वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये

Submitted by webmaster on 11 August, 2008 - 01:06

ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.

या अगोदरचं हितगुज इथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी एका ऑटोच्या मागे वाचलं होतं. "बेवफा दोस्ती"
मनात विचार आला, याच्या आयुष्यात याच्या मित्रांनी बहुदा, बरेचदा मारली असावी याची....मान!!!

साॅरी हा कापली असावी.... Happy Wink म्हणायचं होतं.

>> कशाला??? अतुलजी....
सॉरी thumbs up चा स्मायली दिसत नाही म्हणून हा टाकला. याचा अर्थ वेगळा काही आहे का? असल्यास डिलीट करतो.

क्रुश्नाजी, तुम्ही इथेही माझी मस्करी करताय.... Sad
अतुलजी राहू द्या...मलाच माहीत नाही,दिवा का दअखवतात ते...

अहो,क्रुश्नाजी तुम्ही मला दिवा दाखवता कि नाही नेहमी...त्याचा अर्थ माहित नाही म्हणुन विचारला इतकेच...
आणि ,मी तुमच्यावर कधीच रागवत नाही... Happy

'So many pedestrians! So little time!!'- >> म्हणजे असही असेल कि, वेळ इतका कमी आहे तरीही जास्त लोक चालणं च पसंत करतात !! (गाडी असेल तर वेळ वाचेल इतकंच म्हणायचं असेल)

'So many pedestrians! So little time!!'- >> हे सलमानच्या गाडीवर लिहिलेलं आहे का Wink

हायवे वरून मी रिक्शा मधून चालले असताना समोरून १६ चाके असणारा भला थोरला ट्रक्टर जात होता. त्यावर लिहिले होते
ए अपनी औकातमे रहो.
बिच्चारी माझी रिक्शा.

वाहनाच्या मागे लिहिलेले आजवरचे सर्वात सुंदर वाक्य... Happy मला वाटते आपण सर्वांनी याचे अनुकरण करावे

580492_526149187441454_862305164_n.jpg

तु G 8 1 A ते

हे वाचलेलं एकदा...
कै आहे हे???? ओळखा बरं...

काल एका सुमोच्या (म्हणजे वाहनाच्या) मागे काचेवर लिहिले होते
शिल्पकार
लाखा बंजारा
सायाका माडी हाकाला गाडी

एमएच ४४ म्हणजे कुठले वाहन असेल ??

'दैव जाणीले कुणी' आणि 'पुण्य हवे नशिबाला' ही दोन पेटंट बोधवाक्ये नेहमी ट्रकच्या, ट्रॅक्टरांच्या मागे वाचायला मिळतात.
काल १०९२ असा नंबर असणार्‍या ट्रकच्या मागे '२०९२ ची कृपा' अशी आभाराची पाटी दिसली. अर्थनिर्णयाचा यत्न करत आहे.

आज सकाळी एका रिक्षाच्या मागे पाहिलेले वाक्य
'एक गिअर नीचे,
अख्खा मुंबई पीछे!'

(याच्या रिक्षाला कदाचित lamborghini चे इंजिन असावे!!! Proud Proud Proud )

Pages