क्रिकेट - ९

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

*४४ बॉलमध्ये २० धावामध्ये शेवटच्या पाच विकेट गेल्या * -
नव्या चेंडू बरोबरच त्यावेळी सुटलेल्या जोरदार वाऱ्याचाही फायदा गोलंदाजांना मिळाला असावा, असं मला वाटतं. अर्थात, चूकीचाही असू शकतो हा समज.

*तेंव्हा फ्लॅट पिचेस करून अप टेंप क्रिकेट खेळणे अधिक सयुक्तिक ठरले. पिचेस फ्लॅट नसले कि फ्रीक किंवा गनरेशनल इनिंग ...* -
फास्ट गोलंदाजीचा दर्जा पूर्वीसारखा नाही म्हणून पाटा विकेट बनवणं ही इंग्लंडची चूकच ! भारतीय फलंदाजी अशा विकेटवर बहरणार ही दाट शक्यता लक्षात यायला हवी होती. उलट, फास्ट विकेटवर भारतीय फलंदाज पहील्या दोन - तीन कसोटीत तरी साशंक राहून बाद होण्याची शक्यता अधिक होती.

भारताची बोलिंग दुसर्‍या डावातल्या दहा विकेट्स काढेल हे अवघड वाटतंय.
पहिल्या कसोटीत बुमरा आणि या कसोटीत सिराज/आकाशदीप वगळता इतर बोलर्सनी निराशाजनक बोलिंग केलेली आहे.

स्पिनर्सनी तीन डावात ७८ ओव्हर्स मधे एकही विकेट घेतलेली नाही. शोएब बशिर आपल्या ८-१० विकेट्स घेऊन गेलाय.

आज अगदी उत्तम बॅटिंग झाली तरीही शेवटच्या डावात सहाही भारतीय गोलंदाजांना योगदान द्यावे लागेल जे आत्तापर्यंत तरी दिसलेले नाही.

तस्मात..

ही कसोटी भारत जिंकेल असं वाटत नाही.

“ त्यात एक भाग ड्यूक बॉल्स चा पण आहे.” - हे कॉमेंटेटर्स पण खूपवेळा बोलतायत. मला हा अँगल फारसा समजला नाहीये. नेमका काय फरक पडलाय?

“ फास्ट गोलंदाजीचा दर्जा पूर्वीसारखा नाही म्हणून पाटा विकेट बनवणं ही इंग्लंडची चूकच” - ९० च्या दशकात आखाडे बनवणारं बीसीसीआय बदनाम होतं. “जगात काय म्हटलंय ह्यापेक्षा कुणी म्हटलंय ह्यालाच अधिक महत्व आहे“ हे माबो वरचा असामी म्हटला नसला तरी ‘असा मी, असामी‘ त पु. ल. म्हणून गेले आहेतच Wink Happy

*...ह्यापेक्षा कुणी म्हटलंय ह्यालाच अधिक महत्व आहे * ... त्याहीपेक्षा जे म्हटलंय तें कां व तर्कशुद्ध म्हटलं आहे का, याला अधिक महत्त्व द्यावं. !! Wink

एक गोलंदाज कमी पडतोय फक्त
सिराज बुमराह आकाशदिप हे त्रिकूट एकत्र असते तर प्रेशर कायम राहिले असते आणि मोठा फरक दिसला असता.

हे पुढच्या सामन्यात दिसेल. पण सध्या नाही तर हा सामना जिंकण्यावर फोकस करा.
यावेळी आपण गेल्यावेळची चूक करणार नाही. व्यवस्थित शेवटपर्यंत खेळून इंग्लडला असे आव्हान देणार जे त्यांना शक्य होऊ नये किंवा प्रयत्न करता त्यातूनच विकेट येतील. त्यामुळे पुढचा विचार न करता आधी फलंदाजी व्यवस्थित करायला हवी. गोलंदाज विकेट काढणारच नाहीत तर काय फायदा धावा करून असा नकारात्मक विचार फलंदाजांनी करू नये. उलट त्यांना जास्त संधी द्यायचा प्रयत्न करावा. ३०० भागीदारी करून सुद्धा इंगलड जेमतेम ४०० करू शकले ते आपल्या गोलंदाजांमुळेच.

करुण नायर आज खेळायला हवा. त्याने पुढच्या सामन्यातील संघ निवडीचा प्रश्न थोडा सोपा होईल. रेड्डी सुंदर जडेजा तिघे एकत्र खेळवायचे गरज कमी होईल जी पहिल्या सामन्यातील कॉलेप्स मुळे निर्माण झालेली.

जर प्रसिध अन् शार्दुल मधे निवडायचं झालं तर पुढच्या मॅच मधे शार्दुल ला घ्यायला हवं...

शेवटचा दिवस पीच चांगलं राहणं किंवा फास्ट होणं ही शक्यता कमी व तें खराब होण्याची शक्यताच अधिक ( जरी गेल्या कसोटीत तें खराब झालं नाही तरीही ). म्हणून, पीचवर त्या दृष्टीने बारीक लक्ष ठेवूनच इंग्लंडला किती वेळ व काय लक्ष्य द्यायचं हा निर्णय घ्यावा लागेल. जर पीच उत्तम स्थितीत रहाणार असं वाटलं, तर ड्रॉ हाही पर्याय नाईलाजाने विचारात घ्यावा लागेल !

शेवटचा दिवस पीच चांगलं राहणं किंवा फास्ट होणं ही शक्यता कमी व तें खराब होण्याची शक्यताच अधिक ( जरी गेल्या कसोटीत तें खराब झालं नाही तरीही ). म्हणून, पीचवर त्या दृष्टीने बारीक लक्ष ठेवूनच इंग्लंडला किती वेळ व काय लक्ष्य द्यायचं हा निर्णय घ्यावा लागेल. जर पीच उत्तम स्थितीत रहाणार असं वाटलं, तर ड्रॉ हाही पर्याय नाईलाजाने विचारात घ्यावा लागेल !

ओवरकास्ट कंडीशन आहेत आणि करून नायर बराच बीट होत आहे.
स्लिपमधून दोन कॅच उडाल्या इतक्यात.
हा सेशन महत्वाचा आहे.

लंचं टाईम - 357 ची आघाडी , 175 - 3 !! आता भारताने करायची खेळी व घ्यायचा निर्णय ही खरंच मोठी कसोटी ठरणार आहे ! शुभेच्छा !!

Screenshot-20250705-185902-Web-Shuttle

वैभव सूर्यवंशी !

७८ चेंडूत १४३.

येडा आहे हा पोट्टा...

पंतने ठरवले असते तर सोपे शतक होते आता त्याचे.. पण त्याने मोह टाळला. त्याने येऊन गेम पालटला. मोमेंटम देऊन गेला. आता आपण त्यांना मोठे टारगेट आणि जास्त ओव्हरमध्य देऊ शकतो.

सूर्यवंशीने वेगवान शतकाचा विक्रम रचला आज..
सिक्स सुद्धा १० मारून आपलाच रेकॉर्ड तोडला..
अंडर नाईन्टीन म्हणजे त्याच्यासाठी लहान पोरे.. मजा घेतोय त्यांची Happy

एका कसोटीत सर्वाधिक धावा
भारतीय फलंदाजामध्ये गिलचा विक्रम.. लक्ष्मण गावसकर यांना मागे टाकले

हा सामना जिंकायला इंग्लडला विश्वविक्रम करावा लागणार...
किंवा असे म्हणू शकतो की इंग्लंड जिंकली तर विश्वविक्रम तुटेल..
काल किमान ५०० म्हटले होते पण आता ५५० टारगेट देऊ शकतो सहज.
गिल सुद्धा मस्त मारतोय..

Rishabh Pant becomes the first Asian wicket-keeper to score 2,000 Test runs in SENA countries.

Double Century + Century in a Test match
(Indians)

Sunil Gavaskar v WI (1971)
Shubman Gill v ENG (2025)*

डाव कोसळण्याची भीती.. जे मागच्या सामन्यात झाले..
त्याने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढतो.. वाढेल जर आपण सर्वबाद झालो तर..
तेच आपण डिक्लेअर केले तर त्याचा परिणाम वेगळा होतो..

ठरवले तर त्रिशतक सुद्धा मारू शकतो. अजून सुंदर आहे मागे. इंग्लड सुद्धा मग वैतागून गोलंदाजीत जीव जाळणे सोडून देईल....

पण कसोटी जिंकायला खेळली जाते त्यामुळे डिक्लर करतील साडेनऊ वाजेपर्यंत..

बरोबर साडे नऊ वाजता डिक्लिअर केले..
माझ्या पोस्ट वाचल्या जात आहे बहुधा Happy

टी ब्रेक नंतर आपण 15 ओवरमध्येच 123 असे कायच्या काय मारले. त्यामुळे अचानक लेट डिक्लेअर केल्याचे फिलिंग येतेय.. पण छान केले. इगोशी खेळले इंग्लडच्या

विकेट Lol

*त्यामुळे डिक्लर करतील साडेनऊ वाजेपर्यंत..* केलं , 608चं लक्ष्य देवून ! आपण हरणार नाही याची खात्री !
इंग्लंड 11- 1 !!!

3 बॉल 11 अशी सुरुवात केली..
चौथ्या बॉल वर विकेट आली..
या ना खेळता येते का टिकून हे आता टेस्ट होईल

जो रूट.. तिसरी.. Lol
काय दांडका काढला.. बदाम बदाम बदाम..

-Most runs by a player in a Test match:*

456 - Graham Gooch vs IND, Lord's 1990
430 - शुभमन गिल
426 - Mark Taylor vs PAK, Peshawar 1998
424 - Kumar Sangakkara vs BAN, Chattogram 2014
400 - Brian Lara vs ENG, St. John's 2004

Pages