क्रिकेट - ९

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राहुलचा कॉलच चुकीचा होता पंत धावबाद झाला तो.
रेड्डी जडेजा भागिदारीत सुद्धा किमान तीन वेळा रेड्डी आउट होता होता वाचला.
रनिंग बिटवीन द विकेट्स अगदीच गंडलंय.

करुण नायरची शेवटची टेस्ट मॅच असेल ही ! क्रिकेटनी चान्स दिला पण घालवला त्याने.

फेफजी, दोन्ही मुद्द्याशी पूर्ण सहमत !
( अर्थात, माबोवरील कुणीच तज्ञ सामना पाहून कॉमेंट करत नसूनही आपली पोरं खजील न होता इतका स्कोअर करताहेत, हेही नसे थोडके !! Wink )

Very good passage of the play. बॅट आणि बॉलमधे कडक सामना चालू आहे. स्टोक्स जबरदस्त स्पेलमधे आहे. रूट त्याला चांगली साथ देतोय. जडेजा-सुंदर त्यांना मस्त खेळून काढतायत. शक्य तिथे अ‍ॅटॅक करतायत. ही मॅच दुसर्या इनिंगवर निर्णायक होण्याची चिन्हं आहेत.

भाऊ Lol

प्रेक्षक म्हणून आम्हाला रजेचा हक्क असावा असं मला मनापासून वाटायचं. / एकदा तर माझा बॉस व मी दोघेही दांडी मारून स्टेडियममध्ये अचानक एकमेकांसमोर आलो होतो !! >> Lol

राहुलचा कॉलच चुकीचा होता पंत धावबाद झाला तो. >> राहुलने कॉल दिला होता का ? मला वाटले पंत ने बॉल ड्रॉप केला नि धावला. खरच गरज नव्हती त्या धावेची Sad पंत वि. स्टोक्स कसले मस्त झाले होते त्या आधी. स्टोक्स आल्यावर शॉर्ट पिच मारा त्याच्यावर पण असेल का ?

गोलमाल?

ब्रेकच्या आधी राहुलचे शंभर व्हावे, म्हणून राहुलला फलंदाजी देण्यासाठी पंत धाव घेऊ इच्छित होता. त्याचे नि आपले दुर्दैव की स्टोक्स ने फेकलेला चेंडू त्रिफळ्यांवर आपटला.

आधीच कसोटीसामने कंटाळवाणे, त्यातहि या तिन्ही सामन्यात खेळाडूंचा वेळकाढूपणा राग आणतो.
आज क्रॉलीचे रडणे, गिलने परत न जाता तिथेच फिजिओला बोलावून पाठ चोळून घेणे, काय काय करत असतात.
इंग्लंदच्या जुन्या कॅप्टन व्हीनने म्हंटल्याप्रमाणे यांना नुसता पैशाचा दंड करून काही उपयोग नाही, त्यांच्या जवळ भरपूर पैसा आहे, नि त्याची मुजोरी पण असेलच,

हम करे तो रास लीला दुसरे करे तो क्याराक्टर ढीला.
हा गिलचा अटिट्युड पटला नाही. तसेच तुम करो कीपिंग मै करुंगा बॅटिंग हे कसे काय चालते?

This is a heatwave Test. Everyone is on edge.
Southee said India’s actions earlier in the match, which have included multiple requests to change balls, extended impromptu drinks breaks, batters running off to visit the toilet and occasional interventions by their own physio – already 32 overs have been lost from the game because of slow play – meant they were unable to occupy the moral high ground.

“I’m not sure what they’re complaining about when Shubman Gill’s lying down getting a massage in the middle of the day yesterday,” he said. “It’s never ideal, I don’t think [to lose so much play]. But it’s obviously been hot, so there’s been more drinks than usual. There’s been a number of stoppages with the ball. Also, DRS takes time. There’s been a number of stoppages but I guess to lose that much, it’s probably at the extreme level.”
--------------from Guardian

* .....which have included multiple requests to change balls, * आर्चरने सुद्धा अशा विनंत्या केल्या होत्या.
* गोलमाल? * मला तो प्रसंग व अमोल पालेकरचा चेहरा आठवत होता पण सिनेमाचं नांव नव्हतं आठवत. धन्यवाद, केशवकूलजी. ( अर्थात, मी त्यावरून माझी आठवण नाही तयार केलेली: त्यांनी माझी कॉपी मारली की नाही, माहीत नाही ! Wink )

भाऊ
अमोल पालेकरचा चेहरा आठवत होता. >>>> कोणता? मिशीवाला का बिनमिशीवाला ?
गिल क्रॉलीला काय म्हणाला माहीत आहे?
"Grow your balls."
याबद्दल बहुतेक त्याला दंड होईल.
पण ह्यांच्या जवळ पैसा अमाप आहे त्यामुळे पर्वा इल्ले.

>> राहुलने कॉल दिला होता का ?

पंतने पुश केला होता आणि दोन सेकंद बॉल वॉचिंग करत होता. तेव्हड्यात समोरुन राहुल जवळ जवळ मिड पिच पर्यंत पोचला होता. इथे पंत अडखळला आणि मग धावला..पण नाही पोचू शकला.

लंच पूर्वीची शेवटची ओव्हर म्हणून लाईव्ह टीव्ही बघत होतो. म्हणून म्हटलं राहुलची चूक होती. ब्रेक पूर्वी त्याला एक रन काढून शतक पूर्ण करण्याची घाई झाली असावी असं वाटलं असामी.

*पण ह्यांच्या जवळ पैसा अमाप आहे त्यामुळे पर्वा इल्ले.* -
दंड व पैसे भरण्याची ऐपत यापेक्षाही गिल सारख्या नवीन कर्णधाराने , तेही भारताच्या, स्वतःची अशी इमेज होवू देणं हे खूप चुकीचं वाटतं !!!

हमाममी सब नंगे.
पंत ड्युक बाल्सच्या मागे का लागला आहे?
त्याचे गुपित समजून घेण्यासाठी वाचा.
The ball used in England is made by Dukes, a British company. Dukes is competing for a BCCI contract to become official ball supplier to Indian cricket. Their chief competitor is Sanspareils Greenlands, or SG, who have been the monopoly suppliers since 1994.
Take a guess who SG’s most visible brand ambassador is? Yes. It’s Rishabh Pant.
The player describing the ball as “a big problem” and “not good for cricket” is on the payroll of the company Dukes is threatening with its planned expansion into India.
When Pant threw the Dukes ball on the turf in disgust he was wearing a pair of SG gloves. The next day he was posted on the SG Instagram account cradling an SG bat, looking chic and sultry and loved-up. This is the vice-captain of the India team. Good luck with that contract, chaps.
--------------Barney Ronay at Lord's
https://www.theguardian.com/sport/2025/jul/12/cricket-dukes-ball-england...
इथे वाचा.

केकू त्याच्याच पुढे जे आहे ते असे आहे
In reality, nobody is seriously suggesting these two things are linked, that Pant is involved in some kind of plot to defame the Dukes just because the BCCI contract is huge and because SG pay him to promote their products. It is seriously reaching to imagine any kind of conspiracy angle here. Stuart Broad has also been hugely critical of the Dukes. Is he also in the pay of Big Ball? Has the lacquer-industrial complex got to Broady?

Happy

ड्यूक बॉल बद्दलचा गदारोळ काऊंटी क्रिकेटमधेही सुरू आहे नि तोही दोन समर आधी चालू झाला आहे ना ?

इंग्लंड 172 - 6 !!!
सुंदरचे दोन महत्त्वाचे बळी. चेंडू वळतो आहे ही विशेष लक्ष द्यावी लागणारी बाब, आपली फलंदाजी शेवटी म्हणून . पण भारत जिंकण्याची ही संधी सोडणार नाही, अशी रास्त अपेक्षा !!!

२०० च्या आत गुंडाळा नंतर घाई न करता खेळा. उगाच लंच आधी कुणाचे तरी १०० वा ५० व्हावे म्हणून घाई करू नका.

लंच पूर्वीची शेवटची ओव्हर म्हणून लाईव्ह टीव्ही बघत होतो. म्हणून म्हटलं राहुलची चूक होती. ब्रेक पूर्वी त्याला एक रन काढून शतक पूर्ण करण्याची घाई झाली असावी असं वाटलं असामी. >> हायलाईट्स मधे नीट दिसत नव्हते कि कोणी कॉल केला होता ते पण चुकीचा कॉल नि रीस्पॉन्स होता असे नक्की म्हणू शकतो. राहुलनेही नंतर नीट स्पष्ट नाही केले. https://www.espncricinfo.com/story/eng-vs-ind-kl-rahul-says-rush-for-cen... रूट रात्रभर ९९ वर राहिला होता तेंव्हा लंच ब्रेक क्या चीज है ! ही मॅच हरलो तर राहुलचा कॅच नि हा रन आउट ही दोन ठळक कारणे म्हणता येतील. राहुल तसे होउ देणार नाही अशी आशा ठेवूया Happy

च्च! आमच्याकडे पहाटे ६ वाजता मॅच सुरु होते. नि मी तर सकाळी साडेआठ नऊ ला उठतो. त्यामुळे सगळी मॅच बघता येणार नाही, पण लंच नंतर थोडा वेळ चालली तर चहा पिता पिता बघता येईल. भारताने जिंकावे अशी मनोमन इच्छा आहे
गिल व जैस्वाल यांनी या सामन्यात निराशा केली. नायरनेहि जास्त धावा करायला पहिजेत. माहीतर पुढच्या सामन्यात साई सुंदरन ला संधि द्यावी.

*भारताने जिंकावे अशी मनोमन इच्छा आहे* +१
*...मराहुल तसे होउ देणार नाही अशी आशा ठेवूया * +१
*पण आपण जिंकू. एक पार्टनरशिप पाहिजे.* +१
शुभेच्छा !!!

जीतेगा भाई जीतेगा. भारत मेरा जीतेगा.
फक्त माजोरी पणा नको नाटक नको. झोपून स्कूप मारायचा हास्यास्पद प्रकार नको.
त्याला क्रिकेट नाही म्हणत.
के एल राहुल सारखे खेळलात तर का नाही जिंकणार?
सर कुठे आहेत? त्यांनी जोर लगाके हैय्या करायला पाहिजे.

कोहली आणि शर्मा इंग्लंडचे नागरिक झाले तेव्हा मी पण विचार केला की भारतात आता काही उरलं नाही. लगेच मी पण इंग्लंडच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला आणि तो मंजूर पण झाला. आता मी पण ब्रिटिश नागरिक असल्यामुळे आमची टीम जिंकते यात आनंद आहेच.

Hey Indians how are you? We are winning. उंघली दिखाथे हाउ.

@ केशवकूल,
शनिवार रविवार मित्रांसोबत पिकनिकला होतो. त्या आधी सुद्धा त्यातच बीजी होतो.

सामन्याची क्षणचित्रे आणि स्कोअर फॉलो केला अध्येमध्ये..
पहिल्या डावातील पंतचा रनआऊट आपल्याला भारी पडला. निर्णायक ठरला. तेव्हा छोटा मोठा लीड मिळाला असता तर त्या धावांची किंमत आता दुसऱ्या डावात पटींनी वाढली असती.

आणि तो रन आऊट वैयक्तिक शतकाच्या चक्करमध्ये आला. म्हणून मी म्हणतो हे वैयक्तिक माईलस्टोन डोक्यात चालू असले की त्याचा परिणाम खेळावर होतो. बरेचदा बसणारे फटके अप्रत्यक्ष असल्याने कोणाला ते कळत नाहीत किंवा कळून कोणी मान्य करत नाहीत. कारण ते स्कोअरकार्डवर रिफ्लेक्ट होत नाहीत. कुठे आकड्यात येत नाहीत.

गिलची काल रात्री फलंदाजी लाईव्ह पाहिली जे काही दोनचार बॉल खेळला त्यात बिलकुल फोकस वाटला नाही. तो ठसन ठसन खेळत होता त्यात वाहावत गेला..

Pages