निसर्गाच्या गप्पा (भाग ३५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 March, 2025 - 08:10

Screenshot_20250330_173724_Photos.jpg

नमस्कार, मायबोलीच्या निसर्गाच्या गप्पांच्या ३५ व्या भागात आपले स्वागत आहे.

सर्वप्रथम गुढीपाढव्याच्या व मराठी नविन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

नेहमीप्रमाणेच आपण आपल्याला माहित असलेली निसर्गातील घटकांची माहिती, अनुभव या धाग्यावर शेयर करुन या धाग्याचा एक माहितीपूर्ण संच तयार करुया.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

चाफा रिटर्न्स !

सोनेरी उन्हातला सोनेरी चाफा.

# My Terrace
# My Random Clicks

रच्याकने, सुगंधांची चर्चा करायला माबोवर शेप्रेट धागा हवा आता.
“गंधवेड” किंवा “गंधचर्चा” किंवा “रसगंधा” असे काही नाव देता येईल. करा हे सत्कर्म कुणीतरी.>>>>>>>
अनिंद्य,
हे शुभकार्य तुम्हीच करणार होता.
आठवा:
क्रॉकरी धाग्यावरील चर्चा.
शुभस्य शीघ्रम.....
लवकर काढा धागा..
गंधलावण्य

चाफा सुंदर..

असं म्हणता ?

क्रोकरी धाग्यावर सुगंधी द्रव्यांच्या बाटल्यांबद्दल बोललो होतो आपण. त्या फार सुंदर असतात वगैरे. आता चर्चा आहे ती एकूणच सुगंध आणि आपले सुगंधप्रेम वगैरे बद्दल.

एनी वे, “सबकुछ सुगंधी” असा अनेकोद्दिष्ट धागा काढतो मग. 👍

तुम्ही म्हणाल तसं. Happy
असा स्टिकर द्यायची इच्छा होतेय पण देता येत नाही.
तुमच्या सुगंधी कट्ट्याच्या प्रतिक्षेत..

अनिंद्य, हो चर्चा परफ्युम बाटल्यांची झाली होती पण धागा सुगंधावरच काढणार होतात आणि तुम्हीच काढणार होता.त्यामुळे
.तुमच्या सुगंधी कट्ट्याच्या प्रतिक्षेत.. +1

स्निग्धा,मस्त रंगांची उधळण ...दोन्ही फोटोतील जांभळ्या गुलाबी आकाशाच्या छटा तर सुंदरच .

IMG_20250518_033725.jpg
2
IMG_20250518_033747.jpg
शेजारयांच्या कुंडीतलं गुलाबी जास्वंदाचं फुल
IMG_20250518_033828.jpg

# My Random Clicks

रंगांची उधळण मस्तच आहे, स्निग्धा.
छान आलेत रंग.
सिमरन,
Fiddle leaf plumeria मस्त फुलला आहे. दोन दिवसात झब्बू देतो. आमच्याकडे सध्या कळ्या आल्यात.
शेजारयांच्या कुंडीतलं गुलाबी जास्वंदाचं फुल>>>> तुम्ही ममो ताईंच्या शेजारी तर राहत नाही ना?
त्याच्याकडे अशीच जास्वंद फुलली आहे.

सुनील, स्टिकर बद्दल धन्यवाद Happy

For the lovers of Flor de Papel

# Flor de Papel
# बोगनवेल
# My Random Clicks

पुण्यातले गटग झाल्यावर f c रोड ला गेले होते. तेव्हा pyc च्या समोरच्या लेन मध्ये फुललेला कैलाशपती...
IMG_20250518_144918.jpg

अश्विनी ११,
सुंदर फोटो.
मागे मी कैलासपतीचे फोटो टाकले होते.
भरभरून बहरलेला आणि फळांनी डवरलेला.
जास्वंदीची दोन्ही फुले सुंदर.

धाग्यावर कैलासपतीचे फोटो अनेकदा आलेत. म्हणजे मला वाटतो तेव्हढा दुर्मिळ नाही हा वृक्ष Happy

डबलडेकर जास्वंद खास.

दुर्मिळ नाही, पण फारसा सगळीकडे आढळत पण नाही.
त्याच्या फुलांच्या रंगांच्या छटा वेगळ्या असतात.
Its from Guinea.

Flor de papel..... सुंदर रंग

परभृत Happy

निर्मल, तुम्हाला बरा फोटो काढू दिला, नाहीतर लपलेला असतो हा

आता आषाढात काहितरी व्रत असते ना?

कोकिळ दिसला की मगच जेवायचे ?

कोकिळा व्रत
बहुतेक ते अधिक आषाढ महिन्यात असते. कोकिळा पाहून किंवा तिचा आवाज ऐकून मग जेवायचे/ उपास सोडायचा.
खूप आधी माझ्या ओळखीत कुणीतरी केले होते असे आठवतेय.
विचारून सांगतो.
बाकी आमच्याकडे सकाळी सकाळी कोकिळ नुसते चेकाळलेले असतात. नको नको होतं आवाजाने.
कामातुराणां भयं न लज्जा Lol

कोकिळ चेकाळलेले असतात.…कामातुराणां भयं न लज्जा…

कोकिळ कशाला लाजेल? “पुढचे” सगळे बघायला निस्तरायला काऊ आहेच. यांची मजाय. 😀

म्हणूनच पटकन् “परभृत” आठवले-लिहिले होते.

ऋतुराज अगदी खरे, सध्या ते फारच चेकाळलेले आहेत. त्याची साद म्हणजे कुहू कुहू सुद्धा रेकॉर्ड केले आहे. एका फोटोत तर कोकिळा ही आली आहे. पण हे सगळे इथे टाकायचे म्हणजे भरपूर वेळ जातो.

सर्व फोटो सुरेख.

कोकिळ व्रत आईने तीनदा केलेलं, मला एकदाचे उद्यापन आठवतंय, तेही पुसट. त्याआधी खूपच लहान होते तेव्हाचे फार धूसर, त्याही आधीचे बहुतेक मी अति लहान होते तेव्हा केलेलं, अजिबातच माहिती नाही ते. गुरुजींना बोलाऊन पूजा वगैरे, साग्रसंगीत स्वयंपाक, नैवेद्य. पितळी का चांदीची बहुतेक सोन्याची कोकिळ त्याची पुजा (मग ती गुरुजींना द्यायची). संध्याकाळी बरेच जण जेवायला होते. मी आपली आईच्या हाताखाली स्वयंपाक करायला मदत करत होते. आई पुजेला बसल्यावर इतर बारीक बारीक मदत करत होते, इतपतच आठवतंय.

आईची व्रत वैकल्य खूप असायची. चातुर्मास अमुक तमुक दरवर्षी अगदी. आम्ही घरचे बघूनच थकायचो.

वृक्षवल्ली आम्हा सोयरी >>>>>> rmd धन्स ग.
मस्त आहे लेख. वसेकर छानच लिहितात. मी त्यांच्याशी दोन तीन वेळा बोललो आहे फोनवर.
फुलाच्या परडीसाठी फुलारी हा शब्द पहिल्यांदाच ऐकला.
फुलांचा सडा= फुलांचे सारवण

लोकहो,
ते कार्तिकातील बूच गटग मनावर घ्या.
लेखात सुद्धा उल्लेख आला आहे बूचमहोत्सवाचा

Pages