Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
उदाहरणार्थ हा धागा
उदाहरणार्थ हा धागा
India's got latent - चला निषेध नोंदवूया.
https://www.maayboli.com/node/86266
छावावाले छावाच्या धाग्यावर जा
छावावाले छावाच्या धाग्यावर जा
>>>>
हे पटकन छावावाले छावाच्या छाग्यावर जा असे वाचले गेले
पण योग्य सूचना आहे. इथे मी दुसऱ्या दोन चित्रपटांच्या पोस्ट लिहिल्या जे गेले दोन दिवस पाहिले. पण वेगात वाहून गेल्या.
मागेच मी सूचना केली होती की चित्रपट परीक्षण पोस्ट आणि चित्रपट चर्चा असे दोन वेगळे धागे करायला हवेत. पण दुर्दैवाने मी मायबोलीचा ॲडमिन नाही.
सॉरी आशू मला 'सेव्हिंग
सॉरी आशू मला 'सेव्हिंग प्रायव्हेट रायन' म्हणायचे होते
हा मी तेच म्हणलं असं कसं काय
हा मी तेच म्हणलं असं कसं काय झालं
पण तरीही 300 चे युद्ध मध्ययुगीन होते
300 आणि ट्रॉय ची तुलना होऊ शकते
सेव्हिंग प्रायव्हेट शी नाही तितकीशी बरोबर
मला युद्धाच्या
मला युद्धाच्या चित्रीकरणाबद्दल बोलायचे होते. ट्रॉय नीटसा आठवत नाही.
ट्रॉय म्हणजे ब्रॅड पिट चा
ट्रॉय म्हणजे ब्रॅड पिट चा
त्यातही असंख्य शक्तिशाली योद्धे आहेत आणि त्यांची लढाई खरी वाटते
हे आपल्याकडेच बाहुबली चे अतिरेकी लोण आलेलं आहे
उडत उडत जाऊन मारणे प्रकारच्या मारामारी चे
तुम्हाला हेच दाखवायचं आहे ना मग एक सशक्त काल्पनिक व्यक्तीरेखा उभी करा जशी बाहुबली ची केली
आणि मग दाखवा ना काय वाट्टेल ते
पण याना रेडी मसाला तर तोच हवाय आणि वेगळं काही उठून दिसेल असं लिहायची धमक नाही
मग घ्या ऐतिहासिक व्यक्तिरेखा आयत्या आहेत त्याच
त्यांना बाहुबली मसाल्यात घोळवून द्या खायला लोकांना
यात मग वाहवा आमच्या राजांवर बॉलिवूड ने सिनेमा काढला म्हणून धन्यता मानणारे भाबडे जीव ते मनोरंजन मग ते कसलं का असेना बघणारे जीव यांच्या दोन घटका मनोरंजनाची सोय होते
निर्मात्यांचा गल्ला भरतो
मग त्या ऐतिहासिक व्यक्तिरेखचा काय का होईना
आपल्याला काय
मग त्या ऐतिहासिक व्यक्तिरेखचा
मग त्या ऐतिहासिक व्यक्तिरेखचा काय का होईना >> तुझा सात्विक संताप समजतो . फक्त काही मिनिटे शांतपणे विचार कर कि नक्की काय झाले त्या व्यक्तिरेखांचे ह्या सिनेमानंतर ? ज्यांना राजे माहित आहेत त्यांना ह्यातून काही फरक पडत नाही (सिनेमा पाहिल्याचा मनःस्ताप वगळता) . ज्यांना माहित नाहीत पण जे जाणते असतील त्यांना ह्यातला अतिशोयक्तीचा भाग वगळून बाकी जे काही होते त्यातून कुतूहलाने पुढे बघत गेले तर तो नक्कीच प्लस पॉईंट. उरलेला गाळ जो सिनेमातला इतिहासच खरा धरतात त्यांना इग्नोर करायचे. त्यांना सुधारणे येर्याबगाळ्याचे काम नाहीच तसेही. प्लस पॉईंट कडे लक्ष दे.
how to train your पुष्पक? >>
how to train your पुष्पक? >>
https://www.youtube.com
https://www.youtube.com/shorts/wTMAJKox2Y8
संतोष जुवेकर ला उगीच ट्रोल केले गेले.
प्राईमवर Speak No Evil हा
प्राईमवर Speak No Evil हा डेन्जर थ्रिलर पाहिला.
संतोष जुवेकर ला उगीच ट्रोल
संतोष जुवेकर ला उगीच ट्रोल केले गेले.>>>ही लेडी महागुरु कॅटेगरी आहे
इथे बघा प्रश्न काय आणी उत्तर काय
https://www.youtube.com/shorts/-k7hXbuiU6Y
वरची कमेंट > >
वरची कमेंट > >
ते म्हणतात ना " दुसर्याची रेष छोटी करण्यापेक्षा आपली रेष मोठी करावी"
तसं हिच्या मुलाखती अशाच येत राइल्या तर महागुरूंना लोक विसरून जातील.
Natural Talent !
बाहर we cannot wear anything,
बाहर we cannot wear anything, एक तरिकेसे इन्सिक्युर हो जाते है
हे ऐकुन या बाया स्ट्रटेजिक पॉइंट्स जेमतेम झाकतील इतकेच कपडे घालुन का फिरतात ते कळले. अशा मुलाखती येत राहिल्या पाहिजेत. १०० करोडची घड्याळे असतात हे माहितच नव्हते. कळणार तरी कसे? अजुन येऊद्या असल्या मुलाखती.
(No subject)
युट्युब लिंक उर्वशी ची आहे का
युट्युब लिंक उर्वशी ची आहे का? (आफिसात नाही उघडत मी) तर हिच्या नावाचे १ मंदिर उत्तराखंडात आहे असे हिचे म्हणणे आहे
अशी रील पाहिली होती.
साधना
साधना
बादवे घड्याळ १०० कोटींचे नाहीये. तिच्या डाकूमहाराज सिनेमाने १००-१०५ कोटींचा गल्ला जमवला (बॉक्स ऑफिस कलेक्शन) आणि त्याबद्दल अभिनंदन म्हणून तिच्या आईवडिलांनी तिला गिफ्ट्स दिली.
क्रिकेटर ऋषभ पंतच्या मागे
क्रिकेटर ऋषभ पंतच्या मागे लागलेली उर्वशी हिच होती का?
लॉकडाउन्मध्ये ही
लॉकडाउन्मध्ये ही महाराष्ट्राचे तेव्हाचे राज्यपाल भगतसिंह कोशोयारी यांच्या सोबत गोव्याला गेल्याच्या बातमीने गदारोळ झाला होता - . ( ते तिचे अंकल आहेत. ) मग पुढे त्यांच्याच हस्ते तिला स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. नारी शक्ती पुरस्कार आणखी वेगळा आहे. तो राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जातो.
प्राईमवर छोरी २ पाहिला. आवडला
प्राईमवर छोरी २ पाहिला. आवडला.
सोहा अली खान वॉज नाईस सरप्राईज! मस्त काम केलंय. तिचे कधी फार सिनेमे आले नाहीयेत क?किंवा मी पाहिले नसतील.
नुसरत पण बेस्ट! गश्मीरला छोटा रोल आहे पण आवडला तोही. ती लहान मुलगी फार गोड आहे.
हो, छोरी२ चांगला आहे, शेवट
हो, छोरी२ चांगला आहे, शेवट मात्र फार अॅबरप्ट वाटला. पण एकूण रूपक, वातावरणनिर्मिती, खूप लहानसहान बायसेसकडे लक्ष वेधणं सगळं मस्त.
>>संतोष जुवेकर ला उगीच ट्रोल
>>संतोष जुवेकर ला उगीच ट्रोल केले गेले.>>
आज हे बघण्यात आलं 😀
https://youtube.com/shorts/QO0WBXf17Q8?si=zqdpL7QZ2uWf3InX
प्राईमवर स्पीक नो इव्हिल
प्राईमवर स्पीक नो इव्हिल बघितला. मस्त आहे मला आवडला.
हॉरर थ्रिलर प्रकारातला आहे म्हणजे भूतं बितं नाहीयेत. पण कधीकधी सामान्य दिसणार्या माणसांचं विचित्र वागणंच घाबरवून सोडतं तसंच काहीसं.
एका व्हेकेशनला २ स्ट्रेंजर फॅमिलीज फ्रेंडस बनतात. पुढे मैत्री वाढवायच्या हेतूने त्यातले एक कपल त्यांच्या कंट्रीसाईड्/फार्महाऊस टाईप्स घरी दुसर्या फॅमिलीला पाहुणचार घ्यायला बोलवतात. तिथून पुढे होस्ट फॅमिलीची डार्क बाजू उलगडायला लागते.
वीकएन्डला वेळ जात नव्हता,
वीकएन्डला वेळ जात नव्हता, म्हणून यूट्यूबवर जुना 'जुदाई' बघितला. जितेंद्र, रेखा.
अ आणि अ सिनेमा, वय वाढलेला जितेंद्र. सुमार अॅक्टिंग स्किल्स असून पण त्याला इतके सिनेमे कसे काय मिळाले असतील!
रेखा मात्र झकास.
अशोककुमार श्रीमंत म्हातारा, त्याचा मुलगा जितेंद्र, डॉक्टर.
त्यांचं प्रचंड घर, जितेंद्र काम करतो ते हॉस्पिटल अगदीच कंट्री. घर आणि हॉस्पिटलचं आर्थिक गणित आपल्या मनात काही जुळत नाही.
घराची गव्हर्नेस रेखा. रे आणि जि बालमित्र. तिच्याशिवाय घरचं पान हलत नाही. सकाळी तिने येऊन ऑर्डर्स दिल्याशिवाय घरचं काहीही काम सुरू होत नाही. हे किचन कामासाठी एकवेळ ठीके. पण ड्रायव्हरही तिची वाट बघत हॉलमध्ये येऊन थांबतो.
अशोककुमारला वयानुसार तब्ब्येतीच्या तक्रारी, रेखाचा डोळा चुकवून तो चहात जास्त साखर घालतो, गोड खातो, सिगार पितो, मग रेखा त्याला लटक्या रागाने दटावते, वगैरे नेहमीचे यशस्वी #अति-लाडात सीन्स.
जितेंद्र पोरी फिरवतो, रेखा त्याच्यावर लक्ष ठेवून असते. अ.कु.कडे त्याच्या तक्रारी करते.
एकदा जितेंद्रला त्याचे बॉस WHO च्या सेमिनारला परदेशी पाठवतात. तो तडक तिकडे जातो. बॉलिवूडवाल्यांचं विजा प्रोसेसिंग एकदा मला तपासायचंय.
१५ दिवसच गेलेला असतो, तरी इकडे सगळं उदास उदास असतं. रेखा उदास. अ.कु. उदास. नोकर-चाकर उदास. स्वयंपाकघर उदास. हॉल उदास.
उदासी घालवायला अ.कु. आणि रेखा बागेत पाय मोकळे करायला जातात. पण पूर्ण वेळ एकाच ठिकाणी बसून राहतात. तिथे रेखाच्या स्वप्नात 'मार गयी मुझे तेरी जुदाई' गाणं घडतं. आशा भोसले, कि.कु. जियो!
टळटळीत उन्हात पाऊस पडतो, दोघं भिजत गातात. विनापावसाचं गाणंही चांगलं वाटलं असतं.
रेखाला (रादर प्रेक्षकांना) साक्षात्कार होतो, की हिचं जि.वर प्रेम आहे. तोपर्यंत दोघांत काहीही केमिस्ट्री दिसत नाही. तरी आपण मानून घ्यायचं.
मग अ.कु.ला दिल का दौरा पडतो. ऑक्सिजन मास्क लावायच्या ऐवजी त्याला सलाइन लावतात. घरातच. जि.च्या हॉस्पिटलमध्येही नेत नाहीत. ते कंट्री असतं हे एक कारण असावं. यथावकाश तो मरतो. मरण्यापूर्वी जायदाद रेखाच्या ताब्यात देतो.
जि. परत येतो. भडकतो. रेखानेच कट करून अशी जायदाद करून घेतली म्हणून आरोप करतो. भांडण. रेखा घर की चाबीया फेकून घर छोड के निघते. पुन्हा घर उदास. हॉल उदास. नोकरचाकर उदास. त्यात आता जि. पण उदास.
उदासीत जि.ला साक्षात्कार होतो की रेखा के बिना वो रह नहीं सकता.
मग दोघं लग्न करतात. 'मौसम... सुहाने आ गए लो' हे सुरेल गाणं होतं. आय लव्ह लक्ष्मीकांत-प्यारेलाल.
गाण्याच्या शेवटी रेखा प्रेग्नंट.
पुढे गैरसमजाचे लुटुपुटू प्रसंग, भांडण, रेखा पुन्हा घर छोड के जाते. आधी सोडून गेलेली असते तेव्हा खरं म्हणजे ती त्या घरात आलेलीच नसते, त्यामुळे जाणार कशी. आता आलेली असते, त्यामुळे कन्फर्म्ड जाते. जाताना तिच्या कोख में दुसरा बच्चा असतो.
यावेळी घर उदास, जि. उदास. बाकी कुणी आता नसतंच उदास व्हायला.
जि. पहिल्या मुलाला वाढवतो. सचिन.
रेखा गरीबीत (मेक-अपसकटच्या) दुसर्या मुलाला वाढवते. अरुण गोविल.
दोघं एकाच कंपनीत कामाला लागतात. त्या कंपनीत जितेंद्र पार्टनर असतो. डॉक्टरकीचं काय झालं काय माहित!
लकीली दोघं वेगवेगळ्या मुलींच्या प्रेमात पडतात. लग्न करतात. एकत्र बागेत गाणं म्हणतात- 'तेरे नाम के हम दीवाने हैं...' (गाण्याची चाल 'ब्राऊन गर्ल इन द रिंग ट्रा ल ला ला ला' ... स्टिल आय लव्ह लक्ष्मीकांत-प्यारेलाल)
'हृदयी वसंत फुलताना' या गाण्याची मुळं इथे ठायीठायी दिसतात. 'अशी ही बनवाबनवी'च्या फॅन्सनी हे जुदाईतलं गाणं नक्की शोधून बघा.
मग श्रीमंती वि. गरीबी, चांगली माणसं वि. फारशी रीत नसलेली माणसं - असे काही सीन्स घडतात. त्यात जि. आणि रे पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर येतात आणि त्यांची जुदाई संपते.
शेवटची १० मिनटं अजून पाहून व्हायची आहेत. कदाचित बघणारही नाही. तेवढी जुदाई राहिली तर राहू देत.
प्रीति
प्रीति

गोष्ट चांगली वाटतेय तशी.
आम्ही काही दिवसांपूर्वी 'कभी कभी' बघितला. मी खूप लहानपणी कधीतरी थोडासा बघितला होता. त्यानंतर आत्ताच.
सुरुवातीला कायच्या काय वाटला. (गाणी सोडून अर्थात. मैं पल दो पल का शायर, कभी कभी) पण मग नंतर हळूहळू बरा वाटायला लागला. बराच मोठा काळ कव्हर केलाय, बऱ्याच गुंतागुंती आहेत. भरपूर योगायोग. कहानी पूरी फिल्मी है. त्यामुळे घटना फास्ट घडतात. अमिताभ-राखीचं एकमेकांवर प्रेम असून ताटातूट होते. तिचं लग्न शशी कपूरशी होतं. ती सुरुवातीला दुःखी होते पण नंतर जुळवून घेऊन आनंदाने राहते. त्यांचा मुलगा ऋषी कपूर. अमिताभ मात्र प्रेमभंगाचं दुःख मनात ठेवतो आणि शायरी सोडून देतो. वडिलांचा व्यवसाय सांभाळतो. त्याचं लग्न होतं वहिदा रहमानबरोबर. इकडे ऋषी कपूर प्रेमात पडतो नीतू सिंगच्या. तिचे आईवडील परीक्षित साहनी आणि सिमी गरेवाल. पण ती खरी त्यांची मुलगी नसतेच. ती असते वहिदा रहमानची मुलगी, लग्नाच्या आधी झालेली. तिचा प्रियकर विमान अपघातात मरतो. वहिदा आणि सिमी गरेवाल या एकमेकींच्या कझिन्स किंवा मैत्रिणी असतात, नक्की कळलं नाही. हे गुपित नीतू सिंगला सांगितल्यावर ती 'खऱ्या' आईला भेटायला जाते. ती तिला 'मुलगी' म्हणून ओळख देत नाही. तिलाही अमिताभपासून एक मुलगी असते. ऋषी कपूरही तिथे पोचतो. बऱ्याच घटना घडतात. शेवटी सगळे सुखी होतात.
पण शेवटी एकंदरीत जो काही सारांश निघतो, तो चांगला वाटला.
बॉलिवूडवाल्यांचं विजा
बॉलिवूडवाल्यांचं विजा प्रोसेसिंग एकदा मला तपासायचंय.
१५ दिवसच गेलेला असतो, तरी इकडे सगळं उदास उदास असतं. रेखा उदास. अ.कु. उदास. नोकर-चाकर उदास. स्वयंपाकघर उदास. हॉल उदास.
उदासी घालवायला अ.कु. आणि रेखा बागेत पाय मोकळे करायला जातात. पण पूर्ण वेळ एकाच ठिकाणी बसून राहतात. तिथे रेखाच्या स्वप्नात 'मार गयी मुझे तेरी जुदाई' गाणं घडतं. आशा भोसले, कि.कु. जियो! >> हा पॅरा धमाल आहे
अ.कु.ला दिल का दौरा पडतो. ऑक्सिजन मास्क लावायच्या ऐवजी त्याला सलाइन लावतात. >>
:हाहा:मस्त लिहिलेय पाहायला
जितेंद्र आणि रेखाचाच एक ही भूल पाहिलाय, तोही वेळ जात नसेल तर बघण्याच्या आणि पिसं काढण्याच्या कॅटेगारीतला आहे ,त्यावर खरंतर धागा हवा .काढा कुणीतरी.
<<अशी ही बनवाबनवी'च्या फॅन्सनी हे जुदाईतलं गाणं नक्की शोधून बघा.>>फॅन्स साठी हे घ्या https://youtu.be/O23xE7lGIiI?si=ONAjn-U71I0ww-CK
बट स्टील आय लव्ह लक्ष्मीकांत-प्यारेलाल
गाणं भारी आहे सिमरन
गाणं भारी आहे सिमरन
प्रभू रामचंद्रांबरोबर हम पांच मधली अशोक सराफ यांची (दुसरी) बायको आहे ना ?
आणि महागुरूंबरोबर आहे ती हिंदी मालिकात वयस्कर भूमिकात दिसते तीच का ती ?
शबाना आजमीची कुंभ मेळ्यात हरवलेली बहीण वाटली.
जुदाई पोस्ट
जुदाई पोस्ट
मी पाहिला आहे हा पिक्चर... नाव नक्की माहित नव्हते.

आणि एकही भूल सुद्धा पाहिला आहे..
मला आवडायचा जितेंदर
मजेशीर कलाकार होता
ललिता प्रीति धमाल परीक्षण
ललिता प्रीति धमाल परीक्षण
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=Tev00rWBLi0
जितेंद्र ची वयस्कर भूमिकेची कल्पना ही अशी आहे. असा प्रत्यक्षात म्हातारा झाल्यावरही दिसला नाही कधी.
त्या काळच्या मराठी घरातली जितूजी फॅन मुलं उठसूठ खेकसणारे आपले बाबा असे का नाचत नाहीत असा विचार करत असतील.
Pages