निवडणुकीत खणखणीत विजय मिळवून ट्रंपसाहेब लवकरच अध्यक्षपदाची शपथ घेतील आणि राज्यकारभार सुरू करतील.
त्यांच्या मंत्रीमंडळातील अनेक नेमणूका प्रस्थापितांच्या पचनी न पडणार्या आहेत त्यामुळे किती लोकांना सिनेट मान्यता देते ते बघणे रोचक असेल.
शपथविधीला कोण जाणार, कोण आवर्जून टाळणार वगैरे अनेक गोष्टी मोठ्या बातम्या बनत आहे.
पदभार स्वीकारायच्या आधीच अनेक लोकांनी आपले अती पुरोगामी कार्यक्रम रद्द करून आपण नव्या राजाची पालखी उचलायला सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. उदा. मेटाचा प्रमुख मार्क झुकरबर्ग.
हमासचे अतिरेकीही म्हणे ओलिस ठेवलेले ज्यू लोक सोडून द्यायला तयार झालेत. खरोखर तसे झाले तरच ते खरे मानावे लागेल. आता हे म्हातार्याच्या कुशल नेतृत्वाचा परिणाम की ट्रंपच्या सणसणीत धमकीला घाबरून हे होते आहे ह्यावरून अनेक रणकंदने होत आहेत.
कॅनडा, ग्रीनलंड, पनामा कालवा वगैरे अनेक नवनवीन तोंडीलावणी ट्रंपने उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यावरूनही कौतुक, टिंगल, टवाळी, टीका, आगपाखड वगैरे होत आहे.
एफ बी आयने डी ई आय विभाग टाळे लावून बंद केल्याचे घोषित केले आहे.
आमच्या कॅलिफोर्नियात लॉस अॅंजेलिस मधील अग्नितांडवावरून राजकारण, डी ई आय, वगैरे अनेक विषय चर्चेत येत आहेत.
लॉस अंजेलिसची महापौर बाई त्या आगी भडकायच्या वेळेस अफ्रिकेतील घाना नामक दूर कुठेतरी जाऊन बसली होती. अमेरिकन शहराच्या महापौराला अफ्रिकेत काय काम असते आणि करदात्यांच्या पैशाने ही बाई तिकडे का कडमडायला गेली होती हे अनाकलनीय आहे! तशात तुफान वारे येणार आहेत वगैरे पूर्वसूचना असताना त्याकडे दुर्लक्ष करून बाई घान्याला गेल्या. ट्रंप आणि त्याच्या सहकार्यांनी त्यावरही जोरदार ताशेरे ओढले आणि एक नवे रणकंदन सुरू जाहले!
एकंदरीत जोरदार सुरवात होत आहे.
परागंदा होण्याचे रेकॉर्ड
परागंदा होण्याचे रेकॉर्ड ब्रेक उदाहरण म्हणजे लॉस एंजेलिस ह्या महाकाय महानगराची Democrat महापौर केरन बास.
त्या शहरात महाप्रचंड आगीचे थैमान सुरू झाले तेव्हा ह्या बाई घाना नामक आफ्रिकेतील देशात सहल करत होत्या. विशेष म्हणजे हवामान खात्याने जोरदार वारे वाहणार, हवा कोरडी आहे, आगीचा मोठा धोका आहे इत्यादी इशारे देऊनही ह्या बाईना ज्या त्या प्रचंड शहराच्या सर्वेसर्वा आहेत त्यांना आपली आनंद सहल रद्द करून ह्या संभाव्य धोक्याला तोंड द्यायची तयारी करावी, संबंधित यंत्रणा सज्ज आहेत की नाहीत ते पाहावे इत्यादी महापौरी कामे करावीत असे वाटले नाही. आणि हो, ही घाना देशाची सहल सरकारी खर्चाने झाली होती हे इथे आवर्जून नमूद केले पाहिजे.
नंतर जेव्हा आग लागली आणि यथावकाश तिने रौद्र रूप घेतले तेव्हा काही दिवसांनी बाई आपल्या आनंद यात्रेहून नाईलाजाने परतल्या.
आपणास आपण अशा यात्रेवर गेल्याचा पश्र्चाताप होतो आहे का असे एका पत्रकाराने विचारले असता त्यांनी त्या प्रश्नाला उत्तर दिलेच नाही. कित्ती छान!
टेड क्रुझ हा सिनेटर. राज्याचा कारभार हाकणे ही त्याची जबाबदारी नाही..राज्याचे प्रश्न केंद्रीय पातळीवर मांडणे हे त्याचे काम.
मात्र महापौरांचे तसे नाही. शहराचा कारभार करण्याचा पूर्ण जिम्मा त्यांच्या डोक्यावर असतो. पण तरी ह्या बाई ऐन मोक्यावर परागंदा झाल्या होत्या. Democrat पक्षासमोर हा एक नवा आदर्श घालून दिला आहे ह्या बाईंनी.
साउथ पार्कच्या उद्याच्या
साउथ पार्कच्या उद्याच्या एपिसोडच्या टीजर मधली इमेज वापरुन आईस ने रिक्रुट करायची जाहिरात करुन ट्विस्ट केला. त्यावर साउथपार्कचा एपिक रिप्लाय!
व्हाईटहाऊसचं आता माझी (परत एकदा) सटकली होणार आहे!
लॉस एंजेलिस मध्ये पुन्हा आगी
लॉस एंजेलिस मध्ये पुन्हा आगी लागल्या आणि पुन्हा त्या महापौर सहलीला गेल्या?
---
रिलायन्स रशियन कच्चे तेल आयात करून प्रोसेस्ड प्रॉडक्ट्स अमेरिका आणि युरोपला विकते. सगळाच ढोंगीपणा आहे.
--
US President Donald Trump on Tuesday reacted to India citing the United States doing trade with Russia and yet criticising New Delhi for doing business with Russia. "I don't know anything about it, I'd have to check, but we'll get back to you on that," he said in reply to a reporter's question
--
भारत रशियन तेल आयात करून वॉर मशीन्स चालवतो. अमेरिका मात्र पॅलेस्टाइनमध्ये अन्न छत्रे आणि पाणपोया चालवायला फंडिंग करतं.
कुणी किती टिंगल केली तरी ICE
कुणी किती टिंगल केली तरी ICE सारखी यंत्रणा आपले काम चोख करत रहावी आणि अमेरिकेचा कॅनडा होऊ देऊ नये हीच इच्छा.
बेकायदा घुसखोरांना हुसकावून लावलेच पाहिजे.
लॉस एंजेलिस मध्ये पुन्हा आगी
लॉस एंजेलिस मध्ये पुन्हा आगी लागल्या आणि पुन्हा त्या महापौर सहलीला गेल्या? >> टेप अडकलेली आहे. काहीच मनासारखं न घडल्याने आणि पायाखालची जमीन सरकू लागल्याने नेहेमीचे अद्वातद्वा बोलणे चालू झालेले आहे. चालूद्या!
अंजली, भरत +१. सगळा ढोंगीपणा आहे.
Effort to recall Karen Bass
Effort to recall Karen Bass dies after uproar over LA fires
आणि त्या ICE च्या विरोधात भूमिका घेतात, हे कारण का?
त्यातून अश्वेत आणि स्त्री.
टेड क्रुझ परागंदा होणे हा
टेड क्रुझ परागंदा होणे हा विषय अकारण उकराला गेला..म्हणून प्रत्युत्तरा दाखल के बास ह्या थोर बाईचा उल्लेख केला. तो Democrat समर्थकांना बोचतो ह्याची नम्र जाणीव आहे. पण इतका भयानक निष्काळजीपणा, बेपर्वाई, ढिसाळ कारभार तोही इतक्या महाकाय, अमेरिेकेतील २ नंबरच्या शहरा साठी. विसरता विसरत नाही.
आणि काही जमीन वगैरे सरकत नाही. कदाचित Democrat लोकांच्या पायाखाली जमीन सरकत असेल.
ओह... टेड क्रुझ चा जोक
ओह... टेड क्रुझ चा जोक जिव्हारी लागला का!
तो जोक लिहिला तेव्हा मला पण जाम आवडलेला, तुम्हाला पण इतका आवडला सांगितल्याबद्दल धन्यवाद!
तुम्हालाही करेन बास च्या
तुम्हालाही करेन बास च्या सरकारी खर्चाने केलेल्या सहलीचा किस्सा
पुन्हा एकदा आवडला असेल अशी आशा!
कुठलाही ठोस डेटा नसतांना
कुठलाही ठोस डेटा नसतांना फेंटॅनील चे कारण सांगून कॅनडा साठी अमेरिकेने ३५ % टॅरिफ लावला.
रशिया कारण पुढे करुन भारताला २५ % ( किंवा अधिक ) टॅरिफ लावणार आहे. त्याच वेळी अमेरिका स्वत: रशिया कडून युरेनियम आयात करत आहे . हम करे सो कायदा असा प्रकार आहे. F35 ( किंवा अजून काही अत्याधुनिक वाटावे असे पण महाग डी युद्ध सामग्री ) भारताच्या गळ्यात मारायचे आहेत का?
दिल्ली मधे ट्रम्प निवडून यावा
दिल्ली मधे ट्रम्प निवडून यावा साठी यज्ञ झाले. ट्रम्पचे सत्तेवर येणे आणि ट्रम्प-धोरणे भारतासाठी हिताचे रहातील असे मानणारा एक मोठा वर्ग मायबोलीवर आहे. आज त्यांची मते जाणून घ्यायला आवडेल.
ट्रंप यांना आता नोबेल
ट्रंप यांना आता नोबेल पुरस्कार द्यावाच लागेल..
https://www.instagram.com/reel/DM2tIClhc2k/?igsh=MW01OGU3ODVzdHczcQ==
चीन इतकं खोर्याने रशियन ऑईल
चीन इतकं खोर्याने रशियन ऑईल घेतं तरी चीन वॉर मशीनला पैसे पुरवतात म्हणून तिकडे टेरिफ लावलेले नाहीत. भारतावरचे आणखी २५% वाढवून ५०% केले.
यात रशियन ऑईल हा अर्थात दिखावा आहे. जसं कॅनडाहुन फेंटेनल येते ही शुद्ध धूळफेक होती. अमेरिकेतील बरेचसे आयफोन आता भारतातून येतात त्यामुळे अॅपलला कार्वआऊट डील मिळालं नसेल तर ते मिळेल. अॅपलचे शेअर्स घ्या.
बाकी भारताला एल्बोज अप पाठिंबा!
https://www.npr.org/2025/08
https://www.npr.org/2025/08/04/nx-s1-5453731/nasa-carbon-dioxide-satelli...
The Trump administration has asked NASA employees to draw up plans to end at least two major satellite missions, according to current and former NASA staffers. If the plans are carried out, one of the missions would be permanently terminated, because the satellite would burn up in the atmosphere.
The data the two missions collect is widely used, including by scientists, oil and gas companies and farmers who need detailed information about carbon dioxide and crop health. They are the only two federal satellite missions that were designed and built specifically to monitor planet-warming greenhouse gases.
छपरी ची धाव छप्परा पर्यंत!
छपरी ची धाव छप्परा पर्यंत!


न्युक बांधतो म्हणे. लाव कुठेगी न्युक लाव, पण न्यूक दाखवाची हाताची अॅक्शन तर किती विनोदी असावी!
लुईविल, ओहायो मधील नदीच्या
लुईविल, ओहायो मधील नदीच्या पाण्याची पातळी जे डी ने फॅमिली व्हेकेशन मध्ये कायाकिंग करायला मजा यावी म्हणून आर्मी कोर ऑफ इंजिनियर्स करवी तात्पुरती वाढवून घेतली.
पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर स्वतःच्या फायद्यासाठी वाकवणारे आणखी कुठले कुटुंब तुम्हाला आठवते?
पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर
पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर स्वतःच्या फायद्यासाठी वाकवणारे आणखी कुठले कुटुंब तुम्हाला आठवते?##भारतात असता तर 'नेहरू' असे उत्तर दिले असते
भ्रमर
भ्रमर
<< न्यूक दाखवाची हाताची अ
<< न्यूक दाखवाची हाताची अॅक्शन तर किती विनोदी असावी! >>
------- न्यूक म्हणतांना हाताच्या अॅक्शनने ( हिरोशिमा - नागासाकी आणि ) " mushroom cloud " दर्शवत असेल. "स्मित:
>>पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर
>>पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर स्वतःच्या फायद्यासाठी वाकवणारे आणखी कुठले कुटुंब तुम्हाला आठवते?
ट्रंप बटलर पेन्सिल्वेनिया इथे एका रॅलीत भाषण देत होता तेव्हा त्याच्या रक्षणासाठी असणारे दल तुटपुंजे होते. त्यापेक्षा कितीतरी कमी उपस्थिती असणारा जिल बायडनचा कार्यक्रम जो पूर्ण इन्डोर होता जो त्याच दिवशी होता तिला मात्र कैक पट जास्त सिक्रेट सर्विसचे सदस्य पुरवले होते.
अर्थात हे चुकीने, ढिसाळपणामुळे झाले नसेलही. ट्रंप मारला जावा म्हणून मुद्दामच त्याला कमी सुरक्षा दिली गेली असावी.
जे डी वान्स चे सुरक्षा दल उपराष्ट्रपतीला व्यवस्थित सुरक्षा देऊ शकेल म्हणून जास्तीचे पाणी सोडण्यात आले असे अधिकृत उत्तर संबंधित विभागाने दिले आहे. अर्थातच ट्रंप व्हान्स द्वेष्टे ह्यावर विश्वस ठेवणार नाहीत आणि जे डी व्हान्स आणि कुटुंबियांना जलक्रीडा करता यावी म्हणूनच हे केले गेले असेच ते ठासून सांगतील याची खात्री आहे.
<<जे डी वान्स चे सुरक्षा दल
<<जे डी वान्स चे सुरक्षा दल उपराष्ट्रपतीला व्यवस्थित सुरक्षा देऊ शकेल म्हणून जास्तीचे पाणी सोडण्यात आले असे अधिकृत उत्तर संबंधित विभागाने दिले आहे. अर्थातच ट्रंप व्हान्स द्वेष्टे ह्यावर विश्वस ठेवणार नाहीत >>
अर्थातच नाही. दुसर्या बाजूचे ते सगळे खोटे, आपले तेव्हढे खरे.
जो मोठ्याने बोलेल नि पुनः पुनः येच तेच सांगेल ते खरे.
दोन्ही बाजू खोट्या बातम्या देण्यात चढाओढीत.
टेरिफ्स मुळे बिलियन्स अँड
टेरिफ्स मुळे बिलियन्स अँड बिलियन्स डॉलर्स येत असताना, कॅटरपिलर आणि इटॉन सारख्या कंपन्या सेकंड क्वार्टर च्या प्रोफिट्स मधे काही बिलियन डॉलर्स ची कमी दाखवतायेत. बाकीचे देश एवढे टेरिफ देत असताना ह्या अमेरिकन कंपन्यांचा प्रॉफिट का कमी व्हावा बरे? नक्कीच काहीतरी काळंबेर असेल.
या कंपन्यांनी पुढच्या क्वार्टर च्या प्रोफिट्स मध्ये पण टेरिफमुळे कमी येण्याचे संकेत दिले आहेत. इतकं खरं बोलतायेत म्हणजे अजून वरून डिअर लीडर कडून डट्ट्या आलेला दिसत नाहीये.
टाकोने ज्याला मारायचा प्रयत्न
टाकोने ज्याला मारायचा प्रयत्न केला तो तात्याचा जुना मित्र म्हणतोय की टेरिफ मुळे अमेरिकन कंपन्यांचं नुकसान होतंय.

संरक्षण मंत्र्यांच्या मते
संरक्षण मंत्र्यांच्या मते बायकांना मतदानाचा अधिकार असण्याची काही गरज नाही.
मायबोलीवरच्या टाको समर्थकांच्या मनातलंच बोलला जणू
सर्वांची नजर आता ट्रम्प -
सर्वांची नजर आता ट्रम्प - पुतीन शिखर परिष देकडे लागले आहेत. पण land swap साठी युक्रेन तयार होईल असे वाटत नाही.
तिकडे गाझा चिघळतच आहे. संपूर्ण गाझावर नियंत्रण मिळविण्याची योजना आहे. आधी हॉस्पिटल, शाळा यावर हल्ले करुन अनेक निरपराधी मारल्या जात . आता तर अन्न वितरण होत असतांनाही हल्ले केले जात आहे ज्यामधे शेकडो बालके, महिला मारल्या जात आहे. हे अन्न वितरण नसून डेथ ट्रॅप आहे
दोन्ही ठिकाणी शांतता करार झाल्यास ट्रम्पला नोबेल पुरस्कार नक्की मिळेल. नाही तर नॉर्वेवर १०० % टेरिफ लावला जाईल.
आर्मेनिया नि अझरबैजान मधे
फ्रान्स व जर्मनी मधले युद्ध, मलेशिया व सिंगापूरमधले युद्ध, पोलंड व कझाकास्तान मधले युद्ध, सुरु होण्यापूर्वीच त्रंपनेच थांबवले, हे तुम्हाला माहितहि नसणार. कदाचित शेंडेनक्षत्रांनाहि माहित नसणार, नाहीतर ते आलेच असते सांगायला
या बद्दल तर नक्कीच नोबेल पीस प्राइझ द्यायलाच हवे.
https://x.com/ashajadeja325
https://x.com/ashajadeja325/status/1954627067498410424
@ashajadeja325
·
Dear India : do NOT give away our strategic war chest to Pakistan! Over 25 years of hard work, we have developed a strategic strength with US that cannot be frittered away for any reason. Respectfully, may i recommend we take following actions after the Parliament breaks for recess?. 1. THANK Trump (discreetly at first) for his role in diluting Chinese military help to Pakistan during Sindoor. 2. Get QUAD to nominate him for a Nobel ? Maybe this way we can nominate him in a face saving manner. if nothing else at least say thank you to him. 3. Except for agriculture let’s give the United States a favorable deal and continue to stay away from EU & China on trade. The last thing we want is Pakistan becoming a diplomatic hub where they invite Xi and Trump for a meeting in the region, orchestrated and curated by them. Please do not give away our American goodwill to the bozos in Pakistan. We have too much to lose if we do not play this game correctly. Money is the least of our worries.
इथलं कोण कोण या ताईंशी सहमत आहे ? हात वर करा. लाजू नका.
भारताने उगा केवळ 'पाकिस्तान
भारताने उगा केवळ 'पाकिस्तान फोमो' ला बळी पडून निर्णय घेवू नये.
बाकी जपानच्या $५५० बिलियन गुंतवणूकीबाबत तर काय काहीही वल्गना करुन झाल्यात. आता असे काय कुणी उचलून सगळे पैसे देत नसते. जपानही १-२% डायरेक्ट गुंतवू बाकीचे लोन म्हणत आहे. अजून ऑन पेपर काहीही नसताना यांचे ढोल बडवणे सुरु! $५५० बिलियन सायनिंग बोनस काय , हा न्यू मनी आम्हाला हवा तसा उधळू, आपलं गुंतवू काय! आता जपानला म्हणे 'चुकून' stacked tariff लावलेत. चूक सुधारु, रिफंड देवू असे म्हणत आहेत खरे पण त्याला काही टाईम लाईन नाही तोवर जपानच्या बीफ वर ४१% टॅरीफ. जपानकडे सध्या १.२ ट्रिलीयनचा US debt आहे तर त्यांच्याशी व्यवहार करताना ही अवस्था! आता हा असा सावळा गोंंधळ म्हणजेच इफिशियन्सी की काय कोण जाणे.
जपान ट्रेडिंग डील (!!! )
जपान ट्रेडिंग डील (!!!
) मध्ये अशाच अजुन पुष्कळ गमतीजमती आहेत. टाकोला कशातलं काही कळत नाही आणि जपानने त्याला गुंडाळुन ठेवलं आहे.
भारताने वेळ प्रसंगी चीनला आपलं करावं. ईयु, रशिया, युके बरोबर चांगले संबंध आहेत ते वृद्धींगत करावे. अमेरिका बेभरवशी कारभार आहे, त्यांना जगातील कोणाची गरज नाही अशा वल्गना करायच्या असतील तर आपण फक्त आपलं बघावं. टाकोला गेलास खडड्यांत म्हणावं. तोच अॅटिट्युड फळाला येताना दिसतो आहे.
उद्या/ परवा क्न्झ्युमर प्राईस इंडेक्स, महागाई इ. आकडे येतील. तिमाही आकडे सीझन चालूच आहे. ८० वर्षांच्या टाकोला आज गाजर दाखवलं तर उद्या तो विसरुन स्टिकच बाहेर काढणार असेल तर आजतरी गाजर कशाला दाखवा!
<<<उद्या/ परवा क्न्झ्युमर
<<<उद्या/ परवा क्न्झ्युमर प्राईस इंडेक्स, महागाई इ. आकडे येतील >>>> म्हणजे त्या डिपार्टमेंटच्या मुख्याची हकालपाट्टी!
Pages