Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 March, 2025 - 08:10

नमस्कार, मायबोलीच्या निसर्गाच्या गप्पांच्या ३५ व्या भागात आपले स्वागत आहे.
सर्वप्रथम गुढीपाढव्याच्या व मराठी नविन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
नेहमीप्रमाणेच आपण आपल्याला माहित असलेली निसर्गातील घटकांची माहिती, अनुभव या धाग्यावर शेयर करुन या धाग्याचा एक माहितीपूर्ण संच तयार करुया.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पाम ट्री फुले
पाम ट्री फुले = 👌
For the lovers of Flor de
For the lovers of Flor de Papel
# My Random Clicks
# Flor de Papel
अनिंद्य,
अनिंद्य,

Flor de papel.... झब्बू
ऋतुराज,
ऋतुराज,
हे ट्विन फोटो कसे केले? कोणते App वापरले ?
अनिंद्य
अनिंद्य
मी मोबाईल मध्ये कोलाज केले आणि मग त्याचा स्क्रीन शॉट घेऊन क्रॉप करून टाकला.
अँप नाही. फोटो गॅलरीत फोटो सिलेक्ट करून कोलाज करता येते
"गुलमोहोर बद्दल एक सांगायचे
"गुलमोहोर बद्दल एक सांगायचे आहे.
या झाडाखाली कधीही आसरा घेऊ नका " म्हणजे उभे राहू नका म्हणताय ना?
कारण आमच्या दोन बिल्डिंगच्या रांगेतल्या चार फ्लॅटमध्ये हे गुलमोहर महाराज फक्त माझ्याच वाट्याला आलेत. अगदी फुलांचा मांडव घातल्या सारखं वाटतंय. मला लाल रंग आवडत नाही फारसा पण हा बहरलेला मांडव बघून # feeling rich#,
वरचा गॅलरीतला आणि खाली बेडरूमच्या खिडकीतून घेतलेला फोटो
किट्टु सुंदर देखणा व्ह्यु आहे
किट्टु सुंदर देखणा व्ह्यु आहे तुमच्याकडे. पक्षीही येत असतील.
देखणा व्ह्यू आहे तुमच्याकडे….
देखणा व्ह्यू आहे तुमच्याकडे….
+ १
देखणा व्ह्यू आहे तुमच्याकडे>>
देखणा व्ह्यू आहे तुमच्याकडे>>+1.
म्हणजे उभे राहू नका म्हणताय ना? >> होय . म्हणजे जनरली आपण झाडाखाली सावलीत थांबतो ना ., तसे .
बहुतेक याच्या फांद्या वजनाने जड पण ठिसूळ असतील त्यामुळे पडत असतील . आपण precaution घेतलेली बरी . म्हणून सांगितले .
किट्टू, ऋतुराज आणि अनिंद्य
किट्टू, ऋतुराज आणि अनिंद्य सुंदर फोटो आहेत.
कसले एकेक फोटो आहेत, सहीच.
कसले एकेक फोटो आहेत, सहीच.
गुलमोहरात दोन प्रकारचे रंग असतात एक केशरीकडे जाणारा, एक लाल. मला त्यातला लाल जास्त मोहक वाटतो.
जयु गुलमोहर झाडाबद्दल अगदी करेक्ट विधान, आमच्या मागचे काही वर्षांपूर्वी पडलं, आमची गाडी तशी लांब होती पण आमच्या आणि शेजारच्या गाडीजवळ पडले, थोडक्यात वाचल्या गाड्या.
किट्टु सुंदर देखणा व्ह्यु आहे
किट्टु सुंदर देखणा व्ह्यु आहे तुमच्याकडे. >> हो ना,
घरी असले की दिवसातून दहा वेळा बाहेर जाऊन फुलांकडे बघत बसते.
ही फुले बहरली आहेत सध्या
आवारात ही फुले बहरली आहेत सध्या
# My Random Clicks
https://lh3.googleusercontent
(No subject)
.
(No subject)
For the lovers of Flor de Papel / बोगनवेल
# Flor de Papel
# My Random Clicks
अनिंद्य, तुमचे बोगनवेलीचे
अनिंद्य, तुमचे बोगनवेलीचे सगळेच फोटो सुंदर.
वरचा कांचनचा फोटो पाहून तर मला आमची युनि आठवली.
आमच्या सोसायटीत सध्या सगळीकडे ही स्टार जास्मिन फुलली आहे. साधारण बुचाच्या फुलासारखा वास आहे. दिवसरात्र दरवळ!
स्टार जास्मिन फोटो अगदी
स्टार जास्मिन फोटो अगदी पेंटिंगसारखा आला आहे.
सुंदर !
थँक्यू अनिंद्य
थँक्यू अनिंद्य
इथे वाफेच्या वाफे आहेत हिचे. कमरेइतकी उंची ठेवून कापले आहेत वेल. अक्षरशः गालिचा पसरल्यागत वाटतं.
Good morning
Good morning
दरवळ पसरला....कुंती/ कामिनी
स्टार जास्मिन फोटो अगदी पेंटिंगसारखा आला आहे.>>>>> अगदी अगदी..
गुलमोहर, बोगनवेल, कांचन..... मस्त फोटो
दरवळ पसरला....कुंती/ कामिनी
@ सुगंध दरवळ
@ सुगंध दरवळ
बहुतेक सर्वच पांढऱ्या फुलांना खूप छान सुगंध असतो असे निरक्षण आहे. निसर्गाने रंगाबाबत दाखवलेली कृपणता अशी सुगंधाने भरून निघते.
मनिम्याऊ,ही कामिनी/ मधुकामिनीची फुले आहेत ना ? अगदी पुसटसा Limey undertone असतो सुगंधाला, बरोबर ?
बहुतेक सर्वच पांढऱ्या फुलांना
बहुतेक सर्वच पांढऱ्या फुलांना खूप छान सुगंध असतो असे निरक्षण आहे. निसर्गाने रंगाबाबत दाखवलेली कृपणता अशी सुगंधाने भरून निघते.>>>
एका अभ्यासानुसार हि फुले सायंकाळनंतर उमलतात व रात्री उशिरा त्यांच्या क्लायमॅक्सवर असतात. त्यामुळं अंधारात उठून दिसावी म्हणून शुभ्र रंगाची असतात. शिवाय सुगंध हा परागीभवन करण्यासाठी कीटकांना व निशाचर फुलपाखरांना निमंत्रण व दिशा दर्शनाचे काम करते.
मनिम्याऊ,ही कामिनी/ मधुकामिनीची फुले आहेत ना ? अगदी पुसटसा Limey undertone असतो सुगंधाला, बरोबर ?...
अगदी बरोब्बर..
मी मागे ज्या कैलाशपतीच्या
मी मागे ज्या कैलाशपतीच्या झाडाबद्दल लिहिलं त्याची बहुतेक पानं गेल्या दोन तीन दिवसांत गळून पडली. काल सकाळी तर रस्त्यावर त्या पानांचं कार्पेट अंथरल्यासारखं दिसत होतं. काल संध्याकाळी रस्ते झाडले गेल्याने तो फोटो काढायचा राहिला. झाडावर आता पानांपेक्षा कळ्या आणि फुले जास्त आहेत.
झाडावर कावळ्यांनी घरटं बांधलं आहे. पानं गळल्यामुळे ते उघडं पडलं आहे.
पावसाचं प्रमाण किती असेल हे कावळ्यांना आधीच कळतं आणि त्याप्रमाणे ते झाडावर किती उंचीवर घरटं बांधायचं ते ठरवतात, असं वाचल्याचं आठवतं.
येणारे जाणारे फुलांसाठी वॉचमनला कामाला लावायचे म्हणून तो सकाळी झाडाला शिडी टेकवून ठेवतो.

मस्त फोटो सगळेच.
मस्त फोटो सगळेच.

बहुतेक सर्वच पांढऱ्या फुलांना खूप छान सुगंध असतो असे निरक्षण आहे. निसर्गाने रंगाबाबत दाखवलेली कृपणता अशी सुगंधाने भरून निघते.>>> माझ्यामते अपवाद सोनटक्क्याचा, पांढरा असून सुगंध मंद...
कैलासपती ची पान एकावेळी गळतात सगळी ही नवीन माहिती आहे माझ्यासाठी. वॉचमन ची आयडिया मात्र भारीच.
मी गेल्यावर्षी बरेच दिवस ठाण्यात नव्हते, घरी आले तेव्हा ही जास्वंद काष्ठवत झाली होती , मला वाटलं गेलीच बहुतेक. पण तरी बघू या म्हणून रोज पाणी घालत राहिले. दररोज सकाळ संध्याकाळ तिथे बसते चहा प्यायला त्यामुळे रोज नकळत निरीक्षण करत होतेच. पंधरा वीस दिवसात अगदी बारीक हिरवे धुमारे फुटले खोडाला, मी एकदम खुश. फुलांची अपेक्षा नव्हतीच, नुसत झाड हिरव झालं हेच खूप होतं माझ्यासाठी. पण काही दिवसात कळ्या ही आल्या टोकावर आणि मग फुल ही... तेव्हा पासून खूप फुलते आहे ही जास्वंदी.. रोज एक दोन असतातच फुल.
हा फोटो.
अहाहा
अहाहा
धागा पळतोय. छान वाटत इथे येऊन.
अगदी पुसटसा Limey undertone असतो सुगंधाला, बरोबर ?>>>> बरोबर. कारण
लिंबाचं आणि कामिनीच कुळ एकच Rutaceae.
या कुळातील फुलपांनांना उडनशील तेलाचा वास असतो.
कुणीतरी मला सांगितलं होतं की कुंती आणि कामिनी वेगळी
एकीला कमी वास आणि दुसरीला जास्त.
मला कधी फार कळलं नाही.
कामिनीच फूल काढताना पाकळ्या हातात येतात. झाडाची पाने तुलनेत लहान असतात. आणि फांद्या विरळ असतात.
आता मधुकामिनी आणि कामिनी एकच का अनिंद्य?
भरत,
कैलासपतीच्या झाडाची वर्षातून एकदा दोनदा पानगळ होते.
एका पुस्तकातील माहितीनुसार ज्या हवेत सल्फर डाय ऑक्साईड जास्त प्रमाणात असतो तेव्हा याची पानगळ होते.
पाऊस आणि कावळ्यांच्या घरट्यांचा संदर्भ मारुती चितमपल्लींचा.
तुमचं वॉचमन हुशार आहे.
ममो
जास्वंदीचा रंग सुरेख आहे. जमल्यास मला एक फांदी द्या.
@ भरत, तुमचा वॉचमन स्मार्ट
@ भरत, तुमचा वॉचमन स्मार्ट वर्कर आहे. 😀
@ मनीमोहोर, तुमच्या pink on pink जास्वंदीसोबत कुंडीत चक्क बहावा सुद्धा उगवलेला दिसतोय. 😍
झेंडूही आहेच.
मी दरवर्षी १०० बिया पेरल्या तर १०-१२ उगवतात आणि जेमतेम ४-५ रोपटी जगतात पूर्ण वर्ष. त्यांना ३ वर्ष वाढवतो आणि मग जमिनीत लावायला इतरांना देतो. बहाव्याच्या बियांचा Germination rate फारच कमी असतो. Lucky you !
@ ऋतुराज,
@ ऋतुराज,
“उडनशील तेल” शब्द फार क्यूट. ज्वलनशील सारखं उडनशील
सर्वच लिंबूवर्गीय गंध फार आवडतात. हे फूल सुद्धा थोडे संत्रा-लिंबू-एडलिंबूच्या फुलासारखेच दिसते आहे, फक्त थोडा मोठा साईझ.
मधुकामिनी आणि कामिनी एकच का ते नाही माहित. फोटोतल्या फुलझाडाला मी मधुकामिनी म्हणून ओळखतो. ते चुकीचेही असू शकेल. यालाच कुंती आणि कामिनी म्हणतात ही नवीन माहिती माझ्यासाठी.
बुचाच्या फुलासारखा वास आहे >>
बुचाच्या फुलासारखा वास आहे >>> वाचूनच मस्त वाटले. प्रचंड आवडतो तो वास मला. कुठले अत्तर असते का त्या सुगंधाचे याचा शोध चालू असतो माझा.
अनिंद्य, बोगनवेली मस्तच. यंदा ठाण्याच्या वृक्षवल्लीमध्ये ३-४ रंगाच्या जातीचे कलम बघितले होते.
ऋतुराज, ती जुळ्या फोटोपैकी गुलाबी बोगनवेल खासच आहे - असा फिकट गुलाबी रंग प्रथमच बघितला.
हेमाताई, जास्वंद सुरेखच.
कुंडीत चक्क बहावा सुद्धा
कुंडीत चक्क बहावा सुद्धा उगवलेला दिसतोय. >>>>>>
अं हं. बहावा नाही. ती गोकर्णाची वेल आहे.
बहाव्याच्या बिया रुजवायला रात्रभर गरम पाण्यात भिजवा.
Pages