Submitted by जिज्ञासा on 8 June, 2021 - 22:40
जसे “सर्वदेवनमस्कारः केशवं प्रतिगच्छति” तसे आपले बहुतेक सामाजिक/आर्थिक/आरोग्याचे प्रश्न हे शेवटी जाऊन पर्यावरणाच्या प्रश्नाला भिडू लागले आहेत.
मायबोलीवर अशा पर्यावरण विषयावर होणाऱ्या अवांतरामुळे मूळ धागा भरकटू नये आणि ज्यांना या अवांतरात रस असेल त्यांना मोकळेपणी चर्चा करता यावी यासाठी हा धागा आहे.
असे diversion मीच नाही तर इतर कोणालाही करावेसे वाटले तर माझा धागा वापरता येईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अखेर मान्सून सुरु झाला.
अखेर मान्सून सुरु झाला. माहौल अस होता की जणू काही मान्सूनच. पण आज वेधशाळेने शिक्कामोर्तब केले . म्हणजे जवळ जवळ २० मे पाउस सुरु झाला. आधी वाटले होते की ह्या प्री मान्सून शावर आहेत.
मी शाळेत होतो तेव्हा नेमाने सात जून ला मान्सूनचे आणि शाळेचे आगमन व्हायचे नंतर हळू हळू इराटीक व्हायला लागला. एकदा तर जुलाई महिना गाठला होता.
एकूण पर्यावरण बदलतय ह्याची खात्री पटली.
Earliest monsoon onset in
Earliest monsoon onset in Maharashtra in 35 years
https://www.rediff.com/news/report/earliest-monsoon-onset-in-maharashtra...
मग ह्याला पर्यावरणातील बदल म्हणायचे का?
>>>>सात जून ला मान्सूनचे आणि
>>>>सात जून ला मान्सूनचे आणि शाळेचे आगमन व्हायचे
होय शाळा=मान्सून. ६, ७ जूनच. अगदी अगदी.
आमच्याकडे ( अल्बर्टा,
आमच्याकडे ( अल्बर्टा, सस्कात्चेवान, मॅनिटोबा , ब्रिटिश कोलंबिया ) स्मोक सिझन सुरु झाला आहे.
काल तसेच आजही हवेमधे धूर मोठ्याप्रमाणांट जाणवत आहे. कालचा AQI १ ते १० च्या स्केल मधे आम्ही १०+ वर होतो. पुढील काही महिने परिस्थिती चिघळत रहाणार आणि फार कमी पर्याय शिल्लक आहेत याची जाणिव होत आहे.
आग तसेच air- quality संदर्भात अचूक माहिती साठी,
https://ciffc.net/
https://firms.modaps.eosdis.nasa.gov/usfs/
आमच्याकडे भरपूर पाऊस पडतोय.
आमच्याकडे भरपूर पाऊस पडतोय. मॅनिटोबा आणि सस्काच्युआनला लवकर असाच पाऊस येऊ दे!
सात जून शाळा आणि पावसाळा
सात जून शाळा आणि पावसाळा यासाठी अनुमोदन. पहिलाच निबंधाचा विषय दरवर्षी पावसाशी संबंधित असायचा, गेले ते दिन गेले
हल्ली तसाही ७ जुनला शिडकावा
हल्ली तसाही ७ जुनला शिडकावा करुनच जायचा. शेतीसाठी हवा तो खरा पाऊस जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरु व्हायचा. ऋतुचक्र १ महिना पुढे गेलेय हे मझे गेल्या १५ वर्षांची निरिक्षणे करुन झालेले मत आहे. बाकी ऋतु कळत नाही, पावसाळा कळतो.
आताही कृषी खात्याने बराचसा जुन कोरडा जाईल म्हणुन सांगितले आहे. लगेच पेरण्या करु नका म्हटलेले आहे. बघु काय होतेय. ह्या अवेळी पावसाने माझी कामे खोळंबली. कालपासुन थोडा कमी आहे.
Pages