निसर्गाच्या गप्पा (भाग ३५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 March, 2025 - 08:10

Screenshot_20250330_173724_Photos.jpg

नमस्कार, मायबोलीच्या निसर्गाच्या गप्पांच्या ३५ व्या भागात आपले स्वागत आहे.

सर्वप्रथम गुढीपाढव्याच्या व मराठी नविन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

नेहमीप्रमाणेच आपण आपल्याला माहित असलेली निसर्गातील घटकांची माहिती, अनुभव या धाग्यावर शेयर करुन या धाग्याचा एक माहितीपूर्ण संच तयार करुया.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

स्निग्धा, रमड, जागुताई, गंधकुटी, अनिंद्य, मनिम्याऊ, अस्मिता
सर्वांचे सगळे फोटो मस्त.
हा आमचा गुलाब..
Screenshot_20250423_073031_Gallery.jpg

स्निग्धा
तुम्हाला संपर्कातून मेल केली आहे.

सुप्रभात.
स्निग्धा, मस्त फोटो.

Screenshot_20250424_081236_Photos.jpg

थँक्यू अस्मिता Happy

जागू, वाळा पाहूनच गार वाटलं. ते पूर्वी वाळ्याची शीट्स घातलेले कूलर्स मिळायचे ढब्बे, ते मिळतात का अजून?
कुठला अनंत कुठला आहे? ब्राऊन झालेला, पसरलेला हायब्रीड का?

स्निग्धाने बहार आणली आहे या धाग्यावर!>>>>+100खरच काय सुंदर आणि ब्राइट रंग आहेत फुलांचे.
निसर्गाचे फोटोही छान.

अनंताच्या फुलातला फरक कळतोय, खूप सुंदर सुवास असतो या फुलांचा ,आमच्या शाळेजवळ एका घराच्या अंगणात होते हे झाड.या अनंताच्या फुलांसाठी किती मर मर करायचो ते आठवलं.नंतर आईने जुन्या घरी बाहेर अंगणात झाड लावलेलं, त्याला जेव्हा फुलं यायची तेव्हाचा आनंद शब्दात सांगता येणार नाही. घर सोडताना ते झाड सोडून यायचं दुःख जास्त होतं.

ही आमच्या इथल्या गार्डन मधली काही फुलं ....

IMG_20250424_212823.jpg
2. बोगनवेल
IMG_20250424_212921.jpg
3.
IMG_20250424_213014.jpg
4.
IMG_20250424_213053.jpg
5.
IMG_20250424_213159.jpg
6.
IMG_20250424_213253.jpg
7.
IMG_20250424_220329.jpg

जयुला मम.

अनंत विदेशीही असतो माहिती नव्हतं, बोटांजवळचा देशी ना, तसाच जास्त असतो इथे म्हणून विचारते.

व्वा. जागुताई घरचा वाळा म्हणजे मस्तच.
सिमरन, सगळीच फुले मस्त.
चिन्मयी, तामण एकदम भारी फुलला आहे.
स्निग्धा, dancing doll, ट्युलिप मस्त आहेत.
मेघा, सुंदर बहर.
ही आमच्या कुंडीत एकमेकांशी भांडलेली दोन फुले.
Screenshot_20250428_074528_Gallery.jpg

^^आमच्या कुंडीत एकमेकांशी भांडलेली दोन फुले^^
ही ही ही ही...

या धाग्यावर सगळेच फोटो अप्रतिम आहेत..

20250428_150158.jpg

माझ्या गाडीवर माझ्या नकळत आलेल्या या पाहुण्यांनी माझा सगळा दिवस आनंदी करून टाकला. पुण्यात आल्यापासून बकुळीचा जणू संबंध सुटला होता. काल संध्याकाळी कामानिमित्त 2 3 वेगवेगळ्या ठिकाणी गेले होते आणि गाडी पार्क केली होती त्यामुळे नेमकी कुठे हि फुलं माझ्या गाडीवर ओघळली कळलं नाही. आज सकाळी ऑफिसला निघाले तेव्हा दिसली.

सगळ्यांचे फोटो अप्रतिम.

स्निग्धा मस्त बकुळीची फुलं. आमच्याकडे मेन रोडवर थोड्या थोड्या अंतराने बकुळीची तारेचं कुंपण घातलेली झाडं आहेत, म्युनिसिपाल्टीने लावलेली. फार वाढत नाहीत कुंपणामुळे पण संध्याकाळी फुलं असतात, फक्त ट्रॅफिक गर्दी सर्व खूप त्यामुळे क्वचित घेते.

# इथे मी डकवलेले जास्वंदाचे फोटो थोडे जुने असतील किंवा घरचे नसून दारचे असतील हे डिस्क्लेमर आताच देतो.

आता माझ्या बागेत एकही जास्वंद नाही.

कांचन मला ही आवडतो. छान फोटो. .. गुलाबी हिरवं झाड मस्तच दिसतं. पांढरा ही असतो पण गुलाबी भारी सुंदर दिसतो.
बकुळीचा शकुन so cute स्निग्धा .
जास्वंद ही छान दिसतेय.

Pages