वृत्तान्त - अमितव गटग -ठाणे -११ मे

Submitted by भरत. on 12 May, 2025 - 01:41

काल ११ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत कॅनडाहून भारत भेटीस आलेल्या अमितव यांचा मायबोलीकरांसोबतच्या भेटीचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाची काही छायाचित्रे सूत्रांकरवी प्राप्त झाली आहेत.
1.jpg2.jpg3.jpg4.jpg

ही छायाचित्रे पाहून मायबोलीकरांनी कार्यक्रमाबद्दल अंदाज बांधून इथे लिहायचे आहेत.

टीप १. अनुस्वाराच्या लेखनासंबंधी नियम -
काही शब्दांतील अल्पोच्चारित अनुस्वाराऐवजी अनुनासिक जोडले, तर त्या शब्दाचा अर्थ बदलतो. जसे
१. देहांत - शरीरांत ------------- देहान्त - मरण
२ वृत्तांत - कवितेच्या वृत्तांत ----------- वृत्तान्त - बातमी
३ वेदांत - वेदांमध्ये ........... वेदान्त - उपनिषदांतील तत्त्वज्ञान

हा नियम समजत नसेल तर पुढल्या गटगस हजेरी लावावी लागेल. ज्यांना समजला असेल त्यांनी न समजलेल्यांना समजवण्यासाठी पुढचे गटग आयोजित करावे.

टीप २ - अजून ठरायची आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धमाल प्रतिसाद आहेत.

जरा डुलका काढावा म्हटलं तर कधी नव्हे ते ड्रायवर स्वतःहून गप्पा मारायला लागला. तो अगदी गजराज राव सारखा दिसत होता. डिट्टो. युद्ध संपलं का? झेलमच पाणी सोडलं का? ठाणे बोरिवली बोगद्याचे काम सुरु झालं का? मला काय विचारतोय ... मग म्हटलं मै जरा सोता हूं तर उलट म्हणे असे तिन्हीसांजेला झोपू नये.... मग त्याने पंपावर गाडीत गॅस भरून घेतला. तरीही अगदी वेळेत पोचलो. >> हा मायबोलीबाह्य भाग वाचताना पण मजा आली. त्या ड्रायव्हरला म्हणावं दादा, वाड्यावर या.. म्हणजे इथल्या धाग्यावर हो.

विवि गटग वृत्तान्त : २
आता गप्पा चालू झाल्या. भरत यांचा सर्व क्षेत्रातील व्यासंग आणि विशेषतः मराठी शुद्धलेखनातील अभ्यास सर्वश्रुत आहेच. सध्याच मभागौदि निमित्त त्यांच्याबरोबर काम केले होते. तसेच त्यांच्या प्रतिसादातून त्यांच्याबद्दल एक आदरयुक्त भीती होती. ममो ताईंशी माझा संपर्क आधीपासून होता. त्यांचे लेख मला बरेचदा स्मरणरंजनात नेतात. माझी आई पण त्यांची फॅन आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल एक स्नेहयुक्त भीती होती. निरुदांनी सगळ्यांना QR कोड स्कॅन करून ऑर्डर करायला सांगितली. खरं तर खाण्यापेक्षा गप्पांची भूक जास्त असल्याने नक्की काय ऑर्डर करावे हे कळेना. आम्ही उगाच QR कोड कशाला? छापील कार्ड बरं असलं काहीतरी बडबडत होतो तोवर ललिता- प्रीती आणि भरत यांनी त्यांची ऑर्डर दिली. मला त्यातलं नक्की काय मागवावं आणि त्याचे योग्य इटालियन उच्चार माहित नसल्याने मी सरळ निरुदांना तुम्हाला योग्य वाटेल ते मागवा असे औदार्य दाखवून माझे अज्ञान लपवले. अमितव मेनू एकदम बारीक वाचत होता. ममो ताईंनी एकदम "मला आइस्क्रीम- व्हॅनिला" असे लगेच सांगून टाकलं. माझ्या समोर हँडमेड Mamma Mia लिहिलेली सुंदर प्लेट होती (तिचा फोटो काढायचा राहिला. क्रोकरी धाग्यावर टाकता आला असता)
कॅनडात या वर्षी भरपूर बर्फ पडला यावर तसेच लंडनचे हवामान आणि तिथल्या भेटी याबद्दल अमितव, ममोताई बोलत होत्या. इतक्यात माझेमन आल्या. त्यांना पहिल्यांदाच भेटत होतो पण प्रतिसादातून ओळखत होतो. त्या स्थानापन्न झाल्या तोच मंजूडी आल्या त्या प्रचंड उत्साह घेऊनच. त्यांनी एक पिशवी अमितवच्या हातात दिली आणि मी घाईत आहे त्यामुळे लगेच निघते असे म्हणून पाच दहा मिनिटात निघाल्या. (त्या पिशवीतल्या गोष्टीबद्दल नंतर लिहितो.) नंतर गप्पात मधूनच कोविडचा विषय निघाला त्यात निरुदानी ममो ताईंना कशी मदत केली, बाकी सगळ्यांनी कोव्हिड साठी कसे उपचार केले त्यातले गमतीदार उपचार यावर साधक बाधक चर्चा झाली. त्या गमतीदार उपचारांमुळे खरं तर कोविड गेला हा निष्कर्ष सुद्धा बसल्या बसल्या आम्ही काढून मोकळे झालो. मग मी माझं डेंग्यू पुराण सांगितलं. ग्लास ग्लास पपईच्या पानाचा रस प्यायल्याने येणाऱ्या ढेकरांमुळे आजूबाजूच्या हवेतील डास नष्ट झाले, हा शोध (जावईशोध) लावल्याने मला उगाच एरियातील डेंग्यू उच्चाटन करण्याचे श्रेय मिळवल्याचा आनंद झाला. त्यानंतर गप्पांची गाडी औषधे,आयुर्वेद, self medication यांच्यावरून क्लिनिकल ट्रायल्स वर कशी आली ते आठवत नाही. पण मग "माझा पॅनल इंटरव्ह्यू" सदृश्य चर्चा चालू झाली. हे काय विचारतील ते मला माहित असेल का असे विचार मनात आला. समोर रथी महारथी कौरवसेना पाहून गर्भगळीत झालेल्या आणि हातातून गांडीव गळून पडलेल्या अर्जुनाची काय अवस्था झाली असेल याची प्रचिती मला त्यावेळी आली. मायबोलीचे गटग आणि आपण मायबोलीवर बोलत नाही हे बरोबर नाही असं मी म्हटलं. मग मायबोलीवर चर्चा झडली. कवितांच्या धाग्यावर फार कुणी नसते याची खंत सगळ्यांनी व्यक्त केली. काही लेख त्यावरील चर्चा झाली. मला ललिता प्रीती यांच्या पुस्तक व्यासंगाची खूप उत्सुकता होती त्यामुळे "एवढं वाचायला तुम्हाला कसं जमतं बुआ" असं विचारलं असता. मी रोज किमान अर्धा तास तरी पुस्तक वाचन करतेच करते. असे उत्तर आले. मग त्यांच्या अनेक पुस्तक लेखावर चर्चा झाली. निवडणुकीची, जनगणनेची कामे शिक्षकांना करावी लागतात यावर चर्चा चालू होताच. निरुदांनी भन्नाट किस्सा सांगितला. निरुदा स्थापत्यविषारद आहेत. इमारतीचा आराखडा इत्यादी साठी सरकारची परवानगी लागते. त्यासाठीच्या फायली मंजूर करण्यासाठी पाच नसबंदीचे उमेदवार आणा असा एक फतवा आला होता म्हणे. ऐतेन. त्यामुळे ठाण्यातील लोकसंख्या वाढ निवारण्यात त्यांचा मोठा हात आहे या विनोदावर आम्ही हसून घेतले. आता गप्पा रंगात आल्या होत्या.
II इति विवि गटग वृत्तान्त द्वितीयोध्याय: समाप्त II

हा किस्सा मी नोकरी करत असतानाचा आहे. आमच्या बाॅसवर सदर परिस्थिती ओढवली होती.

आदरयुक्त भीती? अरे देवा! I need a makeover. बरं भेटल्यावर दोन्हीमधलं काय कमी काय जास्त झालं?
--

पराग आणि ललिताप्रीती, मी कोणालाही भेटत नाही. मी गटगसाठी माझा डमी पाठवला होता. त्याला फक्त जुजबी गप्पा मारायला सांगितलं. ही रहस्यकथा असती तर फोन कॉल सायलेंट मोडवर चालू ठेवून मेसेजवर सूचनाही देत असतो, असं लिहिलं असतं. तुम्ही लोकांनी काय आधार कार्ड चेक केलं नाही.
--

जोक्स अपार्ट.
पराग , भेटू की. पण राफाला रिटायर व्हावं लागणं आणि अल्काराजकडे बघत पुढची काही वर्षे काढणं यापलीकडे आपल्याला बोलायला काही कॉमन ग्राउंड आहे का? असा प्रश्न पडला.
--
हा नसबंदीचे उमेदवार किस्सा मी मिस केला.

सांद्र का काय ते संगीत >>>> हे विसरलेच होते.

पांढरा कुर्ता ना? >>> हो पांढरा शर्ट.

@ममो >>> तुमच्या पुस्तकावरून आठवलं. माहिती द्याल का परत? प्रकाशनाच्या वेळी घ्यायचं राहून गेलं.

विविध लोकांचे नंबर तिच्याकडून मिळत असतील, तर तिचा आयडी एकदम चपखल आहे >>> अगदी अगदी

मी तरी जे पहिल्या दोन मिनिटांत दिसलं ते आणि ज्या पदार्थाचं नाव वेटर येई पर्यंत माझ्या लक्षात राहील तो पदार्थ निवडला.
>>> मी ही तसे खादाडीला ऑप्शन चांगले होते पण नावं कॉम्प्लिकेटेड होती.

दहिसर >>> Lol

व्हॉट इज हॉट आणि फोर टीज विथ बिस्कुट ची आठवण हमखास येते. >> Lol

ऋतुराज हा भाग ही उत्तम जमलं आहे. हे काय विचारतील ते मला माहित असेल का असे विचार मनात आला >> कशाला घाबरलास , तू काही ही सांगितलं असतंस तरी आम्ही माना डोलावणार होतोच कारण तू सांगतो आहेस ते चूक की बरोबर हे आम्हाला कुठे माहित होत ? Happy हलके घे

हे घ्या ॲवाकाडो मश्रूम सँडविच.. गटगच्या सकाळीच घेतलं होत नेमकं.
एकदम नॉर्मल, टेस्टी आणि नो नॉन्सेन्स.. >> थँक्यु निरू.. आता पुन्हा कधी गेले vi vi मध्ये तर हे फिक्स... होमवर्क वाचलं.

चार लोकं जमली की हवा हा बेस्ट ऑप्शन असतो बोलण्यासाठी, मतभेट होण्याचा, आपल्याला जज केलं जाण्याचा सवाल नाही. त्यामुळे ठाणा, सातारा, कोकण, लंडन आणि कॅनडा अश्या सगळ्या ठिकाणच्या हवामानाचा आढावा घेतला मी . Happy

माबोवर स्मायली आणि फोटो दोन्ही टाकणं खूप सोपं व्हायला हवं आहे. कारण एक प्रॉपर ईमोजी स्पीक्स हंड्रेड वर्ड्स.

अरे वा, मस्तं झालेलं दिसतंय गटग. पण अशा कसलेल्या लोकांपुढे गटगमधे जाण्याला माझ्या सारख्याला दडपणच येईल (ह्यांच्यापूढे काही बोलता येईल की नाही म्हणून!)
फोटो बघून हे भरत असावेत वाटलेलं ते खरं ठरलं. मी तसा इथे नवीनच, पण भरत ह्यांनी दिनानाथच्या धाग्यावर खूप पाठपुरावा करून माहिती दिलेली... त्यामुळे त्यांची एक प्रतिमा निर्माण झालेली... ऋ म्हणतो तशी आदरयुक्त भिती आपोआपच वाटत असावी.

कामामुळे प्रतिसाद वाचता आले नाहीत.

नव मायबोलीकर असतो तर टिप १ आणि नियम वाचून अजिबात प्रतिसाद लिहिला नसता. पण आता मेलेल कोंबडं आगीला भीत नाही अशी अवस्था झाली आहे.

पहिला सट्टा तुझ्यावरच लावलाय…. Lol

अडचणीच्या वेळी मार्ग दाखवणाराच खरा साथीदार Lol

मला आतापर्यंत अहो- जाहो करणाऱ्या आणि यापुढेही करणार्‍यांचा जाहीर निषेध आणि अनुल्लेख करण्यात येईल.

त्याबद्दल भारत आणि कॅनडा यांच्यात ( ट्रुडो गेल्यावर संबंध पुन्हा मैत्रीपूर्ण झाल्याने) चर्चा करण्यासाठी अमित भारतात आले आहेत. >>> Lol

इथे अमित एक्स ऑफिशियो यजमान आणि अ'निरु'द्ध डि फॅक्टो यजमान होते.>>>>> अगदी अगदी...

ऋतुराज फार गोड मुलगा आहे, याची मायबोलीवरच्या इंटरॅक्शनमधून मिळालीच होती. काल प्रत्यक्ष प्रत्यय आला. बॉटनी, फार्मॉकॉलॉजी आणि संस्कृत काव्य अशा तीन एकमेकांशी काहीही संबंध नसलेल्या क्षेत्रांत तो लीलया विहार करत असतो.>>>>> अतिस्नेहातून झालेले मत आहे. हे नक्कीच बदलू शकते. ववि २०२४ च्या माबोकरांना विचारा>>>>> Lol

उपरोक्त वाक्गंगौघात अशी काही चर्चा झाल्याचं माझ्या काना-मनातून वाहून गेलंय ??>>>> गंगौघ कानातून वाहून गेल्यास तुम्ही आधुनिक जुह्नु ऋषींचे अवतार म्हणायचे Lol

अवगाहन, वाग्गंगा >>> बापरे काय शब्द. कसला व्यासंग. दंडवत _/\_

पूर्वी एक 'वाचनकट्टा' नावाचा वाहता धागा होता खरं... त्याला जिवंत करायला हवा पुन्हा.>>>> नक्कीच

नेहमी वाचनमात्र असल्याने प्रतिसाद द्यावा की नाही हा विचार केला. पण आपल्याच शहरातल्या एवढ्या छान गटग चे एवढे छान वृ वाचून आणि एवढ्या सर्व आयडी चे चेहरे बघून फार बरे वाटले. मस्तच झालेले दिसतेय गटग.

मी काय केलं ना, दोन टॅब्स उघडल्या, आधी आयडी ओळखायला जमावं म्हणून फोटो एका टॅबेत आणि बाकी प्रतिसाद दुसर्‍या टॅबेत असं केलं. मग वाचत सुटले! कसली धमाल केलिये लोकांनी! प्रत्येक प्रतिसादातले अनेक कोट्स काढावेत तर नवीन लेखच होईल इतके भारी आहेत प्रतिसाद!
माबो गटग असतंच भारी. मग ते किती लोकांचं का असेना!
पुण्यात १८ मे ला आहे तिथे भेटायची इच्छा आहे, बघू कसं जमतंय ते.

मस्त मस्त वृ येत आहेत
अपडेट्स देखील भन्नाट
भरत, भरतजी चालेल का? Happy
Btw धावुगल्ली धाग्यावर तुमच्यासोबत झालेल्या 2 वाकयाच्या बोलाचालींवर मी ब्रम्हविद्येचा बेसिक कोर्स जॉईन केला. संपत देखील आला.
मनात शंका होती पण भरत सारखे पारखी व्यक्तीने सांगितले आहे म्हणजे चांगलेच आहे हे डोक्यात होते. म्हणून बिनधास्त जॉईन केला कोर्स. आमच्या त्या शिक्षकांना देखील सांगितले. त्यांना फार कौतुक वाटलेलं कधीही न भेटलेली ( तेव्हा तर तुम्ही कसे दिसता ही ही माहीत नव्हतं , इथेच प्रथमच फोटो पाहिलाय ) माणसं एकमेकांवर इतका विश्वास ठेवतात असे.

फारएन्ड आणि अस्मिता तुम्हीही प्रतिसादातून भरपूर आनंद देताय.
दहिसर Lol

धनि, मॅट्रिक्स आणि की मेकर अगदी तंतोतंत
हेच लिहिणार होतो.

"असेन मी नसेन मी" नाटकाला चाललोय भेटायला जमेल का >>> याचा प्रयोग गटगच्या बाबतीत कोणी केला का?>>>>> एकाने केलाय.. ओळखा पाहू.

दहिसर सुद्धा नुसते दही असे वाचले>>>>> Lol

लाघवी... हा शब्द हल्ली लिहिण्याची पद्धत आहे म्हणे >>>> Lol मी ट्रेन्डसेटर आहे या कौतुकाचा.>>>>> Biggrin

पुढच्या वर्षी ऋतुराज ला एक पेटी माझ्याकडून भेट .>>>>> :डोळ्यात बदाम:

काहीजण जीव गेला तरी इतरांना 'छान लिहिले आहे' एवढे तीन शब्द सुद्धा म्हणू शकत नाहीत. वाचत असतात, स्वतःची करमणूक करून घेत असतात आणि सक्रिय सुद्धा असतात तरीही. त्यामुळे चांगले लिहिणाऱ्यांना प्रोत्साहन देणं मला माझी नैतिक जबाबदारी वाटायला लागली आहे. इतका छान प्लॅटफॉर्म आहे, त्याचा योग्य वापर करता यायला हवा. वाचक म्हणूनही, लेखक म्हणूनही आणि माणूस म्हणूनही.>>>>>> अस्मिता, प्रचंड अनुमोदन.

ॲवाकाडो मश्रूम सँडविच..>>>>> so tempting. हेच मागवणार पुढच्या वेळी.

काजूकतली हा एकमेव अपवाद आहे. बॉक्सवरचं नाव नेहमीपेक्षा वेगळं होतं. >>>> मुरलीधर...दही(सर) फेमस दुकान

आदरयुक्त भीती? अरे देवा! I need a makeover. बरं भेटल्यावर दोन्हीमधलं काय कमी काय जास्त झालं? >>>>> आदर वाढला भीती आहे तितकीच राहिली.

मला पुस्तकावर त्यांची सही घ्यायची आहे.>>>>> माझी पण संधी हुकली

अरे वाह! मस्त झाले गटग!
फोटोज आणि वृत्तांत दोन्ही छान 👍
अनेकांप्रमाणे मी पण फक्त ऋतुराज ह्यांनाच ओळखु शकलो. बाकिच्यांना फोटोत बघुन छान वाटले!
>>"भरत, तुमच्या माबोवरच्या प्रतिसादांतून वगैरे तुमच्याबद्दल माझ्या मनात टोटली वेगळी प्रतिमा होती. प्रत्यक्षातले तुम्ही एकदमच वेगळे निघालात. ">>
(त्यांना फोटोत पाहुन) मी पण अगदी हेच म्हणतो...

झकासराव, नुसते भरत पुरेसे आहे. जी सुद्धा नको. तुम्ही ब्रह्मविद्येचा कोर्स केला हे वाचून छान वाटलं.

ऋतुराज, सुधीर फडके फ्लायओव्हरच्या बाजूचं मुरलीधर का? तिथले काही पदार्थ आवडलेत तर काही अगदीच बंडल वाटलेले. केशरकतली छान होती.

अमित ने माझ्याबद्दल जे भारी भारी लिहिलंय त्याची परतफेड करायची राहिली. मी गेल्या चार पाच वर्षांत इथे जे पर्सनल किंवा close to my heart गोष्टींबद्दल जे थोडंफार लिहिलं, ते त्याच्यापर्यंत पोचलं हे त्याच्या प्रतिसादांतून कळत होतं. त्यामुळे एकदम दोन दोन आघाड्यांवर त्याने मला
भेटायला जमेल का असं विचारल्यावर जाऊयाच असं मला वाटलं. निसर्गायन मधल्या मृगजळवरच्या माझ्या लेखावर त्याने कवितासंग्रह मिळवून वाचेन असं लिहिलं , तेव्हा हा त्याला द्यावा असं वाटलं.

माझे त्याचे मतभेदही अनेकदा झालेत. पण त्याने ते टोकदार न होता मांडले. त्यामुळे मतभेद होऊनही दुसर्‍या मुद्द्यांवर बोलताना याच्या काही खुणा राहत नसत.
विशेषतः हल्लीच्या काही पोस्ट्समध्ये दिसणारा तसंच कुठल्याही गोष्टींचा , जिथ आपला सरळ संबंध नाही, किंवा जे आपल्या हातात नाही , तिथे , फार त्रास करून घ्यायचा नाही, हा त्याचा जीवनविषयक दृष्टिकोन मला आवडला. तो अंगीकारायला जमेलच असे नाही.

तुला भेटून फार छान वाटलं आणि तुझ्यामुळे इतक्या लोकांना भेटणंही झालं .

ऋतुराज आणि भरत मस्त लिहिले आहे. Lol हे पण डमी कडून लिहवून घेतलं तर नाही ना. भरत यांचे गटगने मेक ओव्हर होऊन एकदम वय कमी झाल्यासारखे वाटते आहे. आता तुम्ही आमच्या वयोगटात. Happy भरपूर इमोजीज, चुकीचे मराठी, मधेमधे इंग्रजी वापरून घाईघाईने लिहायचे मी शिकवीन लागलेच तर. Wink

ब्रह्मविद्येची चर्चा आठवते आहे. ललिता प्रीतीचे रोज अर्धा तास वाचन हे मला 'लेकी बोले सुने लागे' झाले आहे. सॅन्डविच फारच भारी निरू. नसबंदीचा किस्सा उद्धृत करा की कोणी. चावट गोष्टींची फार उत्सुकता वाटते.

सगळ्यांचे वृत्तांत आणि सगळे प्रतिसाद धमाल आहेत.

>>भरत यांचे गटगने मेक ओव्हर होऊन एकदम वय कमी झाल्यासारखे वाटते आहे. >> हो ना Happy . मी सुद्धा मध्येच वऱ्हाडी शब्द वाक्यात कसे पेरावेत आणि ते तर अगदी योग्यच आहेत हे कसे दर्शवावे हे शिकवेन.

नसबंदीचे उमेदवार आणि पपईच्या पानातून कोक पानाचा रस पिऊन दिलेल्या ढेकरामुळे डासांचे ओढावलेले मृत्यु ...... Lol Lol Lol .... फार हसले.
दहीसर जोक Lol Lol
>>>>त्यात प्रयोग करून बिघडवून न्यावी असा विचार आला होता. Lol Lol
>>>>>व्हॉट इज हॉट आणि फोर टीज विथ बिस्कुट ची आठवण हमखास येते. Lol Lol

आपल्याकडे शिक्षकांना कसं शिक्षणेतर कामांना जुंपतात वरून चर्चा चालू होती. वर्षभर कुठे ना कुठे निवडणुका चालूच असतात, मतदार याद्या अद्ययावत करणे, प्रत्यक्ष भेटी देऊन सर्व्हे करणे, आता जनगणना करणे अशी सगळी कामं करायला फुल टाईम भरपगारी लोक नेमले तर? किमान शिक्षकांना मुलांच्या शिकवण्यावर लक्ष थोडं अधिक केंद्रित करता येईल यात कुणाच दुमत असायचं कारणच न्हवतं.
तर निरू म्हणाले शिक्षक खिचडी करतात तरी ती किमान मुलांसाठी तरी असते. ठाण्यात सगळ्या सरकारी खात्यांना नसबंदीचे टार्गेट दिलेले. असं टार्गेट नगरविकास किंवा तत्सम कार्यालयातील बाबू लोकांनी पूर्ण करायची एक नामी शक्कल लढवली. प्रत्येक स्थापत्यविषारदाला त्याचा प्लॅन पास करून हवा असेल तर ५ लोकांची नसबंदी करणे अशी अट घातली. निरुंच्या बॉस कडे तेव्हा ३५ का ४० फाईल होत्या. Wink

Happy मस्त किस्सा. 'पंचायत' मधल्या सारखे झाले. त्यात 'तीन बच्चे बवासीर, दो बच्चे मीठी खीर' अशा नसबंदीसाठी प्रोत्साहन देणाऱ्या ओळी भिंतीवर रंगवायच्या असतात.

अर्रे वर्णन द्या ना - पांढरा शुभ्र टॉप माझेमन, लाल साडी ममो वगैरे.
इतका वेळ मला ललीताप्रीती हीच माझेमन वाटत होती Happy परत वाचल्यानंतर कळलं.

नसबंदी किस्सा >>> Lol

काय खायच हे घरीच त्यांचं मेन्यू कार्ड बघून ठरवून ठेवलं होतं, तिथे किती वेळ वाचत बसू हो मेन्यू कार्ड >>> मी पण करते हे पुष्कळदा Happy

व्हॉट इज हॉट आणि फोर टीज विथ बिस्कुट ची आठवण हमखास येते >>> Lol

पहिला सट्टा तुझ्यावरच लावलाय >>> याला काल हसायचं राहिलं होतं Lol

मला त्यातलं नक्की काय मागवावं आणि त्याचे योग्य इटालियन उच्चार माहित नसल्याने >>> ते मेनूवर 'इथे इथे नाच रे मोरा' करत दाखवायचं बिन्धास. ऑर्डरी घेणार्‍यांना तरी कुठे वाचता येत असतं ते?! Proud

उरलेल्या प्र वाचल्या. गटगं म्हणजे एका जागी बसुन केलेली पिकनिकच जणु.. तोच आनंद तीच मजा आणि त्यापेक्षाही भारी नंतर आठवुन आठवुन लिहिताना आलेली जास्तीची मजा… खरेच आनंदाचे डोह आहेत हे गटग.

Pages