वृत्तान्त - अमितव गटग -ठाणे -११ मे

Submitted by भरत. on 12 May, 2025 - 01:41

काल ११ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत कॅनडाहून भारत भेटीस आलेल्या अमितव यांचा मायबोलीकरांसोबतच्या भेटीचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाची काही छायाचित्रे सूत्रांकरवी प्राप्त झाली आहेत.
1.jpg2.jpg3.jpg4.jpg

ही छायाचित्रे पाहून मायबोलीकरांनी कार्यक्रमाबद्दल अंदाज बांधून इथे लिहायचे आहेत.

टीप १. अनुस्वाराच्या लेखनासंबंधी नियम -
काही शब्दांतील अल्पोच्चारित अनुस्वाराऐवजी अनुनासिक जोडले, तर त्या शब्दाचा अर्थ बदलतो. जसे
१. देहांत - शरीरांत ------------- देहान्त - मरण
२ वृत्तांत - कवितेच्या वृत्तांत ----------- वृत्तान्त - बातमी
३ वेदांत - वेदांमध्ये ........... वेदान्त - उपनिषदांतील तत्त्वज्ञान

हा नियम समजत नसेल तर पुढल्या गटगस हजेरी लावावी लागेल. ज्यांना समजला असेल त्यांनी न समजलेल्यांना समजवण्यासाठी पुढचे गटग आयोजित करावे.

टीप २ - अजून ठरायची आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! मस्त वृत्तांत सगळे...

भरत मयेकर ह्यांना दृष्य स्वरूपात पहिल्यांदाच पाहिलं. Happy ते कधी कोणाला भेटल्याच ऐकलही नव्हतं. त्यामुळे मला ते स्लार्टी वगैरे सारखे आहेत असं वाटायला लागलं होतं! ते (आणि मनीमोहर पण) त्यांच्या मला वाटत असलेल्या प्रतिमेसारखेच गंभीर आणि विचारप्रवर्तक दिसतायत फोटोमध्ये Proud

भरत, मी मुंबईला आलो आणि तुम्हांला जमत असेल तर भेटू नक्की.. "आपल्याशी विविध विषयांवर चर्चा करायला आवडेल" Proud म्हणजे बाकी सगळ्यांशीही आवडेल पण ह्याला टेनिस बाफांपर्यंतच इतिहास आहे!

ललिता एकदम "संपादीका"लूक्स मध्ये! बाकी मंजुडी, अमित ह्यांना आधी भेटलो आहे. बाकी सगळ्या मंडळींना भेटायचा योग येईल पुढे.

Great mast GTG. I just moved to Abu Dhabi from Thane. Otherwise I would have attended. Thane club mast ahe. I was a member. Happy
Sorry about English. There is some issue with my keypad on mobile.

त्या रेस्टॉ मधल्या टेबल्स ई चे डेकॉर हे इंग्लंड मधले "हाय टी" रेस्टॉ चे फोटो पाहिलेत तसे वाटले. तोच इन्फ्लुएन्स असेल.

ते ऐकून प्रीतीमधला संपादक जगा झाला आणि ती खुर्ची सोडून (जेवणाची प्लेट घेऊन) आमच्या इथे येऊन बसली >>> तोपर्यंत तुम्ही कवितांबद्दल बोलत असणार Wink

माझेमन Happy तुमच्या वृ चा सुरूवातीचा भाग वाचून "सच्चे दिलसे गटग जाना चाहो, तो पूरी कायनात..." सारखे वाटले Happy

सगळ्यांना भेटण्याच्या नादात डायसकडे दुर्लक्ष झाल्याने मी साष्टांग नमस्कार घालता घालता राहिला. >>> अमितला वाटले असते भारतात आता येणार्‍या पाहुण्यांना ग्रीट करायची ही नवी पद्धत आहे Happy

मनीमोहोर आणि ऋतुराज यांची साताऱ्याचे हवामान याविषयीच्या गप्पा ऐकून मला साताऱ्याला जावेसे वाटू लागले आहे. >>> म्हणजे ऋतुराजने ममोंना सातार्‍यातच अडवून ठेवले व कोकणात पोहोचू दिले नाही असे दिसते Happy

आंब्याची पेटी वि. वाजवायची पेटी, वाजवायची पेटी कॅनडाला कशी न्यायची, पेटी फोल्ड कशी करतात (फोल्ड होणारी पेटी - यावरून 'पूर्वी हे नव्हतं, स्वातंत्र्यपूर्व काळात....' असा माझा चेहरा झाला होता) - हा पण एक टॉपिक झाला. >>> Lol म्हणजे एकूण 'पेटी' शब्दाचा बम्बैय्या अर्थ सोडून इतर सर्व अर्थांची चर्चा झाली Happy

वर्तक आळी >>> अमितचा हाच एरिया का? Happy पूरे मोहल्ले मे किसीसे भी पूँछो टाइप?

बावन्नावे राज्य वाचल्यावरच पोस्ट कोणाची आहे याचा बरोब्बर अंदाज आला Happy

बाकी वृत्तांत/वृत्तान्त संदर्भात असहमती नोंदवून ठेवते >>> ही चर्चा वाचून मी प्रत्येक वेळा नुसतेच "वृ" लिहीले आहे हे चाणाक्ष लोकांना जाणवले असेलच Happy

"असेन मी नसेन मी" नाटकाला चाललोय भेटायला जमेल का >>> याचा प्रयोग गटगच्या बाबतीत कोणी केला का? Wink

तो अगदी गजराज राव सारखा दिसत होता >>>
मै जरा सोता हूं तर उलट म्हणे असे तिन्हीसांजेला झोपू नये >>> Lol

सांद्र का काय ते संगीत >>>> Lol परफेक्ट! चपखल एकदम Happy

आम्ही जे टेबल बुक केलं होत त्यावर बऱ्याच साळकाया माळकाया बसल्या होत्या, त्या काही हटेनात >>> मी पुढे घाबरत वाचलं. मला वाटलं "त्या माबोकरच निघाल्या, गटगकरता आलेल्या" असे आहे की काय Happy

पुढचे अध्याय येऊ देत लौकर ऋतुराज. भरत यांनी "सर" चा केलेला निषेध मी इतका सिरीयसली घेतला की तुझ्या पोस्टीतील दहिसर सुद्धा नुसते दही असे वाचले Happy

मस्त आहेत वृत्तान्त. केयाला मम, एकदम हॅपनिंग झाले आहे माबो. मजा येते आहे. संसारात काही राम नाही, प्रत्येक गटगला जाणं जास्त आनंदाचं आहे हे नवीन मत नोंदवते आहे. Happy

अमित, माझेमन भन्नाट.‌ न लाजता खाऊ घ्यावा/ द्यावा. असेही माबोकरांसमोर लाजून काय उपयोग, सगळ्यांना सगळ्यांचं सगळ्ळं माहिती असतंच. माझेमन, पांढरा कुर्ता ना? तुम्ही आम्हाला लक्षपूर्वक पाहिले, आम्ही पण तुम्हाला झूम करणार. Happy

भरतना सर/ दादा आवडत नाही, त्यामुळेच तर त्यांनी पहिल्या फोटोत शिक्षा केल्यासारखा चेहरा केलेला नाही असा विचार मनात येतो आहे. Happy

ऋतुराज प्रचंड गोड व्यक्तिमत्त्वाचे आहेत ह्याबद्दल अनुमोदन. जडणघडण, सुस्वभाव आणि वागणूक सोशल मीडियावरही लपत नाही. त्यांनी क्लिनिकल ट्रायल विषयी नक्की लिहावे.
पुढचे अध्याय येऊ देत लौकर ऋतुराज. >>> +१

गजराज राव, साळकाया माळकाया, तिन्हीसांजेला झोपू नये, सांद्र का काय ते संगीत >>>>>> Lol

अमितने त्याच्यामानाने जरा जास्तच कौतुक केले आहे, तोही लाघवी झाला की काय Wink आजकाल कुणावर विश्वास ठेवायची सोय नाही. Happy

लाघवी... हा शब्द हल्ली लिहिण्याची पद्धत आहे म्हणे >>>> Lol मी ट्रेन्डसेटर आहे या कौतुकाचा.

आंब्याची पेटी वि. वाजवायची पेटी, वाजवायची पेटी कॅनडाला कशी न्यायची, पेटी फोल्ड कशी करतात >> Lol

ललिता प्रीती, निरू धमाल वृत्तांत. Happy जागा खरोखरच सुंदर आहे, ambiance आवडला. फोटो छान आले आहेत.

सगळे वृत्तांत आणि प्रतिसाद मस्त... सर्वांनी लिहिल आहे त्याला अनुमोदन आहेच पण लगे हाथ दोन शब्द लिहू या म्हणून माझे वराती मागून आलेले हे दोन पैसे...

गाडी लागते म्हणून गोळी घेऊन दादरला जायचं पण गटग चुकवायच नाही अस ठरवून टाकलं होत. पण गटग च ठाण्यात आल्यामुळे माझी अवस्था आंधळा मागतो एक डोळा अशी झाली. वेस्टर्न ला राहणारे एवढ्या लांब आले त्याच खूप कौतुक. मंजूडी धावत धावत येऊन गेली म्हणून भेट तरी झाली आणि सावली आणि माझे मन उशीरा आल्या तरी आरामात बसल्या होत्या म्हणून छान गप्पा रंगल्या. अमितव एवढा प्रवास होऊन ही खूप उत्साही होता. भरत ह्यांना भेटून ही छान वाटले.

वेळ इतका छान गेला, सगळ्यांना भेटून इतकी मजा आली की अजून मनाने त्यातच आहे. ठाण्यात कोणत्याही वेळी पटकन रिक्षा मिळायला एक वेगळ्याच तऱ्हेचं भाग्य लागतं , काल माझं ते भाग्य जोरावर होतं. सावली इथे आता रिक्षा मिळणं कठीण आहे हे सांगत असतानाच एक रिक्षावाला चक्क जवळच अंतर असून ही तयार झाला तेव्हा माझी अवस्था अर्जुनाच्या पोपटाच्या डोळ्यासारखी झाली. मला फक्त रिक्षाच दिसत होती, त्यामुळे घाई घाईत नीट निरोप घेण्याचं मात्र राहून गेलं ह्याची रुखरुख लागून राहिली आहे.

गटग च ठिकाण फारच सुंदर होतं. निरू ना त्यासाठी खूप धन्यवाद... सुंदर सजावट , पूल साईड व्ह्यू, गुड फूड आणि चांगली कंपनी ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या होत्या. त्यामुळे दहा वाजले तरी मंडळी हलायचं नाव घेत नव्हती. आपापल्या क्षेत्रात पारंगत असणाऱ्या लोकांकडून त्या त्या विषयावरच्या गप्पा ऐकणे म्हणजे खरोखर मेजवानी होती. माबो मुळेच आपल्याला त्यांना प्रत्यक्ष भेटायला मिळते म्हणून पुन्हा एकदा मनातल्या मनात माबो चे आभार मानले.

ऑफिस मध्ये मायबोली बघत नाही असं निरू म्हणाले तेव्हा बॉस
उघडू देत नाही का अश्या अर्थाचं कोणीतरी (नक्की कोणी आठवत नाहीये) विचारलं . माझं स्वतःच ऑफिस आहे आणि मीच माझा बॉस आहे असं सांगून निरु नी त्यातली हवाच काढून घेतली. :).

ऋतुराज ह्यांनी त्यांच्या वेगळ्या कार्यक्षेत्रा बद्दल सांगितलेली माहिती माझ्यासाठी एकदम नवीन आणि इंटरेस्टिंग होती. त्यांनी मायबोलीवर ह्यावर स्वतंत्र लेखमालिका लिहायला हवी अर्थात ऑफिसच्या पॉलिसीत बसत असेल तरच. ललिताचं चौफेर वाचन , आणि कुशाग्र बुद्धी या गोष्टी तिच बोलणं ऐकत असताना जाणवत होत्या.

ऋतुराज ह्यांनी माझ्या पुस्तकाच्या पंधरा कॉपी विकत घेतल्या हे जेव्हा मला सांगितलं तेव्हा कोणी तरी विकत घेऊन आपलं पुस्तक वाचतय म्हणून पाच मिनिटं शॉक मध्येच होते मी , नंतर छान वगैरे वाटलं. ह्या साठी पुढच्या वर्षी ऋतुराज ला एक पेटी माझ्याकडून भेट . (आमच्याकडे पेटी फक्त आंब्याचीच असते, बाज्याची पेटी आमच्याकडे नसते. Happy बाकी अमितव चा पेटीचा किस्सा भारीच...

मस्त लिहिले आहे ममो, मी विचारणारच होते कुठे तुमचा वृत्तान्त म्हणून. Happy

मीच माझा बॉस, पोपटाचा डोळा, पंधरा कॉपी>>>> Happy Happy

इतके वृत्तांत (हो! Proud ) आले, पण काय खाल्लंप्यायलं ते एक जण लिहील तर शपथ!
अशाने हे गटग रद्दबातल ठरवावं लागेल. मग श्रीभरतरावजीदादासाहेबसर काहीही म्हणोत! Proud

श्रीभरतरावजीदादासाहेबसर >>> Lol का भस्मासुर तयार करत आहेस. Wink कुठल्याच गटगला जायला न मिळालेल्यांना 'टुकुटुकू माकड, आम्ही खातो पापड' असं म्हणायचा मोह होतो आहे. Proud

श्रीमंत झाल्यासारखे वाटणं, जिव्हाळा आणि नो आढेवेढेला मम. माझा हॅन्गोव्हर उतरायच्या आत नवं गटग झालं व वाचायला मिळतं आहे त्याचीही धमाल येत आहे. Happy

विविध लोकांचे नंबर तिच्याकडून मिळत असतील, तर तिचा आयडी एकदम चपखल आहे Happy >> हे वाचून मला किल्ली मॅट्रिक्स मध्ये निओ बरोबर किमेकर बनून फिरते आहे आणि वेगवेगळे दरवाजे उघडून देते आहे असे इमॅजिन झाले. Lol

मस्त वृतांत आणि फोटो. धमाल आली वाचताना. मी निरू आणि माझेमन सोडून सर्वांना ओळखले - त्यातले काही गेस केले, तेही दगड बरोबर लागले.

अमित माझ्या एका मैत्रीणीच्या नवर्यासारखा दिसतो. आणि कोणी फालतू विनोद करण्याआधी सांगते की त्याची बायको माझी मैत्रीण नाही.

सगळ्यांचे वृत्तान्त... गुगलच्या अंगवळणी पाडा रे हा शब्द.
याचं लॉजिक सप्तमी विभक्तीचा त स्वच्छ लिहावा ( सप्तमीच ना?) असं आपलं मला वाटतं आहे. किंवा ते तसं मी आता यापुढे लक्षात ठेवीन.... मस्त आहेत. सलग वेळ मिळत नाहीये त्यामुळे लगेच हसलो तरी 'पुढचे प्रतिसाद वाचू ' घाईत इथे हसायचं , एकूणच दाद द्यायची राहून जातय.

तिन्ही सांजेला झोपू नये ला जाम हसलेलो. बाकी कॉम्प्युटर हाती लागला की हसता येईल. फोन वरून कोट करणे फार जिकिरीचे. कोटी करणे सोपे.

देवाणघेवाण:
मी आलो तर दारात ललिताप्रीती उभी होती. मला ती प्रीती असणार असच वाटलं, पण तिने मेसेज मध्ये काळया रंगाचा ड्रेस लिहिलय वाटून मी जुजबी अनोळखीचं ( फा म्हणतो तसं फाईडिंगि निमो मध्ये.. तो ओठ दाबूनी निज अधरावर हसतो तसा) हसून आत गेलो. ( क्लिप फा देईलच) मग काही पावलं चालून मेसेज उघडले तर ग्रे एरिया हसून घेतलं असतं तर चाललं असतं असं झालं. मग मागे येऊन तिला भेटलो. तिने ताबडतोब मला दोन पुस्तकं भेट दिली. एक तिने लिहिलेलं आणि एक संपादित केलेलं. ते होतय तोवर पार्किंग मध्येच मागून भरत आले. त्यांनी त्याच्या संग्रहातील इंदिरा संत, वसंत बापट आणि कुसुमाग्रजांचे एक एक पुस्तक मला दिलं आणि मला खरोखर फार भरून आलं. वर ते म्हणाले ' हल्ली माबोवर कविता आवडणारे लोक फार कमी आहेत' हे आधी क्षणभर ते प्रीतीला उद्देशून म्हणत असणार वाटलं. ते मला उद्देशून आहे याचा धक्का ओसरल्यावर यातल्या कवितांचे अर्थ समजले नाहीत की आता स्वाती बरोबर भरत ना हक्काने पिडायचा अधिकार त्यांनी दिलेला आहे ह्याची त्यांना नम्र जाणीव इथे करून देतो.
आत गेलो तर निरू नी सुंदर खोक्यात बांधलेली एक केशराची कुपी आणि म मो नी त्याच्या घराचा कोकणाचा खाऊ... तळलेले गरे हातात दिले. ऋतुराज ने चविष्ट काजू कतलीचा आग्रह सुरू केला. त्याची काहीच गरज पडली नाही. मागून मागून ( पन इंटेंडेड) मी ती खाल्ली. Happy

तिकडे मेन्यू क्यूआर कोड स्कॅन करून मग दिसतो. गप्पांच्या नादात ते पेज लोड केलं तरी त्यातले घटक वाचून ऑर्डर करणे काहीसं जडच जात होतं. मग मी तरी जे पहिल्या दोन मिनिटांत दिसलं ते आणि ज्या पदार्थाचं नाव वेटर येई पर्यंत माझ्या लक्षात राहील तो पदार्थ निवडला. ममो माझ्या शेजारी होत्या त्यांनी माझ्यावर कडी करून मेन्यू कडे ढुंकून न बघता आईस्क्रीम कुठलं आहे हे वेटरलाच विचारून त्याने फार काही फॅन्सी लंबाण लावायच्या आता व्हॅनिला सांगून टाकलं. तिकडे भरत नी भारी कॉफी घेतली. प्रीती अस्सल माबो परंपरेला जागून आम्ही कोणीच चटचट ऑर्डर देत नाहीयोत कळल्यावर पटकन ऑर्डर देऊन परत गप्पांत सामील झाली.

मस्त पोस्ट. पुस्तकं, काजू कतली मज्जा आहे बुवा एका माणसाची. Happy

कविता आवडतात हो भरत, पण 'जिंदगी की जद्दोजहदमें'
कनेक्शन तुटून गेले आहे. पुन्हा जोडता आले तर हवंच आहे. तुम्ही कविताप्रेमी लिहीत राहा. मला स्वतःला फार फार कमी जणांचं लेखन अपील होतं. वर्षानुवर्षे इथे असणारे आयडी काहीही सकस किंवा intriguing भर घालताना दिसत नाही, लेखक आणि माणूस म्हणून दोन्हीतही 'ग्रोथ' किंवा 'डेप्थ' दिसत नाही. तेच-तेच बोलत बसतात. हे मी आमच्या गटगतही बोलून दाखवलं होतं, ते येथेही लिहितेय. काहीजण जीव गेला तरी इतरांना 'छान लिहिले आहे' एवढे तीन शब्द सुद्धा म्हणू शकत नाहीत. वाचत असतात, स्वतःची करमणूक करून घेत असतात आणि सक्रिय सुद्धा असतात तरीही. त्यामुळे चांगले लिहिणाऱ्यांना प्रोत्साहन देणं मला माझी नैतिक जबाबदारी वाटायला लागली आहे. इतका छान प्लॅटफॉर्म आहे, त्याचा योग्य वापर करता यायला हवा. वाचक म्हणूनही, लेखक म्हणूनही आणि माणूस म्हणूनही.

अरे सही चालंलय. एक गटग संपत नाही तोच दुसरं चालू पण झालं?
छान वाटलं वृत्तांत आणि फोटो पाहून.
अस्मिता, खरं आहे. पोच द्यायला हवी खरी, पण बर्‍याच वेळा इतकं छान लिहीलेलं असतं की सविस्तर पोच द्यावी म्हण्तते आणि राहुन जातं.

दहिसर सुद्धा नुसते दही असे वाचले >>> Rofl

बाकी प्रतिसादांमधली पण खूप वाक्यं इतकी जबराट आहेत की काय काय कोट करावं! Happy धमाल लिहितायत सगळे.

पुढचे अध्याय येऊ देत लौकर ऋतुराज. भरत यांनी "सर" चा केलेला निषेध मी इतका सिरीयसली घेतला की तुझ्या पोस्टीतील दहिसर सुद्धा नुसते दही असे वाचले >>> Lol

भरत यांनी "सर" चा केलेला निषेध मी इतका सिरीयसली घेतला की तुझ्या पोस्टीतील दहिसर सुद्धा नुसते दही असे वाचले >> Lol हसायचं राहून गेलं होतं.

नवीन प्रतिसाद ही भारी... दहिसर बेस्ट आहे.
ममो माझ्या शेजारी होत्या त्यांनी माझ्यावर कडी करून मेन्यू कडे ढुंकून न बघता आईस्क्रीम कुठलं आहे हे वेटरलाच विचारून त्याने फार काही फॅन्सी लंबाण लावायच्या आता व्हॅनिला सांगून टाकलं
>> शिवप्रसाद मध्ये जाऊन मसाला डोसा खाणे ही आमच्या चैनीची परिसीमा. त्यामुळे असल्या हॉटेलमध्ये (हो, आमच्या भाषेत हे ही हॉटेलच रेस्टॉरंट वगैरे नाही ) आलं की व्हॉट इज हॉट आणि फोर टीज विथ बिस्कुट ची आठवण हमखास येते.

अगम्य इन्ग्रेडियंट्स आणि अगम्य नाव वाचून ऑर्डर केलेला पदार्थ काय येईल ह्याची कल्पना येऊ नये असंच मेन्यू कार्ड तयार केलेलं असतं ह्यांच.. त्यात पुन्हा माझ्यासाठी भर म्हणजे खाली हिरवा डॉट ही हवा आणि उजवीकडची किंमत ही किफायतशीर पाहिजे. ठाणा क्लब हे नाव वाचताच वरच सगळं डोक्यात क्लिक झालं होतं . म्हणून काय खायच हे घरीच त्यांचं मेन्यू कार्ड बघून ठरवून ठेवलं होतं, तिथे किती वेळ वाचत बसू हो मेन्यू कार्ड ! पण इतरांनी ऑर्डर केलेले पदार्थ बघून आपण ठरवलेलं अवाकाडो मश्रुम सँडविच हे नॉर्मल सँडविच सारखं येईल की नाही असा डाउट आल्याने त्याला बगल देत झिरो रिस्क आइस्क्रीम ( ते सुद्धा फॅन्सी नाही बेसिक व्हॅ नि ला ) कडे वळले.
पण आइस्क्रीम खूपच सुंदर होतं. मऊ ,मुलायम आणि तोंडांत विरघळणार . दुपारीच खाल्लेल्या ,घरी केलेल्या, खाताना बर्फ कचकचणार्या आईसक्रीम शी नकळत मनातल्या मनात तुलना ही होत होतीच. असो.
विनोदाचा भाग सोडा, दुपारी जेवण उशीरा झालं होतं आणि
रात्रीचा हल्ली हलका आहार ठेवला आहे म्हणून काही खाल्लं नाही.

मी डेस्कटॉप चालू करायच्या आधी फोनवरून सगळे प्रतिसाद वाचलेले असतात. पण एक दोन वाक्यांपेक्षा जास्त लिहायचं असेल तर लिहितो मात्र बहुधा डेस्कटॉपवरून. त्यामुळे मधल्या प्रतिसादांतल्या विनोदांवर वेगळं हसायचं राहून जातं किंवा सविस्तर दाद द्यायची राहून जाते.

फारेण्ड हे नेहमी करतो ( यानिमित्ताने माझं ज्यांच्याशी बर्‍यापैकी इंटर अ‍ॅक्शन आहे, त्यांना एकेरी संबोधायला सुरुवात केली आहे, याची नोंद घ्या. त्यांनीही तसंच केलं तर चालेल. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर वय काय बघायचं?) त्यासाठी एक लाइक आणि दहिसर साठी लाफिंग इमोजी.

मनीमोहर यांचा ताजा प्रतिसाद वाचून तुमचं आमचं सेम आहे, हे लिहायला आज डेस्कटॉप लवकर ऑन केला.

भेटायच्या जागेचं नाव कळल्यावर मीही घरीच गुगल करून हा काय प्रकार आहे , मेन्यु काय आहे, हे पाहून घेतलं होतं. मास्टरशेफ ऑस्ट्रेलियामध्ये पाहिलेल्या पदार्थांची नावं दिसली. Leaning tower of Pisa सारखं डुगडुगणारं पॅनाकोटा होतं मेन्युत. पण इथे येऊन ऑर्डर करायची वेळ आली तोवर विसरलो. आणि सगळेच जण आपापली ऑर्डर देणार, तर मला एकट्याला संपेल असं आणखी काही कळत नव्हतं. सध्या एका वेळी फार खाणं जात नाही. शेअर करता येईल का असं विचारण्याइतकी तोवर भीड चेपली नव्हती. म्हणून जिचा उच्चार फार चुकणार नाही आणि ज्यातले जिन्नस बर्‍यापैकी माहीत आहेत अशी cappuccino सांगितली. अ'निरु'द्ध यांनी फक्त कॉफी, काही खाल्ल नाही का ? असं विचारलंही . शिवाय गटग इतका वेळ चालेल याची कल्पना नव्हती. दोन, फार तर तीन तासांत निघू असं वाटलं होतं.
पण माबोकरांना भेटून, गप्पा मारून आणि तसंही पाच वाजल्यापासून आधी कॅब आणि मग गटगमध्ये बसूनच होतो , त्यामुळे भूकबीक लागली नाही.

मधल्या प्रतिसादांना उत्तरं नंतर देतो.

जागा खरोखरच सुंदर आहे, ambiance आवडला. फोटो छान आले आहेत.>>+१०० इथे अजून एखादं गटग व्हायला हरकत नाही ठाणेकर्स Wink

लले Lol एक वर्ष तारीख पे तारीख मधे गेलं, २०२५ मधे जमवायला हवं ते ही पावसाळ्यात (इथे डोळ्यात बदाम स्मायली)

गटगचे वृ वाचूनही फार मस्त मूड सेट होतोय. (इथेही डो ब स्मा)

अमितव फोटोत तरी माझ्या भावाच्या मित्रासारखा आणि एका ओळखीच्या व्यक्तीसारखा दिसतोय. त्याचा मित्रही वर्तक आणि डोंबिवलीकर. मेले मे बिछडा हुवा भाई नसावा पण Lol (इतका कॉमन चेहरा आहे असे अजिबात सुचवायचे नाहीये Lol )

पण इतरांनी ऑर्डर केलेले पदार्थ बघून आपण ठरवलेलं अवाकाडो मश्रुम सँडविच हे नॉर्मल सँडविच सारखं येईल की नाही असा डाउट आल्याने त्याला बगल देत झिरो रिस्क आइस्क्रीम ( ते सुद्धा फॅन्सी नाही बेसिक व्हॅ नि ला ) कडे वळले. <<<

हे घ्या ॲवाकाडो मश्रूम सँडविच.. गटगच्या सकाळीच घेतलं होत नेमकं.
एकदम नॉर्मल, टेस्टी आणि नो नॉन्सेन्स..


'वृ' धमाल..... भानगडच नको त्या त्तान्त ची 😉

अजून पूर्ण वाचायचाय. थोडा थोडा पुरवून वाचतोय.

रच्याकने

&#128525;

=

😍

अमितची एक वस्तू माझ्या कपाटात खूप वर्षे खूप जागा खात होती. गेल्यावेळी तो ठाण्यात आला होता तेव्हा भेटायचं ठरवूनही भेट हुकली होती. ह्यावेळीही शनिवारी भेटायचं ठरवलं पण मला सांसारिक समस्यांमुळे टांग मारावी लागली. माझ्या घरापासून त्याचं घर अगदी १ किमीच्या परिघात आहे तरीही हे असं.. अरे संसार संसार!
रविवारी त्याचा 'गटग आहे, जमलं तर तिथे भेट' असा मेसेज आला. मग कसंही करून जायचंच आणि कपाटातली जागा रिकामी करायचीच असं ठरवून गेले.
बऱ्याच वर्षांनी मायबोली गटगला हजेरी लावली.
तिकडे गेल्या गेल्याच मला भरपूर खाऊ मिळायला सुरुवात झाली. हे असं असतं, १० मिनिटं काय किंवा ३ तास काय - मायबोली गटगला हजेरी लावली की आपली पिशवी काठोकाठ भरून आणता येते.
भरत ह्यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाली. माझेमन, ऋतुराज, अनिरुद्ध ह्यांना पहिल्यांदा भेटले. अमित, लली, हेमाताई ह्यांच्याशी प्रत्यक्ष नाही तरी व्हाट्सअप्पवर संदेशांमधून भेट होत असते.
सगळ्यांना भेटून छान वाटलं. 'येत जा मायबोलीवर' असा अमित आणि भरतकडून प्रेमळ आदेश मिळाला आहे तर जमेल तशी चक्कर मारेन असं ठरवलं आहे.

कविता, त्या सोबो गटगसाठी माझी आठवण ठेवा. >>> Rofl
कालच मनातल्या मनात यादी करत होते कुणाकुणाची आठवण ठेवायची आहे याची

फा, दहीसर - सर Rofl

गटग गप्पांमध्ये मी सारखी पुस्तकांवर बोलत होते, आणि ऋतुराज मला आफ्रिका लेखमालिकेकडे वळवत होता. आरंभशूरपणा करून नंतरचे लेख लिहिलेच नाहीत, हे फक्त तो बोलला नाही इतकंच Wink Light 1
(पूर्वी मी सुद्धा कुणाकुणाला असं अर्धवट लेखमालिकांवरून पोक केलेलं आहेच. उदा. हंगेरीवरची मालिका. बहुतेक टण्याची. त्यामुळे भोआकफ अशी स्वतःवर वेळ आली. असो.)
जोक्स अपार्ट, त्यातला प्लेटेनबर्ग बे वरचा लेख ऋतुराजच्या अजून लक्षात आहे हे पाहून मला खूप आनंद झाला.

ऋतुराजने आणलेली काजूकतली फारच छान होती. कवितांपाठोपाठ मी मिठायांपासून चार हात लांब असते. 'आवडत नाही' हेच कारण दोन्हीसाठी. पण काजूकतली हा एकमेव अपवाद आहे. बॉक्सवरचं नाव नेहमीपेक्षा वेगळं होतं. (म्हणजे प्रशांत्/टिप टॉप वगैरे ठाण्यातल्या यशस्वी नावांपेक्षा. मी नाव वाचलं होतं, पण आता विसरले.)

भरत, तुमच्या माबोवरच्या प्रतिसादांतून वगैरे तुमच्याबद्दल माझ्या मनात टोटली वेगळी प्रतिमा होती. प्रत्यक्षातले तुम्ही एकदमच वेगळे निघालात. Lol

Pages