क्रिकेट - ९

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

“बरोबरी करून तिथे थांबला हा जात योग्य ट्रिब्युट असे म्हणता येईल का ?” - बरोबर. तो ट्रिब्यूटच होता ब्रॅडमनला. ह्या अँगलने तुझं म्हणणं योग्य आहे. दुसर्या बाजूने एका ऑसीने ब्रॅडमनचा रेकॉर्ड मोडून त्याची पताका वाहिली असती असाही एक अँगल आहे. असो. जे झालं ते एक चांगल्या भावनेतून आलेलं जेश्चर होतं. त्याचं कौतूक आहे.

लाराच्या ४०० विषयी: ती ४ मॅचची सिरीज वेस्ट इंडीज ऑलरेडी ३-० ने हारले होते. विंडीजची बॅटिंग मोठ्या प्रमाणात अयशस्वी ठरली होती (४७, ९४ मधे ऑल-आऊट झाले होते). लाराच्या स्वतःच्या फॉर्मवर बरीच टीका झाली होती. त्यामुळे ती इनिंग हे एक स्टेटमेंट होतं असं मला वाटतं.

बाकी सातत्याने ह्या प्लॅटफॉर्मवर ‘मी-मी, माझं-माझं‘ करून इतरांना वात आणणार्याने ‘टीमवर्क’ विषयी बोलणं हा मजेशीर विरोधाभास आहे.

त्यामुळे ती इनिंग हे एक स्टेटमेंट होतं असं मला वाटतं. >> येस मीही तेच टाकलय बघ. मी ती इनिंग पाहिली होती. तेंव्हा सचिन-लारा ह्यात नेहमी सचिनच्या बाजूने हिरीरीने उतरणार्‍या मलाही लाराच्या त्या माईलस्टॉनचे भयंकर कौतुक वाटले होते ( खोटं कशाला बोला - सचिन पण कधी तरी ह्या भोज्याला हात लावेल अशी आशाही वाटून गेली होती. )

दुसर्या बाजूने एका ऑसीने ब्रॅडमनचा रेकॉर्ड मोडून त्याची पताका वाहिली असती असाही एक अँगल आहे. >> खरंय !

ती ४ मॅचची सिरीज वेस्ट इंडीज ऑलरेडी ३-० ने हारले होते.
>>>>

एक्झॅक्टली!

अश्यावेळी शेवटचा सामना जिंकून स्वतःला सिद्ध करायचे असते न की त्यात ४०० मारून

असो,
आपला खेळाकडे बघायचा दृष्टिकोनच वेगळा आहे Happy

माझ्या त्या पोस्ट मधे "भारताने जिंकायचा प्रयत्न न करता " हे कुठे लिहिले आहे हे दाखवतोस ?
>>>>>>>>>>>>>

ओके, तुमचीच पोस्ट कॉपी पेस्ट करतो.
-----------

शक्य असेल तर दुसर्‍या इनिंगमधे होईल तितका वेळ बॅटींग करायची . अगदी दोन दिवस पूर्ण करायला लागली तर तेही करायचे. डीक्लेअर वगैरे करत बसायचे नाही. (अगदीच माज दाखवायचा असेल तर दहा ओव्हर मधे दोनशे वगैरे असे टारगेट देऊन चेष्टा करायची बाझबॉलची Wink ) पिच नि आपले बॉलर ह्या काँबोमधे त्यांची दुसरी इनिंग गुंडाळता येईल असा विश्वास मला वाटत नाही. त्या ऐवजी छान बॅटींग चा सराव करून घ्या. त्यांचे बॉलर्स नि मुख्यत्वे फिल्डर्स थकतील हाही फायदा.
---------

नवीन व्हेन्यू , नवीन पीच , नवे डावपेच ..
... बघू कोण, कसं सरस ठरतंय ! अर्थात, लॉर्ड्सवर आपली कामगिरी संस्मरणीय व्हावी, ही भावना प्रत्येक पाहुण्या संघाला व खेळाडूला खेळ उंचावण्याला अधिक प्रेरणादायी ठरत असावी. बघू त्याचाही फायदा आपल्याला होतो का व किती होतो ! शुभेच्छा !!

ओके, तुमचीच पोस्ट कॉपी पेस्ट करतो. >>> १० विकेटस घेण्याचा काँफिडन्स मला वाटत नाही तेंव्हातसेशा परिस्थितीमधे किमान काय केलेले आवडेल असे म्हणतोय. तुला समजेल अशा शब्दामधे सांगायचे "सामन्यामधे फेवरीट कसे राहायचे" ते सुचवतोय.

नवीन व्हेन्यू , नवीन पीच , नवे डावपेच .. >> स्लोप चे काय होणार देव जाणे ! आपण पण फायदा उठवू अशी आशा ठेवतो. त्याच बरोबर लॉर्ड्स ओव्हरेटेड आहे असे माझे मत आहे हेही नोंदवतो.
वैधानिक इशारा : वरील पोस्ट मधून कुठेही भारताने जिंकण्याचा प्रयत्न करू नये असे पोस्ट्कर्ता सुचवत नाहिये. तसे वाटल्यास तो खुशाल वाचणार्‍याचा दोष समजावा.)

(भाऊ त्या पोस्ट मधे पहिले वाक्य भारताने जिंकण्याचा प्रयत्न करावाच हे वाक्य पहिलेच लिहून ठेवा नाहितर धाग्यावेताळाचा फेरा लागतो)

*भारताने जिंकण्याचा प्रयत्न करावाच हे वाक्य पहिलेच लिहून ठेवा नाहितर...* -
ज्या वेळी भारत जिंकणं ही शक्यताही नसे, तेंव्हाही भारताच्या बाजूने अगणित पैजा लावून हरणारा , त्या काळात भारताने ड्रॉ केला तरी आनंदाने बेभान होवून नाचणारा पठ्ठ्या आहे मी ; असली बेगडी वाक्य लिहून आता इथे माझी भूमिका मांडायची गरज मला भासत नाही !!!! Wink

इंग्लंड फक्त एक बदल.
जोफ्रा आर्चर in
टंग आउट.
Playing XI:Zak Crawley, Ben Duckett, Ollie Pope, Joe Root, Harry Brook, Ben Stokes (c), Jamie Smith (wk), Chris Woakes, Brydon Carse, Jofra Archer, Shoaib Bashir

हे तुम्हाला आहीत आहे का?
एके काळी Timeless Test खेळली जायची, म्हणजे सामन्याचा निकाल लागे पर्यंत खेळ चालत असे. १८७७ ते १९३० सालापर्यंत एकूण ९९ tests खेळल्या गेल्या. एक सामना तर बारा दिवस खेळला गेला. ते दिवस परत यायला पाहिजेत.
अगदी रिसेंटली टेस्ट सहा दिवस खेळली जात असे. बहुतेक चौथ्या दिवशी सुट्टी असे.
ऑस्ट्रेलिया मध्ये एके काळी आठ चेंडूची ओवर असे. अष्टक!
चला सामना सुरु होण्या पर्यंत टाईम पास!

बापू नाडकर्णी
१९६०-६१ साली पाकिस्तानविरोधातल्या एका मालिकेत त्यांनी रेकॉर्ड केला होता. कानपूर येथील सामन्यात त्यांची आकडेवारी ३४-२४-२३-०, दिल्लीतील सामन्यात ३४-२४-२४-१ अशी आकडेवारी होती. पण चेन्नईतील इंग्लंडविरोधात झालेल्या सामन्यात त्यांनी कमाल केली, या सामन्यात त्यांची आकडेवारी ही आश्चर्यकारक होती.
१०,००० बॉल्सच्या पाठी त्यांचा इकोनॉमी रेट हा केवळ १.६४ इतकाच होता. जो आजच्या काळात देखील कुठल्या गोलंदाजाला मिळवणे कठीण आहे.

आपल्या संजय मांजरेकरचा अल्बम होता ना रेस्ट डे..
नेमके कधी हा नियम निघाला आता आठवत नाही. पण असतानाचा काळ काही माझ्या जन्माआधीचा नाही. लहानपणी रेस्ट डे असलेल्या टेस्ट पाहिल्या आहेत

आता देखील नियम असता हा तर बुमराह कदाचित तीन ऐवजी चार टेस्ट खेळला असता.
लाराने 400 मारलेला सामना विंडीज कदाचित रेस्ट डे मुळे गोलंदाजांना पुरेसा आराम मिळून जिंकला असता.

अरे सर क्रिकेटच्या इतक्या आठवणो मनात गर्दी करतात.
आताचे खेळाडू इतका भाव खातात.
पूर्वी खेळाडूला सामान्यां साठी सुट्टी साठी ऑफिसात अर्ज करावा लागत असे. सगळेच नोकरदार. मनेजरच्या शिव्या खाल्ल्यावर राजा मिळत असे, नंतर जरा बरे दिवस आले. ACC, मफतलाल TATA सेन्चुरी रेयान इत्यादींनी आपल्या टीम बनवल्या, खेळाडूंना थोडा रीस्पेक्त मिळू लागला.

इंग्लंड 84- 2 ( पहिलं सत्र )
आज प्रथम इंग्लंडच्या टिपिकल हवामानाची व पीचची औपचारिक ओळख आपल्या संघाला झाली ! चेंडू छान स्विंग होत होता व उसळतही होता. आपल्यालाही खूप सावधपणे फलंदाजी करावी लागेल. सामन्यात मजा येणार आहे असं वाटतंय !!

नमस्कार मित्रांनो बर्‍याच दिवसांनी आलोय. ही टेस्ट सुद्धा चुरशीची होणार असे दिसतेय. आपल्याला नक्कीच संधी आहे.

WTC फायनल शेवटच्या दिवशी लॉर्डस la बघितली.

सर , आपल्या शाळेचा खंडू शिपाई म्हणतोय, उद्या शाळेत टेस्ट सुरू होताहेत म्हणून पहिली घंटा वाजवण्यासाठी त्याला सुटबूट, टाय व गॉगल हवाय, अगदी सचिन सारखाच !!!!20190103_072130_0 (1)_0.jpg

*शेवटचा तास भारताची हार-जीत ठरविणारा असेल.* -
इतक्या लवकर ठरवणं शक्य व योग्य नसावं. आपण शेवट फलंदाजी करणार आहोत व त्यामुळे पहिल्या डावात आघाडी घेणं, निदान अगदी किमान धांवानी मागे राहणं, हे पाहिलं ध्येय असेल/ असावं. तिथून हार - जीत ची खरी तेढ सुरू होईल. मजा यावी ही अपेक्षा !

जैस्वाल गेला. स्मिथचा हलवा कॅच टाकल्याचं प्रायश्चित्त म्हणून राहुल मोठी इनिंग खेळतो का हे बघायचं.

- R. Ashwin
"Rishabh Pant is a fabulous player. He is not Adam Gilchrist, many compare him to Gilchrist. He didn't have such a good defence. Rishabh pant has a high-quality defence. He should be compared with some of the best batters, not Gilchrist. Rishabh Pant can do Pant things," he added.
- R. Ashwin

आश्विनचे हे स्टेटमेंट खूप वायरल होत आहे.

गिलख्रिस्ट पंत तुलनेबाबत नो कॉमेंट्स. कारण दोघे आक्रमक विकेट किपर फलंदाज असले तरी शैली भिन्न आहे. त्यामुळे अश्या तुलनेत काही अर्थ नसतो.

पण पंतच्या सॉलिड डिफेन्सबाबत आश्विनशी सहमत. डिफेन्स करताना तो इतर कोणापेक्षाही जास्त कंफर्टेबल वाटतो. पण त्याचे रन स्कोरिंग फटके अतरंगी आहेत त्यामुळे हे लक्षात येत नाही.

*पूर्वी खेळाडूला सामान्यां साठी सुट्टी साठी ऑफिसात अर्ज करावा लागत असे. * -
एकंदरीतच, पूर्वी खेळाकडे पाहण्याचा बहुतांश दृष्टिकोनच संकुचित होता असावा. रूबेन, आदरणीय कसोटी अंपायर , हे एका राज्य शासकीय विभागात ( बहुतेक, फॉरेन्सिक लॅबोरेटरी ) कामाला होते. अगदी तुटपुंजे मानधन व सुमार सुविधा असूनही केवळ आवड म्हणून अभ्यासपूर्वक ते अंपायारींग करत. शासनाच्या एका आदेशानुसार राज्य व राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धेत राज्य / देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना सामन्यांसाठी स्पेशल रजा मिळत असे पण अंपायर हा प्रतिनिधित्व करत नाही म्हणून रूबेन यांना ही रजा न देता रणजी, कसोटी सामन्यांसाठी बिनपगारी रजा घेणं भाग पाडलं जायचं. खूप नंतर अंपायर हा निःपक्षपाती, म्हणजेच प्रतीनिधित्व न करणाराच, असावा लागतो व खेळासाठी तो खेळाडूंइतकाच महत्वाचा असतो, याची दखल घेत शासनाला त्यांनाही स्पेशल रजा द्यावी असे आदेश काढावे लागले !!

प्रेक्षक म्हणून आम्हाला रजेचा हक्क असावा असं मला मनापासून वाटायचं.
Happy उगाचच दांडी मारायला लागायची.

248 - 4
पंत इतकं छान खेळत होता आज पण आत्ता दुर्दैवाने धांवबाद !! राहुल शतकाच्या उंबरठ्यावर !!
*उगाचच दांडी मारायला लागायची.* - दांडी मारून मॅच बघण्यातही वेगळंच थ्रील असायचं ! एकदा तर माझा बॉस व मी दोघेही दांडी मारून स्टेडियममध्ये अचानक एकमेकांसमोर आलो होतो !! Wink

“एकदा तर माझा बॉस व मी दोघेही दांडी मारून स्टेडियममध्ये अचानक एकमेकांसमोर आलो होतो !!” Lol पु. लं. चा ‘बुट्टी-अधिकारी योग‘ आठवला. Happy

“राहुल शतकाच्या उंबरठ्यावर” - शतक झालं. पण मोठी सेंच्युरी व्हायला हवी होती असं वाटलं.

कालही करूण च्या ४० चं कौतुक वाटलं असलं तरी त्याने सुद्धा तिसर्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर मोठे स्कोअर्स आणि प्रदीर्घ इनिंग्ज वर फोकस करावा असं वाटलं.

Pages