काश्मीरमधील कालचा दहशतवादी हल्ला – एक सुन्न करणारा अनुभव
कालचा दिवस (२२ एप्रिल २०२५) देशाच्या हृदयाला हादरवून गेला. मी स्वतः जेव्हा ही बातमी वाचली, तेव्हा काही क्षणोंसाठी सुन्नच झालो. जम्मू-काश्मीरच्या निसर्गरम्य पहलगाममध्ये, जिथे लोक शांतता शोधायला जातात, तिथे अचानक झालेला गोळीबार, आणि त्यात २६ निरपराध पर्यटकांचा मृत्यू – हा प्रकार केवळ क्रूर नाही, तर मानवतेच्या मुळांवर घाव घालणारा आहे.
एकेकाळी "धरती का स्वर्ग" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये पुन्हा एकदा अशांततेचे सावट पसरले आहे. कालचा हल्ला काही क्षणांचा नसून, त्या ठिकाणचं शांत वातावरण एकदम रक्तरंजित केलं. बायसरन व्हॅलीमधून घोडेस्वारी करत असलेल्या पर्यटकांवर अचानक अज्ञात दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. अनेकजण त्या क्षणी काही समजायच्या आतच जखमी झाले, तर काहींनी जागीच प्राण गमावले.
या घटनेत भारतातील काही पर्यटकांसोबतच दोन विदेशी नागरिकांचाही दुर्दैवी अंत झाला. हा हल्ला केवळ पर्यटकांवर नव्हता, तो भारताच्या शांततावादी वृत्तीवर होता. "काश्मीर रेसिस्टन्स" नावाच्या एका दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारल्याचे समजते. त्यांच्या मते, हा हल्ला ‘बाहेरून होणाऱ्या वसाहतीं’ विरोधात होता. पण खरं सांगायचं तर, हे केवळ बिनदिक्कत मारणं होतं – निर्दोष, निःशस्त्र, निष्पाप लोकांना मारणं.
पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी यावर कठोर भूमिका घेतली आहे. केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाली आहे आणि शोधमोहीम सुरू झाली आहे. पण इतक्यावरच थांबून चालणार नाही. देशभरातून, सोशल मीडियावरून, कँडल मार्चसह, सर्वत्र एकच मागणी आहे – "दोषींना कठोर शिक्षा व्हावी."
या घटनेनं मला वैयक्तिक पातळीवर खूप विचार करायला लावलं आहे. आपण कुठे चाललो आहोत? आपण ज्याठिकाणी मनःशांती शोधतो, तिथेच अशा घटना घडत असतील, तर आपण खरंच सुरक्षित आहोत का?
आता वेळ आली आहे की, आपल्याला केवळ निषेध नोंदवून थांबायचं नाही, तर सुरक्षेबाबत अधिक जागरूक व्हावं लागेल. शांती ही कमकुवतपणाचं लक्षण नाही, ती मजबूत इच्छाशक्तीची आणि दृढतेची निशाणी असली पाहिजे.
माझ्या या ब्लॉगच्या शेवटी, मी प्रार्थना करतो –
ज्यांनी आपलं आयुष्य गमावलं त्यांना श्रद्धांजली, आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची ताकद मिळो.
तुमच्या भावना, प्रतिक्रिया, किंवा यासंदर्भातील अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा.
– एक संवेदनशील भारतीय
विमान कंपन्यांची काय चूक आहे?
विमान कंपन्यांची काय चूक आहे? काश्मीरमध्ये सुरक्षिततेची गॅरंटी देणाऱ्यांनी उचलावा हा खर्च.
ही दोन दिवसांपूर्वीची न्युज
ही दोन दिवसांपूर्वीची न्युज आहे. सध्या सरकारने १४००० रु. ची कॅप लावली आहे.
पुलवामाच्या सैनिकांना तेव्हा
पुलवामाच्या सैनिकांना तेव्हा सरकारने विमानाने का आणले नाही? रस्त्यामार्गे का पाठवले?
जर का स्थानिकांची एकजुट असती
जर का स्थानिकांची एकजुट असती तर कशाला सिक्युरिटी हवी जिथे तिथे?
त्यामुळे जनरालाईज करु नये असा जरी विचार केला तरी सहभाग होताच ना स्थानिकांचा?
मानव पृथ्वीकर , अ'निरु'द्ध
मानव पृथ्वीकर , अ'निरु'द्ध धन्यवाद.
संजय भावे सर >> बॅलन्स्ड पोस्ट
सर्वपक्षिय बैठकीत सरकारद्वारे नक्की काय सांगीतले गेले ते सरकारच्या शब्दात कुठे वाचायला मिळते का ते बघावे लागेल, कारण काल-परवा संजय सिंह ह्यांच्या हवाल्याने आलेल्या बातमीत आणि आज वाचलेल्या बातमीत जे लिहिले आहे ते ह्या लोकांचे आपले आकलन आहे की हे सरकारचे शब्द जसेच्या तसे दिले आहेत हे देखिल तपासुन बघावे लागेल. >> व्हॅलिड पॉईंट. हे लक्षात नाही आले.
पुलवामाच्या सैनिकांना तेव्हा
पुलवामाच्या सैनिकांना तेव्हा सरकारने विमानाने का आणले नाही? रस्त्यामार्गे का पाठवले?
>>> हा प्रश्न मलाही पडला होता. एका डिफेन्स ॲनलिस्टच्या पॉडकास्टमध्ये त्याने उत्तर दिलं होतं की तुम्ही एखाद्या प्रदेशातील तुमची उपस्थिती हलवली की तिथे जो व्हॅक्युम निर्माण होतो तो मिटवायला सगळेच पुढे येतात. मग त्यात आपल्याला नको असलेले गटही येतात.
एखाद्या प्रदेशातील सैन्याची/सुरक्षा गटांची हालचाल हा असामाजिक तत्वांसाठी मोठा डिटरन्स असतो. म्हणून दंगलीच्या वेळी जमावबंदी केल्यावर जास्त प्रक्षुब्ध एरीयात फ्लॅग मार्च करवतात. किंवा एखाद्या खतरनाक गुंडाला बेड्या घालून गाडीतून न नेता मुद्दाम रस्त्यावरून चालवत नेतात.
तो प्रदेश कोणाच्या अधिपत्याखाली आहे हे सबकॉन्शसली ठसविण्याचा प्रयत्न असतो.
>>सर्वपक्षिय बैठकीत
>>सर्वपक्षिय बैठकीत सरकारद्वारे नक्की काय सांगीतले गेले ते सरकारच्या शब्दात कुठे वाचायला मिळते का ते बघावे लागेल<<
क्लासिफाइड इंफर्मेशन असल्यास ती बाहेर येणार नाहि. परंतु अतिरेक्यांना ठोकल्याच्या बातम्या ऐकायला मिळतील...
माझेमन हे माहीत नव्हते.
माझेमन हे माहीत नव्हते.
नवीन Submitted by माझेमन on
नवीन Submitted by माझेमन on 26 April, 2025 - 22:14 >>> +१
दंगलीच्या वेळी जमावबंदी
दंगलीच्या वेळी जमावबंदी केल्यावर जास्त प्रक्षुब्ध एरीयात फ्लॅग मार्च करवतात.
फ्लॅग मार्च आणि सैन्य कोणत्याही कारणाने हलवणे ह्यात फरक आहे. पुलवामाच्या वेळी हल्ल्याचा इशारा देण्यात आला होता,परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
या धाग्यावर काय म्हणायचा
या धाग्यावर काय म्हणायचा प्रयत्न केला जात आहे?
पहलगामला मुद्दाम व आपणहून आपले लोक मारले गेले आणि तसेच पुलवामालाही झाले होते, हे म्हणायचे आहे?
नक्की, थेट शब्दांत लिहा कृपया. सदस्य म्हणून विनंती आहे ही! मी काही कोणी येथील प्रशासक तर नव्हेच, साधा विचारवंतही नव्हे.
आज व्हॅक्युम निर्माण होऊन
आज व्हॅक्युम निर्माण होऊन अतिरेक्यांनी रस्त्याचा ताबा घेतल्यावर युद्धाच्या वेळी आधी रस्ता व परीसर क्लिअर करून मग मुव्हमेंट करणार की कसं?
तसंच रॅंडम धोक्याची सुचना मिळणे, त्याला सपोर्ट करू शकेल अशी माहिती मिळणे व विविध माहितीचे तुकडे जोडून परीस्थितीचा अंदाज बांधणे व त्यानुसार ॲक्शन घेणे आणि पुलवामा परीसरात संशयास्पद व्यक्ती आहेत, हल्ला होईल अशी ठोस इन्फर्मेशन मिळाल्यावर ॲक्शन घेणे यात फरक असावा.
पुलवामाबद्दल ठोस सुचना मिळून कार्यवाही केली नाही असा आरोप असेल तर त्याची नक्कीच न्यायालयीन चौकशी व्हावी/सरकार, सुरक्षा संघटना इ. मधील सर्व जबाबदार व्यक्तींना जबर शिक्षा व्हावी .
- पूर्वी असे तसा पाककडे आता
- पूर्वी असे तसा पाककडे आता येणारा पैशाचा ओघ नाही. आधी कोल्ड वॉर मधे अमिरिकेच्या बाजूला असल्याने, नंतर रशिया अफगाणिस्तानातून परत गेल्यावर मोकळे झालेले अफगाण मुझाहिदीन होते, २००१ नंतर तालिबानशी लढणार म्हणून अमेरिकेकडून मिळणारे फंडिंग होते - तो पैसा व ते अतिरेकी काश्मीरमधे वापरले जात. गेल्या काही वर्षात तो पैसा व अमेरिकेचा पाठिंबाही आटला आहे. आता तर ट्रम्पचा अजिबात सपोर्ट नाही. मग हे अतिरेकी व त्यांना मिळालेला पैसा आला कोठून - यावर अजून कोठे विश्लेषण वाचलेले नाही.
- काश्मीर मधे बहरलेले पर्यटन किंवा गेल्या काही वर्षांत काश्मीरमधले जनमत हळुहळू भारताकडे झुकणे वगैरे बद्दल कोणाला प्रॉब्लेम असू शकतो, त्यांचा यातून काय साध्य करण्याचा हेतू असू शकतो यावर विचार केला तर यातून भारताने काहीतरी प्रचंड आक्रमक पाऊल उचवावे, किंवा सर्वसामान्य लोकांनी जागोजागी स्थानिक मुस्लिमांविरूद्ध प्रतिक्रिया द्यावी - व त्यातून काश्मीर मधले स्थानिक पुन्हा भारताविरूद्ध जावेत - यातले काहीतरी असू शकते. नाहीतर हे अतिरेकी ग्रूप्स इतके मोठे तर नसावेत की तेथे काही वर्षे पूर्वीसारखी अस्थिरता निर्माण होईल. पर्यटन बंद पडले तर पुन्हा रेडिमेड स्थानिक सामील होतील हा ही आडाखा असू शकतो असे वरती कोणीतरी म्हंटलेले आहे, ते पटते.
- आत्ता भारताकडे प्रचंड सहानुभूती आहे, आंतरराष्ट्रीय जनमत अनुकूल आहे. पण भारताने पाणी तोडणे, सिव्हिल एरियात हल्ले करणे वगैरे काही केले तर हे पूर्ण फिरेल, इस्त्रायलविरूद्ध फिरले तसे. त्यामुळे भारत बहुधा धाडकन काहीतरी करणार नाही. उरी मधे केले तसे सर्जिकल स्ट्राइक करायचे, पाकच्या नेत्यांनाही असे काही झालेच नाही असे पोश्चरिंग करता येईल असा स्कोप द्यायचा पण यातून अतिरेक्यांचा पूर्ण बंदोबस्त करायचा - असेच काहीतरी होईल असा माझा अंदाज आहे.
- स्थानिकांनी अतिरेक्यांची माहिती पोलिसांना, सैन्याला देण्याबद्दल - जेथे थोडीफार शंका आली तरी फितूर म्हणून लोक मारले जात असतील तर कोण डेअरिंग करेल? जे लोक याला सपोर्ट करत नाहीत ते त्याच धर्माचे आहेत म्हणून हे त्यांनी जीव धोक्यात घालून करण्याचा आग्रह व ते जर करत नसतील तर ते ही यात सामील आहेत हे दोन्ही अन्यायकारक आहे आणि लाँग टर्म मधे त्या लोकांना आपल्यापासून दूर लोटणारे आहे. जगात जेथे दहशतवाद आहे तेथे असे कोणीही करत असल्याची फारशी उदाहरणे नाहीत. तरीही सैन्य व पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेच्या मार्फत स्थानिकांमधे पेरलेल्या लोकांकडून वेळोवेळी मिळणारी माहिती असतेच.
- बाकी सावध राहणे वगैरे सरकारने करायचे आहे. सामान्य नागरिकांनी सावध राहायचे म्हणजे नक्की काय करायचे हे सोमिविचारवंत क्लिअर करत नाहीत. आर्थिक बहिष्कार? कोणावर? पुण्याचे उदाहरण घेतले, तर पिढ्यानपिढ्या इथे राहणार्यांवर? का, तर तिकडे त्यांच्या धर्माच्या लोकांनी असे केले म्हणून व आम्हाला अशी शंका आहे की त्यांच्यातले त्यांना सपोर्ट करत आहेत म्हणून? भारतातील पोलिसांना, विविध गुप्तचर संघटनांना पत्ता नसलेली गोष्ट तुम्हाला ज्या व्हॉट्सअॅप अंकलने पाठवली आहे त्याला खात्रीशीर माहीत आहे? इतकी खात्रीशीर माहिती असताना व शहर, राज्य आणि केंद्र तिन्हीकडे "आपले" सरकार असताना हे वीर ही माहिती पोलिसांना द्यायला धजावत नाहीत आणि तिकडे त्यांनी जीवावर उदार होउन अशी माहिती द्यायची?
मग यावर काय हातावर हात धरून बसून राहायचे का असेही काही विचारतील. त्यांना उलट ठामपणे सांगावे - . स्वतः मिलिटरीत भरती होउन बॉर्डरवर जाणार नसाल, किंवा किमान यातील विक्टिम कुटुंबाना मदत करणार नसाल, तर सर्वसामान्य लोकांनी हातावर हात धरूनच बसा - निषेध करा, पण तितकेच. सरकार, सैन्य व पोलिसांना त्यांचे काम करू दे. निदान तुमच्या असल्या उपायांमुळे देशाचे होणारे आणखी नुकसान होणार नाही. नाहीतर आपल्याच लोकांवर आर्थिक बहिष्कार टाकून तुम्ही अतिरेक्यांना विरोध नाही, मदतच करताय.
आणि हो, उद्या भारताने लष्करी कारवाई करून अतिरेकी मारले, पाकव्याप्त काश्मीर परत मिळवले तर आपला फुल सपोर्ट आहे. पण लष्करी कारवायांचा एक ठोस आणि स्पष्ट गोल असतो. त्यातून होणार्या संभाव्य परिणामांना, आंतरराष्ट्रीय परिस्थितीला तोंड कसे द्यायचे याचे नियोजन असते. सत्तेवर कोणीही असो, भारत सरकारच्या यंत्रणेत हे सगळे केले जाते यावर माझा विश्वास आहे. आपला इतिहास तसा आहे. तेव्हा सरकारने सावध राहायला किंवा कारवाई करायला काही प्रॉब्लेम नाही. कोणी दोषी आहे, देशविरोधी आहे सिद्ध झाले तर त्यांना ठेचायलाही काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम आहे तो केवळ कोणत्यातरी रॅण्डम शंकेनुसार एखाद्या बिर्याणीवाल्याचा, सीट कव्हरवाल्याचा किंवा फळवाल्याचा धंदा बसवण्याला.
>>पहलगामला मुद्दाम व आपणहून
>>पहलगामला मुद्दाम व आपणहून आपले लोक मारले गेले आणि तसेच पुलवामालाही झाले होते, हे म्हणायचे आहे?<<
बहुतेक हो. आणि अशी विचारसरणी बाळगणार्यांची खरोखर कींव येते..
केवळ एका व्यक्ती किंवा पक्षाविषयी द्वेष असल्यामुळे आपण संपुर्ण यंत्रणेवर किती गंभीर आरोप करतोय याचा सारासार विचार करण्याची कुवत यांच्यात नाहि. आजतोवर यांनी किंवा विरोधी पक्षांनी हि कॉस्पिरसी थियरी प्रुव करण्याकरता काय प्रयत्न केले, त्यातुन शेवटि निष्कर्श काय निघाला याचं उत्तर देण्याचं धारिष्ट्य दाखवावं...
एवढंच नाही काही दिवसांनी
एवढंच नाही काही दिवसांनी आपलेच लोक म्हणायला चालू करतील की हा हल्ला आपणच केला. वाढत्या महागाई वरून लक्ष हटवण्यासाठी हे केल. असामाच्या AIUDFच्या आमदाराला ह्या साठी अटकही झाली आहे.
भारत जेव्हा केंव्हा पाकिस्तानच पाणी कमी करेल त्यावेळीही पाक च्या आगोदर भारतातून ह्याचा विरोध होईल.
हल्ला आपणच केला याच्या अनेक
हल्ला आपणच केला याच्या अनेक watsapp post फिरत आहेत, गुडघ्यात मेंदूल नारू झाल्याचे लक्षण आहे हे
झम्पी, तुम्ही मला विचारलेल्या
झम्पी, तुम्ही मला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले का तुम्हाला?
एका डिफेन्स ॲनलिस्टच्या
एका डिफेन्स ॲनलिस्टच्या पॉडकास्टमध्ये त्याने उत्तर दिलं होतं की तुम्ही एखाद्या प्रदेशातील तुमची उपस्थिती हलवली की तिथे जो व्हॅक्युम निर्माण होतो तो मिटवायला सगळेच पुढे येतात. मग त्यात आपल्याला नको असलेले गटही येतात. >>> एखादं युनिट शिफ्ट होण्याशी याचा काय संबंध समजलं नाही, माझे मन.
आमच्या जवळच्या नात्यात आर्मी आणि एअर फोर्सचे ऑफीसर्स आहेत. पण म्हणून मला सगळंच माहिती आहे असं नाही. फक्त यांचं शिफ्टिंग व्हायचं तेव्हां ते किती सीक्रेट ठेवलं जायचं, कॉन्हॉय असेल तर रात्रीच्या अंधारात निघणे, शॉर्ट नोटीसवर तयार होऊन कॉन्व्हॉय जॉईन करणे हे ऐकलेले आहे. एकदा चंदीगडवरून त्यांना तयार व्हायला फक्त सात मिनिटे दिली होती. त्यात स्नान, ब्रेक फास्ट आणि बाकीचं सगळंच करायचं होतं. ते ही रात्री २ वाजता सांगितलेलं. ज्यांचा नंबर लागत नाही त्यांना स्कीप करावं लागतं. ब्रेकफास्ट बॅगमधे भरून ठेवावा लागतो.
तात्पर्य : अशा युनिटच्या शिफ्टिंगचा आणि प्रेझेन्स दाखवून जरब बसवण्याचा संबंध असेल असं वाटत नाही. त्या डिफेन्स अॅनॅलिस्टचे म्हणणे नेमके काय ते बघायला पाहीजे.
ता.क. शंकराचार्यजींचा हा व्हिडीओ इतक्यातच पाहिला.
https://www.youtube.com/watch?v=bcr7izq-UdA
सगळे विचारवंत आवर्जुन
सगळे विचारवंत आवर्जुन सांगताहेत की काश्मिरींना भारतीय वाटावे म्हणुन प्रयत्न होणे आवश्यक आहे.
म्हणजे नेमके काय करायचे? गेल्या वर्षी २.३ करोड पर्यटक तिकडे गेले. तिकडे प्रत्येकाच्या हातावर भरपुर टिप टेकवावी लागते, आपल्याला जी योग्य वाटते ती त्यांना योग्य वाटली नाही तर ते भडकतात. तर सरासरी कमीत कमी १०० रु टिप धरली तर २.३ करोड x १०० इतका पैसा थेट लोकल लोकांना दिला गेला. बाकी ऑफिशियल पॅकेजेस व खरेदी वेगळी. उर्वरीत भारतियांबी तिकडे जाऊन इतका पैसा ओतला, वर तुम्हारा इन्डिया, तुम्हारा डेल्ही हे ऐकुन घेतले, वाद घातला नाही. इतके प्रेम व पैसा ओतुनही इकडचे विचारवण्त म्हणताहेत उर्वरीत भारताने प्रयत्न करायला हवेत. हिंदुंचे आयुष्य मुस्लिमाण्च्या दाढ्या कुरवाळण्यातच जाणार आहेत आणि ते करुनही डोक्यातली गोळी काही चुकत नाही ते नाहीच.
पहलगाम घटनेत स्थानिकही सहभागी होते हे चित्र दिसतेय. त्यांना माहित नव्हते याचा पर्यटनवर काय परिणाम होणार ते?? तीही काळजी हिंदुनीच करायची आणि जीव मुठीत धरुन तिथे जात राहायचे हे आवाहनही हे ग्रेट विचारवंत करताहेत.
मी तर म्हणेन जोवर दहशतवादाचा पुर्ण बिमोड होत नाही तोवर काश्मिरला कोणी जाऊ नये. असे झाले तरच स्थानिक दहा वेळा विचार करतील दहशताला थारा द्यायच्या वेळी. नाहीतर बकरे जात राहणार, पैसे ओतत राहणार आणि अधुन मधुन कटत राहणार.
कडक प्रतिसाद साधना
कडक प्रतिसाद साधना
पाकिस्तानचे पाणी आटणार, भारत
पाकिस्तानचे पाणी आटणार, भारत सरकार नालायकपणा करुन पाणी अडवणार म्हणुन भारतीय विचारवंतांच्या डोळ्यातले पाणी खळत नव्हते. शेवटी भारत सरकारला उपरती झाली आणि पाणी अडवायच्या ऐवजी होते नव्हते ते सगळे पाणी झेलममध्ये सोडुन दिले. तर आता विचारवंत मुद्दाम पुर आणवला म्हणुन कोकलताहेत.
on second thoughts, दिवसभराच्या उन्हाने बर्फ वितळुन दुपारनंतर पाण्याची पातळी वाढणे त्या भागात नेहमीचेच आहे. कदाचित झेलमची पाणीवाढ ह्या कारणाने झाली असु शकते. पण पाकुस्तानसकट सगळे भारताला शिव्या घालताहेत.
सहमत, गोव्याचे टॅक्सी वाले
सहमत, गोव्याचे टॅक्सी वाले लुटतेत म्हणून बॉयकॉट गोवा ट्रेंड चालू होता social मीडिया मध्ये. हिथे तर थेट जीवशी गाठ आहे. उपाशी मेले तर थोडे दिवस तर नीट राहतील.
पर्यटन थांबले म्हणून काहीही
पर्यटन थांबले म्हणून काहीही फरक पडत नाही. तेथील उद्योगांना स्वस्तात मनुष्यबळ उपलब्ध होते, रोजगार चालूच राहतो.
गोव्याबद्दल गेले सहा महिने
गोव्याबद्दल गेले सहा महिने छापुन येतेय. कित्येक इन्फ्लुएन्सर्सनी गोव्यापेक्षा थायलंड मलेशिया दुबईला जा म्हणुन आवाहने केली. बिचेस ओस पडताहेत म्हणुन बातम्या आल्या पण कोणालाही गोव्यातल्या ख्रिस्ती मायनॉरिटीची कणव आली नाही, त्यांचा धंदा बुडतोय म्हणुन कोणीही गळे काढले नाहीत.
लोकांना आपण पुरोगामी आहोत हे
लोकांना आपण पुरोगामी आहोत हे दाखवायची हौस आहे. अगदी हिम्दी मूवीत पण एखादा इस्लमिक राजाला चांगले दाखवतात.
आता, जे विडिओ फिरताहेत कोणी आसिफ वगैरे म्हणून तो तर लोकलच आहे.
गळा काढण्याची उबळ फार जालीम.
गळा काढण्याची उबळ फार जालीम. तिच्यापुढे कुणाचंच काही चालत नाही.
(No subject)
एखादं युनिट शिफ्ट होण्याशी
एखादं युनिट शिफ्ट होण्याशी याचा काय संबंध समजलं नाही, माझे मन.
>>>
एखादे युनिट नाही रानभुली. सर्व वाहतूक नेहमीच जम्मू ते श्रीनगर महामार्गावरून करणे हा पॉईंट म्हणते आहे मी.
अनलेस अमुक दिवशी/अमुक कॉन्वॉय/अमुक एरीयामध्ये सगळे फॅक्टर्स जुळवून हाय रिस्क वाटली तर वाहतूकीचे निर्णय बदलतील. आणि तुम्ही म्हणता तसं अत्यंत शॉर्ट नोटिसवर शिफ्टींग होत असेल आणि प्रत्येक रॅंडम माहितीच्या तुकड्यावर निर्णय बदलला तर गोंधळ माजेल जे दहशतवाद्यांच्या पथ्यावर पडेल.
अगेन पुलवामाबद्दल ठोस माहिती मिळूनही मुद्दाम वाहतुकीचा निर्णय घेतला हा अत्यंत गंभीर आरोप आहे. आणि योग्य ते पुरावे देऊन तो सिद्ध केला तर संबंधित सर्वांना, ते कुठल्याही पदावर असले तरी शिक्षा व्हावी हा भारतिय म्हणून माझाही आग्रह असेल.
फारेण्ड जनरली तुमचे प्रतिसाद
फारेण्ड जनरली तुमचे प्रतिसाद बॅलन्स्ड असतात. १-२ पॉईंटस् पटले नाहीत.
स्वतःच्या जीवाचा विचार न करता अतिरेक्यांची खबर सैन्याला न देणे समजू शकते. पहलगाम काही फार मोठे नाही. पण आपल्या नेहमीच्या गटात नवीन घोडेवाले किंवा इतर धंदेवाले आहेत हे समजत नाही? अश्या वेळी तुम्ही तुमचा धंदा पाहणार? बरं असे असताना तुमच्या घोड्यावरचा प्रवासी सांगत असेल की खूप दमलो आहे. वर नको जाऊया. हवं तर सगळे पैसे घे पण परत चल. असं असताना उपर तो जाना पडेगा म्हणणं कितपत योग्य आहे? मृत शुभम द्विवेदीच्या पत्नीचा हा थेट आरोप आहे. मग इतरांनी सगळे काश्मिरी यांना सामिल आहेत असा आरोप केला तर चूक कसं?
किंवा दुसऱ्या एका मुलीने सांगितलं आहे की तिचा घोडेवाला सतत तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम, कुराण वाचलंय का वगैरे प्रश्न विचारत होता. जर तुमचं पोट पर्यटकांवर अवलंबून आहे तर हे प्रश्न विचारण्याचं कारण काय?
ॲज अ सेन्सिबल देश, भारत प्रथम हल्ला चढवत नाही. किमान ४ युद्धं व अगणित अतिरेकी हल्ले भारतावर लादल्यावर भारताकडे रिटॅलिएट करण्यासाठी युद्ध, सर्जिकल स्ट्राईक किंवा करार मोडणे असे मोजके पर्याय आहेत. सिंधू जल करारामध्ये दोन देशांतील सौहार्द अपेक्षित आहे. फक्त माणुसकीच्या दृष्टीने पाणी पुरवठा तोडू नये ही अपेक्षा भारतावर अन्याय करणारी नाही का? कदाचित या कारणापायी पाकिस्तानची सामान्य जनता बंड करेल व त्यापायी पाकिस्तानी एस्टॅब्लिशमेंटला भविष्यात नीट वागावे लागेल असा कयास असेल तर भारताने आंतरराष्ट्रीय जनमताची पर्वा करावी का देशाचा स्वार्थ पहावा?
दुसऱ्या एका मुलीने सांगितलं
दुसऱ्या एका मुलीने सांगितलं आहे की तिचा घोडेवाला सतत तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम, कुराण वाचलंय का वगैरे प्रश्न विचारत होता. जर तुमचं पोट पर्यटकांवर अवलंबून आहे तर हे प्रश्न विचारण्याचं कारण काय? >>> खरंच हे विचित्र आहे. त्या मुलीने एक सेल्फी घेतला होता त्यात background ला तो माणूस फोटोत आला होता. संशयितांचे sketches जाहीर झाल्यावर तिने सांगितले की तोच माणूस त्यामध्ये आहे. तिने दाखवलेल्या फोटोवरून सोनमर्गवरून एका पोनीवाल्याला संशयित म्हणून ताब्यात घेतले गेलेय. खरंच सेम दिसत होता तो ताब्यात घेतलेला माणूस आणि त्या सेल्फीत दिसणारा चौकश्या करणारा माणूस आणि sketch मधला माणूस.
भरपूर धरपकड चालू आहे. संशयितांवर soft stand नकोच आणि नाहीच आहे.
आता NIA कडे गेला आहे हा तपास.
गेलेल्या सर्वांना न्याय मिळावा. दोषींवर, त्यांना मदत करणाऱ्या ecosystem वर जितकी कडक कारवाई होईल तितकी थोडी आहे. टिपून शोधून काढले पाहिजेत.
मात्र देशात हिंदू मुसलमान तेढ नको......मुहम्मद अली जीना कबरीतून हसत बसतील.
जे ह्या हल्ल्याला सपोर्ट करत आहेत, terrorists ची हालात से मजबूर म्हणून बाजू घेत आहेत किंवा आनंद व्यक्त करत आहेत त्यांना रोषाला सामोरे जावेच लागेल. . त्यात हिंदू मुसलमान दोन्ही आले. ह्या terrorists बद्दल कणव मनात येणे म्हणजे कमाल.
पण निरापराध.... भरडला जायला नको. तो ही झाल्याप्रकाराने shocked असू शकतो आपल्यासारखाच. आत्ता सगळ्यांनाच healing ची गरज आहे. सगळ्यांनी ISI च्या main goal (भारतात आपापसात अविश्वास निर्माण करणे, फूट पाडून भारताला कमकुवत करणे... इत्यादी) ला फेल करायची गरज आहे.... आणि आपण ते करूच.
Pages