वेबसीरीज ३

Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वाती आणि अमित ला +११. बिन्ज वॉच नाही होत ब्लॅक मिरर. एक भाग बघितला की डिप्रेसच व्हायला होण्याची शक्यता जास्त. आणि करमणुक म्हणुन झटकून पण टाकता येत नाही. डिस्टोपिअन फ्युचर अंगावरच येतं.

माधव धन्यवाद रेकोसाठी. रोचक वाटतेय.

पॅरानॉईड मधे इंदिरा वर्मा आहे, ती मीरा नायरच्या कामसूत्र मधेही होती. >>> आणि Game of Thrones मधली Ellaria Sand.

Black Mirror एकावेळेस एक एपिसोड बघायचा आणि विचाररवंथ करत बसायचं. काही एपिसोडस तर एका बैठकीत पूर्ण करूच शकले नाही. उदा. Crocodile - S4E3

युअर ऑनर (सोनी लिव्ह)
सीझन-१

सेशन्स कोर्टचा जज्ज, त्याच्या मुलाच्या हातून एक अपघात होतो. अपघातग्रस्त माणसाला मदत न करता मुलगा पळून येतो. जज्ज इमानेइतबारे त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातो. पण तिथे तो माणूस कोण हे जज्जला कळतं आणि तो काय वाट्टेल ते करून मुलाला वाचवण्याच्या मागे लागतो. त्यापायी त्याचं एक एक पाऊल गाळात जात राहतं.

सहज बघायला सुरुवात केली. आणि बघत गेले. आवडली. जिमी शेरगिल, मिता वसिष्ठ, वरुण बडोला. सगळेच आवडते कलाकार. इतर सहकलाकारांनीही मस्त कामं केली आहेत. (फक्त जिमी शेरगिलचा मुलगा झालेला कोणे माहिती नाही, पण त्याला फार काही अ‍ॅक्टिंग जमलेलं नाहीये.)

सीझन-२ मात्र पहिल्याच एपिसोडला बोअर झालं. त्यामुळे पुढे नाही बघणार. तो पहिला एपिसोडही अर्धवट सोडून दिला. Uhoh

याच नावाच्या इंग्रजी सिरियलवर बेतलेली आहे. आणि त्यात जज्जचं काम ब्रायन क्रॅन्स्टनने केलंय.

ओरिजिनलही ठीकठाकच होती. ब्रेकिंग बॅडचा फॉर्म्यूला वापरायचा अयशस्वी प्रयत्न वाटला होता.

खौफ सुरू केलीय. पहिला भाग आवडला.
ताण चांगला ठेवला आहे. पात्र परिचय गोंधळात टाकतं. पार्श्वसंगीत खूप मस्त आहे.
प्राईम वर धिस व्हिडीओ इज अन अव्हेलेबल , ट्राय अगेन असा सारखा मेसेज येत आहे. आणखी कुणाला येतोय का ?

Bosh legacy चा.S3 पहायला सुरुवात केली. बरीच gap पडल्यामुळे काही गोष्टींचा संबंध लागायला वेळ लागतोय.

नेटफ्लिक्सवरची Pact of Silence ही ड्रामा थ्रिलर मालिका छान घेतली आहे. १८ भागात संपते. किंचीत लहान करता आली असती पण हळुहळु रंगत जाते. बरीच मुख्य म्हणता येतील अशी पात्रे आहेत आणि प्रत्येकाची स्वतःची कथा चांगली गुंफली आहे. ट्विस्ट, ड्रामा, रहस्य वगैरे गुंतवुन ठेवतं. इंग्लीश डबिंग आहे पण मला तरी चाललं.

>>> ब्लॅक मिरर - पूर्ण पाहून झाला नवा सीझन. मला फक्त पहिला एपिसोड आवडला, बाकी ओके ओके होते.
सेम हिअर. शेवटचा मग मी पाहिलाच नाही एपिसोड.

The Diamond Heist - नेटफ्लिक्स (भारत)
मिनी डॉक्युसिरीज (३ एपिसोड्स)

२००० साली लंडनजवळच्या ग्रिनिचमध्ये मिलेनियम डोम बांधला गेला. त्यात अनेकानेक आकर्षणं तयार केली गेली. त्यातच एक हिर्‍यांचं प्रदर्शन ठेवलं जातं. अत्यंत कडेकोट बंदोबस्तात यात हिर्‍यांची सुप्रसिद्ध कंपनी De Beers आपले निवडक हिरे ठेवते. यात सगळ्यात महत्त्वाचा असतो २०३ कॅरटचा मिलेनिअम स्टार हा मोठा हिरा.

काही चोर हे हिरे चोरायचं ठरवतात. दिवसाउजेडी ती अभेद्य समजली जाणारी हिरे मांडलेली खोली फोडून पाच मिनिटांत हिरे लंपास करून थेम्स नदीतून पलायन करण्याचा बेत ठरतो. हा धाडसी बेत कसा ठरतो, त्याचे तपशील, चोरांची मानसिकता, पोलिसांचे चातुर्य, एकमेकांवरची कुरघोडी यात खूप तपशीलात आणि उत्तमरित्या दाखवलं आहे. पहिला एपिसोड चोरांचा, दुसरा पोलिसांचा आणि तिसरा चोर-पोलिस दोघांचाही. तीन भागात मालिका संपते.

सत्यघटनेवर आधारीत आहे आणि या घटनेतील काही खरोखरीची मुख्य पात्रंच यात आपल्याला ही गोष्ट सांगतात. त्यामुळे त्यांच्या त्यांच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या विचारांतून ही घटना आपल्यासमोर उलगडते. प्रत्येकाचं जीवन आणि त्यांची मानसिकता यांची झलक मिळते आणि त्यामुळे उत्कंठाही वाढते. तिसर्‍या भागातला उंदरामांजराचा खेळही रंजक रंगवला आहे. काय होणार हे सुरवातीलाच माहित होतं पण तरीही गोष्ट इतकी रंजक आहे की आपण गुंतून जातोच. हा दरोडा जर यशस्वी झाला असता तर इंग्लंडच्या गुन्हे विश्वातला तो सर्वात मोठा दरोडा ठरला असता म्हणे.

रच्याकने, शेवटचा वळसाही भारी आहे.

ब्लॅक मिरर बद्दल सेम - पहिले ३ आवडले. पहिला सगळ्यात जास्त. तो हॉटेल रेव्हरी का काय कंटाळवाणा झाला होता नंतर पण केला पूर्ण तरी.
शेवटचे ३ अर्धे पण नाही बघू शकले. बोर झाले.

पॅरॅनॉईड पाहायला सुरू केली. ती पण नंतर रटाळ वाटली एका पॉईंटनंतर. सोडून दिली.

नेफिवरची नवीन "रॅन्सम कॅनियन" कोणी पाहिलीत का? अगदी नवीन दिसते. एकूणच रॅंचेस वाल्या कथांचे पेव फुटले आहे सगळीकडे "यलोस्टोन" पासून. इतरही सर्विसेस वर तशा स्वरूपाच्या काही दिसत आहेत.

इंदिरा वर्मा>>>> तिचं कॅरेक्टर नाही आवडलं फारसं मला. फार चाईल्डीश, रडूबाई वाटली काही काही वेळा.
अ‍ॅलेक साठी बघत राहिले Wink पण त्यालाही किती बघणार असं झालं.

नेफिवरच्या "रॅन्सम कॅनियन" च्या इण्ट्रो चा डान्स आणि ते गाणे मस्त आहे. ते नक्की कोणते गाणे आहे व त्या सिरीज मधे कधी आहे माहीत नाही. पण ब्राउज करताना आपोआप सुरू होते, आणि २-३ वेळा ऐकल्यावर त्याचा बीट, र्‍हिदम जे काय असेल ते इतके आवडले आहे की सगळीकडे शोधतोय. कोठेच सापडले नाही. त्यातली गाणी शोधल्यावर इतरच सापडतात. तो डान्सही मस्त आहे.

सिरीज कशी आहे अजून अंदाज नाही. पहिला एपिसोड थोडा पाहिला आहे. यलोस्टोनची खूप छाप आहे अजूनतरी.

युअर ऑनर (सोनी लिव्ह)>>>> मीही दुसरा सीजन पूर्ण करू शकले नाही.

Bosh was good.
Bosh legacy मात्र फारशी आवडली नाही.

The pitt अवश्य बघा‌ लोकहो. मेडिकल ड्रामा आवडत असेल तर मस्ट (आणि मस्त) वॉच आहे.

Grey's anatomy चा कितवाकी सीजन सुरू आहे आणि आता निव्वळ फालतू पणा सुरू आहे.

अमेझॉन प्राईम वरची खौफ पाहिली सुरुवात चांगली होती पण शेवट गंडलाय .मेन भूत चांगलं नसतं तर ते नायिकेला मदत कशाला करेल. शेवटी चिखलातले सीन सूचक बिचक असले तरी फार कळण्यासारखे नाहीत ते आपण समजून घ्यायचे,उगाच दोघांचा रिवेंज एकत्र बांधायचा प्रयत्न केलाय. एकंदरीत जुळवून कथा लिहिल्यासारखी आहे . त्यातल्यात्यात नायिकेच काम करणारी हिरोईन (जमतारा वाली)ने चांगलं काम केलंय. वूमन अब्युज वरची सुझल 2 नंतरची गंडलेली दुसरी वेबसीरीज.

Succession बघायला सुरुवात केली आहे. ओळखीत दोघा-तिघांनी रेकमेंड केली होती.
चार एपि. बघून झाले. पण अजून तितकीशी मजा नाही आलेली बघताना, आवर्जून पुढचा भाग बघावा असं काही वाटलेलं नाही.
इथे काही चर्चा झाली होती का?
या धाग्याची अगदी पहिली पोस्ट याच्या चौथ्या सीझनबद्दलची आहे.

Bosch Legacy पाहून संपवली , नेहमी सारखी interesting वाटली नाही. पण Bosch चा aura काही औरच आहे. 13 वर्षे अडकलेल्या flower girls case चा निकाल चुटकीसरशी लागला .
हनी आणि bosch किंवा Maddy आणि हनीच नातं आवडलं

Bosch मध्ये त्याचे घर आणि सुरुवातीचे संगीत हे पण माझ्याकरता वॉव फॅक्टर्स होते. लेगसी मध्ये ते दोन्ही नाहीत. आणि आधी तो पोलिस असतो तेंव्हाचा त्याचा रुबाब पण भारी होता. PI झाल्यावर तो रुबाब कमी झालाय.

Bosch मध्ये त्याचे घर >>> yess . काय घर , काय अंगण , काय view !!
मला तसचं Lincon Lawyer च ही घर आवडतं .

हो बॉशमध्ये त्याच्या घराचं लोकेशन एकदम भारी आहे. लिंकन लॉयर की आणखीन कोणत्यातरी सिरीजमध्ये अशाच लोकेशनचं घर होतं.

Pages