Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे हे सोडल्यास मला 90 टक्के खात्री होती की आपणच इंग्लडपेक्षा सरस संघ आहोत आणि ठरणार.. पीच फलंदाजीला अनुकूल होता त्यामुळे निर्णायक विजयाची खात्री 70 टक्केच होती. आणि विजयाचा हा विश्वास दुसऱ्या दिवशीच आला होता जेव्हा नवीन बॉल वर इंग्लडचे खेळाडू चाचपडताना दिसले. आणि मग ते पूर्ण सामना कधीच आश्वासक भासले नाहीत. त्यामुळेच मी जिथे तिथे प्रतिसादात इतकी बॅटिंग करत होतो. कारण इतका विश्वास मला आलेला या संघावर.
पहिल्या कसोटीनंतर आपले काही प्रॉब्लेम लक्षात आले पण ते सुटण्यासारखे आहेत हा विश्वास होता. आणि ते सोडवण्याच्या दृष्टीने उचललेली योग्य पावले संघनिवडी पासून दिसली होती.
आता मात्र प्रॉब्लेम इंग्लड समोर आहेत. त्यांच्या गोलंदाजीत धार नाही. फलंदाजी सिराज आकाशदिप समोर गडगडली तिथे याना बूमराह येऊन मिळाला तर इंग्लंडचे अजून कठीण होणार..
अर्थात यावर सुद्धा उपाय आहेत, पण ते इंग्लडचे प्रॉब्लेम आहेत. आपण का टेन्शन घ्या
अब तेरा क्या होगा कालिया च्या चालीवर अब तेरा क्या होगा गोरीया म्हणून खाली बसूया!
६
६
१
१
१
१
प्रत्येक गोलंदाजाच्या नावासमोर विकेट्स कॉलम मधे आकडा हवाच. ० सोडून
असं चित्र पहिल्या कसोटीत दिसलं असतं तर आज २-० आघाडी असती.
चलो देर आए दुरुस्त आए ।
भारताच्या विजयाचा आनंद काल वरीचे तांदळाचा भात,शेंगदाण्याची आमटी, बटाट्याचे कटलेट्स आणि फ्रूट सलाद खाऊन साजरा केला
.*... जडेजा राऊंड द विकेट
.*... जडेजा राऊंड द विकेट येऊन राइट हँडरच्या लेग स्टम्पच्या बाहेर मारा ..* -
ह्या पाटा विकेटवरही शेवटच्या दिवशी जडेजाने चेंडू चांगलेच वळत होते व बऱ्यापैकी वर उसळत होते. यापुढे इंग्लंड इतक्या निर्जीव विकेट बनवण्याची शक्यता कमी आहे . त्यामुळे, केवळ फास्ट गोलंदाजी आता यशस्वी ठरली म्हणून फक्त त्यावरच अवलंबून न राहता कुलदीपसारखा स्पेशालिस्ट स्पिनर संघात घेणं योग्य ठरेल, असं वाटतं.
*336 India's margin of
336 India's margin of victory at Edgbaston is their biggest by runs away from home. Their previous biggest was a 318-run victory against West Indies at North Sound in 2019.
जिथे पहिल्या सामन्यातील पराभवानंतर बरेच लोकांना 4-0, 5-0 वगैरे स्कोअर लाईन वाटत होती तिथे भारताने आजवरच्या सर्वात मोठ्या फरकाने विजय मिळवला
पहिली कसोटी
पहिली कसोटी
शार्दूल ठाकूर
६-०-३८-०
बॅटिंग १ धाव पहिला डाव
१०-०-५१-२
बॅटिंग ४ धावा दुसरा डाव
दुसरी कसोटी
नितीश रेड्डी
६-०-२९-०
बॅटिंग १ धाव पहिला डाव
०-०-०-०
बॅटिंग १ धाव दुसरा डाव
असले ऑल राऊंडर (!) संघात घेण्याऐवजी ६ पूर्ण फलंदाज आणी ५ पूर्ण गोलंदाज का खेळवले जात नाहीत?
लॉर्ड्स कसोटी संघ असा असावा.
जैस्वाल
राहुल
नायर
गिल
पंत
साई सुदर्शन
जडेजा
कुलदीप
आकाशदीप
बुमरा
सिराज
संघ बहुतेक असा असेल
संघ बहुतेक असा असेल
जैस्वाल
राहुल
साई/नायर/जुरेल पैकी दोघे
गिल
पंत
जडेजा
सुंदर
आकाशदीप
बुमरा
सिराज
--------
साई, नायर, ज्युरेल, रेड्डी यापैकी दोन खेळवावे लागणार ज्यात अजूनपर्यंत कोणी क्लिक झाले नसल्याने आणि त्या उलट वॉशिंग्टन सुंदरने फलंदाजीत योगदान दिले असल्याने कुलदीप यादव कडे जातील ही शक्यता कमी आहे.
या ऊपर कुलदीप येईल आणि अचानक पाच विकेट काढेल असेही काही नाही. या आधी तो इंग्लंडमध्ये एकच कसोटी खेळला आहे आणि त्यात विकेटलेस होता.
तसेही कृष्णा जागी बुमराह आल्याने याच विनिंग कॉम्बिनेशनची गोलंदाजी अजून तगडी होणार आहे. तिला त्याहून तगडी करण्यापेक्षा आहे त्या फलंदाजीसोबत जाणे हा टेस्टेड आणि सेफ गेम खेळतील असे वाटते.
*उलट वॉशिंग्टन सुंदरने
*उलट वॉशिंग्टन सुंदरने फलंदाजीत योगदान दिले असल्याने कुलदीप यादव कडे जातील ही शक्यता कमी आहे.* - सुंदर हा फलंदाज म्हणून नाही तर ऑलराऊंडर म्हणूनच ह्या संघात येवू शकतो असं मला वाटतं; ऑफ स्पिनर म्हणून काय उपयोग झाला त्याचा, विशेषतः शेवटच्या दिवशी जेंव्हा तसं होणं अत्यावश्यक होतं तेव्हा ? मग त्यापेक्षा एक स्पेशालिस्ट फलंदाज किंवा गोलंदाज घेणं, व त्याहीपेक्षा एक स्पेशालिस्ट स्पिनर घेणं योग्य नाही कां?
मग ते पूर्ण सामना कधीच
मग ते पूर्ण सामना कधीच आश्वासक भासले नाहीत

>>
303 ची पार्टनरशिप होतानाही नाही??
“कुलदीपसारखा स्पेशालिस्ट
“कुलदीपसारखा स्पेशालिस्ट स्पिनर संघात घेणं योग्य ठरेल, असं वाटतं.” सहमत! ३ फास्ट बॉलर्स + १ स्पिनर हा अॅटॅक मलाही योग्य वाटतो. ४ स्पेशलिस्ट बॉलर्स आणि एक ऑलराऊंडर हे काँबिनेशन जास्त बॅलन्स्ड वाटतं. इंग्लंडमधे असणारा उन्हाळा पाहता, बॉल फार स्विंग होण्याची शक्यता नाहीये. त्यामुळे एक दर्जेदार स्पिनर मोठा अॅसेट ठरू शकतो.
303 ची पार्टनरशिप होतानाही
303 ची पार्टनरशिप होतानाही नाही??
Uhoh
>>>>>>>>
नव्या चेंडूवर वाटत नव्हताच.
३०० भागीदारी होताना माझी पोस्ट वाचा.
----------
११ ओवर नंतर नवीन बॉल येईल..
जडेजाला लाऊन धावा रोखा.. नवीन बॉल वर पाहिले पाच गेले.. मागचे सुद्धा जातील..
----------
ऑफ स्पिनर म्हणून काय उपयोग
ऑफ स्पिनर म्हणून काय उपयोग झाला त्याचा, विशेषतः शेवटच्या दिवशी जेंव्हा तसं होणं अत्यावश्यक होतं तेव्हा ?
>>>>>>
राजा उडवला त्यांचा
आणि फलंदाजीत सुद्धा प्रॉपर फलंदाज साई किंवा करून विशेष काही करू शकले नाहीत तिथे त्याला तुम्ही एक आश्वासक फलंदाज म्हणून देखील बघू शकता. ऑल राऊंडर म्हणूनच बघितले पाहिजे असा हट्ट का? एक गुणी फलंदाज जो तुम्हाला वेळप्रसंगी एखाददुसरी महत्वाची विकेट सुद्धा मिळवून देऊ शकतो, जो बॉल जडेजाच्या विरुद्ध दिशेने वळवून व्हेरिएशन देतो.
बाकी माझा कुलदिपला नकार किंवा विरोध नाही. त्याला घेतले तरी हरकत नाही. त्या निर्णयावर टीका नसेल. पण सुंदर त्याचवेळी हा देखील अयोग्य पर्याय वाटत नाही इतकेच. सगळे काही चूक की बरोबर नसते. बरेचदा दोन्ही पर्याय आपल्या जागी योग्य असतात.
पण ते ही सोडा..
पण ते ही सोडा..
गंमत बघा..
पहिली कसोटी हरल्यावर बरेच जण थेट चार शून्य पाच शून्य मोडमध्ये गेले होते. जणू काही इथून सुधारणेला वावच नाही. जणू आपण आपला सर्वोत्तम संघ खेळवला, सर्वोत्तम परफॉर्मन्स दिला, आणि तरीही हरलो...
पण आता बघा दुसरी कसोटी आपण बुमराह नसताना जिंकलो. ती सुद्धा नुसते जिंकलो नाही तर कधी नव्हे इतक्या विक्रमी धावसंख्येने जिंकलो. तेही कमी म्हणून अशा मैदानावर जिंकलो जिथे आजवर आपण जिंकलो नव्हतो..
आणि आता पुढच्या कसोटीला बुमराह सुद्धा आत येईल...
आणि तरीही आपल्याला असे वाटते की कुलदीपला घेऊन संघ अजून तगडा होईल.
आता गंमत म्हणजे विरोधाभास बघा किती. मागच्याच आठवड्यात जो चमू बिनकामाचा आणि हरण्यासाठीच इंग्लडला आला आहे असे वाटत होते त्यात इतके जबरदस्त जिंकल्यानंतरही अजून सुधारणेला अजून वाव आहे असे वाटू लागले आहे. फिरली की नाही जादूची कांडी
४ स्पेशलिस्ट बॉलर्स आणि एक
४ स्पेशलिस्ट बॉलर्स आणि एक ऑलराऊंडर हे काँबिनेशन जास्त बॅलन्स्ड वाटतं. >> +१. कुलदीप येणे निव्वळ अशक्य वाटते. बारींग इंजरीज, बुमरा, सिराज नि आकाश दीप असणार हे नक्कीच आहे. बुमरा प्रसिद्ध च्या जागी येईल कि रेड्डीच्या जागी हाच प्रश्न आहे. रेड्डीच्या जागी आला तर सात पर्यंत बॅटींग असावी म्हणून जाडेजा नि सुंदर दोघेही खेळणार हे नक्की आहे. त्या टीममधे नायर तीनवर राहील . साईने असे काही केले नव्हते कि नायरच्या जागी आणले जाईल नि नायर तीनवर सेटल वाटातोय नि मुख्य म्हणजे बॉल्स खाऊन गिलला सोफ्ट बॉलसमोर यायला जमवतोय. बुमरा प्रसिद्ध्च्या जागी आला तर मात्र कुलदीपला रेड्डीच्या जागी येता येऊ शकते. हे मुख्यत्वे पिचवर ठरेल. जर बाउन्स असेल तर कुलदीपला नक्की आणतील असे वाटते.
आपली बॉलिंङ जबरदस्त झाली हे खरे आहे पण विकेट्स सगळ्या बर्याचशा पहिल्या सत्राच्या सुरूवातीला नि शेवटच्या सत्राच्या शेवटी बॉल हार्ड असताना गेल्या आहेत हे विसरता येत नाही. सॉफ्ट बॉल झाल्यावर तिनशे ची पार्टनरशिप आरामात झाली होती ही फक्त एका इनिंगआधीची गोष्ट आहे. मॅकमुल्लम नि स्टोक्सची वक्त्यव्ये बघता त्याच चूका परत करण्याची शक्यता कमी वाटते. पहिल्या ओव्हर्स बॉलप्रमाणे खेळण्याची तडी दिली जाईल असे दिसतेय. तसे झाले तर इंग्लंडची बॅटींग पण तेव्हढीच तगडी आहे नि मुख्य म्हणजे रूट अजून खेळायला लागायचा आहे. (तो पाच सामने फेल जाईल हि आशा भाबडी आहे) . टॉसबद्दलचा हब्रिस पण स्टोक्स च्या बोलण्यातून गायब झालाय म्हणजे जनता जागी झालेली दिसत आहे.
असामी वरच्या इंग्लंड कॅन
असामी वरच्या इंग्लंड कॅन कमबॅक पोस्ट बाबत +७८६
पहिल्या कसोटीनंतर मी असाच विचार आपल्या संघाबाबत केला होता
असामी वरच्या इंग्लंड कॅन
Duplicate
गिल ने दुसर्आ डाव लवकर
गिल ने दुसर्आ डाव लवकर डीक्लेअर केला नाही ह्याची काही संभाव्य कारणे १ - ह्यातली सगळी काही ना काही प्रमाणात कारणीभूत ठरली असावीत.
१. आपल्या बॉलर्सना पुरेसा ब्रेक मिळावा. तसेच विकेट टेकिंग प्रोबॅबिलिटी दिवसाखेर वाढणार असल्यामूळे त्याचा फायदा घेता यावा. त्याचबरोबर चौथ्या दिवशी कमी वेळ बॉलिंङ केली तर पाचव्या सकाळी फ्रेश अॅटॅक करता येईल हा फायदाही आहेच. एकंदर दहा इकेट्स साठी तीन टाईम स्लॉट वापरायचे.
२. इंग्लंड प्लेयर्स ना थकवणे. विशेषतः स्मिथ नि ओपनर्सना.
३. आदल्या मॅच मधे जवळजवळ चारशे चेश करणे हा अपवाद धरला तरी चान्स कशाला घ्या ? बाझबॉलचा गाजावाजा करताच आहात तर पाचशेच्या वर जिंकायला करायला सांगत प्रेशर निर्माण करणे.
ह्यातले तिसरे कारण बॅकग्राऊंडमधे नेहमी डोक्यात असावे असे वाटते. कितीही वीट आणला तरी बाझबॉलने एकंदर विचारपद्धती मधे बदल घडवून आणले आहेत असे वाटते.
चौथ्या दिवशी आपण डिक्लेअर
चौथ्या दिवशी आपण डिक्लेअर करायला उशीर करत होतो तेव्हा आमच्या व्हाट्सअप ग्रूपवर सुद्धा बराच कलाकलाट चालू होता. तेव्हा मी सुद्धा दोन तीन कारणे दिली होती.
१) माइंड गेम - जे समोरच्याला अपेक्षित असते ते बिलकुल करू नका. त्यांना आणखी फ्रस्ट्रेट करा. घटना घडायची वाट बघायला लावा. लाचार करा. एकूणच मोराल डाऊन करा.
२) बाझबाल इगो हर्ट करा. त्यांना जिंकायची संधी ठेवू नका पर्यायाने काही मोटिवेशनच ठेवू नका. जिंकायची संधी नसल्यास ते फार अटॅक करणार नाहीत. आणि आपल्या गोलंदाजांची लाईन बिघडणार नाही. त्यांना त्यांचे सेटअप करता येतील. साधारणपणे असे म्हटले जाते की गाजर दाखवा आणि मारण्यात विकेट काढा. पण इंग्लंडबाबत वेगळे आहे, नेमके उलट आहे. दुसऱ्या दिवशी सुद्धा स्मिथ बिनधास्त मारत होता. सामना कसा वाचवावा याचा जणू काही प्लान नव्हता. आम्ही सामना वाचवायला खेळतोय असे दाखवले असते तरी फरक पडला असता. उलट त्यांचा अप्रोच बघून आपले गोलंदाज खुशच असतील.
३) संध्याकाळी कमी ओवर टाकल्या तर दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा बॉल पुरेसा नवीन राहील. पहिल्या तासात त्याचा पुन्हा वेगवान गोलंदाजांना त्याचा नव्याने फायदा उचलता येईल. अन्यथा संध्याकाळीच जास्त ओवर दिल्या असत्या तर वेगवान गोलंदाजांचे स्पेल संपल्यावर जडेजा सुंदर नवीन बॉलवर नाहक वापरावे लागले असते.
अर्थात दुसऱ्या दिवशी पाऊस पडून बरेच ओवर फुकट गेल्या असत्या आणि सामना अनिर्णीत राहिला असता तर आमच्या ग्रूपवर माझी अक्षरशा चिरफाड झाली असती. पण हा धोका मी नेहमी पत्करतो
काही करोड क्रिकेट एक्सपर्टचा देश आहे हा.. सगळेच कसे आपल्या मताशी सहमत असतील...
नुसते भारतातलेच एक करोड नाही
नुसते भारतातलेच एक करोड नाही तर जगभार पसरलेले आणखी ४० - ५० लाख पण.
हो, म्हणून मी एक करोड नाही तर
हो, म्हणून मी एक करोड नाही तर काही करोड लिहिले
साधारणपणे कप्तानाच्या निर्णयाचे मूल्यमापन निकालावरून केले जाते. अर्थात ते देखील तितके योग्य नाही कारण हा अनिश्चिततेचा खेळ आहे.
पण बरेचदा ते ही न करता आपल्या आवडीनिवडी नुसार आणि आपल्या आकलनानुसार चाहते जोखतात.
आपण हा सामना जिंकलो नसतो तर गिल आणि एकूणच टीम मॅनेजमेंट झोडपले गेले असते.
पण जिंकल्यावर सुद्धा त्याला श्रेय दिले जाईल याची खात्री नाहीच.
पर्सनली मला गिल पंत ही कर्णधार उपकर्णधार जोडी फार आवडली आहे. त्यांचे मैदानावरील बोन्डिंग धमाल आहे.
काल एक इंटरव्ह्यू पाहिला ज्यात त्याला या कसोटीआधी प्रश्न विचारला गेला होता की हे गोलंदाजी युनिट 20 विकेट घेणारे वाटत नाही.
त्यावर तो म्हणाला की देशातील सर्वोत्तम खेळाडू निवडून हा संघ बनला आहे. हा वीस विकेट घेऊ शकत नाही तर कोण घेणार.
कर्णधाराला हा विश्वास दाखवावा लागतो.
थोडे विषयांतर - ह्या सर्व
थोडे विषयांतर - ह्या सर्व जल्लोषात गंभीरला कुणी किंचितसा तरी हसताना पाहिलंय का ? मला खूप कुतूहल आहे जाणून घेण्याचं !
गंभीर आणि ऋषभ पंत सोबत अभिषेक
गंभीर आणि ऋषभ पंत सोबत अभिषेक शर्मा हे कपिल शो मध्ये आलेले मध्यंतरी. मी अजून पाहिला नाही तो पूर्ण एपिसोड पण शॉर्ट व्हिडिओ रीळ बरेच फिरत आहेत. त्यात हसतोय दिलखुलास.. माणूस अगदीच गंभीर नाही
*माणूस अगदीच गंभीर नाही* -
*माणूस अगदीच गंभीर नाही* - देव करो, तसंच असो !
माणूस अगदीच गंभीर नाही <<
माणूस अगदीच गंभीर नाही <<
असं कसं..??
गंभीरच आहे तो..
मुल्डरने लाराचा रेकॉर्ड
मुल्डरने लाराचा रेकॉर्ड मोडायचा चान्स सोडला. मला हे लॉजिकच कळत नाही. रेकॉर्ड ची शोभा मोडण्यातच असते नि खुद्द लाराला सुद्धा कौतुकच वाटले असते कि कोणी तरी आपल्यापुढेही गेला. चारशे करणे मग भला समोरचा संघ कोणताही असो, हे येरागबाळ्याचे काम नाही.
“ ह्या सर्व जल्लोषात गंभीरला
“ ह्या सर्व जल्लोषात गंभीरला कुणी किंचितसा तरी हसताना पाहिलंय का ?” - मॅच जिंकल्यावर चेहरा हसरा होता त्याचा.
“ मला हे लॉजिकच कळत नाही. रेकॉर्ड ची शोभा मोडण्यातच असते” - मला हा प्रश्न मार्क टेलरने ब्रॅडमनच्या ३३४ च्या हाय्येस्ट इंडिव्हिज्युअल स्कोअरची बरोबरी करून, तो न मोडता इनिंग डिक्लेअर केली तेव्हाही पडला होता.
रेकॉर्ड मोडायचा की नाही हे
रेकॉर्ड मोडायचा की नाही हे ज्याची त्याची पर्सनल चॉईस आहे असे मला वाटते. यावर लोकं एक बाजू घेऊन का बोलत आहेत जिथे तिथे हे मला समजत नाही.
म्हणजे मारले असते त्याने 400 काय 500 धावा..
तरी त्यात पॉईंट काय असता?
रेकॉर्ड बुक मध्ये नाव आले असते.. इतकेच
झिंबाब्वेच्या दुबळ्या संघासमोर मारून काय तो असा जगातला दिग्गज म्हणून गणला जात लारा सचिन पाँटिंग कोहली यांच्या पंक्तीत येऊन बसला असता का?
त्याने त्यात इंटरेस्ट दाखवला नाही, पुरेसे रन झाले, तर विक्रम राहू दे आपल्या जागी म्हणत डिक्लेअर केले. संपला विषय..
आणि लाराने तरी काय केले?
संघहितापेक्षा वैयक्तिक विक्रमाला प्राधान्य देत 582 चेंडू खेळून 400 धावा मारल्या..
वेस्टइंडीज संघ तब्बल 202 ओवर सलग खेळले..
त्यामुळे त्यांच्या गोलंदाजांना देखील सलग गोलंदाजी करावी लागली. त्यात दमल्याने इंग्लंडच्या फलंदाजांना बाद करता आले नाही. थोडक्यात राहिले. आपल्या विक्रमासाठी सामना अनिर्णीत राहिला जो जिंकू शकले असते. आणि कहर म्हणजे तो कप्तान होता.
म्हणजे मारले असते त्याने 400
म्हणजे मारले असते त्याने 400 काय 500 धावा..
मग "ज्याची त्याची पर्सनल चॉईस आहे असे मला वाटते" हे नि त्यापुढचे "आणि लाराने तरी काय केले? म्हणून दोषारोप करणे" हे वाचून शहानिशा झाली
माझ्या आठवणीप्रमाणे, लाराचे ४०० पहिल्या डावात झाले होते त्यामूळे मोठा स्कोर टाकून समोरच्या टीमवर प्रेशर आणणे फार चुकीचे होते असे म्हणण्याएव्हढा ठाम आत्मविश्वास माझ्यात नाही. तसे होणार नाही हे स्वप्न लाराला पडले नसावे असे गृहित धरूया.
तरी त्यात पॉईंट काय असता? >> मी पोस्ट करणार्याचे नाव १०० वेळा तरी वाचले (हा रेकॉर्ड असावा बहुधा
मला हा प्रश्न मार्क टेलरने ब्रॅडमनच्या ३३४ च्या हाय्येस्ट इंडिव्हिज्युअल स्कोअरची बरोबरी करून >> गम्मत म्हणाजे तेंव्हा टेलर ने फक्त ब्रॅडमनचा उल्लेख केला होता. त्यापुढच्या कोणाचाच नाही. माझ्या मनात ब्रॅडमन एकिकडे नि बाकीचे सगळे दुसर्या बाजूला अशी विभागणी आहे त्यामूळे मला तो निर्णय आवडला होता हेही तितकेच खरे. बरोबरी करून तिथे थांबला हा जात योग्य ट्रिब्युट असे म्हणता येईल का ?
लाराचे ४०० पहिल्या डावात झाले
लाराचे ४०० पहिल्या डावात झाले होते त्यामूळे मोठा स्कोर टाकून समोरच्या टीमवर प्रेशर आणणे फार चुकीचे होते असे म्हणण्याएव्हढा ठाम आत्मविश्वास माझ्यात नाही.
>>>>>>>
हे कुठले प्रेशर आहे जे ७५१ धावांनी येते आणि ५५१ धावांनी येत नाही.
जेव्हा तुम्ही २०२ ओवर खेळून ७५१ मारता तेव्हा तिथून जिंकायचे म्हणजे एकच पर्याय उरतो तो म्हणजे फॉलोऑन द्या आणि आपल्या गोलंदाजांना सलग गोलंदाजी करायला लावा ते सुद्धा अश्या फलंदाजधार्जिणे खेळपट्टीवर.
अश्यावेळी योग्य डावपेच म्हणजे थोडे कमी खेळून त्या ओवर वाचवून दुसऱ्या डावात पुन्हा खेळायला यायचे असते जेणेकरून आपल्या गोलंदाजांना आराम मिळेल आणि पुन्हा ताज्या दमाने विकेट घेता येतील.
चुकत असेल तर करेक्ट करा..
जसे विंडीजने २०२ ओवर खेळून ७५१ धावा केल्या.
तेव्हा इंग्लंड पहिल्या डावात ९९ ओवर खेळून २८५ धावा करून बाद सुद्धा झाली होती.
पण विंडीज कडे पुन्हा फलंदाजीला यायचा पर्याय नव्हता. इतक्या ओवर आधीच खेळून झाल्या होत्या आणि लीड सुद्धा तब्बल ४६६ होता. त्यामुळे फॉलो ऑन शिवाय पर्याय नव्हता. मग दुसऱ्या डावात दमलेल्या विंडीज गोलंदाजांचा समाचार घेत इंग्लंडने पहिल्या इनिंगपेक्षा जास्त म्हणजे शिल्लक १३७ ओवर फक्त ५ विकेट गमावत खेळल्या.
तेच विंडीज ४० ओवर कमी खेळले असते आणि २०० धावा कमी केल्या असत्या, लारा ३०० वर समाधान मानले असते तर तेच दुसऱ्या डावात पुन्हा खेळून गोलंदाजांना आराम देता आला असता. सामना जिंकले असते, जिंकायची अधिक संधी राहिली असती.
असो,
त्या दिवशी सुद्धा बहुधा तुम्हीच अशी पोस्ट टाकली होती की भारताने जिंकायचा प्रयत्न न करता दोन दिवस खेळावे आणि इंग्लडला धडा शिकवावा, त्यांचे बॉलर आणि फिल्डर दमवावे वगैरे... तेव्हाही मला आश्चर्य वाटले होते. पण गमतीने म्हणत असाल असे वाटलेले. पण आता वाटते ते सुद्धा सिरीयस म्हटले असावे. नशीब गिल आणि पंत असा विचार करत नाहीत आणि आपण जिंकण्यासाठी गेलो आणि जिंकलो.
बहुतेक माझेच विचार वेगळे असावेत जे माझ्यासाठी संघहित हे वैयक्तिक विक्रमाच्या आधी येते. बहुधा त्यामुळेच माझ्या आवडीचे प्लेअर सुद्धा तसेच आहेत जे संघाहिताला प्राधान्य देतात.
हे कुठले प्रेशर आहे जे ७५१
हे कुठले प्रेशर आहे जे ७५१ धावांनी येते आणि ५५१ धावांनी येत नाही. >> परत लारा किंवा माझ्याकडे क्रिस्टल बॉल नाही त्यामूळे, नक्की किती धावा असल्या कि किती प्रेशर येणार हे ठरवता येणे मर्त्य मानवांसाठी अशक्य आहे. परत ""ज्याची त्याची पर्सनल चॉईस आहे असे मला वाटते"" हे आपलेच बोधवचन उद्धुत करायचा मोह आवरत नाही.
" तेव्हा इंग्लंड पहिल्या डावात ९९ ओवर खेळून २८५ धावा करून बाद सुद्धा झाली होती." अशी विधाने टाकण्याआधी जरा त्या आकड्यांकडे लक्ष दिलेस तर ९९ ओव्हर्स इंग्लंड खेळले म्हणजे त्यांचा अॅप्रोच काय होता हे दिसते आहे. तुझ्याच म्हणण्याप्रमाणे असलेल्या पाटा पिचवर ह्या पाचशे धावा पुरेशा ठरल्या असत्या हा भयंकर आत्मविश्वास कशामूळे येतो हे देवच जाणे. (आता ह्यावर मी असे कुठे म्हणालोय असा दावा नक्की करशील त्यावर असे म्हणेन कि - जर तुला माहित नसेल तर पाचशे काय नि सातशे काय ह्यावर वाद का घालतो आहेस नक्की ?)
परत लाराने पर्सनल माईलस्टोनकडे लक्ष दिले असे तू म्हनालास त्याबद्दल एव्हढेच सांगेन कि जरा त्या मॅचच्या आसपास विंडीज ची स्थिती काय होती हे शोध नि एका वेस्ट इंडीयन खेळाडूने हा माईलस्टोन केल्यामूळे तिथल्या लोकांना, टीमला, माजी खेळाडूंना काय वाटाले ह्याबद्दल वाच. "फेव्हरीट म्हणजे फक्त जिंकायला नाही" म्हणणार्या मनुष्याला हे समजावे लागावे हा विनोद आहे.
त्या दिवशी सुद्धा बहुधा
त्या दिवशी सुद्धा बहुधा तुम्हीच अशी पोस्ट टाकली होती की भारताने जिंकायचा प्रयत्न न करता दोन दिवस खेळावे >> माझ्या त्या पोस्ट मधे "भारताने जिंकायचा प्रयत्न न करता " हे कुठे लिहिले आहे हे दाखवतोस ? पोस्ट चा अर्थ कळत नसेल तर विचारत जा. "शक्य होईल तर " ह्या वाक्याने सुरू झालेली पोस्ट आहे. तूझे तेच फक्त सकारात्मक , बाकीचे सगळे नकारात्मक बोलतात वगैरे तुझे खयाली पुलाव आहेत. (अर्थात सेल्फ व्हॅलिडेशन साठी तुला भयंकर उपयुक्त आहेत हे समजू शकतो.)
Pages