एक्स्ट्रा 2ab : एनडीए सरकार आणि विनोद

Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.

या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.

तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोदींचा नवीन व्हीडिओ.>>> दहा वर्षापासून ज्या घोड्यावर बेट लावलीय तो घोडा नसून गाढव आहे हे लक्षात आल्यावर नैराश्यातून असे व्हिडिओ टाकून नैराश्य दूर करण्याचा प्रयत्न करावा लागतो.

अर्थात ज्याला घोडा समजलो ते गाढव आहे, हे सत्य बदलत नाही. Happy

अरे मी मोदींचा व्हिडिओ टाकतोय आणि राहुल गांधींचा व्हिडिओ कसा येतोय? का होतय असं? कोई मेरे कान मे आके सांगोगा? हं सांगोगा?

उत्तर प्रदेश - भाजप आमदाराने पोलिस अधिकार्‍याची मानगूट धरली. सोबत जय श्रीरामच्या घोषणा आहेतच.

असली कामे करताना जय श्रीराम असं ओरडायचं हा नियमच झालाय.

जय श्रीराम!

https://x.com/ANI/status/1904804667143709081
Delhi: Actor Varun Sharma, who is participating in the 'One Nation One Election' awareness drive, says, "
I think this (One Nation One Election) will save a lot of time...I am sure that when this is consolidated, it will save a lot of everyone's time...

नोटाबंदी किती चान आहे ते सांगायला खली आला होता.

https://x.com/ANI/status/1908194695118754161

Several women workers of Pune BJP unit stormed and vandalised the private clinic run by the doctor who was handling the case of Tanisha Bhise, a pregnant woman who died after being allegedly denied treatment at Deenanath Mangeshkar Hospital due to lack of money.

कसली फेक तोडफोड केलीय बघा. बहुतेक शोभेच्या वस्तू खाली पाडल्या. त्यातली एकही फुटण्यासारखी नाही. खरीच तोडफोड करायची असती तर त्यातलीच एक घेऊन टेबलावरची काच फोडली असती.

टीप - मी तोड फोडीचं अजिबात समर्थन करत नाही किंवा या प्रकरणी कोणी तोडफोड करावी असं म्हणत नाही. पण निषेधाची नाटकं कशाला?

लुटुपुटुची तोडफोड वाटतेय खरंच.

आणि भाजपच निवडून आलीय, राज्यात व केंद्रात केव्हापासून भाजपचीच सत्ता आहे, कायदा सुव्यवस्था पाळणं ही आपलीच जबाबदारी आहे, काय झालं याची योग्य ती कायदेशीर चौकशी व कायदेशीर कारवाई करणं आपल्याच हातात आहे असं त्यांना कोणीतरी सांगायला हवं.

देशांत तसेच राज्यात धार्मिक धृवीकरणाची प्रक्रिया जोरदार सुरु आहे. मुस्लिम व्यावसाय करणार्‍यांवर बहिष्कार टाका अशा अवाहना पासून त्यांच्या प्रार्थनास्थळांना वेळो वेळी टारगेट करणे किंवा ३०० वर्षांपूर्वी येथे गाडल्या गेलेल्या थडग्याचे कारण.... अशा घटनांत वाढ झालेली आहे. वेळीच या विषारी विचारसरणीला आळा घातला असता तर ?

यातून काय होणे अपेक्षित आहे? बीड मधे मशिदीवर हल्ल्याच्या घटनेत दोन युवकांवर UAPA अंतर्गत कारवाई होणार आहे.
https://www.rediff.com/news/report/maha-mosque-blast-uapa-invoked-agains...

बीडच्या बातम्या वाचल्या की असे वाटते की बीड हे चंबळ खोऱ्यात आहे की काय. . खंडणी काय मारहाण काय खून काय.

दिवाणी वादाचे फौजदारी खटल्यांत रुपांतर या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने उ प प्र सरकारला फटकारले आहे. फरकही कळत नाही ?
"... complete breakdown of rule of law in Uttar Pradesh. "

https://www.loksatta.com/desh-videsh/law-and-order-situation-in-uttar-pr...

मोदी रविवारी श्रीलंका भेटीवर होते आणि दुसर्‍याच दिवशी Operations begin at Adani-backed port terminal in Colombo
निव्वळ योगायोग हो.
Sri Lanka’s Minister of Transport, Highways, Ports and Civil Aviation Bimal Rathnayake described the CWIT project a “foster child” from two past governments [Presidents Gotabaya and Ranil Wickremesinghe who succeeded him]. “It was an unsolicited investment that came in without any competitive bid. But we cannot delete it like a computer programme, especially after considerable amount of infrastructure work has been done,” he told The Hindu, adding that the National People’s Power [NPP] government would try its best to follow due process in all future investments.

दिल्लीवालोंको भाजप सरकार मुबारक.
आता मासळी बाजारांवर संक्रांत. देवळाच्या बाजूला मासळी बाजार नक्को.
गंमत म्हणजे ते देऊळ त्या मार्केटवाल्यांनीच उभारलंय.
https://x.com/RavinderKapur2/status/1909802382545821816

निवडून आलेल्या सरकारने संमत केलेल्या विधेयकांवर राज्यपालांनी एका ठराविक काल मर्यादेत निर्णय घ्यायला हवा. समोर आलेल्या विधेयकांवर , अनेक वर्ष कुठलाही निर्णय न घेणे हे राज्यपालांचे कृत्य बेकायदेशीर आहे असा महत्वाचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

https://www.loksatta.com/sampadkiya/editorial/supreme-court-verdict-tami...

उद्धव सरकारला त्रास देण्यासाठी काळी टोपीवाला कोषारी होता अगदी तसाच हा तामिळनाडूचा राज्यपाल रवी ची नेमणूक द्रमुक सरकारला त्रास दे ण्यासाठीच झालेली आहे.

दीनानाथ धाग्यावर लोक झुंडशाही, नासधूस याबद्दल काहींनी लिहिलं आहे.

कोथरूडमधली ताजी घटना
https://x.com/zoo_bear/status/1909965548877967504

भाजप कार्यकर्ते स्वतःचेच कॅमेरे घेऊन युनिसेक्स सलून मध्ये घुसले. तिथल्या कर्मचार्‍यांना मारहाण केली. ज्याला मारहाण झाली त्या च्यावरही गुन्हा दाखल होणं हा आता नियमच आहे. आधी गोरक्षकांकडून होणार्‍या मॉब लिंचिंग प्रकरणी हे होई. आता गाईंचा कंटाळ आला. म्हणून लव्ह जिहाद.

मनसे कार्यकर्त्यांनीही सरकारी कार्यालये, बँका ते रस्त्यावरचे विक्रेते यांना मराठी न बोलण्यावरून दमदाटी करण्याचे अगणित प्रकार गेल्या आठवड्यात झाले. या सगळ्यांनी स्वतःच त्याचे व्हिडियो बनवून सोशल मीडियावर टाकले. त्याबद्दल कारवाई केली जाईल असं गृहमंत्री म्हणाले.

प्रतिक्रिया उमटल्यावर नेहमीप्रमाणे आंदोलन मागे घेतलं.

बुलडोझर फक्त मुसलमानांच्या घरांवरच चालतात. कामराचा शो झाला त्या हॉटेलात तोड फोड करणार्‍या शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना आणि नागपूरमधल्या विहिंप / बजरंग दल वाल्यांना काही तासांत जामीन मिळाला.

नागपुरात आज आंबेडकर जयंतीनिमित्त मांसविक्रीची दुकानं बंद ठेवायचे आदेश महानगरपालिकेने दिले आहेत. कोणी अशी मागणी केली असेल का ?

हे असंच चालत राहिलं तर हळू हळू फक्त बुधवार, रविवार एवढे दोनच दिवस मांस आणि मासेविक्री सुरू राहील. त्या दिवशीही कोणता सण आला की बंद.

<< नागपुरात आज आंबेडकर जयंतीनिमित्त मांसविक्रीची दुकानं बंद ठेवायचे आदेश महानगरपालिकेने दिले आहेत. कोणी अशी मागणी केली असेल का ? >>

------ आंबेडकरां बद्दल खरोखरच आदर असेल तर दर दिवशी घटनेची सरकारकडूनच होणारी हेळसांड थांबवायला हवी. लाखो लोकांच्या उदर निर्वाहाचा व्यावसाय जयंती निमीत्तने बंद ठेवणे हेच घटनाविरोधी आहे.

डिसेंबर मधे परभणी येथे संविधान प्रतिकृती तोडफोड करणार्‍यांवर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला काही तासातच मानसिक रुग्ण म्हणून पोलीसांनी घोषित केले. तो खरोखरच मानसिक रुग्ण आहे हे डॉक्टर लोक सांगू शकतात, पोलीस नाही. या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणे अपेक्षित आहे. हा कट रचणारा मास्टर माईंड कोण आहे ? त्याच्यावर काही कारवाई?

दंगल झाली, काहींना अटक झाली, अटक करण्यात आलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांचा न्यायालयीन ( पोलीस ?) कोठडीत असतांनाच संशयास्पद मृत्यू झाला. चौकशी अहवाल काय म्हणतो?

मराठीला अभिजांत भाषेचा दर्जा दिल्यावर मराठीला अच्छे दिन आले असे वाटले होते. आता मराठी तसेच इंग्रजी माध्यम शाळांत १ ते ५ वर्गात हिंदी भाषा सक्तीची होणार आहे.

गाय पट्टा करण्याचे स्वप्न साकार होण्यासाठी अगदी लहान असतांनाच हिंदी भाषा शिकविल्यास अजय भिस्त/ धिरेंद्र शास्री यांचे अभ्यासू विचार मुलांच्या डोक्यात शिरतील. बच्चों को पहली कक्षा से ही अच्छी शिक्षा मिलेगी. Happy

Policies our govt is working on will shape future of next 1,000 years: PM Modi

--
देवळांकडे असलेली संपत्ती गरीब हिंदूंच्या कल्याणासाठी वापरली असती तर हीराबाला लोकांकडे धुणीभांडी करावी लागली नसती, एका मुलाला स्टेशनवर चहा विकावा लागला नसता आणि पुढे भीक मागावी लागली नसती, असं म्हटलं तर चालेल का?

पंक्चरवाला#

पहलगाम हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू - अतिशय दुःखद बातमी.

अमेरिकेचे अध्यक्ष क्लिंटन यांच्या भारत भेटीदरम्यानही अशीच घटना घडली. त्यावेळी ३५ निष्पाप शिखांची हत्या करण्यात आली होती.

काँग्रेसच्या तथाकथित भ्रष्टाचार प्रकरणांची यादी भक्तगण पाठ करून ठेवतत. त्यात टुजी, कोलगेट सोबत कॉमनवेल्थ गेम्स पण असतात.
A court in Delhi has formally closed the investigation of the Enforcement Directorate (ED) into the alleged money laundering linked to the Commonwealth Games 2010 (CWG).
The judge said ED's submission that the offence of money laundering was not found during its investigation.

Major fire at ED office likely damaged Choksi, Nirav Modi, Bhujbal records

पहलगामच्या आधी मुस्लिम व्यावसायांवर बहिष्कार टाकण्याचे विचारही आपल्याला शिवले नव्हते असे वाटणार्‍यांसाठी. २२ मार्च २०२५ चा एक व्हिडिओ आहे ( डोंबिवली ).
https://x.com/HindutvaWatchIn/status/1903401042231881941

दगडफेक हे निमीत्त मिळाले असेल किंवा मिळविले असेल. कारण नसेल तर तयार करायला काहीच लागत नाही. दंगल इंजिनियरींग मधे अनेकांची मास्टरी आहे.

मुस्लिम व्यावसायिकांवर आर्थिक बहिष्कार टाका असे जाहिर आवाहन येथे एकायला मिळते. आपल्याच देशातल्या नागरिकां विरुद्ध , शेकडोंच्या उपस्थिती मधे असे बहिष्काराचे आवाहन होणे नक्कीच चिंताजनक आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर जनमानसांतला क्रोध ओसंडून वहात आहे आणि हे अगदी समजण्यासारखे आहे. पण आर्थिक नाड्या आवळण्याचे ( बहिष्काराचे ) विषारी विचार फार आधीपासून आपल्या मनांत आहेत. आज गृहखात्याच्या आशिर्वादाने मोकळेपणा आलेला आहे.

करोना काळात थूक जिहाद.
मग उत्तराखंडमध्ये लव्ह जिहादची खोटी केस उभी करून मुस्लिमांना गावाबाहेर काढणं.
बाबा रामदेवचं शरबत जिहाद.

भाजप महाराष्ट्रचा पोस्टर बॉय नितीश राणेचं मल्हार झटका मांस

संयुक्त अरब अमिराती ९ लाख
सौदी अरेबिया ४.५ लाख
कुवेत ४.२५ लाख
कतार ३.३५ अलख
येमेन २.९७ लाख
वरची आकडेवारी आणि ओमान, बहारीन,तुर्किये, जॉर्डन , लेबनान यांची एकूण आकडेवारी बघितली तर ती आहे ३० लाख ६० हजार.
इराण, इराक, मलेशिया आणि इतर मुस्लीम धर्म असणाऱ्या देशातली लोकसंख्या वेगळीच.
हि आकडेवारी इस्लामिक देशात पोटापाण्यासाठी राहणाऱ्या हिंदूंची आहे.
जगाचा इतिहास भूगोल वर्तमान व्यापार आर्थिक ताणेबाणे काहीही माहिती नसलेले बिनडोक बहिष्कार बहिष्कार खेळत बसतात.
या लक्षावधी लोकांनी काय करण अपेक्षित आहे ?
इस्लामिक देशातली नोकरी सोडणे ? व्यवसाय बंद करणे ?
बर
पुढची गंमत सांगतो.
अबुधाबी & कतार इन्व्हेस्टमेंट ऑथोरिटीने अदानी एनर्जी मध्ये एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केलेली आहे.
सौदी अराम्कोचा चेअरमन असलेला सौदी प्रिन्स रिलायन्स पेट्रोलियमच्या संचालक मंडळावर आहे.
अबुधाबी इन्व्हेस्टमेंट ऑथोरिटीने रिलायन्स स्मार्ट बाजार मध्ये ४९६६ कोटीची गुंतवणूक केलेली आहे.
हिंडेनबर्ग रिपोर्ट आल्यानंतर जी पडझड झाली तेव्हा अदानीला वाचवायला हेच पेट्रो डॉलर्स कामाला आलेले होते.
आता मला सांगा
कोणकोण आखाती , इस्लामिक देशातल्या नोकऱ्या सोडून , व्यवसाय बंद करून माघारी येणार आहे ?
कोणकोण विप्रोच्या नोकरीचा राजीनामा देऊन बाहेर पडणार आहे ?
कोणकोण वोकहार्डमधून बाहेर पडणार आहेत ?
रिलायन्स समूहात, अदानी समूहात इस्लामिक देशाचे पैसे आहेत म्हणून कोणकोण रिलायन्स आणि अदानीच्या कंपनीतल्या नोकऱ्या सोडणार आहे ?
किंवा या दोन्ही कंपन्यांची उत्पादन वापरणे बंद करणार आहेत ?
सत्तापिपासू लोकांना बिहार निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा हिंदू मुस्लीम बहिष्काराचा अजेंडा राबवायचा आहे , यापलीकड यांना काहीही दिसत नाही.
आनंद शितोळे
#आपल्या_धडावर_आपलेच_डोके
#शेम्बुड_आपल्या_नाकाला
#सीधी_बात

आज आमच्या फॅमिली ग्रुप मध्ये आपल्या एरियात पंक्चर काढणारे / गाड्या सर्विस करणारे इत्यादि हिंदू लोकांची यादी आली आहे Happy

Pages