चित्रपट कसा वाटला - ११

Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53

नवीन चिकवा.

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क तरह का कोयला काला होता है. दूसरी तरह का...भी कालाही होता है' तो का? >>> Happy हो तोच. पुढे बरेच काय काय पाल्हाळ आहे. परवीनचे एक्स्प्रेशन्सही बदलत जातात. सुरूवातीला तिला वाटते हा खरंच कोळसा, खाण, तेथील प्रोसेस ई बद्दल माहिती देणार आहे Happy

'एक सेकंद के लिये लगा मेरा अपना ही खून है'! >>> यस!

आणि मुलाला नाजायज म्हणण्यापेक्षा बापालाच नाजायज बाप म्हणणे! ते जास्त चपखल आहे खरे म्हणजे.

त्रिशुल आणी शक्ती फक्त आणी फक्त डॉयलॉगची आतिषबाजी आहे..जबरदस्त लिहलेत सगळेच डॉयलॉग..शक्ति मधे अमिताभ आणी स्मिता पाटिल लिव्ह इन मधे त्याकाळी वैगरे दाखवणे फारच काळाच्या पुढच होत..

फा >>> आत्ता मी याच गाण्याबद्दल लिहायला आले होते.

तो निरुपा रॉयने एकहाती हाणून पाडला का मग
>>> अगदी छिन्नी, हातोडा, विटा वगैरे घेऊन. पूर्वीच्या काळी निम्मी जशी एकतर्फी प्रेम व सबसिक्वंट प्रेमभंगासाठी जन्माला आलेली तशीच निरुपा रॉय पती व मुलांना हरवण्यासाठी. त्यातनं जमलंच तर लगेहाथ ती दृष्टी वगैरे पण हरवून घ्यायची. कसला रोमान्स नी कसलं काय!

शक्ति मधे अमिताभ आणी स्मिता पाटिल लिव्ह इन मधे त्याकाळी वैगरे दाखवणे फारच काळाच्या पुढच होत..
>>> १०००++
आणि बऱ्यापैकी अनअपोलोजेटीक होते ते. जाने कैसे कब कहा गाणं आवडतं

>>> मुलाला नाजायज म्हणण्यापेक्षा बापालाच नाजायज बाप म्हणणे!
हो, अगदी! Happy

माझेमन Lol

आत्ता मी याच गाण्याबद्दल लिहायला आले होते. >>> Happy

तेथे "जनमान तुम कमल कार्त हो" के बोल असे टायटल आहे Happy

'गेट आऊट' सायकॉलॉजीकल थ्रिलर आहे. एक व्हाईट फॅमिली आहे. त्यात एक तरुण मुलगी आहे. ती तिच्या काळ्या मित्राला घेउन येते आणि मग त्याला एक एक विचित्र वागणारे लोक भेटायला लागतात. तो तिथुन सुटु शकतो का? काय रहस्य आहे त्या जागेत. तुम्हीच पहा.
मी पिकॉक वरती पाहीला.

ब्लड डायमंड - प्राईमवर पाहिला.
Leonardo DiCaprio, Jennifer Connelly, Djimon Hounsou
प्राईमवरून जात आहे व पाच ऑस्कर नामांकन मिळालेली दिसल्याने पाहिला. सिएरा लिओन सिव्हिल वॉरच्या काळात तेथील दहशतवाद्यांनी तिथल्या सामान्य जनतेला गुलामासारखे वागवून हिऱ्यांच्या खाणीतून हिरे - ओबडधोबड, न तासलेल्या स्वरूपातील काढून घेण्यासाठी भयंकर अन्याय व शोषण केले जाण्याची कथा आहे. कथा आणि अभिनय जबरदस्त आहे. भयंकर वेगवान पॉलिटिकल वॉर थ्रिलर आहे.
त्या शोषित जनतेने मत देऊ नये व तिथली सत्ता बदलू नये, गुलामगिरी, अन्याय व हिऱ्यांचा गैरव्यवहार असाच चालू रहावा म्हणून एकेकाचे हात तोडून टाकलेले सीन आहेत. भयंकर अंगावर येणारा सिनेमा आहे. त्रासदायक बाब म्हणजे हे खरेच असले पाहिजे असे वाटून क्लेश होतात. सगळी सप्लाय चेन अशी बनवली आहे की ज्यांचे शोषण होते त्यांना वाचा उरली नाही, सगळे अव्याहतपणे सुरू रहावे म्हणून संपूर्ण जगातील लोक याकडे दुर्लक्ष करतात.

जेनिफर कॉनली (मेरी बॉवेन्स) नावाची अमेरिकन जर्नलिस्ट आहे. लिओ एक स्वतःचे आईवडील नवव्या वर्षी बलात्कार व मुंडके उडवलेले बघितल्याने- यातच मोठा झालेला प्रसंगी निर्ढावलेला तरीही कुठेतरी संवेदनशील असा तस्कर आहे. तो हिरे व बंदुकांची तस्करी करतो. जिमॉन हा तिथला शोषित आहे, ज्याच्या मुलाला दहशतवादी होण्यासाठी ट्रेन केले जाते आहे. बायको व मुली एका निर्वासितांच्या छावणीत त्यांच्याच देशात ताटातूट झाल्याने तुरुंगवासात राहतात.

या जिमॉनच्या मुलाला त्यातून वाचवून आणून सगळ्या कुटुंबाला एकत्र आणून लंडनला सुरक्षित पाठवण्याचा थरार आहे. पुन्हा एकदा - भयंकर सिनेमा आहे. सगळीकडेच एवढा अन्याय आणि शोषण बघून तेही कोण्या एका अमेरिकन तरूणीला बोटात घालायला हिरा मिळावा म्हणून - एकदम सगळं व्यर्थ वाटायला लागतं. हे सगळे कच्च्या स्वरूपातले हिरे किम्बर्लीच्या खाणीतून तासायला भारतात सुरत मधे येतात आणि बेल्जियम, ॲन्टवर्प मधल्या डायमंड ट्रेडिंग हब मधे जातात. सगळे जग या अन्यायात हातभार लावते , त्यामुळे दहशतवाद व युद्धही चालू राहते.

ही शोषणाची शृंखला इतकी घट्ट आहे की कुठून सुरु होतेय व कुठे संपते कळत नाही. शेवटी त्या बाप मुलाला एकत्र आणताना लिओचा जीव जाताना आफ्रिकेतील savannah बघत, त्या सुंदर संध्येचे रसपान करत मॅगीला 'तुला आता कथा मिळाली बघ' म्हणतो. ते दृष्य काटा आणणारे व मनःशांती देणारे असे दोन्ही झाले आहे. दहशतवादाचे बाळकडू मिळालेला जिमॉनचा बारा- तेरा वर्षे वयाचा मुलगा हिऱ्यासाठी बापावर बंदूक उगारतो. तो सीनही भेदक झाला आहे. त्याच्या डोळ्यात फक्त थंड भाव असतात. सगळे हिऱ्यांसाठी हपापलेले आहेत, माणसांशी कुणाला काही देणं घेणं नाही. हा हिरा सुखवस्तू जनतेपर्यंत येण्याचे सगळे मार्ग रक्ताळलेले आहेत. त्यामुळे ब्लड डायमंड. पण अशी हजारो कुटुंबे तिकडे वाट बघत असतात, सुटकेची. त्यापैकी एका कुटुंबाला लंडनला जायला मिळते. जबरदस्त चित्रपट आहे. नक्की पहा.

अस्मिता मस्त लिहीलयस. खूपच आवडलाय तुला सिनेमा जाणवले. मला बघता येइल का याबद्दल शंका आहे . पण लिखाण आवडले.
----------------
काल मिशन इम्पॉसिबल ८ पाहीला. अ तिरंजित व अतिमानवी, सिनेमा आहे. टॉम क्रुझ चांगला दिसतो यात क्रु कट नाही तर जरा लांब केस आहेत. पण हा सिनेमा परत पहाणार नाही. एकदा ठिक आहे.
मुख्य म्हणजे 'मिशन इम्पॉसिबल' ची सिग्नेचर ट्युन फार कमी वेळेत वाजलेली आहे. मला फार आवडते किंबहुना ते एक आकर्षण होते. आज पहीले भाग काढुन पाहीनच. टॉम-टॉम-टॉम!!!

ब्लड डायमंड - विशलिस्टला आहे. कधीपासून पहायचा आहे मला.

असंच 'कोबाल्ट रेड' पुस्तक आहे. आफ्रिकेत लहान लहान मुलांना खाणींमध्ये राबवलं जातं. स्मार्ट फोन्स आणि इलेक्ट्रिक कार बॅटरीजसाठी लागणारं कोबाल्ट मिळवण्यासाठी.
पुस्तकाचा रिव्ह्यू वाचला, घ्यावंसं वाटलं, पण वाचवलं जाईल का असंही वाटलं. Sad

ब्लड डायमण्ड काही वर्षांपूर्वी पाहिला होता. भारी होता. खूप डिटेल्स लक्षात नाहीत. सॉलिड लिहीले आहेस. त्यावेळेस "आमचे हिरे तसे नाहीत" वाल्यांबद्दलही लेख आले होते हे लक्षात आहे.

आमचे हिरे तसे नाहीत" वाल्यांबद्दलही लेख आले होते हे लक्षात आहे.
>>> हे वाचलेले नाहीत पण मी स्वतः तनिष्कचे हिऱ्याचे नेकलेस रोज वापरते. त्यांचेही कशाकशातून येत असतील असं वाटून एकदम कसंनुसं झालं. त्यांचे असे काही आंतरजालावर असेल तर शोधायचे ठरवले आहे. उत्सुकता निर्माण झाली एकदम.

स्त्रियांवर लहानपणापासून "हिरा है सदा के लिये, Woman's best friend, प्रेमाचे प्रतीक" इत्यादी रोमॅंटिसाईझ गोष्टींचे कंडिशनिंग केलेलं असतं, शेवटी खरेतर 'कार्बन'च आहे ते.

थॅंक्यू सर्वांना. Happy

ब्लड डायमंड फार वर्षापूर्वी बघितला होता. त्यावेळी लिओनार्दोची रोमॅंटीक इमेज मोडून काढणारा चित्रपट म्हणून लक्षात आहे. तो हात छाटण्याचा प्रकार अगदी अंगावर येतो. ‘हिरा है सदा के लिए’ वगैरे फोल वाटले होते काही काळ.

ब्लड डायमंड फार वर्षांपूर्वी पाहिलाय
भेदक आहे
बापावर थंड डोळ्यानेबबंदूक रोखलेला जेमतेम 14 ते 16 वयाचा मुलगा आणि त्या बापाची धडपड फार मनात रुतलेली
परत पहिला पाहिजे

आमच्या प्राईमवरून आठवडाभरात जातो आहे, भारतातल्या प्राईमची कल्पना नाही. पण पहायचा असेल तर नक्की बघून घ्या.

ता क: आता पाहिले तर Leaves prime in 7 days ही सूचना गायब झालेली दिसतेय.

प्राईमवर तेलुगुमध्ये डार्क नावाचा पिक्चर बघितला, नवरा लाऊन ठेवतो साऊथ इंडीयन. समांतर जग, थोड्या वेळेच्या फरकाने, एवढा कन्फुजिंग आहेना की बास रे बास. सेम टू सेम कपल. लिड दोघे आवडले. शेवटी मला शेवट समजला असं वाटतंय तोपर्यंत मी आधीचा काही भाग बघितला नव्हता म्हणून नवऱ्याने तोच तमिळमध्ये बहुतेक ब्लॅक नावाने आहे तो लावला. थोडा बघितला परत confused म्हटलं जाऊदे. मे बी मी भाषेचा गोंधळ घातला असेल.

भूतकाळात जिथे त्यांचा खून झालेला असतो तिथेच येतात.

सायन्स फिक्शन प्राईमवर पाहिला आहे.
Passengers (Trailer)
Jennifer Lawrence, Chris Pratt
एका स्पेशशिपवर पाच हजार लोक पृथ्वी सोडून दुसऱ्या ग्रहावर रहायला चालले आहेत. त्या सगळ्यांना क्रायॉनिक- हायबरनेशन झोपेत पॉड्स मधे नव्वद वर्षांसाठी ठेवले आहे. स्पेशशिप ॲस्ट्रॉईड बेल्ट मधून जाताना उल्का ( debris) आदळून त्यात तांत्रिक बिघाड होतो व एक पॉड आधीच उघडून क्रिस उठून बसतो.

संपूर्ण स्पेशशिपवर तो एकटाच जागा असतो, पृथ्वीवर संदेश जाण्यासाठीही पन्नास वर्षे लागणार असतात. हरप्रकारे प्रयत्न करूनही तो पुन्हा हायबरनेट होऊ शकणार नसतो. अशा वर्षभराच्या एकटेपणात तो एका सहप्रवासी- जेनिफरची ( ऑरोरा) ची सगळी माहिती काढतो. ती एक लेखिका असते, तिचे लेखन वाचून तिच्या प्रेमात पडतो, तिच्या मनाच्या- ती जशी विचार करते ते वाचून -प्रेमात पडतो. आणि तिला पॉडमधून उठवण्याचे ठरवतो. ती सुंदर, मिश्किल, प्रसन्न व हुशार असते. तिला उठवल्यानंतर ते खरोखरच प्रेमात पडतात. रोमान्स खूप छान दाखवलाय. साय फाय सिनेमात रोमान्स वर भर नसतो. पण सुरवातीला एकटेपणा, सुटकेचे प्रयत्न यात खूप संथ वाटतो. जेनिफर उठली की कथा मस्त रोमॅन्टिक होते.

शिपवर झालेल्या उल्कावर्षावामुळे तांत्रिक बिघाड झाल्याने अचानक थरार सुरू होऊन चित्रपट वेगवान होतो. कथानकाचा वेग नियंत्रित/ युनिफॉर्म नाही. शेवटी दोघे मिळून शिपला व पाच हजार निद्रिस्त लोकांना वाचवतात. ऐंशी वर्षे शिपवर संसार करून सुखी होतात व शेवटी 'गार्डन ऑफ इडन' तयार करतात. थोडा अ आणि अ आहे. एंगेजिंग आहे पण खूप छान नाही. जेनिफर लॉरेन्स आवडते, तिचे सेन्स ऑफ ह्यूमर व एनर्जी सगळीकडेच दिसते. तिच्यासाठी पाहिला.

सिनेमॅटोग्राफी खूप सुंदर आहे, पार्श्वसंगीतही खूप आवडले. अवकाश, उल्का, नेब्युला, ग्रह , तारे हे सगळेच फार सुंदर दाखवले आहे. दोघांची कामंही चांगली आहेत. मी एन्जॉय केला सिनेमा. यातला रोमान्स मला फार आवडला.

इथे वाचून एक एक विशलिस्ट मध्ये नोंद करुन ठेवते आणि बघायला गेले की वेगळाच कुठलातरी पिक्चर बघते.

Transcendence (Prime) (Trailer)
Johnny Depp, Rebecca Hall, Morgan Freeman, Cillian Murphy
जॉनी डेप हा नॅनो टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधला जगप्रसिद्ध वैज्ञानिक आहे. त्याची 'पार्टनर ईन सायन्स' आणि 'पार्टनर ईन लाईफ' रेबेका सुद्धा त्याची त्याच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यात साथ देते. प्रत्यक्षात एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून मात्र ती फिलियांथ्रॉपिस्ट विचारांची आहे. तिच्या महत्त्वाकांक्षा मात्र जग अजून सुखी कसे होईल, पर्यावरणात समतोल कसा येईल, लोकांचं आयुष्य अजून सोयीचं कसं होईल- अशा असतात. त्याच्या महत्वाकांक्षा ह्या- तो अजून कसा आंतरजाल, टेक्नॉलॉजी व स्टेम सेल रिसर्च मधे पुढे कसा जाईल अशा आहेत.

त्यांचा एक फिलॉसॉफीकल विचारांचा दुसरा प्रोग्रामर मित्रंही आहे. ह्या तिघांची एक कंपनी आहे, ज्यात मॉर्गन फ्रिमन गुंतलेला आहे आणि गोवर्नमेंट ऑफिशियल आहे. हा प्रकार हाताबाहेर जातो आहे म्हणून एक ॲन्टि -टेक्नॉलॉजी/ आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेरिरिस्ट ग्रूप याच्यावर गोळीबार करतो. सुरवातीला तेच खलनायक वाटतात पण नंतर त्यांचेही चूक नव्हते असे वाटते. त्यांच्या गोळीबारात जॉनी डेपला गोळी लागून तो मरणार असतो पण स्वतःच्या प्रोग्रामच्या बळावर रेबेकाच्या मदतीने सगळी consciousness किंवा बुद्धी - मन आणि चेतना अपलोड करून पुन्हा शरीराशिवाय जिवंत होतो. शरीराच्या मर्यादा संपल्याने बुद्धी व मन अमर्याद होते. मन अमर्यादच असतं पण ती जाणीव विकसित करण्याचे तंत्र या चेतनेने खुलं होतं.

यात त्याच्या फीलिंग्ज/ भावना हरवून तो नॅनो टेक्नॉलॉजीच्या बळावर सगळ्यावर ताबा मिळवतो, अक्षरशः प्रत्येक अणू रेणू मधे त्याला सेल्फ हिलिंग व ह्याच्या मनाशी कनेक्शन जोडता यायला लागते. Omniscient..! शेवटी व्हायरस मिळवून रेबेकाच्या मदतीने त्याला संपवावे लागते.

कल्पना खूप अमेझिंग आणि काळाच्या पुढची आहे , चित्रपट दहा वर्षे जुना आहे. कामं उत्तम, तगडी स्टारकास्ट आहे. सुरवातीला कथानक ज्या उंचीवर जाते त्यामानाने
क्लायमॅक्स एकदम थिटा किंवा ॲब्स्ट्रॅक्ट वाटतो. पण मला ह्या विषयावरचे सिनेमे आवडतात म्हणून मी दुसऱ्यांदा पाहिला. वैचारिक खाद्य भरपूर मिळेल, समाधान मिळेल की नाही माहीत नाही.

हॉस्टाइलस - वेस्टर्न पट. इन्टेन्स आहे. स्लो आहे पण आवडला. रोझमंड पाईकचे काम आवडले. वेड लागून, आपल्या लहान मुली, व बाळाच्या प्रेतांना जोजवत असते तो प्रसंग बाप रे!!! पण मग सावरते.
विकत घेउन पाहीला. अन्य प्लॅटफॉर्मसवरती आहे का ते माहीत नाही.

Iratta netflix वर पाहिला. हिंदी audio उपलब्ध नाही, subtitles वाचून पाहिला. खूप खूप आवडला. लीड ॲक्टर च्या अभिनयाची तारीफ करू तेवढी कमी आहे. बहुतेकांनी आधीच पाहिला असेल, ज्यांनी नाही पाहिला त्यांनी जरूर पहा.

ब्लड डायमंड खुपच भारी आहे. लिओनार्दो ने ज्या विविध प्रकारच्या भुमिका केल्या आहेत त्यामुळे तो खुप आवडतो. सम्पुर्ण सिनेमा मधे डायमंड साठी जीव काढतो पण शेवटी त्या बापाला ज्या प्रकारे सान्गतो की मुलाची कालजी घे तो सीन अजुन ही दोळ्यासमोई आहे. त्याने लावलेला ऍसेंट उच्चारण शैली पण मस्त आहे.

अस्मित, ब्लड डायमंडचा रिव्ह्यू छान. पण बघणार नाही कदाचित. खूप अंगावर येणारा पिक्चर आहे असंच ऐकलंय.

वीकेंडला MI Final Reckoning पाहिला. आधीच्या भागापेक्षा हा जास्त आवडला. जबरदस्त स्टन्ट्स आहेत, सिनेमाला कमालीची गती आहे. बाकी अतिरंजित वगैरे गोष्टी असतील हे गृहित धरूनच असले पिक्चर बघितले जातात त्यामुळे ते काही खटकलं नाही. या वयातही टॉम क्रूझ फिट आहे आणि चिकणा दिसतो hearteye.jpg
मी तरी सिनेमा पूर्णपणे एन्जॉय केला. कदाचित परत पाहायला जाईन. सबमरीनचा आणि विमानातल्या मारामारीचा हे सीक्वेन्स भन्नाट आहेत.

सबमरीनचा आणि विमानातल्या मारामारीचा हे सीक्वेन्स भन्नाट आहेत. >>> हे दोन वेगवेगळे सीन्स आहेत ना? Happy हॉलीवूड आहे म्हणून वेगळे असतील. बॉलीवूड मधे एकाच सीनमधेही असू शकते.

क्लायमॅक्स एकदम थिटा किंवा ॲब्स्ट्रॅक्ट वाटतो >>> पोस्ट सायफाय मोड मधे वाचल्याने "थिटा" सुद्धा मला ग्रीक सिम्बॉल वाटला Happy एखादेवेळेस सायफाय लेजेण्ड्स असे अल्फा, गॅमा वगैरेच्या भाषेत बोलतही असतील असे वाटले.

हे दोन वेगवेगळे सीन्स आहेत ना? >>> Lol हो हो. एकाच सीनमधे दोन्ही गोष्टी असायला हा काही रजनीकांत, प्रभास वगैरेंचा पिक्चर नाही. मला मात्र तुझ्या पोस्टमुळे उडणारी सबमरीन डोळ्यासमोर आलीये Proud

तुझं काही तरी आहे रमड, सिरीज धाग्यावर तू मिसोची वाट बघत होतीस, इथे क्रूझ या वयात चिकना दिसतो म्हणालीस - मोठी रेन्ज आहे एकंदरीत. Wink Proud Keep it up babe.

सबमरीनचा आणि विमानातल्या मारामारीचा हे सीक्वेन्स भन्नाट आहेत. >>> हे दोन वेगवेगळे सीन्स आहेत ना? >> Lol शार्कनॅडो असू शकतात तर हे का नाही ? 'प्यार करे आरी चलवाये' हे तुझ्याच एका लेखात वाचलं आहे. Happy

आता हे क्लिशे वाटेल पण ते थिटा- ग्रीक सिम्बॉल वगैरे पोस्ट केल्याकेल्याच मनात आले होते. Happy

अगं मिसो, क्रूझ हे (माझ्या) लहानपणातले क्रश आहेत ना! त्यांची रेंज काहीही असली तरी मला दोघेही छानच वाटतात Proud

Pages