एक्स्ट्रा 2ab : एनडीए सरकार आणि विनोद

Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.

या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.

तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भरतजी, तुम्ही भारतात असल्याने अशी कविता करून टीव्ही वर झळकण्याची व वातड चिवडा व कडक लाडू खाण्याची संधी मिळत नाही हे दु:ख मी समजू शकतो पण इतकी असूया बरी नव्हे !

आत्ताच पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान तुर्कीने पाकिस्तानला उघडपणे समर्थन दिलं. यापूर्वीही काश्मीर प्रश्नावर तुर्कीने पाकिस्तानचीच बाजू घेतली आहे. अशा परिस्थितीत 'शत्रूचा शत्रू तो आपला मित्र' या तत्त्वानुसार सायप्रसची भेट ही भारतासाठी विशेष महत्त्वाची ठरते.

मोदींनी ११ वर्षांत इतक्या देशांना भेटी दिल्या आणि इतक्या राष्ट्रप्रमुखांना मिठ्या मारल्या. त्यातल्या किती देशांनी पाकिस्तानविरुद्ध भारताच्या बाजूने स्टेटमेंट दिलं?

त्या त्या देशांत या अशा गोळा करून आणलेल्या मोदीभक्तांनी मोदींकडे जितकं लक्ष दिलं त्याच्या किती अंश त्या राष्ट्रप्रमुखांनी दिलं?

देवा! सगळ्याच वृत्तपत्रांनी आणि चॅनेल्सनी ही अशी बातमी चालवली आहे.
https://indianexpress.com/article/explained/explained-global/pm-modi-in-...

मोदीजी जी ७ मीटिंगला जातील का? तिथे ट्रंपजी पण येतील का? दोघांत काय बोलणी होतील? ट्रंपजींच्या नव्या शिरस्त्याला अनुसरून अशी बोलणी मीडियासमोर झाली तर ?

देशोदेशांतील संबंध हे सतत बदलत असतात. आजचा शत्रू उद्या तसाच राहीलच असं नाही, आणि मित्र देखील कायमस्वरूपी मित्र असतीलच असंही नाही.

कोणीतरी आपल्या बाजूने निवेदन दिलं नाही म्हणून त्यांना आपला शत्रू समजणं चुकीचं ठरेल. उदाहरणार्थ, नुकत्याच झालेल्या UN मधील गाझा सीझफायर ठरावाच्या वेळी भारताने मतदानातून अनुपस्थित राहून एकप्रकारे इस्राएलच्या बाजूने आपली भूमिका स्पष्ट केली.
त्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंधांत प्रयत्न करत राहणं महत्त्वाचं असतं. आज तुर्की उघडपणे पाकिस्तानचं समर्थन करत असताना आपण तुर्की आणि सायप्रस यांच्यातील तणावाचा आपल्या हितासाठी फायदा करून घेणं हेच रणनीतीदृष्ट्या शहाणपणाचं ठरेल.
G7 मध्ये भारताला इन्व्हिटेशन दिल नाही पाहिजे म्हणून बरेच लोकं आप आपले देव पाण्यात बुडवून बसली होती. जरा थोडा धीर धरायला पाहिजे होता.

सायप्रस चे नागरिकत्व मोठे अदानी यांनी कधीचे घेतलेले आहे. श्री श्री श्री मोदीजी हे मोठ्या मालकांचा business सेट करायला जात असतील. तुर्की समोर सायप्रस ची काही लायकी नाहीय त्यामुळे सामरीक फायदा वगैरे सगळे नुसतं भक्त मंडळीना दिलेल गाजर आहे.

सन १९७५ ते १९७७ मधील आणीबाणीच्या कालावधीत लोकशाहीकरिता लढा देताना कारावास भोगावा लागलेल्यांना आता वाढीव मानधन मिळणार आहे. तसेच मानधनधारकाच्या हयात जोडीदारालाही मानधन देण्याचा आणि अन्य काही अटी शिथिल करण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

देशात २५ जून, १९७५ ते ३१ मार्च, १९७७ या कालावधीत आणीबाणी घोषित करण्यात आली होती. या कालावधीत लोकशाहीकरिता लढा देणाऱ्यांना कारावास भोगावा लागला. अशा व्यक्तींच्या सन्मानार्थ, त्यांचा यथोचित गौरव करण्यासाठी २०१८ मध्ये दरमहा मानधन देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. या मानधनात वाढ करण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला, त्यानुसार आणीबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्यांना दरमहा २० हजार रूपये आणि त्यांच्या पश्चात पत्नीस किंवा पतीस दरमहा १० हजार रूपये मानधन देण्यात येईल. एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या आणीबाणीधारकांना दरमहा १० हजार रूपये, तर त्यांच्या पश्चात पत्नीस किंवा पतीस ५ हजार रूपये मानधन देण्यात येईल.

दुप्पट करण्यापूर्वीची आकडेवारी -आणीबाणीत महाराष्ट्रातील ३ हजार ७८२ जणांनी कारावास भोगला.त्यांचा सन्मान, यथोचित गौरव करणेबाबत या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मानधन वितरीत करण्यासाठी २८ कोटी १२ लाख ५५५ रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे

--
स्वातंत्र्यसैनिकांना मिळणार्‍या पेन्शनसाठी किमान सहा महिने तुरुंगवासाची (आणि सुटका झाली असेल, तर ती माफी न मागता झालेली असण्याची) अट आहे. पेन्शनची रक्कम २०१६ साली वाढून तीस हजार रुपये केली गेली.

मोदी - ट्रम्प फोनवर तब्बल ३५ मिनिटे चर्चा झाली. भारत पाक यांच्या दरम्यान युद्ध विरामाची घोषणा सर्वप्रथम ट्रम्पनी केली होती . त्यावेळी ट्रम्पला जे सांगायला हवे होते ते आज सांगितले. फोनवर काय संभाषण झाले हे केवळ मिसरीच सांगू शकतात. मध्यस्थी नको हे सांगायला बराच विलंब झाला.

लागलीच असीम मुनीर यांच्यासोबत ट्रम्पचे WH मधे लंच. Honoured to meet him असे प्रशस्तीपत्रक.

आता यांना तर इंग्लिश पण नको आहे असे वाटते का? एकीकडे आपल्या देशातील भाषा आपल्या संस्कृतीचे रत्न आहेत म्हणायचे आणि दुसरीकडे एका रत्ना करता दुसऱ्या रत्नाचे कोंदण हिसकावून घ्यायचे.

संगणकासाठीही फॉरीन लँग्वेजेस नको. कुणीतरी पित्तु सोडूनच म्हणुनच गेलंय की जगभरातील शास्त्रज्ञांनी मान्य केलंय की संस्कृत ही संगणकासाठी सर्वात योग्य भाषा आहे. संस्कृत मध्ये कोडिंग सुरू करा लौकर.

त्याला आणि त्याच्या शेठला बोलता येत नाही म्हणुन सगळ्यांना त्यांच्याच पंक्तीत बसवतोय
<<
Drag you down to his level and beat you with experience..

https://www.loksatta.com/sampadkiya/features/nashik-ubatha-sena-sudhakar...
देवेंद्रजी, या ‘पापा’ला क्षमा नाही…
राष्ट्रीय राजकारणात मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागत आहेत, म्हणून काय वाटेल त्या तडजोडी करायच्या का?

रघुनंदन भागवत

हे स्वतःला भाजप समर्थक म्हणवतात.

आज संजय गांधींचा स्मृतिदिन. वरुण गांधीची आठवण झाली.त्याच्या ट्वि टर हँडलवर २८ मार्च २०२४ ला त्याने पिलिभीतच्या जनतेचे आभार मानणारं पत्र लिहिलं आहे. त्यानंतर वर्षभरात फक्त दोन ट्वीट्स - ऑपरेशन सिंदूरबद्दल. कुठे गायब करून टाकलं?

Pages