काश्मीरमधील कालचा दहशतवादी हल्ला – एक सुन्न करणारा अनुभव

Submitted by बन्या on 22 April, 2025 - 23:12

काश्मीरमधील कालचा दहशतवादी हल्ला – एक सुन्न करणारा अनुभव

कालचा दिवस (२२ एप्रिल २०२५) देशाच्या हृदयाला हादरवून गेला. मी स्वतः जेव्हा ही बातमी वाचली, तेव्हा काही क्षणोंसाठी सुन्नच झालो. जम्मू-काश्मीरच्या निसर्गरम्य पहलगाममध्ये, जिथे लोक शांतता शोधायला जातात, तिथे अचानक झालेला गोळीबार, आणि त्यात २६ निरपराध पर्यटकांचा मृत्यू – हा प्रकार केवळ क्रूर नाही, तर मानवतेच्या मुळांवर घाव घालणारा आहे.

एकेकाळी "धरती का स्वर्ग" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये पुन्हा एकदा अशांततेचे सावट पसरले आहे. कालचा हल्ला काही क्षणांचा नसून, त्या ठिकाणचं शांत वातावरण एकदम रक्तरंजित केलं. बायसरन व्हॅलीमधून घोडेस्वारी करत असलेल्या पर्यटकांवर अचानक अज्ञात दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. अनेकजण त्या क्षणी काही समजायच्या आतच जखमी झाले, तर काहींनी जागीच प्राण गमावले.

या घटनेत भारतातील काही पर्यटकांसोबतच दोन विदेशी नागरिकांचाही दुर्दैवी अंत झाला. हा हल्ला केवळ पर्यटकांवर नव्हता, तो भारताच्या शांततावादी वृत्तीवर होता. "काश्मीर रेसिस्टन्स" नावाच्या एका दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारल्याचे समजते. त्यांच्या मते, हा हल्ला ‘बाहेरून होणाऱ्या वसाहतीं’ विरोधात होता. पण खरं सांगायचं तर, हे केवळ बिनदिक्कत मारणं होतं – निर्दोष, निःशस्त्र, निष्पाप लोकांना मारणं.

पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी यावर कठोर भूमिका घेतली आहे. केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाली आहे आणि शोधमोहीम सुरू झाली आहे. पण इतक्यावरच थांबून चालणार नाही. देशभरातून, सोशल मीडियावरून, कँडल मार्चसह, सर्वत्र एकच मागणी आहे – "दोषींना कठोर शिक्षा व्हावी."

या घटनेनं मला वैयक्तिक पातळीवर खूप विचार करायला लावलं आहे. आपण कुठे चाललो आहोत? आपण ज्याठिकाणी मनःशांती शोधतो, तिथेच अशा घटना घडत असतील, तर आपण खरंच सुरक्षित आहोत का?

आता वेळ आली आहे की, आपल्याला केवळ निषेध नोंदवून थांबायचं नाही, तर सुरक्षेबाबत अधिक जागरूक व्हावं लागेल. शांती ही कमकुवतपणाचं लक्षण नाही, ती मजबूत इच्छाशक्तीची आणि दृढतेची निशाणी असली पाहिजे.

माझ्या या ब्लॉगच्या शेवटी, मी प्रार्थना करतो –
ज्यांनी आपलं आयुष्य गमावलं त्यांना श्रद्धांजली, आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची ताकद मिळो.

तुमच्या भावना, प्रतिक्रिया, किंवा यासंदर्भातील अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा.

– एक संवेदनशील भारतीय

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काश्मीर UT च राहू द्यायला हवी. वेगळे जम्मू राज्य करावे. तसंच पश्चिम बंगालमधील काही सीमेवरचे दंगलग्रस्त जिल्हे मिळून UT करावी. उर्वरित प. बंगाल राज्य राहील. जिथे जिथे असे गोंधळ नेहमी चालतात ते ते भाग सेंट्रल गव्हर्न्मेंटच्या अधिपत्याखाली असलेले उत्तम.

सुरक्षा दलाला कसलीही आगामी माहीती पुरवण्याची तसदी घेतलेली नव्हती.>>> ह्या विधानावर हसावे की रडावे ?? तो देसी जेम्स बॉन्ड काय करतोय ?? 26/11 च्या वेळी त्यावेळचा गुजरात कहा मुमं इथे मुंबईत येऊन जे बोलला होता ते 16 आणे सच !!

हा वेद कुमार भाउ कोन ते माहित नाही , पण मेजर जनरल बक्षी म्हणातात ते ऐकल असेल ना ?
During COVID, this army for three years there was no recruitment. Our forces were cut down by one lakh 80000. Who did it? उमर अब्दुल्ला? ममता ? उद्धव ठाकरे ?

काश्मीर UT च राहू द्यायला हवी. वेगळे जम्मू राज्य करावे. तसंच पश्चिम बंगालमधील काही सीमेवरचे दंगलग्रस्त जिल्हे मिळून UT करावी. उर्वरित प. बंगाल राज्य राहील>> बीड जिल्हा देखिल टाकावा का त्यात ?

त्यामुळे २ दिवसापूर्वीच पर्यटक येऊ लागले हे सफेद झूठ आहे.
सरकारकडून फार मोठी चूक झाली असणार. ती झाकण्यासाठी आता बळीचे बकरे शोधत आहेत. सर्वपक्षीय बैठकीत जेव्हा इतक्या सहज कबुली दिली तेव्हाच शंका आली होती.

२६/११ झाले तेव्हा मेडिया मध्ये accountability , intelligence failure वगैरे विषय होते. महामहिम मोदीजीनीही तिथे धाव घेऊन पत्रकार परिषद घेतली होती व सरकार वर ताशेरे मारले होते, हल्ला अजूनही सुरू असताना ! अनेक मंत्र्यांनी राजिनामेही दिले.

आता मात्र इको सिस्टीम 'त्यांच्या कडून फळे खरेदी करू नकात' असे फॉरवर्ड्स करण्यात मग्न आहे, मेडियाही विरोधी पक्षालाच प्रश्न करत आहेत.

या बाबतीत मोदीजी खरेच भाग्यवान आहेत, कितीही मोठी घोडचूक असूदेत, त्यांना कुणी जाब विचारत नाहीत, सारे महुवा, बरखा, राजदीप वरच तुटून पडतात. ( इकडेही तेच, ट्रम्प ने टेरिफ च्या हट्टापायी मार्केट ला आग लावली तरीही त्यांचे भक्त लोक पेलोसी, एओसी, वगैरेंवरच दोष घालतात) अजब न्याय वर्तुळाचा.

आमचा पूर्व सहकारी बितान अधिकारी ह्या हल्ल्यात मरण पावला , हरहुन्नरी कलाकार , नियमित व्यायाम करणारा हा पोरगा असा जाईल हे मला पचवतात येत नाहीये. :'(

या बाबतीत मोदीजी खरेच भाग्यवान आहेत, कितीही मोठी घोडचूक असूदेत, त्यांना कुणी जाब विचारत नाहीत, सारे महुवा, बरखा, राजदीप वरच तुटून पडतात. >>
विकु, अगदी बरोबर. शिवाय, आतापर्यंत फक्तं बदला घेऊ ह्याच वल्गना होत आहेत... सुरक्षा यंत्रणा भक्कम करू जेणे करून असे पुन्हा घडणार नाही असे आश्वासन कोणीच देत नाही... अशा घटना घडल्यावर ना मागचे सरकार देत असे, ना आताचे सरकार...

आतापर्यंत फक्तं बदला घेऊ ह्याच वल्गना होत आहेत..
यापूर्वी दोन वेळेस बदला घेतला होता कि surgical आणि एअर strike करून.

यापूर्वी दोन वेळेस बदला घेतला होता कि surgical आणि एअर strike करून>>
काय झालं पुढे... संपला का दहशतवाद ? का घडलं पहलगाम?? आपण सुरक्षा यंत्रणा भक्कम का नाही करू शकत??? बदल्या पेक्षा सुरक्षा देणे महत्वाचे नाही का ?

दहशतवाद संपणार नाहीच. उद्या आपण पाकच्या म्हणणाप्रमाणे काश्मीर देऊनही टाकला तरी सुद्धा दहशतवाद चालूच राहणार आहे. त्यांच्या साठी तो जिहाद आहे. काही तरी कारण पाहिजेच असते हिंसे साठी.
बाकी सुरक्षा यंत्रणा मात्र अजून भक्कम केल्या पाहिजे. असल्या घटना झाल्याचं नाही पाहिजे. आणि समजा झालीच तर नक्की त्रुटी कुठे होती याचा तपासही झाला पाहिजे.

>>पण 1992 च्या दंगलीत जे हिंदू शस्त्र घेऊन रस्त्यावर उतरले त्यांचे कमी काळासाठी का होईना पण ब्रेन वॉशिंग नव्हते झाले का? <<
गल्लत होतेय, इथे. ९२ची दंगल गॅसलाइटिंगचा प्रकार होता, शिवाय त्यावेळेची परिस्थिती स्फोटक असल्याने हिंदू तरुणांची माथी भडकली. व्हेअरअ‍ॅज, मदरसांमधे लहान मुलांना पाजलं जाणारं बाळकडु (ब्रेनवॉश) एखाद्या सिस्टमिक पॉय्झन सारखं दिलं जात असल्याने, इट अ‍ॅक्ट्स लाइक ए लाइव बाँब.. वेटिंग टु बी डेटनेटेड...

मदरसांमधे लहान मुलांना पाजलं जाणारं बाळकडु (ब्रेनवॉश) एखाद्या सिस्टमिक पॉय्झन सारखं दिलं जात असल्याने,
आणि ह्याला अंतच असंणार नाही असं वाटतंय. समोरचा आपला नसला तर चांगलंच आहे आणि आपलाच असला तरीही काही बिघडत नाही. येणकेन प्रकारे हिंसा करणारच.

अमित शहा नी अजित डोभाल असे लोक पदांवर आहेत तो पर्यंत काश्मीर पर्यटकांसाठी सुरक्षित नाही. हे दोघे जो पर्यंत राजीनामा देत नाही किंवा पदांवरून जात नाही तो पर्यंत काश्मीर वगैरे ठिकाणी जाऊ नये, लोकांनी फिरायला जायच्या आधी देश कशा लोकांच्या हातात आहे ते पाहावे मग आपला जीव तळहातावर घेऊन जायचे असल्यास काश्मिरात जावे.

दहशतवाद संपणार नाहीच. उद्या आपण पाकच्या म्हणणाप्रमाणे काश्मीर देऊनही टाकला तरी सुद्धा दहशतवाद चालूच राहणार आहे. त्यांच्या साठी तो जिहाद आहे. काही तरी कारण पाहिजेच असते हिंसे साठी.
बाकी सुरक्षा यंत्रणा मात्र अजून भक्कम केल्या पाहिजे. असल्या घटना झाल्याचं नाही पाहिजे. आणि समजा झालीच तर नक्की त्रुटी कुठे होती याचा तपासही झाला पाहिजे.
>> अगदी १०० टक्के.
पाकने त्यांच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमध्ये किंवा अख्ख्या पाकिस्तानमध्ये असे काय दिवे लावलेत की लोक त्यांना सपोर्ट करतात हेच मुळात समजायला कठीण आहे.

बन्डु >>> बितन यांना श्रद्धांजली, त्यांच्या पत्नीची क्लिप आजच पहिली. असं काही बघितलं की परत राग उफाळून येतो.

Submitted by punekarp on 25 April, 2025 - 22:28 >> ती साईट काश्मीर टूरिजमची आहे. सरकारची नाही. ती इथे देण्याचा उद्देश लक्षात आला असेल.

जम्मू काश्मीर टूरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन नावाचं सेमी गवर्मेंट ऑर्ग आहे. पण तिथे मोघम माहिती आहे. जी साईट मी दिलेली आहे त्यावरच सर्वात जास्त माहिती मिळते. बुकींग ही होते.

मुळात म्हणजे बाजूच्य पाक लोकांचे येणे जाणे चालूच असते.
त्यांची एक ट्रीक म्हणजे भारतीय मुलींशी लग्न करणे.
उडदामाजी काळे गोरे प्रकार आहे.
असे प्रकार स्थानिक लोकांच्या मदतीनेच होतात हा ईतिहास आहे.
बरेच मुद्दे आहेत.
सुरक्षा यंत्रणेला माहित नाही, भलावण केली परवानगी नसताना वगैरे वगैरे…

काही विडिओत सांगतात कलमा म्हणा, काही टूरिस्ट सांगतात असं काही म्हटले नाही. सारच गोंधळात टाकणारे आहे.
https://youtu.be/aI2jWiF8jJs?si=W6pz3nuiNulo9sF2

हिंदु आहे असे म्हटले तर कलमा कशाला विचारतील? थेट गोळी. ते नवविवाहित जोडपे, नवर्‍याने हिन्दु म्हटल्यावर लगेच
गोळी घातली. मुस्लिम आहे म्हटले असते तर विचारले असते. एक आसामी हिंदु वाचला न कलमा बोलुन.

कलमा बोलला की तुम्ही मुस्लिम झालात असा समज आहे. म्हणून तुम्ही कलमा बोलणार असाल तर सोडू कारण तुम्ही आता मुस्लिम झाला आहात. नाही माहित तर मारू.

राणभूली तुमची पोस्ट वाचली होती, योग्य मुद्दे होते.
हे फक्त पोच देण्यास, पोस्ट काढण्याच्या तुमच्या निर्णयाचाही आदर.

बैसरन व्हॅली केव्हा टुरिस्ट्सना ओपन असते त्याबाबत:
https://www.hindustantimes.com/india-news/baisaran-open-all-yearround-no...

नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यातही ती खास attraction असते अशा कितीतरी टूर ऑपरेटर्सच्या जाहिराती आहेत.

रानभूली तुमची पोस्ट वाचली होती, योग्य मुद्दे होते.
हे फक्त पोच देण्यास, पोस्ट काढण्याच्या तुमच्या निर्णयाचाही आदर. >>
मम म्हणतो..

एवढेच नाही तर मुंबई ट्रेन मध्ये जे बॉम्ब ब्लास्ट झाले होते त्यातलेही सगळे आरोपी हे भारतीयचं होते.

>>"बैसरन व्हॅली केव्हा टुरिस्ट्सना ओपन असते त्याबाबत:">>
@ मानव पृथ्वीकर
बातमी/व्रुत्त वाचले! निव्वळ पर्यटक म्हणुन दोन वेळा आणि पर्यटन व्यवसायाशी संबंधीत कामासाठी म्हणुन (१९९५ ते २००२ ह्य कालावधीत सर्व सिझनमध्ये) किमान दहा वेळा जम्मु-काश्मिरला जाणे झाले आहे. त्यापैकि तिन वेळा बैसरन व्हॅलीला भेट दिली आहे. त्या ठिकाणाला शेवटची भेट २० जुन २०१७ रोजी अमरनाथ यात्रा सुरु होण्याच्या सुमारास दिली होती. ह्या अनुभवावरुन एक गोष्ट खात्रीने सांगु शकतो की त्यावेळीतरी 'बैसरन व्हॅली' पर्यटक आणि ट्रेकर्ससाठी कधिही बंद नसायची! मुळात बंद करायला हे काही कुंपण्/फाटक वगैरे असलेले ठिकाण नाही. एकतर तिथे पोहोचायला कच्चा/पक्का असा कुठलाच रस्ता नाही. एकतर पायपिट करुन किंवा घोडा/खेचरावर बसुन तिथे पोहोचावे लागते. त्यामुळे फारतर खबरदारीचा उपाय म्हणुन प्रशासन पर्यटकांच्या पहिल्या पसंतीचा असलेला घोडा/खेचराचा पर्याय बंद करुन तिथे येणार्‍या पर्यटकांची संख्या लक्षणीयरित्या घटवु शकते, परंतु KP (खानाबल-पहलगाम) रोडला लागुन असलेल्या डोंगर-टेकड्यांच्या सुमारे ९-१० कि.मी. अंतराच्या पट्ट्यात कितीतरी ठिकाणांहुन ट्रेकर्स एखाद्या वाटाड्याच्या मदतीने किंवा स्वतःच्या जवाबदारीवर तिथे सहज पोहोचु शकतात.

अर्थात माझ्या सगळ्या काश्मीर भेटी ३७० कलम रद्द होण्यापुर्वी झालेल्या असल्याने आताच्या बदललेल्या परिस्थितीत केंद्र/राज्य सरकारने किंवा स्थानिक प्रशसनाने काही नवीन नियम्/निर्बंध लागु केले असल्यास त्याबद्दल माहिती मिळवावी लागेल. तसेच सर्वपक्षिय बैठकीत सरकारद्वारे नक्की काय सांगीतले गेले ते सरकारच्या शब्दात कुठे वाचायला मिळते का ते बघावे लागेल, कारण काल-परवा संजय सिंह ह्यांच्या हवाल्याने आलेल्या बातमीत आणि आज वाचलेल्या बातमीत जे लिहिले आहे ते ह्या लोकांचे आपले आकलन आहे की हे सरकारचे शब्द जसेच्या तसे दिले आहेत हे देखिल तपासुन बघावे लागेल.

ह्या दहशतवादी हल्ल्याची बातमी वाचल्यापासुन बैसरन व्हॅलीच्या आठवणी उफाळुन आल्या होत्या. जुने फोटोज बघत हळहळत असतानाच परवा आमच्या दहावीच्या बॅचच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर 'संजय लेले' हा आमचा डोंबिवलीकर शाळामित्र देखिल ह्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याचा मेसेज वाचल्यावर ह्या अमानुष हल्ल्यामुळे झालेल्या दुखा:ची तीव्रता कित्येक पटींनी वाढली आहे.

हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व अभागी जीवांना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏

काश्मीर मधून परत येणाऱ्या पर्यटकांना एअरलाईन लुटत आहे. जे कॅन्सल करतायेत त्याना पैसे परत देण्यास त्रास देत आहेत.

Pages