Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 March, 2025 - 08:10

नमस्कार, मायबोलीच्या निसर्गाच्या गप्पांच्या ३५ व्या भागात आपले स्वागत आहे.
सर्वप्रथम गुढीपाढव्याच्या व मराठी नविन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
नेहमीप्रमाणेच आपण आपल्याला माहित असलेली निसर्गातील घटकांची माहिती, अनुभव या धाग्यावर शेयर करुन या धाग्याचा एक माहितीपूर्ण संच तयार करुया.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
रेन लिली एकदा रुजली की
रेन लिली एकदा रुजली की वारेमाप फोफावते. ३ कुंड्या सोडून असलेल्या कुंडीत आलेली ही चुकार फुले
बहावा नाही. ती गोकर्णाची वेल
बहावा नाही. ती गोकर्णाची वेल आहे….
नक्की का ?
होय गोकर्ण च आहे ती अनिंद्य.
होय गोकर्ण च आहे ती अनिंद्य. झेंडू दुसऱ्या कुंडीत आहे.
रेन लिली सुंदर.. मला खूप आवडते.
Pink on pink आवडलं खूप. रंग आवडला मला ही . तसा ही गुलाबी आवडता आहे अजून ही.
ऋतुराज नक्की देईन फांदी, त्या निमित्ताने घरी तरी येशील
Ok, my bad. मला छोटू बहावाच
Ok, my bad. मला छोटू बहावाच वाटला.
रेन लिलीचा हा पिवळा रंग सर्वात जास्त आवडता.
@ माधव
…. कुठले अत्तर असते का त्या सुगंधाचे याचा शोध चालू असतो…
@ माधव
कुलाब्याला “अजमल” म्हणून अत्तरवाला आहे, सत्तर एक वर्ष जुने दुकान आहे, आता झकपक केले आहे. तिथे नक्की मिळेल बुचाचे नैसर्गिक अत्तर.
त्यालाच आकाशमोगरा म्हणतात बहुतेक. सुवासावरून तुम्हाला समजेलच.
अनिंद्य
अनिंद्य
तुमच्याकडून नवीन नवीन नावे समजतात.
बुचाला, आकाशनिंब आणि गगनजाई नावे माहीत होती
अनिंद्य, बघतो तिथे जाऊन.
अनिंद्य, बघतो तिथे जाऊन.
मस्त फोटो सर्वच आणि मस्त
मस्त फोटो सर्वच आणि मस्त चर्चा.
साधी तगर पांढरी सुवासविरहित असते. डबल तगर सुवासिक असते.
माधव, बुचाच्या फुलांचा सुवास
माधव, बुचाच्या फुलांचा सुवास माझाही खूप आवडता आहे. तसं अत्तर सापडलं तर सांग नक्की.
बुचाला इतकी सगळी नावं आहेत हे आजच समजलं.
कामिनीचा फोटो छान. सुगंध पोचला.
कैलासपती मस्तय. पण त्याची फुलं काढून नेण्याचा उद्योग मात्र नाही आवडला. उठसूट सगळ्या झाडांची फुलं कशाला ओरबाडायची? दिसूदे ना जरा सुंदर.
जास्वंद छान, ममो. आशा सोडून दिल्यानंतर फुटवे आल्यामुळे किती भारी वाटलं असेल!
रेन लिलीचे वेगवेगळे रंग असतात होय? मग ती छोटी पांढरी असते ती पण रेन लिली का? माझ्या माहेरी फुलली आहे. ही पहा -
मस्त आहे.
मस्त आहे. माझ्याकडे पूर्वी गुलाबी रंगांची होती, आम्ही नालासोपारा सोडून श्रीरामपूरला गेलो तेव्हा आमच्या वर रहातात त्यांनी तुमची आठवण म्हणून मला द्या सांगितलं, कुंडी सकट मी दिली, कंद काढून घेतला नव्हता.
बुचाची फुलं बालपणात नेतात, डोंबिवलीत आयरे रोड वर आता पाटकर शाळा मैदान आहे तिथे आहे अजूनही झाड, असं मला समजलं आहे. पूर्वी चाळी होत्या तिथे, मी आणि मैत्रीण बुचाची फुलं पडलेली आणायचो कधीतरी, माझी आई त्या फुलांची सुरेख वेणी (गजरा) गुंफायची. मला त्या फुलांचे गगनजाई नाव आठवतं. ते झाड आहे अजूनही पण आता आम्ही तिथे रहात नाही, जायला हवं एकदा.
बुचाची फुलं बालपणात नेतात >>>
बुचाची फुलं बालपणात नेतात >>> अगदी! आमच्या शाळेत होती ३ झाडं. ती फुलं गोळा करायला मधल्या सुट्टीत झुंबड उडायची सगळ्यांची. त्यातही ताजी फुलं झेलायला अजून मारामारी. आणि या सगळ्यानंतर हातात गुच्छ जमा झाला की कमालीचा आनंद! पाण्यात ठेवली की फुलं २ दिवस पण चांगली राहतात आणि घरात घमघमाट होतो. नॉस्टॅल्जिक झाले मी!
बुचाचा सुगंध अनेकांचा फेवरेट
बुचाचा सुगंध अनेकांचा फेवरेट दिसतोय इथे. याबाबतीत भाग्यवान आहे. संकुलात ३ आणि सौभाग्यवतींच्या ऑफिसबाहेर २ अशी बुचाची झाडे जवळपास आहेत. फुलतात तेव्हां घमघमाट. जमीनीवर फुलांचा खच. त्याचा आनंद. चालतांना पायात येतात त्याचे दुःख.
अनिंद्य मी कुलाब्याला शोधतोच.
अनिंद्य मी कुलाब्याला शोधतोच. पण तुम्ही किंवा तुमच्या विरोधी पक्षाने बुचाचे अत्तर बनवायचे मनावर घ्या.
मग आपण बुच अत्तर गटग करुया
मला त्या फुलांचे गगनजाई नाव
मला त्या फुलांचे गगनजाई नाव आठवतं. >>> इथे शेवटी आवडतं लिहायचं होतं (मोबाईलवरुन लिहीताना चुक झाली आणि आता एडीट करता येत नाहीये) , बुचाचं गगनजाई नाव मस्त वाटतं मला.
बुच अत्तर गटग >>> चालेल. मी
बुच अत्तर गटग >>> चालेल. मी पण येते
बुचाची एवढी चर्चा पाहून एकदम
बुचाची एवढी चर्चा पाहून एकदम मी बुचकळ्यात पडलो
फाको.
बुचकळ्यात >>> म्हणजे तुला
बुचकळ्यात >>> म्हणजे तुला त्या झाडावर पडायला लागेल
बुचकळ्यात
बुचकळ्यात 😀
@ माधव, एक दुरुस्ती. मी नेहेमी “दुसरा पक्ष” म्हणतो, “विरोधी पक्ष” नाही 😀
बुचकळ्यांना सुगंध असतो? -
बुचकळ्यांना सुगंध असतो? - फाको झब्बू
बूच गप्पा कोट्या सगळंच मस्त.
बूच गप्पा कोट्या सगळंच मस्त.
आज या ठिकाणी ही जी रिक्षा आहे ती फिरवायचा मोह मला आवरत नाहीये.
https://www.maayboli.com/node/80646
फा को नाही, छान कोट्या करताय.
फा को नाही, छान कोट्या करताय. तिन्ही आवडल्या ऋतुराज, रमड आणि माधव.
@ मनीमोहोर, पुन्हा वाचला तो
@ मनीमोहोर, पुन्हा वाचला तो लेख. आता कार्तिक मासाची वाट बघतो आहे, बुचाच्या फुलांचा पीक सीझन.
वैशाखात आम्रमंजिरी, चैत्रात मोगरा तसे मालती, बुचाची खरी शान कार्तिकेत.
अनिंद्य, नोटेड.
अनिंद्य, नोटेड.
बुचाची खरी शान कार्तिकेत >>> बूच फारसा अनुभवायला मिळत नाही त्यामुळे हे कधी लक्षात नव्हते आले. आता कार्तिक म्हटले की दिवाळी, त्रिपूरी पौर्णिमा आणि बूचही आठवेल.
बुचाची खरी शान कार्तिकेत >>>
बुचाची खरी शान कार्तिकेत >>> हो, माझ्याही नव्हतं लक्षात आलं. मला पावसात पण फुलं वेचल्याचं आठवतंय. कदाचित शाळेतली झाडं लवकर फुलत असतील.
खजुराहोला बुचाची फुललेली झाडे
खजुराहोला बुचाची फुललेली झाडे पाहिली आहेत.
खजुराहोला बुचाची फुललेली झाडे
खजुराहोला बुचाची फुललेली झाडे ?
Too much of good thing
Too much of sensory overload
यंदा कार्तिक महिन्यात बूच बघा सर्वजण.
काल रॉबिन्स्व्हिल च्या बॅप्स
काल रॉबिन्स्व्हिल च्या बॅप्स मंदिराला भेट दिली. काय अत्तरं - मोगरा, गुलाब, रातराणी, अगदी पारिजातक सुद्धा.
अरे व्वा धागा परत एकदा पळता
अरे व्वा धागा परत एकदा पळता झाला. मस्तच
बुच गटग करा, मी पण येईन.
बुचाच्या/ त्याच्या सुगंधाच्या
बुचाच्या/ त्याच्या सुगंधाच्या आठवणीत गुंग झालेत सारे गंधप्रेमी. ❤
रच्याकने, सुगंधांची चर्चा करायला माबोवर शेप्रेट धागा हवा आता.
“गंधवेड” किंवा “गंधचर्चा” किंवा “रसगंधा” असे काही नाव देता येईल. करा हे सत्कर्म कुणीतरी.
आधीच तसा धागा असेल तर शोधा-सांगा.
किंवा 'गंधकुपी' मला वाटतं असा
किंवा 'गंधकुपी' मला वाटतं असा आय डी आहे पण हेच नाव धाग्यास समर्पक वाटते. काढा रे काढा.
Pages