Submitted by webmaster on 11 August, 2008 - 01:06
ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.
या भावनेला माझे पूर्ण अनुमोदन
या भावनेला माझे पूर्ण अनुमोदन आहे अध्यक्ष महोदय...
नुकतेच हे वाचले एका ट्रकमागे:
नुकतेच हे वाचले एका ट्रकमागे:
हँसने वाले का भाई
जलने वाले का जमाई
एका टेम्पोच्या मागे लिहिलेले
एका टेम्पोच्या मागे लिहिलेले वाक्य
"बडा बनके ट्रक बनुंगा"
काल कुंपणीत एक ट्रक लोडींग
काल कुंपणीत एक ट्रक लोडींग साठी आला होता त्याच्या मागे लिहिले होते "ना पिअर ना सासरो, बजरंगबली थारो आसरो".
आता पिअर (कलिग्ज अँड पिअर्स मधील असेल तर ) आणी सासर्याचा काय संबंध?
बहुदा रावसाहेबांप्रमाणे प्राचीला यमक जुळते म्हणुन गच्ची तसे यमक जुळवले असेल.
>>बहुदा रावसाहेबांप्रमाणे
>>बहुदा रावसाहेबांप्रमाणे प्राचीला यमक जुळते म्हणुन गच्ची तसे यमक जुळवले असेल.>>
नाही.... 😀
पिअर = माहेर
सासरो = सासर/सासुरवाडी
अच्छा, असे आहे का ते? तरी मी
अच्छा, असे आहे का ते? तरी मी ड्रायव्हरला अर्थ विचारला होता तर तो दात काढुन हसला फक्त.
हो, पीहर हवे ते. माहेर.
हो, पीहर हवे ते. माहेर.
मी आत्तापर्यंत पिअर - पीहर-
मी आत्तापर्यंत पिअर - पीहर- पिया का घर म्हणजे सासर समजत होते. आणि नैहर म्हणजे माहेर.
ये चीटिंग है बाबूभैय्या
पीहर आणि नैहर हे समानार्थी
पीहर आणि नैहर हे समानार्थी शब्द आहेत.. माहेर.
"ये चीटिंग है बाबूभैय्या"
"ये चीटिंग है बाबूभैय्या"
राजस्थानी बोलीभाषेतले आहे ते वाक्य 😀
पीहर
पीहर
म्हणजे पित्याचे घर. शौरसेनी प्राकृत भाषेतला शब्द आहे.
पिहर/ पिहरवा म्हणजे माहेर
पिहर/ पिहरवा म्हणजे माहेर असलं तरी माहेर म्हणजे जवळचे, आपले, सुरक्षित, कम्फर्ट देणारे म्हणून अशा व्यक्तीला पक्षी रोमँटिक पार्टनरला पिहरवा असं गाण्यात म्हटलेलं आठवतं.
अगदीच रच्याकने: सहज शोधताना किशोरी आमोणकरांची ही ठुमरी सापडली. तुम बिन मोरे बिदेसी पिहरवा, कैसे कटे बरसात रे फारच सुंदर आहे. ऐकली न्हवती.
मलाही पीहर म्हणजे सासर
मलाही पीहर म्हणजे सासर वाटायचं! नैहर-पीहर अशी जोडी ऐकल्यामुळे! आणि 'पिया' (प्रिय) या संबोधनामुळे.
अमित, मग तो स्वल्पविराम बहुधा चुकीच्या जागी आहे का? 'तुमबिन मोरे बिदेसी, पिहरवा कैसे कटे बरसात' - तू परदेशी, मी माहेरी, आता हा पावसाळा कसा निभायचा!
ओह! परफेक्ट! पझल पीस बरोब्बर
ओह! परफेक्ट! पझल पीस बरोब्बर बसला मग.
अमितव ठुमरी छान आहे.
अमितव ठुमरी छान आहे.
पीहर म्हटलं की मला सावन बीतो जाये पिहरवा आठवतं. बहुतेक त्यामुळे सासरी ती एकटी आणि नवरा कुठे तरी कडमडलाय असं काहीतरी वाटायचं.
तसंही एक कोकणी मुलगी म्हणून सावन आणि पिया हे समीकरण मला झेपत नाही. श्रावणातल्या पावसाचं आम्हाला कौतुक नसतं. आम्ही नुकताच आषाढ संपवून निःश्वास सोडलेला असतो. श्रावणात मांसाहारी घरात पियाची आठवण आली तर ती त्याला खायच्या वारी काय भाजी खाऊ घालावी म्हणजे तो वैतागणार नाही यासाठी असते. चाकरमान्यांच्या घरात तर या वैशाखात लग्न होऊन आलेली बायकोसुद्धा श्रावणात पियाची वाट बघत नाही. कुणी सुचवलंच तर सुचवणारा येडा का खुळा अशा नजरेने त्याच्याकडे बघतील. आमच्याकडे पिया फिल्डींग लावतो ती भाद्रपदातल्या सुट्टीसाठी
माझेमन, एकदम बरोबर आणि भारी
माझेमन, एकदम बरोबर आणि भारी लिहिलंयस.
गाडीच्या आगेमागे नव्हतं
गाडीच्या आगेमागे नव्हतं लिहिलेलं पण आता पिहरवा आलाच आहे तर माझा प्रश्न विचारून घेतो.
भिमसेनजींची एक चिज आहे - पिहरवा तू बिरमा (आधी मला ते बलमा ऐकू यायचे मग कुठेतरी ते बिरमा असल्याचे वाचले). तर त्या चिजेतला 'बिरमा' म्हणजे काय?
आणि पिहरवा म्हणजे माहेर म्हटलं तर "मोरा रे मीत पिहरवा" याचा अर्थ कसा लावायचा? मीत सहसा प्रियकर / प्रेअसीला उद्देशून म्हटले जाते ना?
>>> पिहरवा तू बिरमा
>>> पिहरवा तू बिरमा
सगळे बोल देता येतील का? संदर्भावरून कळू शकेल.
>>> मोरा रे मीत पिहरवा
सुरजनवा आ के मिलो
म्हणजे 'अरे माझ्या सख्या, तू मला माहेरी येऊन भेटून जाशील का?' - असं असू शकेल.
हा तोच ट्रिकी स्वल्पविराम दिसतो आहे.
एकूण ती नवी नवरी इतकी प्रेमात बुडाली आहे की पहिल्या श्रावणात माहेरी आल्यावर त्याच्याशिवाय तिला चैन पडत नाही.
माझेमन , सही बात!
माझेमन , सही बात!
सगळे बोल देता येतील का? >>>
सगळे बोल देता येतील का? >>> पंडीतजींचे शब्द ओळखणे कठीण काम. तुम्ही ती चिजच ऐका (इथे तर बिलमा आहे) ...
https://www.youtube.com/watch?v=o2nZC1XVhJM
ऐकते. धन्यवाद.
ऐकते. धन्यवाद.
>>नवी नवरी इतकी प्रेमात
>>नवी नवरी इतकी प्रेमात बुडाली आहे की पहिल्या श्रावणात माहेरी आल्यावर त्याच्याशिवाय तिला चैन पडत नाही >> म्हणजे ती नवी नवरी आमच्या कोकणातली नसणार - काशिनाथ नाडकर्णी ते माझेमन सगळ्यांचा कोरस
>>> म्हणजे ती नवी नवरी आमच्या
>>> म्हणजे ती नवी नवरी आमच्या कोकणातली नसणार
म्हणजे ती नवी नवरी मुळात मराठीच नसणार. मराठी माणसं सतत 'सुख मला भिवविते' मोडमध्येच असायची!
हा तोच ट्रिकी स्वल्पविराम
हा तोच ट्रिकी स्वल्पविराम दिसतो आहे. >>> शास्त्रीय संगितात शब्दातली अक्षरे कळणे, मग त्या शब्दांचा एकमेकांशी असलेला अर्थ लागणे हे चॅलेंजींग असते बर्याचदा. त्यात आता ह्या ट्रिकी स्वल्पविरामची भर पडली.
लताला शास्त्रीय संगीत न शिकल्याची खंत वाटायची आणि त्या वाटण्याचे मला नवल वाटायचे. ती कधी बेसुरी झाली नाही हे तर आहेच पण गाण्यातले एक न एक अक्षर स्पष्ट गाणे, शब्दाचा अर्थ सूरांतून सांगणे हे सगळे तिला साध्य होते. कोणत्याही शास्त्रीय गायकाला ही तिन्ही वैशिष्ट्ये साधणे कठीण असते.
भिमसेन जोशींचं माधवला समजलं
भीमसेन जोशींचं माधवला समजलं नाही त्यामुळे ते नाहीच ऐकलं. मग सर्च केला तर श्यामला भावे यांचं स्पॉटिफायवर सापडलं त्यांनी ही चांगलं गायलय.
ते ऐकून...
पिहरवा सो बिरमा
का कैसे चूक क्/परे
मोरा ---- किन सौतन
सुख पाए
असं काही ऐकू आलं.
बिरम अर्थ
बिरम अर्थ
विराम, अटकाव, विलब.
प्रियकराला उशीर का होतो आहे?
सवतीने त्याला मोहित केले आहे का?
असा काही अर्थ आहे का.
Arrow in the dark.
अरे इथे गंमत म्हणून
अरे इथे गंमत म्हणून वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये पहायला आलो तर इथे सुद्धा हिंदी का उर्दू का काय ती शिकवणी चालू आहे. आजकाल माबोवर सगळ्याच धाग्यांवर अशी हिंदीची शिकवणी सुरू झालेली दिसते आहे. मागे एका आयडीला खूप हिंदीमधे लिहिता म्हणून त्रास दिला होता मग आता हे बरं चालतंय!
@स्वाती, तू 'रंगरेज मेरे' वर
@स्वाती, तू 'रंगरेज मेरे' वर रसग्रहण लिहिले होते, तो लेख मी मारवाडी - हिंदी रोजच बोलणाऱ्या मैत्रिणीला पाठवला होता. त्यात तू या शब्दांचा उल्लेख केला आहेस. पीहर - नैहर दोन्ही शब्दांचा अर्थ माहेरच आहे असे ती म्हणाली होती पण मी तिला म्हटले स्वातीचं चुकणं शक्यच नाही, ती पुरेसा अभ्यास करून लिहिते आणि मी तुला कधी सांगितले नाही.
मलाही नक्की कुणाचे बरोबर आहे याची खात्री वाटत नव्हती. मलाही समहाऊ 'पी -हर प्रीतम पिया' शी जुळतेय वाटत होते.
माझेमन, धमाल पोस्ट. पण मला
माझेमन, धमाल पोस्ट. पण मला आता मराठवाड्यातले पिया फिल्डिंग कधी लावत असतील असा प्रश्न पडला. कारण सगळे ऋतू उन्हाळ्यातच येतात. 'राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा' आहे. कोकणात पावसाचं कौतुक नसल्याने भाद्रपदात, आमच्याकडे पाणी चित्रपटातल्यासारखे पाणी शोधत शोधतच पिया साईडबायसाईड फिल्डिंग लावत असतील.
पाणी शोधत शोधतच पिया
पाणी शोधत शोधतच पिया साईडबायसाईड फिल्डिंग लावत असतील
Pages