वेबसीरीज ३

Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

TBBT नंतर Young Sheldon पहायला घेतली होती मधले काही seasons चे काही भाग कंटाळवाणे झाले especially शेल्डनवर फोकस असलेले. लहानसा sheldon क्यूट होता पण नंतर नंतर irritating झाला. Georgie, meemaw, sheldon चे बाबा हे आवडते charachters. शेवटचे भाग बघवले नाहीत माझ्याकडूनही.

Young Sheldon नंतर त्याचीच sequel असलेली Georgie and mandy's first marriage बघत आहे. Georgie चे character खूप छान develeop झाले आहे. Mandy ची आई मात्र irritating आहे. पण ही सिरीज सुद्धा हलकीफुलकी आणि मस्त वाटली.

Georgie and mandy's first marriage ही कुठे बघायला मिळेल?

Young Sheldon खूप मस्त आहे. सगळी कॅरेक्टर छान रंगवली आहेत. मला सर्वात बिनधास्त मेरीची आई आवडली. कदाचित माझ्या स्वभावाच्या पूर्ण विरुद्ध असण्याने !! Opposite attracts !!! जॉर्ज ला मात्र उगाच मारले शेवटी असे खुपदा वाटले.
धनि , शेल्डन विषयी वाचल्यावर लिहिल्या शिवाय रहावले नाही.

Georgie and mandy's first marriage ही कुठे बघायला मिळेल?
>>>> हॉटस्टार वर

चिकित्सालय चा रेको होता. पण सोमि वर एव्हढे वाभाडे काढलेत.
पण काही जणांनी आवर्जून सांगितलेय कि ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचा अचूक आढावा घेतला आहे.
कदाचित गंभीर विषय पंचायत प्रमाणे मांडताना फसला असावा.
इथे जर कुणी रेको दिला तर पाहीन.

शेल्डन विषयी वाचल्यावर लिहिल्या शिवाय रहावले नाही >> अरे मस्तच. मी काल लिहिले तेव्हा मला वाटले नव्हते इतक्या लोकांना आवडली ही सिरीज. भारीच. Happy

यंग शेल्डन खूप आवडती सीरीज आहे. इथे लिहिले होते मी बहुधा पूर्वी. स्पिनॉफ असली तरी ओरिजिनल च्या वरताण अफलातून जमली आहे !!
तो लहान मुलगा फार भारी अ‍ॅक्टर आहे, कुठून शोधून आणला असेल, काय काम केलं आहे त्याने!! आणि मिसीचे पात्र आणि ती अ‍ॅक्ट्रेस पण माझे फार आवडते. मीमॉ, शेल्डन चे आई बाबा पण मस्त. त्याच्या बाबाच्या डेथ चा एपिसोड खूप मेलोड्रामॅटिक करता आला असता पण त्यांनी खूपच संयत केला . फोकस त्या डेथ चा जिवंत कॅरेक्टर्स वर इफेक्ट असाच ठेवला.
मला त्या मँडी चे कॅरेक्टर आणि तो ट्रॅक फारसे नाही आवडले त्यामुळे जॉर्जी आणि मँडी नाही बघितली. तसाच अजून एक न आवडलेला ट्रॅक म्हणजे जॉर्ज चे शेजारणीसोबत (अल्मोस्ट) अफेअर आणि त्याच्या आईचे त्या पास्टरसोबत असेच विचित्र इक्वेशन.

अमेरिकाज सायकिक चॅलेन्ज - प्राईम मला वाटतं किंवा मॅक्स असेल.
मस्त करमणुकप्रधान शो होता. काहीतरी १६ सायकिक्स होते आणि एलिमिनेशन राऊंडस. शेवटपर्यंत मजा आली. सायकिक क्षमता असावी यावर, थोडाफार विश्वासही बसला म्हणजे जो अंदाज फक्त होता , त्याचे कणभर विश्वासात रुपांतर झाले.

येस, यन्ग शेल्डन एन्जॉय केली होती. विशेषत: तो फिलॉसॉफीचा क्लास घेतो तो एपिसोड माझा अत्यंत फेव्हरिट आहे!

फिलॉसॉफीचा क्लास वाला फार मस्त आहे!! फेव्रेट एपिसोड्स खूप आहेत.
शेल्डन आणि मिसी दोघांची अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट करतात तो, मिसी चे बेसबॉल सिलेक्शन, शेल्डन च्या इन्टरेस्ट्स मधले काही समजत नसूनही जॉर्ज त्याला कॅलिफोर्नियाला घेऊन जातो तो, जॉर्ज आणि मिसीचे बाँडिंग सीन्स पण खूप मस्त आहेत - त्यातला तो लॉब्स्टर खायला जाण्याचा, फादर डॉटर डान्स चा, ड्राइव करताना टोर्नेडो येतो तेव्हाचा.

हो हो - अ‍ॅप्टिट्यूड टेस्टवालाही मस्त होता!
जॉर्ज आणि मिसीचेही. तिचा प्रथम पीरिअड येतो तोही एपिसोड गोड होता.

फोकस त्या डेथ चा जिवंत कॅरेक्टर्स वर इफेक्ट असाच ठेवला. >> Yes, ती डेथ न दाखवता बाकीच्या लोकांच्या इमोशन्स दाखवल्या फक्त.

जॉर्ज चे शेजारणीसोबत (अल्मोस्ट) अफेअर >> मला वाटते की हे आधी बिग बँग मध्ये आलेले होते त्यामुळे ते कनेक्ट करून घ्यावे लागले असेल. त्याचा मृत्यू पण अपरिहार्यता होती. नाही तर तो एक खूप आवडते पात्र झाला होता.

मला वाटते की हे आधी बिग बँग मध्ये आलेले होते त्यामुळे ते कनेक्ट करून घ्यावे लागले >>>>नाही नाही. तो नंतर आलेला उल्लेख त्यांनी वेगळा जोडला आहे. मेरी कधीतरी एकदम वेगळा पोशाख करून असते तेव्हाचा संदर्भ आहे.

आहा!
छान लिहिताय यंग शेल्डन बद्दल
आम्ही बरेच सिजन पाहिले.
एकत्र बसून.
बिग bang थेअरी फक्त मी पाहिलंय.
पण ते न पाहिल्याने काही अडचण नाही.
नंतर कोविड नंतरच्या काळात त्यांचे एपिसोड रेग्युलर आले नाहीत.

नंतर आम्ही prime subscription नाही रिन्यू केले.
त्यातले सगळे character फार फार भारी जमलेत.
मिमॉ कसली बिनधास्त आहे.
फिजिक्स चे प्रोफेसर जो तिचा बॉयफ्रेंड होतो.
नंतर दुसरे एक प्रोफेसर जो खडूस असतो, ती प्रिन्सिपल.
जॉर्जि आणि त्याचा तो मित्र जो त्याच स्कुल मध्ये कोच असतो,
शेल्डनची आई, बहीण मिसी , शेजारी कपल आणि त्यांचा मुलगा (जो फार हुशार नसतो )
धमाल आहे.

यंग शेल्डन थोडीफार पाहिली आहे. इंटरेस्टिंग वाटली पण "पुल" कमी आहे. शेल्डन व त्याचा एक मित्र घरी रॉकेट बनवतात म्हणून एफबीआयवाले येतात तो सीन धमाल आहे Happy

पुल = इतर बरेच काही उपलब्ध असताना हीच सिरीज लावण्याइतका इंटरेस्ट निर्माण होणे.

फा >> खरे तर सगळ्या गदारोळात काही तरी साधे सरळ जुन्या स्टाइलची सिटकॉम भारी वाटली. मला बहुतेक तोच पुल होता. नेफी वरच्या त्याच त्याच फॉर्म्युला सीरिअल्स पेक्षा ही जरा वेगळी होती. आणि सिटकॉम असतानाही त्यांची एक सलग गोष्ट पण होती जिने पूर्ण सिरीजभर बांधून ठेवले.

अशीच अजून एक आवडलेली सिरीज म्हणजे ब्रूकलिन ९९

हो ते पटते ध.

ब्रूकलिन ९९ सुद्धा मस्त आहे. तुकड्यातुकड्यांत पाहिली आहे.

रॉयल्स पळवत पळवत पाहिली... बघायला घेतलीच आहे तर बघुन घेउ म्हणुन...
मॉरिस चा सस्पेन्स भारी असेल अशी भाबडी आशा होती.. मॉरिस आणि भुमी चं काहीतरी कनेक्शन असेल असं वाटलं होतं..
सगळाच फुसका बार...

Hotstar वर क्रिमिनल जस्टीस S4 रिलीज झालाय. मूर्खासारखे फक्त 3 एपिसोड रिलीज केलेत. आधीचे सगळेच सिझन आवडते आहेत .. आता पुढच्या पार्ट ची वाट बघत बसा

सगळाच फुसका बार. >> मला काही अपेक्षा नव्हत्याच. भूमीचा रोल कमी करून बाकीच्या रॉयल्सचा रोल वाढवायला हवा होता. साक्षी तंवर, झीनत यांना जास्ती काम हवे होते. इव्हन ते दोन नवीन भाऊ बहीण पण चांगले काम करतात.

भूमीचा रोल कमी करून बाकीच्या रॉयल्सचा रोल वाढवायला हवा होता. >>> भुमी नकोच होती, सगळ्यात जास्त तीच खुपत राहते, शाहिदचा भाउ बराय पण रॉयल वाटत नाही...सगळ्यात रॉयल फोटोतला मिसो थोडे रॉयल लहान भाउ-बहिण वाटतात...साक्षी पेक्षा करिष्मा कपुर किवा राणी मुखर्जी सुट झाली असति..माधुरीही चालुन गेली असती..झिनत अजुनही "दम मारो दम मोडच वाटते..तिच्या एवजी जरा कुणी बर घ्यायला हव होत.
२ एपिसोडच बघितले पण भुमी असहनिय आहे..

भुमी नकोच होती >>> करेक्ट!
रॉयल्स तर 'गरीबांची ब्रिजरटन' लेव्हलला पण गेली नसावी असं वाटलं. झीनत अमान पहायला आवडली पण तिला पाहून 'अय्या' पिक्चरमधल्या ज्योती सुभाषची आठवण आली. मालिका येताजाता पाहिल्यामुळे अजून काही मतं झाली नाहीत. मिसो आवडलाच. पण ल्यूक केनी सुद्धा भारी दिसला म्हणून त्याचा विशेष उल्लेख.

नेट् फ्लिक्सवर डार्क डिझायर ही मेक्सिकन वेबसीरिज पाहतोय.
अल्मा ही लॉ प्रोफेसर. स्त्रियांच्या बाबतीतले हिंसक गुन्हे हा तिचा खास विषय. तिचा नवरा लिओनार्डो हा न्यायाधीश. लिओनार्डोचा भाऊ इस्टेबान हा माजी पोलिस अधिकारी. ब्रेंडा ही अल्माची मैत्रीण. झोई अल्माची मुलगी - कॉलेजात - बहुतेक मेडिकल शिकणारी.
ब्रेंडाचा नुकताच घटस्फोट झालाय आणि अल्मा तिला सोबत म्हणून एक वीकेंड तिच्याकडे राहायला जाते. ब्रेंडा नव्याने आयुष्य जगायला = मज्जा करायला फारच उत्सुक आहे. दोघी एका पार्टीला जातात. तिथे अल्माचा डारिओ या तरुणाशी संबंध येतो. ती घरी परत येते आणि ब्रेंडाने आत्महत्या केल्याची बातमी येते. दरम्यान डारिओ तिच्या मागे लागतो. तो ऑब्सेस्ड लव्हर वाटतोय, तोच तो झोईशी ही निनावी चॅट करत असल्याचं भासतं. मग हे कदाचित सूडनाट्य असावं असं वाटू लागतं. बॉलीवुडमध्ये असे चुन चुनके बदला लेनेवाले अनेक चित्रपट असतील.
मी आता पहिल्या सीझनच्या दहाव्या एपिसोड पर्यंत पोचलोय. बिन्ज वॉच करायचा मोह टाळातोय काय आणि कोण खरं, खोटं तेच कळेनासं झालंय. या सगळ्यांच्या आपापसातील संबंधातही भरपूर गुंता आहे.
.
इंग्रजी डबिंग आणि सब्टायटल्सही आहेत. दोन्हीचा भाव एक पण शब्द वेगळे.

विकीच्या म्हणण्यानुसार इंग्रजीखेरीज अन्य भाषेतली सर्वाधिक पाहिली गेलेली वेबसिरीज आहे.

अरे वा! कथावस्तू रोचक वाटते आहे. हल्ली खूप महिन्यांत काहीच बिंज केलेलं नाही. बघतो क्लिक होते का ही.
धन्यवाद.

Pages