वृत्तान्त - अमितव गटग -ठाणे -११ मे

Submitted by भरत. on 12 May, 2025 - 01:41

काल ११ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत कॅनडाहून भारत भेटीस आलेल्या अमितव यांचा मायबोलीकरांसोबतच्या भेटीचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाची काही छायाचित्रे सूत्रांकरवी प्राप्त झाली आहेत.
1.jpg2.jpg3.jpg4.jpg

ही छायाचित्रे पाहून मायबोलीकरांनी कार्यक्रमाबद्दल अंदाज बांधून इथे लिहायचे आहेत.

टीप १. अनुस्वाराच्या लेखनासंबंधी नियम -
काही शब्दांतील अल्पोच्चारित अनुस्वाराऐवजी अनुनासिक जोडले, तर त्या शब्दाचा अर्थ बदलतो. जसे
१. देहांत - शरीरांत ------------- देहान्त - मरण
२ वृत्तांत - कवितेच्या वृत्तांत ----------- वृत्तान्त - बातमी
३ वेदांत - वेदांमध्ये ........... वेदान्त - उपनिषदांतील तत्त्वज्ञान

हा नियम समजत नसेल तर पुढल्या गटगस हजेरी लावावी लागेल. ज्यांना समजला असेल त्यांनी न समजलेल्यांना समजवण्यासाठी पुढचे गटग आयोजित करावे.

टीप २ - अजून ठरायची आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निरुदा मधून मधून त्यांच्या "आरण्यक" चे फोटो दाखवत होते. मी ते निमंत्रण समजून लवकरच तिथे भेट देणार आहे किंवा त्यांनीच तिथे गटग आयोजित करावे.
>>>>याला माझे तातडीने अनुमोदन आहे.

II इति विवि गटग वृत्तान्त तृतीयोध्याय: समाप्त II <<

॥ इतिश्री ऋतुराजकृतम्
अन्य गटगआमंत्रणं अभ्यर्थनम्
अमितवश्रीस्थानकस्य विविगटगवृतान्तम् संपूर्णम् ॥

खूपच छान वृ लेखन ऋतुराज. सगळेच वृत्तांत वाचून मजा आली. पुढे कधी ठाण्यात गटग असेल तर जायला हरकत नाही असा धीर आला आहे सध्या. कुठपर्य टिकतोय बघू.

नविन अध्याय मस्त ऋतुराज
.
छान लिहिलं आहे सर्वांनी
.
आज पुणे गटग दणक्यात झाले
ठाणे पेक्षा जास्त मेंबर्स आले त्यामुळे जरा जास्तीच बरे वाटत आहे.
.
मजेचा भाग सोडला तर एवढे मात्र नक्की की गटग होत राहायला हवेत.
प्रत्यक्ष भेटी महत्वाच्या Happy

तिसरा अध्याय लैच गुळमाट झाला ऋतुराज
Happy

छान लिहिलाय vrutaant
भांडणं नकोत ह्या शब्दावर
व्याकरण चर्चा वाचून आधीच घाबरलोय Lol

॥ इतिश्री ऋतुराजकृतम्
अन्य गटगआमंत्रणं अभ्यर्थनम्
अमितवश्रीस्थानकस्य विविगटगवृतान्तम् संपूर्णम् ॥>>>> Lol _/\_

भेटल्यावर अमितला कॅनडात कुठे राहतो ते विचारल्यावर तो म्हणाला Ottawa
त्याचा उच्चार ओटावा असाही आहे. तेव्हा काकाफॉ वरील ओट्यावरील चर्चा आठवून तो विषय तिथे न काढता मी आतल्या आत गिळला.

॥ इतिश्री ऋतुराजकृतम्
अन्य गटगआमंत्रणं अभ्यर्थनम्
अमितवश्रीस्थानकस्य विविगटगवृतान्तम् संपूर्णम् ॥ >>> मस्त Happy

ऋतुराज - तिन्ही अध्याय आवडले. विशेषतः हा तिसरा.

त्याचा उच्चार ओटावा असाही आहे >>> अमितने कसा केला ते देवनागरीत लिही Happy तो आटोवा का असा काहीतरी करतो. तो स्थानिक उच्चार करतो असा माझा इतके दिवस समज होता (मियामी-मायामी, नायगारा-नायाग्रा, बोस्टन-बॉस्टन). पण आता अनुस्वारपुराणावरून तो शब्दावर कोठेतरी मात्रा आली ना मग झालेतर मोड मधे उच्चारतो का काय अशी शंका आली Happy

इतिश्री ऋतुराजकृतम्
अन्य गटगआमंत्रणं अभ्यर्थनम्
अमितवश्रीस्थानकस्य विविगटगवृतान्तम् संपूर्णम् ॥ >>> मस्त झाला आहे हाही भाग. तपशीलात दिल्याबद्दल धन्यवादच. Happy

'ऑटोवा' आहे ते मुलांनो. ओट्यावर पसारा करू नका. Happy

ऋतुराज - तिन्ही अध्याय आवडले. विशेषतः हा तिसरा >>> +१

'ऑटोवा' आहे ते मुलांनो. ओट्यावर पसारा करू नका >>> Lol अस्मिताने लगेच ज्याच्यात्याच्या ओटीत चुका टाकल्या Proud

ऋतुराज दे टाळी Lol मीही सेम विचारात पडलेले ऑटावा म्हटल्यावर. खरं तर माझी भूगोलाची माहिती बरी आहे. सो मनातलं प्रश्नचिन्ह चेहर्यावरही उमटलं असावं. मग अमितने तीन चार प्रकारे उच्चारून दाखवलं . मग ओटावा सापडलं.

इथली धमाल वाचतेय. पण वाचताना इतकी गुंगले की प्रतिसाद राहिलाच
तर सगळे वृ (पूर्ण लिहित नाही कारण एव्हाना पुरेसा गोंधळ झालाय अनुस्वाराचा. तर बरोबर काय हे विसरलं गेलय Proud ) धमाल लिहिताय. मजा आली वाचताना.

वृत्तान्ता वरून आता ओटावा वर घसरले.
ऋतुराज तिसरा अध्याय पण मस्त झालाय. निरू संस्कृत यांचा प्रतिसाद भारी.

आपल्याला हवा तो उच्चार समजून कोट्या करून घ्यायचा आणि शेवटी "ऑटो वा ओटा वा।" असे म्हणायचे.
नाही तरी आपल्या गाड्या कुठे अंधातरी पळतात.

मला ते गाणं आठवतंय सारखं
ऊ ओटावा मामा
उउ ओटावा मामा
Lol <<
त्यानंतरच अमितवनी उच्चार बदलले..
तेवढंच स्मरणरंजन..

बरं ते टोरांटो (उच्चार कसा माहीती नाही) कुठे आहे, तिथे काही नातेवाईक रहातात. तसं तिथून जवळ असलेल्या केंब्रिजमधले एक केंद्रे म्हणून व्लॉग्ज करतात ते बघितले आहेत. कॅलगरीहून लिटील सिंगर रिया व्लॉग्ज करते ते काही बघितले आहेत. कॅलगरी टोरांटो हून लांब हे माहीतेय. सोसायटीतील एक मुलगी ओटावाला होती ती आता दुसरीकडे मुव झाली. आपलं कसं घरात बसून व्लॉगद्वारे विश्व बघायचं पार कोकण ते अमेरीका, कॅनडा, युरोप वगैरे. तेही निवडक आणि मराठी.

आता ठाण्यातून कॅनडात पोचला धागा.

मला तर अमित ने काही तरी विचित्र उच्चार केलाय हे जाणवलं ही नाही. माझ्या मनात ओटावा असल्याने मी तेच धरून चालले बहुत करून.

हे सगळं फ्रेंच भाषेमुळे झाले आहे. कॅनडाची दुसरी भाषा फ्रेंच आहे. सरकारी नोकरीत फ्रेंच येणाऱ्यांना झुकते माप आहे, काही ठिकाणी आवश्यक आहे. त्यात क्यूबेक, मॉन्ट्रिअल व राजधानी असलेले ऑटोवा इकडे फ्रेंचचा प्रभाव कॅलगरी, एडमंटन किंवा व्हॅन्कूवरपेक्षा जास्त आहे.

त्यात फ्रेंच लोक जास्त अक्षरं असली तरी लाडं लाडं करत कुठल्यातरी एकाशी प्रामाणिक राहून उरलेल्या अक्षरांचे उच्चार आपल्या वळणावर नेतात. उदा. Queue हा शब्द फक्त Q लिहिला तरी पुरला असता पण नाही. हा शब्द मुळात फ्रेंच आहे. बरेचसे कॅनेडियन शब्द मुळात फ्रेंच आहेत, त्यामुळे आपलं कुणाचंच चूक नाही. कारण आपलं इंग्रजी ब्रिटिश उच्चारांच्या प्रभावाखाली येतं. त्यात आपली मातृभाषा आहे मराठी म्हणजे लाडेलाडेला वावच नाही, त्यामुळे ह्याच्या नादाला लागणं आपल्यासाठी कठीण आहे. Happy

रच्याकने - अन्जूताई टोरांटोचा उच्चार 'ट्रॉन्टो' असा होतो. मला कॅलगरीत खूप वर्षं राहिले असल्याने कॅलगरीची बरीच माहिती आहे. बाकी थोडीबहुत.

मला कॅलगरीत खूप वर्षं राहिले असल्याने कॅलगरीची बरीच माहिती आहे.>>>>>>> माझ्याकडे सोपे उच्चार पण चुकवायच कसब आहे. त्यामुळे कॅलगरीत खूप वर्षं राहूनही आमच्या सारख्यांच्या कॅटेगरीची कल्पना नाहीये.
मी तर भर प्रेझेंटेशन मधे supply ला सुपली म्हणालो होतो.

Pages