चित्रपट कसा वाटला - ११

Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53

नवीन चिकवा.

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क तरह का कोयला काला होता है. दूसरी तरह का...भी कालाही होता है' तो का? >>> Happy हो तोच. पुढे बरेच काय काय पाल्हाळ आहे. परवीनचे एक्स्प्रेशन्सही बदलत जातात. सुरूवातीला तिला वाटते हा खरंच कोळसा, खाण, तेथील प्रोसेस ई बद्दल माहिती देणार आहे Happy

'एक सेकंद के लिये लगा मेरा अपना ही खून है'! >>> यस!

आणि मुलाला नाजायज म्हणण्यापेक्षा बापालाच नाजायज बाप म्हणणे! ते जास्त चपखल आहे खरे म्हणजे.

त्रिशुल आणी शक्ती फक्त आणी फक्त डॉयलॉगची आतिषबाजी आहे..जबरदस्त लिहलेत सगळेच डॉयलॉग..शक्ति मधे अमिताभ आणी स्मिता पाटिल लिव्ह इन मधे त्याकाळी वैगरे दाखवणे फारच काळाच्या पुढच होत..

फा >>> आत्ता मी याच गाण्याबद्दल लिहायला आले होते.

तो निरुपा रॉयने एकहाती हाणून पाडला का मग
>>> अगदी छिन्नी, हातोडा, विटा वगैरे घेऊन. पूर्वीच्या काळी निम्मी जशी एकतर्फी प्रेम व सबसिक्वंट प्रेमभंगासाठी जन्माला आलेली तशीच निरुपा रॉय पती व मुलांना हरवण्यासाठी. त्यातनं जमलंच तर लगेहाथ ती दृष्टी वगैरे पण हरवून घ्यायची. कसला रोमान्स नी कसलं काय!

शक्ति मधे अमिताभ आणी स्मिता पाटिल लिव्ह इन मधे त्याकाळी वैगरे दाखवणे फारच काळाच्या पुढच होत..
>>> १०००++
आणि बऱ्यापैकी अनअपोलोजेटीक होते ते. जाने कैसे कब कहा गाणं आवडतं

>>> मुलाला नाजायज म्हणण्यापेक्षा बापालाच नाजायज बाप म्हणणे!
हो, अगदी! Happy

माझेमन Lol

आत्ता मी याच गाण्याबद्दल लिहायला आले होते. >>> Happy

तेथे "जनमान तुम कमल कार्त हो" के बोल असे टायटल आहे Happy

'गेट आऊट' सायकॉलॉजीकल थ्रिलर आहे. एक व्हाईट फॅमिली आहे. त्यात एक तरुण मुलगी आहे. ती तिच्या काळ्या मित्राला घेउन येते आणि मग त्याला एक एक विचित्र वागणारे लोक भेटायला लागतात. तो तिथुन सुटु शकतो का? काय रहस्य आहे त्या जागेत. तुम्हीच पहा.
मी पिकॉक वरती पाहीला.

ब्लड डायमंड - प्राईमवर पाहिला.
Leonardo DiCaprio, Jennifer Connelly, Djimon Hounsou
प्राईमवरून जात आहे व पाच ऑस्कर नामांकन मिळालेली दिसल्याने पाहिला. सिएरा लिओन सिव्हिल वॉरच्या काळात तेथील दहशतवाद्यांनी तिथल्या सामान्य जनतेला गुलामासारखे वागवून हिऱ्यांच्या खाणीतून हिरे - ओबडधोबड, न तासलेल्या स्वरूपातील काढून घेण्यासाठी भयंकर अन्याय व शोषण केले जाण्याची कथा आहे. कथा आणि अभिनय जबरदस्त आहे. भयंकर वेगवान पॉलिटिकल वॉर थ्रिलर आहे.
त्या शोषित जनतेने मत देऊ नये व तिथली सत्ता बदलू नये, गुलामगिरी, अन्याय व हिऱ्यांचा गैरव्यवहार असाच चालू रहावा म्हणून एकेकाचे हात तोडून टाकलेले सीन आहेत. भयंकर अंगावर येणारा सिनेमा आहे. त्रासदायक बाब म्हणजे हे खरेच असले पाहिजे असे वाटून क्लेश होतात. सगळी सप्लाय चेन अशी बनवली आहे की ज्यांचे शोषण होते त्यांना वाचा उरली नाही, सगळे अव्याहतपणे सुरू रहावे म्हणून संपूर्ण जगातील लोक याकडे दुर्लक्ष करतात.

जेनिफर कॉनली (मेरी बॉवेन्स) नावाची अमेरिकन जर्नलिस्ट आहे. लिओ एक स्वतःचे आईवडील नवव्या वर्षी बलात्कार व मुंडके उडवलेले बघितल्याने- यातच मोठा झालेला प्रसंगी निर्ढावलेला तरीही कुठेतरी संवेदनशील असा तस्कर आहे. तो हिरे व बंदुकांची तस्करी करतो. जिमॉन हा तिथला शोषित आहे, ज्याच्या मुलाला दहशतवादी होण्यासाठी ट्रेन केले जाते आहे. बायको व मुली एका निर्वासितांच्या छावणीत त्यांच्याच देशात ताटातूट झाल्याने तुरुंगवासात राहतात.

या जिमॉनच्या मुलाला त्यातून वाचवून आणून सगळ्या कुटुंबाला एकत्र आणून लंडनला सुरक्षित पाठवण्याचा थरार आहे. पुन्हा एकदा - भयंकर सिनेमा आहे. सगळीकडेच एवढा अन्याय आणि शोषण बघून तेही कोण्या एका अमेरिकन तरूणीला बोटात घालायला हिरा मिळावा म्हणून - एकदम सगळं व्यर्थ वाटायला लागतं. हे सगळे कच्च्या स्वरूपातले हिरे किम्बर्लीच्या खाणीतून तासायला भारतात सुरत मधे येतात आणि बेल्जियम, ॲन्टवर्प मधल्या डायमंड ट्रेडिंग हब मधे जातात. सगळे जग या अन्यायात हातभार लावते , त्यामुळे दहशतवाद व युद्धही चालू राहते.

ही शोषणाची शृंखला इतकी घट्ट आहे की कुठून सुरु होतेय व कुठे संपते कळत नाही. शेवटी त्या बाप मुलाला एकत्र आणताना लिओचा जीव जाताना आफ्रिकेतील savannah बघत, त्या सुंदर संध्येचे रसपान करत मॅगीला 'तुला आता कथा मिळाली बघ' म्हणतो. ते दृष्य काटा आणणारे व मनःशांती देणारे असे दोन्ही झाले आहे. दहशतवादाचे बाळकडू मिळालेला जिमॉनचा बारा- तेरा वर्षे वयाचा मुलगा हिऱ्यासाठी बापावर बंदूक उगारतो. तो सीनही भेदक झाला आहे. त्याच्या डोळ्यात फक्त थंड भाव असतात. सगळे हिऱ्यांसाठी हपापलेले आहेत, माणसांशी कुणाला काही देणं घेणं नाही. हा हिरा सुखवस्तू जनतेपर्यंत येण्याचे सगळे मार्ग रक्ताळलेले आहेत. त्यामुळे ब्लड डायमंड. पण अशी हजारो कुटुंबे तिकडे वाट बघत असतात, सुटकेची. त्यापैकी एका कुटुंबाला लंडनला जायला मिळते. जबरदस्त चित्रपट आहे. नक्की पहा.

अस्मिता मस्त लिहीलयस. खूपच आवडलाय तुला सिनेमा जाणवले. मला बघता येइल का याबद्दल शंका आहे . पण लिखाण आवडले.
----------------
काल मिशन इम्पॉसिबल ८ पाहीला. अ तिरंजित व अतिमानवी, सिनेमा आहे. टॉम क्रुझ चांगला दिसतो यात क्रु कट नाही तर जरा लांब केस आहेत. पण हा सिनेमा परत पहाणार नाही. एकदा ठिक आहे.
मुख्य म्हणजे 'मिशन इम्पॉसिबल' ची सिग्नेचर ट्युन फार कमी वेळेत वाजलेली आहे. मला फार आवडते किंबहुना ते एक आकर्षण होते. आज पहीले भाग काढुन पाहीनच. टॉम-टॉम-टॉम!!!

ब्लड डायमंड - विशलिस्टला आहे. कधीपासून पहायचा आहे मला.

असंच 'कोबाल्ट रेड' पुस्तक आहे. आफ्रिकेत लहान लहान मुलांना खाणींमध्ये राबवलं जातं. स्मार्ट फोन्स आणि इलेक्ट्रिक कार बॅटरीजसाठी लागणारं कोबाल्ट मिळवण्यासाठी.
पुस्तकाचा रिव्ह्यू वाचला, घ्यावंसं वाटलं, पण वाचवलं जाईल का असंही वाटलं. Sad

ब्लड डायमण्ड काही वर्षांपूर्वी पाहिला होता. भारी होता. खूप डिटेल्स लक्षात नाहीत. सॉलिड लिहीले आहेस. त्यावेळेस "आमचे हिरे तसे नाहीत" वाल्यांबद्दलही लेख आले होते हे लक्षात आहे.

आमचे हिरे तसे नाहीत" वाल्यांबद्दलही लेख आले होते हे लक्षात आहे.
>>> हे वाचलेले नाहीत पण मी स्वतः तनिष्कचे हिऱ्याचे नेकलेस रोज वापरते. त्यांचेही कशाकशातून येत असतील असं वाटून एकदम कसंनुसं झालं. त्यांचे असे काही आंतरजालावर असेल तर शोधायचे ठरवले आहे. उत्सुकता निर्माण झाली एकदम.

स्त्रियांवर लहानपणापासून "हिरा है सदा के लिये, Woman's best friend, प्रेमाचे प्रतीक" इत्यादी रोमॅंटिसाईझ गोष्टींचे कंडिशनिंग केलेलं असतं, शेवटी खरेतर 'कार्बन'च आहे ते.

थॅंक्यू सर्वांना. Happy

ब्लड डायमंड फार वर्षापूर्वी बघितला होता. त्यावेळी लिओनार्दोची रोमॅंटीक इमेज मोडून काढणारा चित्रपट म्हणून लक्षात आहे. तो हात छाटण्याचा प्रकार अगदी अंगावर येतो. ‘हिरा है सदा के लिए’ वगैरे फोल वाटले होते काही काळ.

Pages

नवीन प्रतिसाद लिहा