काश्मीरमधील कालचा दहशतवादी हल्ला – एक सुन्न करणारा अनुभव

Submitted by बन्या on 22 April, 2025 - 23:12

काश्मीरमधील कालचा दहशतवादी हल्ला – एक सुन्न करणारा अनुभव

कालचा दिवस (२२ एप्रिल २०२५) देशाच्या हृदयाला हादरवून गेला. मी स्वतः जेव्हा ही बातमी वाचली, तेव्हा काही क्षणोंसाठी सुन्नच झालो. जम्मू-काश्मीरच्या निसर्गरम्य पहलगाममध्ये, जिथे लोक शांतता शोधायला जातात, तिथे अचानक झालेला गोळीबार, आणि त्यात २६ निरपराध पर्यटकांचा मृत्यू – हा प्रकार केवळ क्रूर नाही, तर मानवतेच्या मुळांवर घाव घालणारा आहे.

एकेकाळी "धरती का स्वर्ग" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये पुन्हा एकदा अशांततेचे सावट पसरले आहे. कालचा हल्ला काही क्षणांचा नसून, त्या ठिकाणचं शांत वातावरण एकदम रक्तरंजित केलं. बायसरन व्हॅलीमधून घोडेस्वारी करत असलेल्या पर्यटकांवर अचानक अज्ञात दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. अनेकजण त्या क्षणी काही समजायच्या आतच जखमी झाले, तर काहींनी जागीच प्राण गमावले.

या घटनेत भारतातील काही पर्यटकांसोबतच दोन विदेशी नागरिकांचाही दुर्दैवी अंत झाला. हा हल्ला केवळ पर्यटकांवर नव्हता, तो भारताच्या शांततावादी वृत्तीवर होता. "काश्मीर रेसिस्टन्स" नावाच्या एका दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारल्याचे समजते. त्यांच्या मते, हा हल्ला ‘बाहेरून होणाऱ्या वसाहतीं’ विरोधात होता. पण खरं सांगायचं तर, हे केवळ बिनदिक्कत मारणं होतं – निर्दोष, निःशस्त्र, निष्पाप लोकांना मारणं.

पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी यावर कठोर भूमिका घेतली आहे. केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाली आहे आणि शोधमोहीम सुरू झाली आहे. पण इतक्यावरच थांबून चालणार नाही. देशभरातून, सोशल मीडियावरून, कँडल मार्चसह, सर्वत्र एकच मागणी आहे – "दोषींना कठोर शिक्षा व्हावी."

या घटनेनं मला वैयक्तिक पातळीवर खूप विचार करायला लावलं आहे. आपण कुठे चाललो आहोत? आपण ज्याठिकाणी मनःशांती शोधतो, तिथेच अशा घटना घडत असतील, तर आपण खरंच सुरक्षित आहोत का?

आता वेळ आली आहे की, आपल्याला केवळ निषेध नोंदवून थांबायचं नाही, तर सुरक्षेबाबत अधिक जागरूक व्हावं लागेल. शांती ही कमकुवतपणाचं लक्षण नाही, ती मजबूत इच्छाशक्तीची आणि दृढतेची निशाणी असली पाहिजे.

माझ्या या ब्लॉगच्या शेवटी, मी प्रार्थना करतो –
ज्यांनी आपलं आयुष्य गमावलं त्यांना श्रद्धांजली, आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची ताकद मिळो.

तुमच्या भावना, प्रतिक्रिया, किंवा यासंदर्भातील अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा.

– एक संवेदनशील भारतीय

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधना जबरदस्त मुद्दे मांडले आहेस. सर्वच प्रतिसाद सुरेख आहेत. फक्त एकच सुचवते - 'विचारवंत' नाही 'तेजस्वी विचारवंत' म्हणत जा. :))

बरं इतकी मोठी घटना झाली, तिचं निमित्त करून ' भारतात हिंदू मुसलमानांच्यात तेढ निर्माण केली जातीये' असं नेहमीचं फीअर माँगरींग करून, त्यानिमित्ताने आपलं पुरोगामित्वं पितांबरीनं चकचकीत घासून, सोमिवर कळपांसमोर नाचून झालं असेल तर भारतात रहाटगाडगं नेहमीसारखंच सुरू आहे याकडे आता लक्ष द्यायला हरकत नाही.

"पुण्यातील 'त्यांच्या' दुकानाची यादी", "सांगलीतील 'त्यांच्या' दुकानाची यादी" , "अक्षय्य तृतियेला त्यांच्या कडून आंबे खरेदी नको" वगैरे मेसेजेस पसरत आहेत, कुणा एका गायनॅक ने पेशंट ला पहायला नकार दिला. हे सारे पाहून भाजप समर्थकांना या हल्ल्याचे दु:ख झालेले नसून आनंदच झालेला आहे असे माझे निरिक्षण आहे. ऐन बिहार निवडणुकीच्या तोंडावर ( मागे सुशांत च्या वेळेलाही हेच झाले होते) अशी घटना म्हणजे पर्वणीच.

२६/११ च्या वेळचे मेडियाचे वर्तन आणी (मोदींचे) वर्तन आणी आजचे मेडियाचे वर्तन यातील फरक पुन्हा एकदा अधोरेखित करू इच्छीतो.
( बाकी लंडन मध्ये एका छपरी भारतीय तरुणाने पाक एंबसी समोर मिशीला ताव देणे व अटक झाल्यावर रडवेल्या चेहर्‍याने 'बट व्हाय', असे ओरडणे, एका वयस्कर व्हॅट्सॅप अंकल ने पाक ला पाणी न मिळण्यावरून अश्लील हावभाव करणे, शेजारीच दुसर्‍या अंकल ने भारताचा झेंडा उलटा हातात धरणे हे करुण विनोदी प्रकार आहेतच)

काही लोक या परिस्थितीला धार्मिक विचार देण्याचा प्रयत्न करत आहेत, जे देशासाठी अतिशय धोकादायक आहे.>>>
- विचारजंत शिरोमणी शरद पवार.
हा विकृत माणुस देशासाठी पाकिस्तान पुरस्क्रुत जिहादी दहशतवाद्यांपेक्षा जास्त धोकादायक आहे.

हिथं हिंदूंना नाव विचारून मारलं गेलय. ज्यांनी भीतीपायी खोटी नाव सांगितली असतील त्यांना कलमा विचारून मारलं गेलंय. तरीही काही तरी कारण काढून आणि थेट नाही म्हणायचं म्हणून भाजपा समर्थकांच्या आडून हिंदूंवरच टीका केली जातेय. पाकिस्तानी एंबसी समोर पाणी बॉटल दाखवण्यात काय चुकीचं आहे. ते अभिनंदन च पोर्टेत घेऊन आलेले. भारताने पाच ते दहा टक्के पाणी जरी अडवलं तरीही पाकिस्तान च्या आगोदर भारतात आंदोलन चालू होतील.

माझे मन (माम चालेल का ?)
माझं म्हणणं इतकंच आहे कि हल्ल्याच्या वेळच्या युनिटच्या शिफ्टींग बद्दलचा प्रश्न आहे ना, त्याला धरूनच लिहीलंय.
फ्लॅग मार्च वेगळा, युनिट शिफ्ट होतं ते वेगळं. आणि जे मी ऐकलंय ( लहान असताना पाहिलेलं पण आहे) ते म्हणजे ओ आर, जेसीओ हे सगळे बसमधे जातात , पूर्वी तर वन टन किंवा थ्री टन मधे जात असत. सीओ, टू आय सी, क्वार्टरमास्टर आणि अ‍ॅडज्युटंट हे जीप / कार अशा त्यांच्या रँकप्रमाणे असलेल्या वाहनातून येत. काही वेळा ऑफीसर्स बसमधे पुढे बसत. स्टँडींग इन्स्ट्रक्शन्स मला माहिती नाहीत. त्या वयात कुणी विचारणार पण नाही.

हे आर्मीबद्दल. मग सीआरपीएफ ला हेलिकॉप्टर कसं देतील हा प्रश्नच आहे. आणि सरकार त्याला उत्तर देऊन शंका समाधान का करत नाही हा ही.

आम्ही श्रीनगर विमानतळावर आमच्या विमानाची वाट पाहात होतो तेव्हा सोबत बरेच जवान त्यांच्या फुल युनिफॉर्ममध्ये त्यांच्या विमानाची वाट पाहात होते, सोबत सामानाच्या सॅक्स होत्या. सुट्टीवर निघाले होते की अजुन काही काम माहित नाही, विचारले नाही. मला वाटले आमच्या विमानात येतील पण त्यांचे चार्टर्ड फ्लाईट होते हे त्यांच्यासाठी घोषणा झाली तेव्हा कळले. सगळे सैनिक त्या फ्लाईटमधुन गेले आणि विमानतळ अर्धा रिकामा झाला.

पुलवामा हल्ल्यानंतर लष्करी आणि निमलष्करी जवानांना हवाई प्रवासाची सुविधा देण्यात आली. बैल गेला आणि झोपा केला.

पण आपल्या नेहमीच्या गटात नवीन घोडेवाले किंवा इतर धंदेवाले आहेत हे समजत नाही? अश्या वेळी तुम्ही तुमचा धंदा पाहणार? >>> जेथे संशयास्पद आहे तेथे सरकारी यंत्रणा चौकशी करेल, आणि तेथे स्थानिकांनी कुणकुण लागली तर कळवायला हवे होते हे १००% बरोबर आहे. पण काही नवीन लोक दिसले तर हे लगेच अतिरेकी असतील असे लोकांना वाटले असेल का? सध्या गेली ४-५ वर्षे तेथे तसा ट्रेण्ड नाही. सुरूवातीला यंत्रणासुद्धा सतत हाय अ‍ॅलर्ट वर असतात पण हळुहळू शिथिल पडत जातात, लोकांचेही तसेच होत असेल.

एनीवे, जेथे संशय आहे तेथे चौकशी करा. दोषी आढळले तर ठेचा. त्याबद्दल काही नाही. सरसकट घाऊक आरोप करू नका इतकाच माझा मुद्दा आहे. (ते तुम्ही करत आहात असे म्हणत नाही, आधीच्या पोस्टचे स्पष्टीकरण)

फक्त माणुसकीच्या दृष्टीने पाणी पुरवठा तोडू नये ही अपेक्षा भारतावर अन्याय करणारी नाही का? >>> कोणतीही "लष्करी" कारवाई भारताने जरूर करावी. अगदी पाकव्याप्त काश्मीर मधे घुसावे, ते परत मिळवावे, अतिरेक्यांना जेथून मदत मिळत आहे ते सर्व उध्वस्त करावे. त्याचे पुरावे तयार ठेवावेत. कोणीही भारताला काही विचारणार नाही. चौकशी यंत्रणांनी स्थानिक भाग पिंजून जे याला सपोर्ट करत होते त्यांनाही शिक्षा करावी - याबद्दल काही वाद नाही - ते सगळे होईलच. यापेक्षा वेगळे काही करायचे असेल तर - युद्धाचे सर्व देशांनी मान्य केलेले नियम आहेत. ते भारतानेही मानलेले आहेत. ते जर तोडायचे असतील तर त्याच्या परिणामांना सामोरे जाण्याची देशाची तयारी आहे का बघावे.

पण त्यापेक्षाही आपल्या ज्ञात इतिहासात भारताने कधी असे काही केले आहे - ज्यातून युद्धात सर्वसामान्य लोकांना थेट त्रास होईल? सामान्य लोकांचे पाणी तोडणे हे आपले कॅरेक्टर नाही.

साधना ताई
श्रीनगरचा एअरपोर्ट लष्कराचा आहे ना ? लेह लडाख आणि कारगिलचे तर आहेत. इथे सुट्टीवर जाणारे तीन चारशे जवान नंबर लागावा म्हणून रांगेत असतात. एअर फोर्सचे महाकाय गजराज किंवा आय एल ७५ मधे एका वेळी तीनशे जण जाऊ शकतात. तर एन ३२ मधे तीस चाळीस जण जातात. आता जवानांना सुद्धा विमान प्रवास अलाऊड असल्याने खासगी विमानाने पण जात असतील.

सामान्य लोकांचे पाणी तोडणे हे आपले कॅरेक्टर नाही
तसही आपल्याला सगळं पाणी आडवंण शक्य नाही. आत्ताही आपल्या हक्काचं २०% पाणी आपण वापरत नाही. पण समजा पुढे माघे २०% च्या ऐवजी तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत आपलं आपली कॅपॅसिटी वाढवाली तर मला नाही वाटत की दोन तीन देश वगळता जास्त कोण विरोध करेल.

रानभुली तुमचा आताचा प्रश्न मला समजला नाही. पण या विषयावर माझं मत मांडून झालंय. त्यामुळे माझ्याकडे या पॉईंटवर इतर काही बोलण्यासारखं नाही.

फारेण्ड >>> आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे आणि ओव्हरऑल भारतीय कॅरॅक्टरप्रमाणे पाणी तोडणे योग्य नाही हे मान्य. पण इतकी वर्षं नियमाप्रमाणे जाऊन, पाकिस्तानला वेळोवेळी झुकतं माप देऊनही (पाकिस्तानने हल्ला करूनही काहीशे करोड रुपये सिंधू जल करारातर्फे देणे, ९३००० सैनिक पीओके/आपले ५४ सैनिकही न घेता सोडणे, युद्धात जिंकलेले हाजीपीर खिंड वगैरे सैनिकीदृष्ट्या महत्वाचे प्रदेश परत करणे इ.) पाकिस्तानचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. त्यामुळे हा उपाय सरकार/सैन्याला रामबाण वाटत असेल तर तसं.

पण त्यापेक्षाही आपल्या ज्ञात इतिहासात भारताने कधी असे काही केले आहे - ज्यातून युद्धात सर्वसामान्य लोकांना थेट त्रास होईल? सामान्य लोकांचे पाणी तोडणे हे आपले कॅरेक्टर नाही.>>>>इथिक्स आणी नियम हे दोन्ही बाजुनी पाळले जाणे अपेक्षित आहे ना? पाकिस्तान सारख्या &*^%%$ देशासाठी कुठलेही नियम पाळायची आवश्यकता नाही.

स्थानिकांनी सावध राहून संशयास्पद काही असेल ते लगेच यंत्रणांना कळवणे हे व्हायला हवं आणि गरजेचं आहे.
पण फक्त असं म्हणून उपयोग नाही. आपल्या सुरक्षा व्यवस्थेतील gaps कडेही लक्ष द्यायलाच हवं.
ज्या ठिकाणी अनेक पर्यटक जात आहेत, तेही काश्मीर सारख्या संवेदनशील ठिकाणी जिथे नेहमी धोका आहेच आणि हे माहिती आहे, तिथे वाहन जाण्याची सोयही नाही म्हणजे काही प्रसंग झालाच तर मदत पोहोचणेही कठीण आहे हे लक्षात घेऊन strategically काही सुरक्षा व्यवस्था, तिथे सैन्याची चौकी असायला नको का? नसेल तर पर्यटकांना प्रवेश बंद आणि स्थानिक गाईड्स, प्रवासी संस्था यांना पर्यटकांना तिथे न्यायला सक्त मनाई हवी, प्रवेशावर checkpoints हवेत.

तिथले नेते आपापल्या कुटुंबियांना परदेशी पाठवून मोकळे होऊ लागले आहेत.

ज्यांना आटा आणि टोमॅटो दिसतसुद्धा नाहीयेत त्यांना पाणी नाही मिळाले तर ते जीवावर उदार होऊन सीमा ओलांडायला लागतील. प्रश्न आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या अखत्यारीत जाईल.

मुळात तांत्रिकदृष्ट्या पाणी थांबवणे यासाठी काही वर्षे लागतात, लागतील.

POK वगैरे घेण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झालाच तर तेथील सर्व खर्चाचा बोजा भारतावर पडेल. बलुचिस्तान आपल्यात सामील होऊ इच्छित असलेच तरी भूभाग connected नाहीत.

थोडक्यात, कराचीतून समुद्रमार्गे होणारा व्यापार बंद करणे व त्या माध्यमातून त्यांच्याकडे आपोआप यादवी होईल हे बघणे हा सर्वात सोपा उपाय आहे व विचारात आहे असे समजते

पाणी थांबवणे, अचानक अधिक पाणी सोडणे वगैरे वल्गना आहेत पण पॉप्युलर आहेत

सिंधू नदी प्रणाली मध्ये पाच नद्या आहेत.‌ पर्जन्यकाळात (किंवा बर्फ वितळल्यामुळे) फेसांडत फुफाटत वाहणाऱ्या या नद्या आहेत. पाणी अडवायचं म्हणजे हौदाच्या तोट्या बंद करायच्या नसून, या नद्यांवर नवीन धरणं/बॅरेजेस बांधणं किंवा आहेत त्यांची उंची वाढवणं, हे पर्याय आहेत.
अतिउंच भागात सुरक्षित/शाश्वत धरणं बाधणं आव्हानात्मक काम आहे. भविष्यात हे झाल्यावर पावसाळ्यात हे जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर त्यांच्या बॅकवॉटरमुळे काश्मीर/पंजाब/हिमाचल मध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये किंवा पाण्याच्या दबावामुळे धरणं फुटू नये म्हणून हे पाणी देशाच्या इतर भागात वळवावे लागेल.‌ त्यासाठी कॅनॉल्सचं मोठं जाळं तयार असावं लागेल. या प्रकल्पासाठी लागणारा पैसा आणि राजकीय चिकाटी यांचा पुरवठा अव्याहत होत राहील असं धरलं तरी, या इन्फ्रास्ट्रक्चरच्या ॲक्चुअल कन्स्ट्रक्शनसाठी लागणारा कालावधी, शिवाय त्याआधी भूमी अधिग्रहण, प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्यांची तड लावणे, तसेच पर्यावरणासंबंधीचे क्लिअरन्सेस, कोर्ट केसेस, राज्याराज्यांचे मतभेद यांसाठी लागणारा कालावधी बघता हे बरंच लॉंगटर्मचं नियोजन आहे.

पाणी थांबवणे, अचानक अधिक पाणी सोडणे वगैरे वल्गना आहेत पण पॉप्युलर आहेत
>>> हे सुरू झाले आहे. चेनाबचं पाणी जे आपल्या हक्काचं आहे ते एकदम कमी केलंय. झेलमचं पाणी जास्त सोडल्यामुळे मुझफ्फराबाद परीसरात पुरसदृश परीस्थिती निर्माण झाली आहे.

पाण्यावरच्या चर्चेच्या धाग्यात सिंधू जल कराराची अधिकृत लिंक व भारताने आपल्या हिश्श्याचं पाणी साठवण्यासाठी काय केलंय याचे एक पॉडकास्ट दिले आहे.

आता ट्रॅव्हल कंपन्या कश्मीरच्या टूर पॅकेज मधे कुराणातील वचनांची तोंडओळख आणि खतना/सुन्ता अशी दोन ऑप्शन्स देणार आहे (अर्थातच थोडा जास्तीचा अधिभार लावून) असे ऐकून आहे.
म्हणजे टूरिस्ट भी खूश और टेररिस्ट भी खूश!

भ्रमर, तुमचा लेख वाचला. सॉरी उत्तर द्यायला उशीर झाला. पुर्ण वाचेपर्यंत धडधडत होतं जोवर "आई" सुखरुप सापडली वाचलं. त्यावेळी तुम्ही सर्व सुखरुप असणं हि देवकृपाच होती.
आता, राहिला प्रश्ण मी विचारलेला - अश्या प्रत्येक कृतीतून इतक ठळकपणे दिसून आलय की, हा दहशतवाद धर्मावर आधारीत आहे व धर्मपिपासू लोकंसंख्या हि वाढणारच आहे आणि त्याला एकच उपाय आहे, जिथे ती पिपासू वृती आहे ती ठेचायची. सर्वांनाच पकडा आणि मारा असे म्हणात नाहीहेत पण " आपण" च जबाबदार आहोत असा सूर खटकला बर्‍याच ठिकाणी.
आज सोमिवर किंवा इथेही काश्मिरचे पर्यटन विस्काळित होणार? वगैरे वाचले. मग निरपराधी लोकांनी जीव घालवायचा का तिथे जावून? ह्या अश्या पोस्टी चुकीचं समर्थन करतात(गिल्ट ट्रिप ) करतात आणि चोर निसटतो अशी परेस्थिती होते.
काश्मिरात दोग ग्रूप ठळकपणे आहेत, एक घाबरून दहशतवादास मदत करणारे? एक धर्मपिपासूपणा फोफाडणारे. मग हे क्प्ण सुधारणार? आणि तिसरं कारण, बाजूच्या देशाचा शिरकाव . घुसखोरी येन केन प्रकारे.

मोदीजींच्या एका आदेशाने पाकिस्तानात “भूकंप!"
पाकिस्तानचे सर्व सोशल मीडिया अकाउंट्स भारतात ताबडतोब बंद करण्यात आले. ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामवरून पाकिस्तानची उपस्थिती गायब झाली. यामुळे पाकिस्तानात अचानक गोंधळ उडाला आहे.
इस्लामाबादमध्ये लोक रस्त्यावर उतरले आहेत नि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु आहे.
दुकानदारांकडे रेशन संपल्यामुळे हजारो लोक भुकेल्या अवस्थेत लांबच लांब रांगेत उभे आहेत.
पेट्रोल पंपांवरही हाहाकार आहे — पेट्रोल नाही, लाईन मात्र किलोमीटरभर!
पाकिस्तानी सैनिकांचे हाल इतके वाईट झाले की, सैनिकांना दररोजचं जेवणही मिळेनासं झालंय.
काही ठिकाणी सैनिकांना स्वतःच स्वयंपाक करून अन्न शिजवावं लागतंय.
कराची लाहोरच्या रस्त्यांवर चहा आणि बिस्किटांच्याही "ब्लॅकमध्ये" विक्री सुरू आहे.
पाकिस्तानातला मीडिया स्वतःचे वृत्तपत्र हाताने लिहून लोकांमध्ये वाटतोय.
पाकिस्तानात लोकं आता मोबाईलऐवजी कबूतरांवर मेसेज पाठवायला सुरुवात केलीये!
हे सगळे पाहून काळ मोदी, शहा, नी ज्यांच्या कडे खूद्द अमेरिकेचे लष्करी तज्ञ क्लास लावून संरक्षणचे धडे घेताहेत ते अत्यंत हुशार चाणाक्ष अजित डोभाल एकेमेकाना टाळ्या देत गालातल्या गालात खुदूखुदू हसताहेत.

?

पहिल्या पन्नास एक प्रतिसादांनंतर हा धागा वाचणं थांबवलं होतं. अर्थात यथावकाश माझे मुद्दे मांडायचेच होते. कदाचित आता मी लिहितोय ती बातमी आधी इथे आलीही असेल.

काश्मीरमध्ये झालेल्या दहशत वादी हल्ल्याला सामान्य काश्मिरीही जबाबदार . त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा असा सूर असलेले प्रतिसाद पाहिले.
मग तोच न्याय यांना का लागत नाही?
In Supreme Court, NIA links heroin haul at Adani’s Mundra port to Lashkar-e-Taiba funding, Pahalgam terror attack

<अन्नावरून रस्त्यावर मुडदे पाडणारा भिकारी देश असल्या हत्याकांडांना फायनान्स करत आहे >

तिथे जाऊन आलेल्या पर्यटक आणि स्थानिकांच्या मते बैसरन व्हॅली पर्यटकांसाठी कधी बंद झालीच नव्हती. पण सरकार म्हणतं की ती इतक्यात खुली होणं अपेक्षित नव्हतं. सुरक्षा यंत्रणेला कळलंच नाही हो. तसंच ड्रग्ज्च्या धंद्यातून टेरर फंडिंग होतं आणि अदाणीच्या पोर्टवरून सगळ्यात जास्त ड्रग्ज येतात , त्याच्या बातम्या होतात. पण हे सुरक्षा यंत्रणेला माहीतच नव्हतं. असंच ना?

मायबोलीवर काश्मीरबद्दल इतका अभ्यास असलेले लोक आहेत , हे पाहून बरं वाटलं. शिवाय इतक्या कॉम्प्लिकेटेड समस्येबद्दल इतक्या आत्मविश्वासाने बोलतात यासाठी त्यांच्याबद्दल आदर वाटतो.
माझा अजिबातच अभ्यास नाही.
या दोन गोष्टींबद्दल इथले अभ्यासू काय म्हणतात?
We have been doing this dirty work for United States for about three decades you know and the West including Britain - Pak defence minister Khawaja Asif

हिलरी क्लिंटन यांनी हे कधीचंच सांगितलं होतं.
काश्मिरात इस्लामी दहशतवाद १९८९ च्या सुमारास सुरू झाला. त्याच्या दशकभर आधी अफघाणिस्तानातून रशियाला बाहेर काढायला त्यांनी आय एस आय, पाकिस्तानी लष्कर यांची नावं घेतली आहेत. याच रिसोर्सेसचा आणि स्ट्रॅटेजीचा उपयोग पाकिस्तानने भारताविरुद्ध केला का?

Pages