काश्मीरमधील कालचा दहशतवादी हल्ला – एक सुन्न करणारा अनुभव
कालचा दिवस (२२ एप्रिल २०२५) देशाच्या हृदयाला हादरवून गेला. मी स्वतः जेव्हा ही बातमी वाचली, तेव्हा काही क्षणोंसाठी सुन्नच झालो. जम्मू-काश्मीरच्या निसर्गरम्य पहलगाममध्ये, जिथे लोक शांतता शोधायला जातात, तिथे अचानक झालेला गोळीबार, आणि त्यात २६ निरपराध पर्यटकांचा मृत्यू – हा प्रकार केवळ क्रूर नाही, तर मानवतेच्या मुळांवर घाव घालणारा आहे.
एकेकाळी "धरती का स्वर्ग" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये पुन्हा एकदा अशांततेचे सावट पसरले आहे. कालचा हल्ला काही क्षणांचा नसून, त्या ठिकाणचं शांत वातावरण एकदम रक्तरंजित केलं. बायसरन व्हॅलीमधून घोडेस्वारी करत असलेल्या पर्यटकांवर अचानक अज्ञात दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. अनेकजण त्या क्षणी काही समजायच्या आतच जखमी झाले, तर काहींनी जागीच प्राण गमावले.
या घटनेत भारतातील काही पर्यटकांसोबतच दोन विदेशी नागरिकांचाही दुर्दैवी अंत झाला. हा हल्ला केवळ पर्यटकांवर नव्हता, तो भारताच्या शांततावादी वृत्तीवर होता. "काश्मीर रेसिस्टन्स" नावाच्या एका दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारल्याचे समजते. त्यांच्या मते, हा हल्ला ‘बाहेरून होणाऱ्या वसाहतीं’ विरोधात होता. पण खरं सांगायचं तर, हे केवळ बिनदिक्कत मारणं होतं – निर्दोष, निःशस्त्र, निष्पाप लोकांना मारणं.
पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी यावर कठोर भूमिका घेतली आहे. केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाली आहे आणि शोधमोहीम सुरू झाली आहे. पण इतक्यावरच थांबून चालणार नाही. देशभरातून, सोशल मीडियावरून, कँडल मार्चसह, सर्वत्र एकच मागणी आहे – "दोषींना कठोर शिक्षा व्हावी."
या घटनेनं मला वैयक्तिक पातळीवर खूप विचार करायला लावलं आहे. आपण कुठे चाललो आहोत? आपण ज्याठिकाणी मनःशांती शोधतो, तिथेच अशा घटना घडत असतील, तर आपण खरंच सुरक्षित आहोत का?
आता वेळ आली आहे की, आपल्याला केवळ निषेध नोंदवून थांबायचं नाही, तर सुरक्षेबाबत अधिक जागरूक व्हावं लागेल. शांती ही कमकुवतपणाचं लक्षण नाही, ती मजबूत इच्छाशक्तीची आणि दृढतेची निशाणी असली पाहिजे.
माझ्या या ब्लॉगच्या शेवटी, मी प्रार्थना करतो –
ज्यांनी आपलं आयुष्य गमावलं त्यांना श्रद्धांजली, आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची ताकद मिळो.
तुमच्या भावना, प्रतिक्रिया, किंवा यासंदर्भातील अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा.
– एक संवेदनशील भारतीय
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=Lf4q8Xge-uI
एकुनच खुप चीड, राग आणि दु:ख वाटतं. मृत्युंचा आकडा तरी खरा नाही वाटत, ज्यास्तच असावा.
<< काश्भिरात हिंदुंची मोठ्या
<< काश्भिरात हिंदुंची मोठ्या प्रमाणावर कत्तल ही गोष्ट २०१४ पुर्वी आम होती. आता अश्या गोष्टी परत सुरु झाल्या आहेत. >>
------- हिंदू लोकांसोबत मुस्लिम लोकांच्यापण मोठ्या प्रमाणावर हत्या झालेल्या आहेत असे १९८८ पासून २००३ या पंधरा वर्षाचा डेटा सांगतो.
काश्मिर मधे हिंसाचाराचा सर्वात मोठा फटका हा मुस्लिम समुदायलाच बसत आहे.
https://www.satp.org/satporgtp/countries/india/states/jandk/data_sheets/...

येथे दिलेले २००३ चे आकडे ( सामान्य नागरिकांच्या हत्या = ८०७) भारत सरकारच्या गृहखात्याने दिलेल्या आकडेवारीच्या ( ७९५ ) जवळ आहेत. नागरिकांच्या अशा प्रकारे हत्या होणे वाईटच आहे आणि म्हणून चौकशी होणे गरजेचे आहे.
कुणा सोम्या गोम्या संघटनेने म्हटले " मी केले " यावर विश्वास ठेवणे घातक आहे. भारताच्या गृहखात्याचा सखोल चौकशी अहवाल सर्वात महत्वाचा आहे. फार मोठे काही शिजत आहे आणि नजिकच्या काळांत कळेलच.
<< काही झाले तरी पर्यटकांना
<< काही झाले तरी पर्यटकांना कोणी त्रास्देणार नाही हा विश्वास होता. त्यालाच काल तडा गेला. तो विश्वास परत मिळवायला काश्मिरला खुप मेहनत करावी लागणार. >>
----- काश्मिर भारताचा अविभाज्य भाग आहे असे आपण मानत असू तर मेहनत सबंध भारत देशाने घ्यायला हवी.
मेहनत सबंध भारत देशाने
मेहनत सबंध भारत देशाने घ्यायला>>>
लोक जातच आहेत तिकडे. यंदा महापुर आलेला.
काश्मिरी लोक उर्वरित भारतात राहतात, लग्ने करतात, जागा घेतात. आमच्या काश्मिरी ड्रायवरला महाराष्ट्राची माहिती होती, अगदी अकोल्यापर्यंत जाऊन आलेला. त्याची सख्खी काकी कोल्हापुरची आणि मावशी व मामा चेंबुरला/वाशीला राहतात. हे त्याच्या आईने सांगितले.
हाऊसबोटीतला एक वेटर गोव्यात ६ वर्षे होता, इथेच ग्रज्युएशन केले. पैसे कमी मिळतात म्हणुन परत गेला. दुसरा चंदिगढ मध्ये ४०,००० ची नोकरी करत होता पण त्यातले हातात १० च राहतात. मग शिकार्यावर काम करुन १० कमवलेले काय वाईट, घराजवळ राहता तर येते म्हणुन परत गेला.
मला आठवतेय, १९९० मध्ये कश्मिर खोर्यात तिथल्या लोकांच्या साथीने जे काही झाले त्यानंतर काही वर्षात केसरी ट्रवेल पहिली कंपनी होती तिथे टुरिस्ट नेणारी. (आजही केसरीचा डेस्क व जाहिरात श्रीनगर विमानतळावर आहे.)
त्यानंतर उर्वरीत भारतातुन लोक जाताहेत. तिथली गरिबी पाहुन घसघशीत टिपा देताहेत. आणि तुमचा इन्डिया/डेल्ही हेही ऐकुन्घेताहेत. या भेटीत हा सुर जरा कमी लागला. सुधारताहेत. बर्याच संस्था त्यांना प्रवाहात सामिल करुन घ्यायचे प्रयत्न करताहेत.
ते इकडे येऊन राहण्यावर बंधन कधीच नव्हते. उर्वरित भारत तिकडे जाऊन राहु शकणार नाही हे जे बंधन घातले गेले होते त्यामुळे तिथे कुठलीही कायमस्वरुपी इन्डस्ट्री विकसित होऊ शकली नाही. त्याचे परिणाम आता ते भोगताहेत. त्यांना मुद्दाम दुर ठेवले गेले. आता मुळ प्रवाहात आणायची कायद्याने व्यवस्था केली गेली. त्यासाठी लोकांनी तिथे जायला हवे. लोक तिथे जातात त्यांना मारायला लागले तर कोण जाईल?
लोकल लोकांच्या गोष्टींवर
लोकल लोकांच्या गोष्टींवर पुर्ण विश्वास ठेवणे कठिण आहे.
एके काळी रीपोर्टर असलेल्या परीचिताकडून एकले की, लोकल गरीब स्थानिक तरुण नशाबाजी करून गेला तरी वेगळे पिकचर दाखवण्यात येते. गेलेल्या तरुणाला शहिद सांगायला भाग पडतात, तश्या मुलाख्ती देतात. त्यामुळे इतर बरेच रिकामटेकडे भडकून अश्या कुठल्याही कामाला त्यार होतात… त्यामुळे अशी घाण पसरतच आहे…
काश्मिर मधे हिंसाचाराचा
काश्मिर मधे हिंसाचाराचा सर्वात मोठा फटका हा मुस्लिम समुदायलाच बसत आहे
ह्यात काहीही विशेष नाही. आपला धार्मिक अजेंडा रेटाण्या साठी दहशतवाद्याना प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष मदत करणार तर नुकसान होणारच.
पाकिस्तानची पण हीच लाईन आहे कि आमचेच लोक जास्त मेलेत. आम्हीच खरे व्हिक्टिम. कालचाच हल्ला बघा, त्यांना हिंदू पुरुषांनाचं मारायचं होत पण pony वाले मध्ये आले आणि मेले. शुक्रवार नंतर मिलिटरी ला दगड मारताना बसला आपल्याच भावाच्या डोक्यात वाढला आकडा. चकमक चालू तर जमा घोषणा द्यायला मग मारणारच. लपयला जागा द्या मग मिलिटरी च्या गोळीबारत त्यांच्या बरोबर हा पण जाणार. मग गळे काढायला मोकळे कि आम्हीच खरे विक्टिम.
पाकीस्तान तर शत्रूच आहे. पण
पाकीस्तान तर शत्रूच आहे. पण त्याहून घातक आहेत आपल्यातले जयचंद - त्यांना ओळखा. यांचेच तेजस्वी वंशज मग पुढे जाऊन ' हिंदूना आपसात एकी करता येत नाही त्यामुळे हार मानावी लागते' असे सांगत सुटतात. पण जेव्हा एकी करायची वेळ येते तेव्हा हेच लोक शेण खातात. व्हिक्टिम ब्लेमिंग, व्हिक्टिमनाच सामोपचारानं घेण्याचे सल्ले तर नेहमीचेच असतात. दांभिक!
तर असल्या भुरट्या लोकांकडे लक्ष न देता एकजुटीनं रहा. देशभक्त मुसलमानांनीही आपल्या समाजातील चुकीच्या प्रवृत्तींवर प्रहार केले पाहिजेत, त्यांच्याबद्दल स्पष्ट बोललं पाहिजे. किती वर्षं सत्याकडे पाठ फिरवणार? नाहीतर काळोख्या कोपर्यात सुई पडली आहे पण दिव्याखाली प्रकाश आहे म्हणून फक्त तिथेच शोधायची असा मूर्खपणा होईल.
देशभक्त हिंदू नीही आपल्या
देशभक्त हिंदू नीही आपल्या समाजातील चुकीच्या प्रवृत्तींवर प्रहार केले पाहिजेत, त्यांच्याबद्दल स्पष्ट बोललं पाहिजे. किती वर्षं सत्याकडे पाठ फिरवणार?
आज सकाळीच एका व्यावसायिक
आज सकाळीच एका व्यावसायिक ग्रुप वर चर्चा चालली होती. त्यांच्याकडून वस्तु घेणं बंद करा. मी विचारल तुमच्यापैकी किती जणांनी आपल्या पोरांना पंक्चर काढण्याचा , सरबत /फळे विकण्याचा धंदा काढून दिला/? मुंबईतल्या मुसलमान फळविक्याकडून काही विकत घेतलं नाही तर पाकिस्तानी अतिरेक्यांची मदत कशी बंद होईल.? मग मला पाकिस्तानात जाण्याचा प्रेमळ सल्ला दिला गेला
@उदय >>>
@उदय >>>
काश्मिर हा मुस्लिम बहुल प्रदेश आहे (साधारण 97 % मुस्लिम), तिथून उरल्या सुरल्या काश्मिरी पंडितांना ९० च्या दशकात हाकलवून लावले होते. ९०च्या दशकात लोकल काश्मिरींनी दहशतवादाचा विडा उचलला होता. मुस्लिम अतिरेकी पोलिसांना मदत केल्याच्या आरोपांवरून निर्दोष काश्मिरींना मारत होते. मग मुस्लिम मृतांची संख्या जास्त आहे यात नवल काय?
मुस्लिम आणि इतर धर्मीय संख्येने समान असते, मुस्लिम समुदायाचा अतिरेकी हल्ल्यांत सहभाग नसता आणि मुस्लिमांच्या हत्येचे प्रमाण जास्त असते तर काश्मीरमध्ये मुस्लिमांवर अन्याय झालाय असे म्हणता आले असते.
दुसरे म्हणजे तिथे मुस्लिमांना ते मुस्लिम आहेत म्हणून कुणी मारल्याचे ऐकिवात नाही परंतु हिंदू किंवा शीख आहेत म्हणून लोकांच्या हत्या झाल्या आहेत. त्या एकाच तागडीत कश्या तोलता येतील?
सबंध भारत काश्मिरी लोकांवर विश्वास ठेवून इतर चांगली ठिकाणे नाकारून काश्मीरमध्ये फिरायला जातो.
कुठल्याही प्रदर्शनात काश्मिरी शाली, गालिचे कुणी बनवलेत याचा विचार न करता घेतो. काश्मिरी भरतकाम केलेले ड्रेस, साड्या हातोहात संपतात. काश्मीरमधली सफरचंद, अक्रोड, केशर ही उत्पादने भारतातील कुठल्याही शहरात प्रिमिअम किंमत घेऊन खपतात.
भारताचे कुठलेही सरकार रिगार्डलेस पक्ष काश्मीरमध्ये इकॉनॉमी सुधारण्यासाठी मोठी पॅकेजेस देते.
काश्मीरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचे जेवढे काम सुरु आहे याबद्दल तर लोकल काश्मिरी पण समाधान व्यक्त करतात.
काश्मिरी लोकांच्या राजकीय मतांना रिप्रेझेंटेशन मिळावे म्हणून नुकत्याच निवडणूक झाल्या. त्यानंतर जे सरकार बनले त्यावर फार कुणी आक्षेप घेतल्याचे दिसत नाही. अगदी दहशतवादाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या माणसाला काश्मिरींनी निवडून दिले आणि थोडा फार कागदी निषेध व्यक्त करण्यापलीकडे इतर काहीही झाले नाही.
काश्मिरी पंडितांची दखल घेतली नाही परंतु काश्मिरी मुसलमानांच्या मानवाधिकार रिलेटेड इश्यूजवर न्यायपालिकाही तत्पर असते.
उर्वरित भारताने अजून काय करणे अपेक्षित आहे?
आणि सर्व अपेक्षा फक्त उर्वरित भारताकडून ठेवायच्या की काश्मिरी लोक संबंध सुधारण्यासाठी स्वतः काही पावले उचलणार आहेत?
काश्मिरी लोक संबंध
काश्मिरी लोक संबंध सुधारण्यासाठी स्वतः काही पावले उचलणार आहेत? >> नक्की काय पावले उचलणे अपेक्षित आहे ?
किमान दहशतवाद्यांना कुठलीही
किमान दहशतवाद्यांना कुठलीही लॉजिस्टिकल मदत न पुरवणे.
काश्मिरी लोकांनी
काश्मिरी लोकांनी पाकिस्तानातून येणार्या लोकांना आश्रय देणे एकतर बंद करायला हवय.. गावागावांमधे अशी घुसखोरी झाली तर ती ताबडतोब पुढे योग्य लोकांना कळवायला हवी.
पाकीस्तान तर शत्रूच आहे >>>>
पाकीस्तान तर शत्रूच आहे >>>>>
मामींच हे वाक्य वाचल्यावर अचानक लक्षात आले, की मी काही महिन्यांपासून पाकिस्तानी सिरीयलच्या चॅनेल्सला subsribe केलं होतं. ते सगळे unfollow करून टाकले. खरंतर पाकिस्तानी सिरिअल्स खूप आवडायला लागल्या होत्या पण आज वाटलं न जाणो यातून मिळणारा पैसा दहशतवादाला वापरला जात असेल तर. नकोच ते. सगळे चॅनेल आणि विडिओला unsubscribe करून टाकले.
आपल्या आजूबाजूला अवैध दारूची
आपल्या आजूबाजूला अवैध दारूची विक्री, जुगार अड्डे, अतिक्रमणे , वेश्याव्यवसाय चालू असतात, त्याचा आपल्याला त्रास होत असतो. हे सर्व त्याच भागातील पोलिस चौकीत जाऊन तक्रार कधी करून बघा आणि काय अनुभव येतो ते सांगा.
इथे शेवटी तेच चालू.. विषय
इथे शेवटी तेच चालू.. विषय काय आणि प्रतिसाद काय…
हे वाचा,https://www.opindia
हे वाचा,
https://www.opindia.com/2025/04/terror-has-no-religion-list-of-incidents...
काहीजणांनी कातडी ओढलेली असतात
काहीजणांनी कातडी ओढलेली असतात डोळ्यांवर..
किमान दहशतवाद्यांना कुठलीही
किमान दहशतवाद्यांना कुठलीही लॉजिस्टिकल मदत न पुरवणे. >> हे करत नस्तील हे कशावरून? आग्यानि म्हटलंय ते माझ्याही मनात आलेलं .. आपण किती अवैध बांधकामे , खराब रास्ते ह्याची तक्रार करतो ? रस्त्यात अपघात झाला किंवा कोणावर हल्ला झाला की तत्परतेने धावून जातो ? इथे मुसलमानांच्या नावाने खडे फोडणारे, जर जन्माने मुस्लिम असते आणि कर्माने / आचारणाने/वर्तणूकीने मात्र आता आहेत तसेच असते आणि त्यांच्याकडे अविश्वासाने पाहिलं गेलं असंत तर कसं वाटलं असतं ?
मला ठाऊक आहे की मला त्यांच्याबद्दल सहानुभूति बाळगणारा म्हणून तिरस्काराने पाहिलं जाईलच , पण सरसकट सर्वांना त्याच तराजूत तोलून जी काही थोडी फार आशा आहे ते सुद्धा दूर जाते. 15 कोटी मुसलमानांची आर्थिक कोंडी करणे म्हणजे आपल्याच अर्थ आणि सामाजिक व्यवस्थेला नख लावणं हे कसं ह्या लोकांच्या लक्षात येत नाही ?
इंडियन एक्सप्रेस च्या
इंडियन एक्सप्रेस च्या बातमीनुसार ३ दहशतवाद्यापैकी दोन पाकिस्तानी आहेत तर तिसरा भारतीय आहे.
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/DIzFNttSZFW/
मोदीजी पंतप्रधान असते तर असे कधीच झाले नसते.
हे करत नस्तील हे कशावरून? >>>
हे करत नस्तील हे कशावरून? >>>>
ते करत नसतील असे मी म्हटले नाही. पण या आणि ज्या कुठल्याही वेळी भारतीय नागरिकांचे प्राण गेले अश्या हल्ल्याच्या वेळी ही मदत झालेली आहे हे तर नक्की. एखाद्या वेळीसुद्धा अतिरेक्यांना अशी मदत करणे हे सरळ सरळ काहींच्या जीवावर बेतणार असेल तर त्याला माफी कशी मिळेल?
मी सर्वांना एका तराजूत तोलत नाही आणि (भारतियांवर) आर्थिक बहिष्काराचे समर्थनही करत नाही. पण बाहेरून आलेल्या पर्यटकांनी उडदामाजी काळे गोरे कसे निवडायचे? स्वतःचा जीव धोक्यात घालून कुणी इतरांचे आयुष्य सुकर करायला जाणार नाही हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.
त्यावर आणि आपल्या समाजातल्या काहींच्या कृत्यांमुळे आपल्या समाजाची वारंवार बदनामी होत असेल त्याबद्दल काही मंथन होते आहे का? काश्मीरी हिंदूंचे पलायन आणि परवाचे सरळ सरळ धर्म विचारून केलेले हत्याकांड समोर असताना दुसऱ्या बाजूने दर वेळी आम्हांला समजून घ्यावे, आमच्यावर विश्वास ठेवावा म्हणून चालणार नाही. समाज म्हणून विश्वास कमवावा लागेल. त्यासाठी 'आऊट ऑफ द वे' जाऊन प्रयत्न करावे लागतील.
जर जन्माने मुस्लिम असते आणि
जर जन्माने मुस्लिम असते आणि कर्माने / आचारणाने/वर्तणूकीने मात्र आता आहेत तसेच असते....
>>>>>>>>>>>
आपण मुस्लिम घरात जन्म घेतला असता आणि त्याच समाजात लहानाचे मोठे झालो असतो तर आपली जडणघडण वेगळी असती, आपली विचारप्रक्रिया वेगळी असती. आज आपण जसे आहोत तसे बिलकुल नसतो.
>>>>>>आपली विचारप्रक्रिया
>>>>>>आपली विचारप्रक्रिया वेगळी असती. आज आपण जसे आहोत तसे बिलकुल नसतो.
त्यांना म्हणजे भ्रमर यांना म्हणायचे आहे की जन्माने मुस्लिम आनि कर्माने आपल्यासारखे म्हणजे देशाविषयक आस्था, आदर असणारे आपण असतो तर....!
ऋन्मेष तुम्हास उद्देश्युन नाही - जन्म घेणे आपल्या हातात नसते त्यामुळे आपण हिंदू आहोत यात आपला सहभाग शून्य.
ऋन्मेष तुम्हास उद्देश्युन
ऋन्मेष तुम्हास उद्देश्युन नाही - जन्म घेणे आपल्या हातात नसते त्यामुळे आपण हिंदू आहोत यात आपला सहभाग शून्य
>>>>>
हो, हे मला माहीत आहे. त्यामुळे मी स्वतःला कधीच हिंदू असल्याचा टॅग लावत नाही. मी धर्म मानत नाही.
मी नास्तिक आहे. मी देव सुद्धा मानत नाही.
माझ्या घरचे कट्टर आस्तिक असून सुद्धा माझे विचार आज असे आहेत.
पण हेच जर मी कट्टर मुस्लिम घरात जन्म घेतला असता तर मला तरी खात्री नाही की माझे आज जसे विचार आहेत तसेच असते.
शक्यता आहे की मी सुद्धा धर्माबाबत कट्टर असतो.
जसे कुठे जन्म घ्यावा हे आपल्या हातात नसते, तसेच आपण जे आज विचार करतो ते देखील आपल्याला जन्माने मिळालेले नसतात. तुम्ही कुठल्या घरात, समाजात जन्म घेतात त्यानुसार तुमचे विचार घडत जातात.
एखाद्या धर्मांध कुटुंबात एका मुलाने जन्म घेतला आणि तो सुद्धा पुढे जाऊन धर्मांध झाला तर मला कल्पना आहे की त्या कुटुंबात जन्म घेणे त्याच्या हातात नव्हते. पण आता त्याने तो जन्म घेतला आहे आणि तो तसा झाला आहे तर त्यापासून स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला सुरक्षित ठेवणे हे माझे कर्तव्य माझी जबाबदारी आहे. मला त्याच्या जाती धर्मात आणि भूतकाळात इंटरेस्ट नाही. माझ्या सुरक्षिततेत आहे
उलट मी माझ्या मागच्या एका पोस्टमध्ये लिहिले आहे की अमुक तमुक धर्माच्या व्यवसायांवर बंदी टाका वगैरे आवाहनाला फसून धार्मिक तेढ आणि कट्टरता वाढवू नका. ते याचसाठी.
>>पण सरसकट सर्वांना त्याच
>>पण सरसकट सर्वांना त्याच तराजूत तोलून जी काही थोडी फार आशा आहे ते सुद्धा दूर जाते. <<
अग्रीड.
पण जे कट्टर मुसलमान आहेत - दिवसांतुन ५ वेळा नमाज, मशिद/जमातखान्यात आणि मुलांना मदरसांत आवर्जुन पाठवणारे, त्याचं काय? ते तर कायम फेंसवर असतात. इथे सुद्दा माझ्या पाहण्यात दोन्हि प्रकारचे मुसलमान आहेत. एक केवळ नांवाला मुसलमान, तर दुसरे उच्चशिक्षित असुन देखील रिग्रेसिव मतांचे. हि अशी माणसं नेहेमीच इन्सिक्योर असतात, कदाचित सततच्या ब्रेनवॉशिंगमुळे असावं. वरदेखलं भाईचारा पण त्यांच्या कौमशी टाइटली इंटिग्रेटेड. इस्लाम खतरेमेची बांग आली कि जिहाद करायची तयारी. अशा लोकांमुळेच इस्लामोफोबिया बळावतो.. जोवर या लोकांचं रिवर्स ब्रेन्वॉशिंग होउन ते मूळ प्रवाहात येत नाहित तोवर अशा घटना घडत रहाणार...
>>पण सरसकट सर्वांना त्याच
डपो
जग बदलले आहे. मी धर्म मानत
जग बदलले आहे. मी धर्म मानत नाही म्हणुन दुसरा धर्म मानणारा माझा गळा कापणार नाही असे नाहीय.
ह्या बदलत्या जगात कसे वागावे हे मला समजत नाहीय. जग वेगाने बार्बरीक होतेय आणि माझ्यावर सिविलाईज्ड राहायचे संस्कार झालेत. मला पुढे काय हे खरेच समजत नाहीय
मी धर्म मानत नाही म्हणुन
मी धर्म मानत नाही म्हणुन दुसरा धर्म मानणारा माझा गळा कापणार नाही असे नाहीय.
>>>
Exactly
आणि माझ्यावर सिविलाईज्ड राहायचे संस्कार झालेत.
>>>
आपल्याकडे महाभारत प्रत्येकाने वाचले आहे आणि महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरात शिकवला गेला आहेच. हे आपल्याला योग्य निर्णय घ्यायला मदत करतीलच असे वाटते.
आग्या आयडी ला ऊत्तर : वरच्या
आग्या आयडी ला ऊत्तर : वरच्या सगळ्याची आपण कायदेशीर मार्गाने तक्रार करून दाद मागू शकतो. लाचलुचपत अतिक्रमण यांवर कारवाई साठी स्थानिक स्वराज्य संस्था आणी नंतर न्यायालय आहेत.
पण हे जे वरचे हत्याकांड झाले त्याला तुम्ही कुठे तक्रार करणार आणी प्रतिवादी कुणाला करणार.
तुमच्या विभागात दर महिन्याला प्रभाग निहाय बैठका मनपा च्या वार्ड ऑफीस मधे होतात तिथे सामान्य नागरिक जाऊन आपल्या तक्रारी सांगु शकतो..
Pages