चित्रपट कसा वाटला - ११

Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53

नवीन चिकवा.

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इब्राहिमचं कॉन्स्टिपेटेड अ‍ॅक्टिंग (!) >>> Lol

अ‍ॅक्टिंगबद्दल बोलतंच आहे कोण? ते फक्त आहेत दोघं पिक्चरमधे. पिक्चर चालूये त्याच्या त्याच्या कर्माने Lol

केजो, खुशी, इब्राहिम इतके ट्रोल होतायेत तरी काSSSSही फरक पडत नाही त्यांना, गेंड्याची कातडी आहे गाढवांची !
पुढचे प्रोजेक्ट्स ऑलरेडी साइन केलेच असतील !

किल चा बेस्ट पार्ट शेवटचा डायलॉग आहे - साला इतना कौन मारता है बे ? हमने तो तेरे चार लोग मारे थे तुने तो परीवार के चालीस खतम कर दिये. काय डिलीव्हरी आहे ! खल्लास ! हिरो पेक्षा व्हिलनच लक्षात राहतो शेवटी.

किल पाहिला होता मी. राघव जुयाल ने चांगले काम केलेय , मला तो हिरोच फार तोच तो कॅटेगरी वाटला. मी राघव जुयाल ला रिएलिटी शोज मधे पाहिले होते, मला तो कॉमिकल होस्ट, डान्सर असाच माहित होता त्यामुळे हे काम एकदम वेगळेच वाटले.

राघव जुयाल हे त्याचे नाव आहे. त्याला कोठेतरी पाहिल्यासारखे वाटते.>>>> डान्स इन्डीया डान्स मधे स्पर्धक होता
त्याचा स्लो मोशन डान्स प्रचन्ड फेमस झाला होता...नतर पुढे रेमोचा डान्स + वैगरे होस्ट करत होता...विटी आणि हजरजबाबी आहे...

किल >> बरा होता का? तो आला तेव्हा बघावा की नाही असे वाटत होते. पण खूप मारामारी असेल तर बघून टाकेन. किलबिल सारखे पिक्चर आवडतात पाहायला Proud

सिनेमा तसा एन्गेजिंग आणि वेगवान आहे, पण हो, भरपूर वायलन्स. माणूस मारण्याचे ४० प्रकार असे नाव देता येईल सिनेमाला Happy

जोई सारखाच आहे की जुगल वजा धमाल करा म्हणजे काय उरते ते मोजा. >>>>> ह्यातला मोजा म्हणजे आधी मळका फाटका अंगठा बाहेर येणारा मोजा आठवला. त्या अर्थाने देखील हे वाक्य जास्त भारी आहे. Happy

तुमचा लाडका नादानियां न पहाता Lol , नेटफ्लिक्सवर ‘अ विकेंड अवे’ आणि ‘बेकेट’ हे दोन छान थ्रिलर्स पाहिले आणि प्राईमवर ‘लाईफ’ हा सायफाय हॉरर. सगळे आवडले. पहिले दोन्ही सुट्टीवर गेल्यावर घडलेले गुन्हे/पाठलाग या पठडीतले आहेत. (मला सिनेमाचा इतकाच रिव्ह्यु लिहिता येतो).
तिसरा बहुतेक सर्वांनी पाहिला असेल.

काय भीषण पिक्चर आहे! पिक्चर चांगला असावा नाहीतर सो बॅड इट इज गुड असावा. सुमारे १५-२० मिनिटे पाहिला नादानियाँ.

सुरूवातीचे नॅरेशन अ‍ॅलिशिया सिल्व्हरस्टोनच्या "क्लूलेस" सारखे आहे. त्यातही अशाच एका श्रीमंत मुलीचे मनोगत आहे. पण ते फार सुंदर जमले आहे. इथे निदान पहिल्या काही मिनिटांत ते जमलेले नाही. एकाच वेळेस तिच्या फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम्स आणि त्यावरच्या तशाच श्रीमंत उपायांबद्दल हसू येणे, पण तरीही तिच्या कहाणीत इंटरेस्ट वाटणे हे दोन्ही व्हायला हवे, ते होत नाही.

सुरूवातीला मला असेही वाटले की केजोच्या पिक्चरमधल्या शाळा/कॉलेजेस असतात त्यावर सेल्फ डेप्रकेटिंग नॅरेशन आहे, पण तसेही दिसत नाही.

(बाय द वे, "क्लूलेस" बघितला नसेल तर जरूर पाहा. फुल रेको)

"क्लूलेस" बघितला नसेल तर जरूर पाहा. फुल रेको >>> + १००० Happy

(पण सिनेमाच पहा त्याच नावाची सीरीज पण होती कुठेतरी, ती नाही)

दुपहिया प्राईमवर पाहात नाहिये का कोणी ? पंचायत स्टाईल मधे बनवलेली आहे. स्टार कास्ट मस्त आहे नि एकंदर ट्रीटमेंट वेगळी आहे. स्पर्श श्रिवास्तव चा एकंदर वावर जबरदस्त आहे. त्याचे डान्सेस बघायला धमाल येते. एक सरप्राईज आयटम आहे.

अ‍ॅलिशिया सिल्व्हरस्टोनच्या "क्लूलेस" >>> हाच आठवत होते परवा! Happy थँक्स फा.

एकाच वेळेस तिच्या फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम्स आणि त्यावरच्या तशाच श्रीमंत उपायांबद्दल हसू येणे, पण तरीही तिच्या कहाणीत इंटरेस्ट वाटणे हे दोन्ही व्हायला हवे, ते होत नाही >>> परफेक्ट मांडलं आहेस.

इश्वाक सिंग आहे म्हणुन ‘तुझसे ना हो पायेगा‘ बघितला. काहीच नवीन नाही, सगळे as expected पण सगळ्यांचा अभिनय व वावर सहजसुंदर. हिरोइन अजिबात प्लॅस्टिकी नाही.

पाताललोक मधला अंसारी इश्वाक सिंग आवडलेला. कामही छान करतो, शांत वाटतो आणि दिसायलाही छान हँडसम आहे. he always looks as if he is at peace with himself. त्याला अजुन कामे मिळुदे.

तो सैपुत्र हसला की आवडला . दोन्ही मुलांपेक्शा त्यान्चे आइबाप आवडले .
दिया मिर्झा डोळ्यात बदाम . खुशीच्या मैत्रिणी आवडल्या .
बाकी सगळा आनंद आहे .

बाय द वे, भारतातली इलाईट स्कूल्स आता अमेरिकन पॅटर्न्सशी जुळवली आहेत का? हाय स्कूल हे भारतात दहावीपर्यंत असते. पुढे ज्यु कॉलेज. अमेरिकेत बारावीपर्यंत हायस्कूल. इव्हन शाळेच्या नावात "समथिंग हाय" असे असणे (इथे "फाल्कन हाय") हे ही अमेरिकन आहे. कारण बर्‍याच शाळा फक्त ९ वी ते १२ वी असतात. भारतात असा पॅटर्न पूर्वी तरी नव्हता.

सैपुत्र हा त्यांच्या दृष्टीने खालच्या दर्जाच्या शाळेतून आलेला असतो ना? मग त्याला कॅप्टन होऊ देणे हे मतपरिवर्तन लगानमधल्या मतपरिवर्तनापेक्षाही फास्ट आहे. तेथे पिढ्यानपिढ्यांचे जातीय समज आमिरच्या एका सीनमधल्या भाषणाने नाहीसे होतात व त्या कचरा ला संघात सामील केले जाते. इथे एलाइट व गरीब्/मव लोकांमधला फरक एका २-३ ओळींच्या बकबकीने सगळे विसरून जातात. बाय द वे, ते एलाइट लोक आणि सैपुत्र यात मला काहीच फरक दिसला नाही.

सैपुत्रची एण्ट्री अजून व्हायची आहे म्हणून अंधारात हुडी घालून पळताना दाखवला आहे. नंतर एण्ट्री होते तेव्हा त्याची मान कोणत्याही दिशेला फिरली तरी त्याच्या डोक्यावरचे केस पुढून मागे उडतात. मोहब्बतेमधे एकाच वेळी एकाच सीनमधे दोन विरूद्ध दिशांनी वाहणारे वारे होते. इथे चारी दिशांनी वाहणारे आहेत. बहुतेक शूटिंगच्या वेळचा समोरचा पंखा स्वतःभोवती तर फिरतोच पण याच्याभोवतीही फिरतो.

मग त्याला कॅप्टन होऊ देणे हे मतपरिवर्तन लगानमधल्या मतपरिवर्तनापेक्षाही फास्ट आहे. >>> ईथे तो भाषणाने नाही , सिक्स पॅक अ‍ॅब्ज दाखवून मतपरिवर्तन करवतो Wink

नॉयडावाला सीन हॅरी पॉटर वरून इन्स्पायर्ड वाटला. मगल वि प्युअर ब्ल्ड.

पूर्वी नायक गरीब असला तर आई शिलाई मशीन चालवायची. आता ती टीचर असते. लाखांत पगार घेते.

काही गोष्टी पाश्चात्य जगातल्या उचलल्यात. काही इथल्या ( पॅट्रिआर्की).

CBSE शाळा बारावीपर्यंत असतात बहुतेक.

पोरगं कॉलेजात गेलं की घरा पासून दूर होणार हे पण इथे फक्त मेडिकल इंजिनीयरिंग वाल्यांच्या बाबतच अधिक होतं.
इथे पोरं कॉलेजात जातात. युनिव्हर्सिटीत नाही. हे दोन्ही इंग्लंड अमेरि केतून घेतलं असावं.
लॉ कॉलेजमध्ये बारावीनंतर अ‍ॅडमिशन मिळते की आधी एक पदवी लागते? हल्ली नियम बदललेत का? आधी सगळे बी ए एल एल बी दिसायचे.
डिबेट जिंकलं की आय व्ही कॉलेजेस स्वतःच बोलवणार.

लॉ कॉलेजचा विषय आल्यावर पिक्चर एकदम वेगळ्याच प्रतलावर गेला. स्टार्ट अप , व्हेंचर कॅपिटल आणि स्टार्ट अप विकून पैसा .

पोस्ट ग्रॅज्युएशनची मुलं तरी इतका पुढचा विचार करत असतील का माहीत नाही.

कोव्हिड लशीबद्दलचे मुद्दे अगदीच पेडेस्ट्रियन होते.

फॅमिली डिनर होतं तर मेहताज कुठे होते?

ईथे तो भाषणाने नाही , सिक्स पॅक अ‍ॅब्ज दाखवून मतपरिवर्तन करवतो
<<<<< लगान मध्ये आमिर खान ऑलरेडीच फ्रंट ओपन बंडी घालून फिरत असल्याने सिक्स पॅक ऍब्ज असेच सहजी दिसत असतील. म्हणून मतपरिवर्तनासाठी पुरेसे ठरले नसणार.

फॅमिली डिनर होतं तर मेहताज कुठे होते? >>> ते फक्त जयसिंग फॅमिलीचं होतं असंच मला वाटलं. त्यात बाप आज घरी जेवायला असणार आहे ही कौतुकाची गोष्ट आणि आनंदाची परमावधी होती. आता या मधे मेहताज कुठे घुसवताय, भरत? Happy

सिक्स पॅक अ‍ॅब्ज >>> तो पहिल्या तासाभरातला कळस फालतू सीन होता. त्या सीन खालोखालचा फालतू कोविड वॅक्सीन आर्ग्युमेंटचा. अजून पुढचा पिक्चर पाहिला नाही.

भरत, नायक गरीब नाहीचे त्याची फॅमिली फक्त जयसिंग इतकी हाय सो नाही. स्टेटस ते नाही त्यांचे. यांची श्रीमंती बऱ्याच पिढ्यांपासून असेल. आणि साध्या सर्जनाला कदाचित त्यांच्या शाळेची फी परवडत नसेल Lol

१२ वी बहुतेक त्यांनी ज्युनियर कॉलेजसारखी घेतली आहे. काही काही शाळांचे आता ज्यु कॉलेज असतात. तसे.

आता भारतात पण कॉलेजेस नी ५ वर्ष इंटिग्रेटेड लॉ डिग्री सुरू केलेली आहे. पण ते IV ची भानगड काय कळली नाही.

कोव्हिड लशीबद्दल>> १२ वी मधल्यांनी आणि ते सुद्धा kejo स्कूल मधल्यांनी इतके मुद्दे मांडले ते खूप. भलत्याच अपेक्षा आहेत तुमच्या Proud

फॅमिली डिनर हे फक्त त्यांचे फॅमिली डिनर होते. व्याही भोजन नव्हते Lol

नादानियांमध्ये त्यांनी सुनील शेट्टीचे नाव देव रंजन चोप्रा आणि महिमाचे नाव शीतल ठेवायला हवे होते. किमान चालून चालून कमावलेल्या पाचशे कोटींचा आफ्टरमॅथ म्हणून मार्केट करता आला असता Proud

फॅमिली डिनर होतं तर मेहताज कुठे होते?
<<<<< ते त्यांच्या फॅमिली डिनरचे मोहताज मेहताज नाहीत असे सूचित करायचे असेल.

नादानियांमध्ये त्यांनी सुनील शेट्टीचे नाव देव रंजन चोप्रा आणि महिमाचे नाव शीतल ठेवायला हवे होते. किमान चालून चालून कमावलेल्या पाचशे कोटींचा आफ्टरमॅथ म्हणून मार्केट करता आला असता Proud
<<<<<<<< Rofl

लगानमधल्या मतपरिवर्तनापेक्षाही फास्ट आहे
>>
मी शिवाजीराजे भोसले बोलतोय मधे ही तेच...

Pages