निवडणुकीत खणखणीत विजय मिळवून ट्रंपसाहेब लवकरच अध्यक्षपदाची शपथ घेतील आणि राज्यकारभार सुरू करतील.
त्यांच्या मंत्रीमंडळातील अनेक नेमणूका प्रस्थापितांच्या पचनी न पडणार्या आहेत त्यामुळे किती लोकांना सिनेट मान्यता देते ते बघणे रोचक असेल.
शपथविधीला कोण जाणार, कोण आवर्जून टाळणार वगैरे अनेक गोष्टी मोठ्या बातम्या बनत आहे.
पदभार स्वीकारायच्या आधीच अनेक लोकांनी आपले अती पुरोगामी कार्यक्रम रद्द करून आपण नव्या राजाची पालखी उचलायला सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. उदा. मेटाचा प्रमुख मार्क झुकरबर्ग.
हमासचे अतिरेकीही म्हणे ओलिस ठेवलेले ज्यू लोक सोडून द्यायला तयार झालेत. खरोखर तसे झाले तरच ते खरे मानावे लागेल. आता हे म्हातार्याच्या कुशल नेतृत्वाचा परिणाम की ट्रंपच्या सणसणीत धमकीला घाबरून हे होते आहे ह्यावरून अनेक रणकंदने होत आहेत.
कॅनडा, ग्रीनलंड, पनामा कालवा वगैरे अनेक नवनवीन तोंडीलावणी ट्रंपने उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यावरूनही कौतुक, टिंगल, टवाळी, टीका, आगपाखड वगैरे होत आहे.
एफ बी आयने डी ई आय विभाग टाळे लावून बंद केल्याचे घोषित केले आहे.
आमच्या कॅलिफोर्नियात लॉस अॅंजेलिस मधील अग्नितांडवावरून राजकारण, डी ई आय, वगैरे अनेक विषय चर्चेत येत आहेत.
लॉस अंजेलिसची महापौर बाई त्या आगी भडकायच्या वेळेस अफ्रिकेतील घाना नामक दूर कुठेतरी जाऊन बसली होती. अमेरिकन शहराच्या महापौराला अफ्रिकेत काय काम असते आणि करदात्यांच्या पैशाने ही बाई तिकडे का कडमडायला गेली होती हे अनाकलनीय आहे! तशात तुफान वारे येणार आहेत वगैरे पूर्वसूचना असताना त्याकडे दुर्लक्ष करून बाई घान्याला गेल्या. ट्रंप आणि त्याच्या सहकार्यांनी त्यावरही जोरदार ताशेरे ओढले आणि एक नवे रणकंदन सुरू जाहले!
एकंदरीत जोरदार सुरवात होत आहे.
डोलांडला नोबेल कसंही करून
डोलांडला नोबेल कसंही करून हवंय
नोबेल हा माझा जन्मसिद्ध हक्क
नोबेल हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळावणारच!!
- श्री श्री प पु डोलांड
Obamaला कसं मिळालं लगेच?
Obamaला कसं मिळालं लगेच? मलाबी जत्रेत येऊ द्या की.
पापाजीने छह महिनों के अंदर दो
पापाजीने छह महिनों के अंदर दो वॉर रुकवा दी!
तात्यामुळेच उद्धव आणि राज
तात्यामुळेच उद्धव आणि राज एकत्र येताहेत. उद्या मोदींनी राहुलला मिठी मारली तरी नवल नाही. #तात्याचामहिमा
ट्रम्पने निर्णय घेण्याचा
ट्रम्पने निर्णय घेण्याचा धडाका लावताच त्याला खीळ घालण्याचा प्रयत्न अनेक सडकछाप चिल्लर न्यायाधीश करू लागले होते. न्यायासनावर बसून विशिष्ट विचाराने पूर्वग्रहदूषित असणारे अनेक न्यायाधीश डेमोक्रॅट मंडळींनी नेमले होते. ते झारीतील शुक्राचार्य बनून शक्य असेल तिथे ट्रंपच्या कारवायांना आडकाठी करत होते.
काल परवा सर्वोच्च न्यायालयाने ह्या बेबंद judicial activism ला थोडा लगाम घातला गेला असेल अशी आशा आहे.
बेकायदा घुसखोरांची उचलबांगडी हा निवडणुकीचा मुद्दा होता. म्हातार्या बायडनने सीमा सुरक्षेचा केलेला बट्ट्याबोळ हाही निवडणुकीचा मुद्दा होता. लोकांनी ह्या आणि अशा मुद्द्यांकरताच ट्रंपला निवडले होते. पण त्याला दिलेली आश्वासने देखील पूर्ण करू दिली जात नव्हती. त्या प्रकाराला आवर बसेल असे वाटते.
अजून एक चांगला निर्णय म्हणजे अल्पवयीन मुलांची जेंडर अॅफर्मिंग केअर ह्या गोंडस नावाखाली भयानक हार्मोन टोचणे, अवयवांची काटछाट करून जन्माचे नुकसान करणे ह्याला कोर्टाने पायबंद घातला आहे. अनेक डेमोक्रॅट मंडळींना असे अमानुष मार्ग वापरून मुलाची मुलगी आणि मुलीचा मुलगा असा बदल करणे म्हणजे LGBTQA+/!@$*^($)_*}{][ ह्या वंचित गटाला न्याय देणे आहे असे वाटते. त्यांना ब्रेक लागेल अशी लक्षणे दिसत आहेत.
दुसरीकडे डेमोक्रॅटिक पक्षात जी काही धुगधुगी आहे ती कमालीच्या डाव्या किंवा जॅस्मिन क्रॉकेट आणि एओसी सारख्या निर्बुद्ध लोकांचीच दिसते आहे. डेमोक्रॅटिक पक्ष काही सौम्य बनायला तयार नाही. त्यामुळे पुढच्या मध्यावधी निवडणु़कीत काय होते ते बघणे मनोरंजक असेल.
अवयवांची काटछाट करून जन्माचे
अवयवांची काटछाट करून जन्माचे नुकसान करणे ह्याला कोर्टाने पायबंद घातला आहे.
>>>
धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली गुप्तांगांची सर्व धर्मात चालणारी काटछाट पण बंद करणार का?
Trump चे विरोधकही आता
Trump चे विरोधकही आता त्याच्या बाजूने फिरले असतील.
चर्चेचा घोळ न घालवता धडक कारवाई.
>>त्यामुळे पुढच्या मध्यावधी
>>त्यामुळे पुढच्या मध्यावधी निवडणु़कीत काय होते ते बघणे मनोरंजक असेल.<<
हो. पुढच्यास ठेच मागचा शहाणा हि उक्ती डेम्सच्या शब्दकोषात नसावी. सॅनफ्रॅन्सिस्कोने ३-४ वर्षांपुर्वि वोट बँककरता केलेली चूक आता नुयॉर्क सिटि करायला जात आहे. ममदानीने एनवायपिडीचा फंड कमी आणि रेंट कंट्रोल/फ्रीज इ. आश्वासनं दिली आहेत. रामास्वामी म्हणतोय ते बरोबर आहे - नुयॉर्क सिटि इज स्क्रुड...
>>
>>
धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली गुप्तांगांची सर्व धर्मात चालणारी काटछाट पण बंद करणार का?
<<
सुन्ता वगैरे म्हणत असाल तर त्याने लिंगबदल होत नाही. कातडीचा थोडा भाग कापला जातो. अर्थात हे क्रूर आहेच. पण अशा प्रकाराने सदर व्यक्तीचे जन्माचे नुकसान होते असा काही डेटा मला माहित नाही. असल्यास त्यावर जरुर बंदी घातली जावी.
मुलींच्या बाबत असेच काहीतरी केले जाते आणि ते मात्र अमानवी आहे. पण ह्याचा अमेरिकेत इतक्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे का ह्याबद्दल शंका आहे.
पण धार्मिक कारणाने केले जाणारे हे विधी म्हणजे लिंगबदल नाहीत.
जेंडर अॅफर्मिग केअर ह्या नावाखाली केले जाते ते भयंकर असते. अल्पवयीन मुलगा एकदा बाहुलीशी खेळला, नखाला नेलपॉलिश लावले म्हणून त्याचे गुप्तांग छाटण्यापर्यंत मजल गाठणे अमानवी आहे. अनेक ठिकाणी अशा गोष्टींसाठी आईबापांची परवानगी नसली तरी चालेल वगैरे अतर्क्य मोकळिक आहे. एकदा का ही काटछाट झाली की पुन्हा आपले जन्मजात जीवशास्त्रीय लिंग मिळवता येत नाही. जरी आपल्या कृत्याच्या पश्चाताप झाला तरी परतीचे मार्ग बंद होतात. म्हणून अशी बंदी आवश्यक आहे.
आज "त्या" दिवसाचा स्मृतिदिन
आज "त्या" दिवसाचा स्मृतिदिन ज्या दिवशी ट्रंप होत्याचा नव्हता होता होता वाचला. केवळ दैव बलवत्तर म्हणून नाहीतर मृत्यू समीप होता.
बायडन म्हणा किंवा डीप स्टेट म्हणा त्यांच्याकडून एक निकराचा प्रयत्न केला गेला. आणि अमेरिकेच्या सुदैवाने तो फसला.
आजही बटलर पेन्सिल्वेनिया इथला हा भयंकर प्रकार नीट कळलेला नाही. तो घडवून आणणाऱ्या लोकांची पाळेमुळे इतकी खोल आहेत की पुरावे नष्ट करणे , लपवून ठेवणे , दिशाभूल करणे ह्यात संबंधित लोक पारंगत आहेत. ट्रंप सत्तेत आला तरी ह्यात फार फरक पडेल असे दिसत नाही.
केनेडी हत्येबाबत आजही फार काही माहीत नाही. साठ वर्षे होऊन गेली तरी ते अनेक गुपिते गुलदस्त्यात आहेत. इथेही तेच होणार.
पण एक गोष्ट आहे. डिबेट मधे इतका भयंकर वाईट कामगिरी करणारा बायडन शर्यतीत तग धरून होता पण हत्येचा प्रयत्न फसल्यावर मात्र एका दिवसात तो अध्यक्षीय शर्यतीतून बाहेर पडला (किंवा त्याला हाकलून दिले गेले).
जेफ्री एप्स्टीन नामक विकृत
जेफ्री एप्स्टीन नामक विकृत माणूस, त्याची कृष्णकृत्ये आणि त्याची तथाकथित आत्महत्या यावरून अनेकदा गदारोळ, चर्चा वगैरे होत असतात.
ट्रंप सरकारने आम्ही ह्या प्रकरणाचा सखोल तपास करून सर्व अंडीपिल्ली बाहेर काढू असे आश्वासन दिले होते. आत्ता फेब्रुवारीत पॅम बाँडी ह्या न्याय खात्याच्या मंत्रीण बाईने असे सांगितले होते की ह्या प्रकरणाची माहिती विशेषतः ह्या नराधमच्या गिर्हाईकांची यादी अर्थात क्लायंट लिस्ट असणारी फाईल माझ्या डेस्कवर आहे आणि खातरजमा होताच ती सगळ्या जनतेसमोर आणू वगैरे.
परंतु त्याला अनेक महिने झाले आता अचानक ट्रंप सरकारने काखा वर करून ह्यात काहीही दम नाही. एप्स्टीन हा नीच माणूस होता. पण क्लायंट लिस्ट वगैरे काहीही नाही. हे प्रकरण बासनात गुंडाळून ठेवण्याची वेळ झाली आहे.
असल्या सारवासारवीमुळे ट्रंप समर्थकांमधे संताप निर्माण झाला आहे. दोन तट पडले आहे. आम्हाला हे स्पष्टीकरण मान्य नाही म्हणणारे एका बाजूला आणि सारवासारवीला समर्थन देणारे दुसर्या बाजूला.
आणि अर्थातच अनेक शक्यता अर्थात कॉन्स्पिरसी थियर्या मांडल्या जात आहेत.
एक अशी आहे की हा एप्स्टीन इस्रायलच्या मोसादचा हेर होता आणि अल्पवयीन मुली आणि स्त्रिया वापरून त्याच्या बळावर बड्या लोकांना ब्लॅकमेल करून हवे ते राजकीय निर्णय घ्यायला भाग पाडत होता.
अनेक मोठे मोठे लोक (दोन्ही पक्षांचे) ह्यात सामील असल्याचे उघडकीस येईल आणि अमेरिकेत अराजक होईल म्हणून ट्रंप हे प्रकरण गुलदस्त्यात ठेवत आहे.
हा एप्स्टीन तुरुंगात होता. आत्महत्या करण्याची शक्यता असणार्या कैद्यात ह्याचे नाव होते (सुसाईड वॉच लिस्ट) म्हणून जास्तीचा पहारा होता. तरी त्याच्या मृत्यूच्या दिवशी नेमके सगळे व्हिडियो कॅमेरे "तांत्रिक त्रुटीमुळे" बंद पडले. तुरुंगाचे पहारेकरीही नेमके गायब होते आणि अशा अनाकलनीय, गूढ काळात ह्या इसमाने "आत्महत्या" केली. ह्याचेही काही उत्तर सापडलेले नाही. इतक्या संशयास्पद प्रकारे मृत्यू होऊनही त्याची योग्य चौकशी झालेली नाही. प्रकरण गुंडाळून ठेवण्याकडे दोन्ही सरकारांचा कल आहे.
काही ट्रंप भक्त चाहते यांचा नक्की भ्रमनिरास झालेला आहे. जॉर्ज ऑरवेलच्या अॅनिमल फार्मची आठवण येऊ लागली आहे!
टाको एपस्टीन फाईल्सवरुन लक्ष
टाको एपस्टीन फाईल्सवरुन लक्ष उडवायला काय करेल ?
मिलिटरी स्ट्राईक्स ऑथोराईज? कोणावर? इराण पार्ट २? मेक्सिको ड्रग कार्टेल?
छ्या! इतकं कशाला करायला
छ्या! इतकं कशाला करायला लागतंय! विच हन्ट म्हणायचं आणि सोडून द्यायचं!
आता टॅरिफ्सचे परिणाम दिसायला लागले की तसंही सामान्य लोकांचं लक्ष ग्रोसरी प्राइसेसवरून हलणार नाही. त्या एका महिन्यात खाली यायच्या होत्या हे विसरलेच की नाही सगळे?!
टॅरिफ नि एपस्टाइनच्या गोंधळात
टॅरिफ नि एपस्टाइनच्या यामधे लोकांना गुंतवून ठेवले म्हणजे भरपूर भ्रष्टाचार नि पैसे खाणे चालू आहे तिकडे कुणाचे लक्ष जात नाही!
बाकी इथल्या इन्फ्लेशनवर
बाकी इथल्या इन्फ्लेशनवर भारंभार लिहिणार्यांनी जूनचे आकडे बघितले का?
टॅरिफ नि एपस्टाइनच्या यामधे
टॅरिफ नि एपस्टाइनच्या यामधे लोकांना गुंतवून ठेवले म्हणजे भरपूर भ्रष्टाचार नि पैसे खाणे चालू आहे तिकडे कुणाचे लक्ष जात नाही! >>आणि म्हणे अमेरिका ग्रेट. ह्या बाबतीत भारताचीच कॉपी करतोय तात्या
इथल्या ट्रंपद्वेष्ट्यांनी
इथल्या ट्रंपद्वेष्ट्यांनी बेकायदा घुसखोरीचे आकडे किती खाली आले आहेत ते पाहिले आहे का?
शाळेत असताना जेव्हा सर्वप्रथम
शाळेत असताना जेव्हा सर्वप्रथम 'उंदरांच्या भितने घराला आग लावू नये' या वाक्प्रचाराची तोंडओळख झालेली तेव्हा माझ्या बालमनात असा विचार आला की नक्कीच एखाद्या निरुद्योगी इसमाने हा वाक्प्रचार बनवला असणार, असं कुणी करतं का?? असं कोण करेल?? पण आज इतक्या वर्षांनी असं जाणवतंयं की नुसतेच अशी कृती करणारेचं या जगात नसतात, तरं अगदी समोर घरं जळत असताना, उंदीर कसे पळाले यासाठी त्या कृतीचे हिरीरीने समर्थन करणारे समर्थकही त्यांना लाभतात.
आमचे घर आणि आमच्या भागातली
आमचे घर आणि आमच्या भागातली कुठलेही घर जळत नाही आहे. नोंद घ्यावी.

हो, त्या लॉस एन्जेलिसमधे घरे जळत होती तेव्हा डेमोक्रॅटिक महापौर घाना देशात सहल करण्यासाठी गेल्या होत्या. आणि न्यूसम जवळपास असणारे तलाव कोरडे का पडले आहेत ह्याविषयी अचंबा व्यक्त करत होता
बेकायदा घुसखोर थांबवले जात आहेत. जे बायडन कृपेने घुसलेत ते बाहेर हाकलले जात आहेत ह्याबद्दल बहुतांश अमेरिकन समाधानी आहेत. बायडनच्या काळात ह्या घुसखोरांना आदरातिथ्यासाठी मॅनहटन वगैरे चकचकीत भागात उत्तम हॉटेलमधे खोल्या वगैरे फुकटात दिल्या जात होत्या. हल्ली फ्लॉरिडा राज्यात अलिगेटर अल्काट्राझ नामक आलिशान हॉटेलात रहायला जागा देतात म्हणे!
<<
<<
आता टॅरिफ्सचे परिणाम दिसायला लागले की तसंही सामान्य लोकांचं लक्ष ग्रोसरी प्राइसेसवरून हलणार नाही. त्या एका महिन्यात खाली यायच्या होत्या हे विसरलेच की नाही सगळे?!
>>
अहो असं काय करता, ते इन्फ्लेशन चे मोठ मोठे चार्ट्स आणि टेबलं तुमच्या तोंडावर फेकून मारतील परत. आणि असंही अमेरिकन जनता टेरिफ भरत नाहीच. टेरिफ सगळे ते ते देश भरतात
https://www.newsnationnow.com
https://www.newsnationnow.com/business/your-money/egg-prices-fall-econom...
अंड्यांचे प्रचंड वाढलेले भाव हा बायडन काळात एक महत्त्वाचा मुद्दा होता.
आनंदाची गोष्ट म्हणजे ट्रंप काळात सलग तिसर्या महिन्यात अंड्यांचे भाव खाली उतरले आहेत.
ग्रोसरीच्या नावाने ऊर बडवून घेणारे लोक कदाचित आनंदित होतील!
मला वाटलेलं मिलिटरी स्ट्राईक
मला वाटलेलं मिलिटरी स्ट्राईक वगैरे करेल. नाही! टाकोने कोकाकोलाला उसाची साखर वापरायची सक्ती केली आहे!
अंड्यांचे भाव ट्रंप काळात जानेवारीपासून गगनाला भिडलेले ते आता बायडन काळा सारखे झालेत. हा मुद्दा तुम्ही आणलात म्हणून. त्याचा आणि टाकोचा काहीही संबंध नाही.
>>> त्याचा आणि टाकोचा काहीही
>>> त्याचा आणि टाकोचा काहीही संबंध नाही.
असू दे, त्यांना तरी मीजल्सग्रस्तांसमोर मिरवायला काहीतरी हवंच की!
जानेवारी हा काळ बायडनचाच होता
जानेवारी हा काळ बायडनचाच होता. ट्रंपचा शपथविधी २० जानेवारीला झाला. त्यामुळे गगनाला भिडलेले अंड्यांचे भाव हे बायडनचेच कर्तृत्व आहे.
आता तीन महिने ते खाली येत आहेत ते ट्रंपच्या काळात. अजूनही खाली येणे शक्य आहे.
टॅरिफ प्रकरण यशस्वी होते की नाही ते आणखी काळ गेल्यावरच कळेल. तोवर ट्रंप द्वेष्ट्यांनी रडून घ्यायला काही हरकत नाही.
कॅनडाची काय स्थिती आहे? लोकांना घरे परवडू लागली का?
बेकायदेशीर रित्या अमेरिकेत घुसून धुडगूस घालणार्या लोकांना पायघड्या घालून त्यांचे आदरातिथ्य करण्याचा बायडनी मूर्खपणा थांबला आणि बेकायदेशीर कृत्य पुन्हा एकदा गुन्हा या जातकुळीत गणले जाऊ लागले ह्याचा आम्ही सामान्य नागरिक आनंद साजरा करत आहोत.
युक्रेन युद्ध थांबलेले नाही पण निदान अमेरिकन पैशाचा अमर्याद ओघ काहीसा थंडावला आहे हे चांगले आहे. ट्रंपने निदान काहीतरी वेगळा प्रयत्न केला. पुतिन आणि झेलेन्स्की दोघांशी संवाद साधायचा प्रयत्न तरी केला.
इस्रायल हमास युद्ध थांबवायचा प्रयत्न केला आणि त्याला अजून यश आलेले नाही. इराणला वेसण घालण्याचा प्रयत्न केला आहे. बघू कितपत यश मिळते ते.
अनेक पैसे वाया घालवणारे सरकारी उद्योग ट्रंपने बंद केले आहेत. कुठल्याशा गाझामधे कंडोम साठी लाखो डॉलर्स, कोलंबियातील ट्रान्स नाटके बसावीत म्हणून लाखो डॉलर्स वगैरे मूर्ख उद्योग बंद केलेत.
अल्पवयीन बालकांचे लैंगिक अवयव काटछाट करून, त्यांना भयानक रसायने पाजून त्यांच लिंग बदलायचे अघोरी प्रकार कोर्टाच्या मदतीने बंद पाडले. हेही ट्रंपचेच यश.
गुडघ्याला पुरेसा रक्तपुरवठा
गुडघ्याला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही वाचलं. चालायचंच! जास्त हस्तांदोलन करू नका असा सल्ला दिला आहे. जगात कोणी मित्र ठेवलेच नाहीत सगळ्यांना शत्रू केलं की हस्तांदोलन करायलाच नको. हे खरं कारण आहे ट्रेड वॉर मागे.
वॉल स्ट्रीट जर्नलचं आर्टिकल
वॉल स्ट्रीट जर्नलचं आर्टिकल वाचलं का?
मला ते वाचता येत नाहीये. पण त्या बद्दलचं रिपोर्टिंग वाचतोय आणि क्रीपी शिवाय दुसरा शब्द नाही. आता पर्यंत शेकडो गोष्टी लाजिरवाणं कॅटेगरीत होत्या. फीफा वर्ल्ड कप चोरणे हे तर लाज आणणारी गरिबी होती. पण हे ... बादलीचा तळ सरते शेवटी कधी गाठला जाणारे आणि किती लक्तरं निघाली की अमेरिकन नागरिकांना आता बास होणारे देव जाणे.
गुडघ्याला पुरेसा रक्तपुरवठा
गुडघ्याला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही>>>>ओहो आत्ता समजल. काही लोकांची "ती" गुडघ्यात असते. म्हणजे तिकडे रक्त पुरवठा कमी झाला की त्याला म्हणतात "गुडघाचळ"!
<< टाकोने कोकाकोलाला उसाची
<< टाकोने कोकाकोलाला उसाची साखर वापरायची सक्ती केली आहे!>>
सर्वांनी इतर खाणे सोडून दररोज सकाळ संध्याकाळ McDonald मधेच खावे अशीहि Executive order निघेल!
<<आनंदाची गोष्ट म्हणजे ट्रंप काळात सलग तिसर्या महिन्यात अंड्यांचे भाव खाली उतरले आहेत.>>
असे म्हणतात!
गॅस १.९५ ला झाला आहे असेहि म्हणतात.
<<टेरिफ सगळे ते ते देश भरतात Rofl>> असेहि म्हणतात.
अनंत कोटी ब्र्ह्मांड नायक
अनंत कोटी ब्र्ह्मांड नायक बराक हुसेन ओबामा यांनी ट्रंपची २०१६ ची निवड ही रशियाचे कारस्थान होते असे काही करून सिद्ध कराच असा आदेश अमेरिकन गुप्तचर संस्थेला दिला होता असा लेखी पुरावा आहे असा दावा ट्रंपच्या मंत्रीमंडळातील तुलसी गॅबार्ड या सदस्याने जाहीररित्या केला आहे.
गुप्तचर संस्थेने तपास करून असा अहवाल दिला होता की रशियामुळे निवडणुक निकाल बदलला, त्यांनी मतदान यंत्रे हॅक केली वगैरे कुठलाही पुरावा नाही. पण त्याने अनंतकोटी ब्र ना ओबामाजींचे समाधान झाले नाही. ट्रंपसारखा फासिस्ट सत्तेवर येऊ नये म्हणून थोडेफार खोटे बोलले तर काआआआआही हरकत नाही असे त्या थोर माणसाचे विचार असावेत.
अर्थात प्रेसिडेन्शियल इम्युनिटी अर्थात राष्ट्रपतीची कवचकुंडले सुप्रीम कोर्टाने दिल्यामुळे गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा होणे जवळपास अशक्य आहे. पण निदान ढळढळीत पुरावा समोर आणला तर ह्या महात्म्याचा रथ जो कायम दशांगुळे हवेत तरंगत असतो तो थोडा जमिनीवर येईल.
Pages