चित्रपट कसा वाटला - ११

Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53

नवीन चिकवा.

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दारावरचे शिपाई वासुदेवाला अडवतात पण अकबरासारख्या उघडपणे मुघल राजवेषात असलेल्याला सहज आत जाउ देतात असले सीन्सही आहेत.

अहो इथेच कारण दिले आहे

मिडलकलास लव्ह स्टोरी (२०२२) चित्रपट प्राईम वर पाहिला.
छान एंटरटेनिंग वाटला. एक हिरो आणि दोन हिरोईन असलेले चित्रपट नेहमी आवडतातच. चाईल्डहूड ड्रीम आहे ते.
हिरो फार फनी आणि क्यूट होता. संवाद सुद्धा त्याला चुरचुरीत होते. त्याची ग्रेस बघून तरुणपणीच्या इश्क विश्क प्यार व्यार मधील शाहीद कपूरची आठवण झाली.

काईट रनर - प्राइम

आपल्याकडे संक्रांतीला जसे पतंग उडवतात तसे अफगाणीस्तानातही पतंगाचा खेळ चालतो - एक मुलगा पतंग उडवतो आणि त्याचा सहाय्यक फिरकी पकडतो. त्या फिरकी पकडणार्‍याचे आणखी एक काम असते - कटलेल्या पतंगाचा पाठलाग करून त्याला हस्तगत करणे, म्हणून तो काईट रनर. पतंग उडवणार्‍याचा दर्जा वरचा आणि काईट रनरचा खालचा.

ही गोष्ट अशाच एका काईट रनरची - त्याच्या पतंग उडवणार्‍या मालकासमोर घडवलेली, बर्‍याच अंशी तोच त्या गोष्टीला जबाबदार आहे.

अमीर अफगाणीस्तानातल्या एका श्रीमंत माणसाचा मुलगा. हसन त्या माणसाच्या नोकराचा मुलगा - आपला काईट रनर. लहान असला तरी हसन अमीरकरता कुठल्याही थराला जाऊ शकतो. अमीरने म्हटले असते तर लिटरली माती खायची त्याची तयारी असते आणि अमीरकरता तो आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असीफशी पंगा पण घेतो. पण तोच पंगा त्याला खूप महागात पडतो. पतंग उडवायच्या दिवशी कटलेला पतंग आणायला गेलेल्या हसनला असीफ बेदम मारतो. पण रक्तबंबाळ अवस्थेतही हसन तो पतंग घेऊन अमीरच्या बाबांना नेऊन देतोच.

अमीरला हसन आवडत जरी असला तरी तो त्याला खुपतही असतो. कारण नोकराचा मुलगा असला तरी बाबा अमीरइतकेच प्रेम हसनवरही करत असतो. बाबाला अमीरचा घाबरट स्वभाव आवडत नसतो आणि हसनच्या नीडरपणाचे त्याला कौतुक असते. याच कारणाने अमीर आणि बाबा यांच्यात थोडा दुरावा पण निर्माण होतो. बाबाचा एक मीत्र - रहिम - मात्र अमीरच्या दुखावलेल्या मनावर फुंकर घालत असतो. त्याच्या प्रोत्साहनामुळे अमीर कथा लिहायला लागतो. बाबाला ते पण पसंत नसते फारसे.

त्या पतंग उडवण्याच्या दिवसापासून अमीरचा काँप्लेक्स जास्तच वाढतो. तो शेवटी हसनची आणि त्याच्या बाबाची हकाल्पट्टी करण्यात यशस्वी होतो. त्या घटनेनंतर थोड्याच दिवसात रशियन फौजा तो भाग हस्तगत करतात आणि अमीरचे बाबा त्याला घेऊन अमेरीकेत येतात.

पुढे अमीर कथालेखक बनतो. एके दिवशी त्याला रहिम काकाचा फोन येतो आणि तो त्याला भेटायला पाकिस्तानात जातो. पुढे काय होते ते पडद्यावर बघणे जास्त चांगले.

गाजलेल्या पुस्तकावरचा सिनेमा आहे, इथे मायबोलीवर पण त्या पुस्तकावर चर्चा झाली होती ते आठवतय. मी पुस्तक वाचलेले नाही त्यामुळे पुस्तकातले किती सिनेमात आलंय ते माहित नाही. पण स्वतंत्र कलाकृती म्हणून सिनेमा चुकवू नये असा आहे.

दोन काळात सिनेमा घडतो - एक साधारण १९८० असावा दुसरा २०००. दोन्ही काळात एकाच भौगोलिक भागात झालेले बदल, युद्धाने झालेली वाताहत हे कमाल दाखवलं आहे. नांदतं घर आणि नंतर त्याच्यावर आलेली अवकळा विषण्ण करून जाते.

वाळवंट आणि बर्फाच्छादित शिखरे यांनी मिळून बनलेला तो भाग बघताना खूप मस्त वाटते. पण ते मस्त वाटणे फार टिकत नाही.

इंग्लिश ऑडिओ निवडला तरीही सिनेमाचा बराचसा भाग अफगाणी (?) भाषेत आहे. त्यामुळे सबटायटल्स वाचत वाचत सिनेमा बघावा लागतो. तेवढी एकच खोट काढता आली मला. बाकी सिनेमा संपल्यावरही त्याची पकड सुटत नाही तर सिनेमा चालू असताना इतर कमतरता शोधणे अशक्य होते.

एकेकाळाचा श्रीमंत युद्धाने कसा बेघर आणि पर्यायाने गरीब होतो हे बघणे खूप अंगावर येते. सैनिकाची बेशरमी खूप राग आणते. पण सगळ्यात जास्त तगमग होते ती एका कोवळ्या मुलावर झालेल्या अत्याचारांनी. सुरक्षीत जागी आल्यावरही त्या अत्याचारांच्या नुसत्या आठवणींनी तो मुलगा लपून बसतो. आपलं आयुष्य किती सुरक्षीत गेलं म्हणून देवाचे आभार मानले मी त्या क्षणी.

मी बहुदा वाईट घटनांबद्दल जास्त लिहिलय पण सिनेमाचा एकंदर मूड डिप्रेसिंग नाहीये. शेवट तर खूप सुंदर आहे. रक्तपात किंवा इतर असभ्यता कुठेही नाही. अभिनय कुणी केलाय असे वाटलेच नाही - सगळेजण तो सिनेमा जगले आहेत असेच वाटले.

सिनेमा नक्की बघाच. आणि एक तर आधी पुस्तक वाचा नाही तर सबटायटल्स वाचत रहा.

पतंग उडवायच्या दिवशी कटलेला पतंग आणायला गेलेल्या हसनला असीफ बेदम मारतो.>> मी चित्रपट नाही बघितला पण पुस्तक वाचलंय. ही घटना इथे सांगितली त्या पेक्षा जास्त भयावह आहे पुस्तकात.

शर्मिला+१
<तो शेवटी हसनची आणि त्याच्या बाबाची हकाल्पट्टी करण्यात यशस्वी होतो. > याचं कारणही वेगळं आहे.

पुस्तक वाचलेलं आहे, ते फार अंगावर येतं. आत्ता तुमचा रिव्यू वाचताना ही पुढे काय वाचायला लागेल अशा विचाराने तगमग होत होती. सिनेमा नक्की बघेन.

मी चित्रपट नाही बघितला पण पुस्तक वाचलंय. ही घटना इथे सांगितली त्या पेक्षा जास्त भयावह आहे पुस्तकात. >>> १००++
त्यामुळे बघेन की नाही माहित नाही.
एकंदरीत काईट रनर, कबुलीवालार बंगाली बोऊ आणि खुदा के लिये अंगावरच येते.
एके काळाच्या सुंदर देशाची (फिरोझ खानच्या पिक्चरमध्ये बरेचदा अफगाणिस्तानातले शूटिंग असायचे) काय वाट लावून ठेवली आहे.

अमराठी लोकांना यामुळे आधी नसलेली माहिती होईल वगैरे वाचले होते. पण संभाजीराजांना औरंगजेबाने फार क्रूरतेने मारले व त्याआधी ते युद्धे हरले नव्हते, याव्यतिरिक्त नक्की काय माहिती या पिक्चरमधून मिळते? >> ह्याबद्दल आधी लिहून झालेय कि फा ? बेसिक क्युरिऑसिटी जागृत झाली तर लोक चेक तरी करतील ना ? सिनेमा काढायचाय कि डॉक्युमेंटरी ह्याबद्दल निर्मात्याच्या मनात शंका नसावी असे वाटलेय. आपल्याला इतिहास माहित आहे म्हणून आपण त्यापलिकडचे शोधतोय. ज्यांना माहित नाही त्यांच्या मनात कुतूहल निर्माण केले जातेय ना ?

बेसिक क्युरिऑसिटी जागृत झाली तर लोक चेक तरी करतील ना >>>>हे किती लोक कितपत करतील ? आपल्याकडे सिनेमात दाखवतात तोच खरं इतिहास मानण्याची प्रथा पाडली आहे

डोंट मूव्ह: थ्रिलर - नेटफ्लिक्स
आपल्या लहान मुलाचा अपघारी मृत्यूने शोकदग्ध आई आता 'आपण तरी जगून काय राम? ' या विचारात एक निबिड अरण्यात डोंगर माथ्यावर ज्या कड्यावरुन कपारीत तो दुर्दैवी मुलगा पडला त्याच कड्याच्या टोकावर उभी आहे. एका पायचं अंतर आहे आणि तिकडे एक अनोळखी व्यक्ती येते. तिला बोलतं करायचा प्रयत्न करते, त्याचा ही भूतकाळात फार सुखावह नाही. अपघातात त्याने ही त्याची मैत्रिण गमावली आहे. हे सगळं ऐकून ती आई विचार बदलून मागे फिरते. पण त्याच्या अंतस्थ हेतू काही तरी वेगळाच असतो. ती कधी घरी पोहोचेल का?
उत्कंठावर्धक आणि काही प्रसंगी श्वास रोखून धरायला लावणरा चित्रपट आहे.
मला आवडला.

हे किती लोक कितपत करतील ? आपल्याकडे सिनेमात दाखवतात तोच खरं इतिहास मानण्याची प्रथा पाडली आहे >> वेगळे मुद्दे आहेत जाई. कमर्शियल असला तरी सिनेमा बघून ज्यांना माहित नव्हते किंवा वरवर माहित होते तेही गूगल करून चेक करतील कि नक्की काय झाले ? कोण होता वगैरे. आता त्याउप्पर खरा इतिहास काय नि कोनता ह्यात मूळातच इतके वाद आहेत कि जाऊ दे .

*************************स्पॉयलर*****
शेवटी ती त्याला 'थँक्यू' म्हणते. तो सीन घालायला शेवट तसा केलाय वाटलं मला. तो पण त्याची गफ्रे मरते तेव्हा थँक्यू म्हणतो. पण ते थँक्यू ... सिरियल किलर बनायला कारणीभूत ठरलेलं, आणि हिचं थँक्यू, हिच्या जीवनाचं सार इ. इ. हरवलेलं नाही हे समजणारं.
पण दोघेही आपापल्या कारणाने मरणार्‍याला वाचवत नाहीत ... वगैरे ग्यान बाटायला असा शेवट केला असणार वाटलं.

ती छानच दिसते. अर्धा अधिक चित्रपट तिला एक संवाद नाही की शरीराची ढिम्म हालचाल नाही. फक्त डोळ्यांची उघडझाप यावर ती कथा पुढे नेते. कणकण मरत जाण्याचा अभिनय सोपा नसेल. श्वास रोखून बघत होतो मी.

डोन्ट मूव्ह मागे फारएन्डाने दिला होता ना 'बघणेबल' रेको? मला कल्पना आणि सुरुवात आवडली पण पुढे काही तथ्य वाटलं नव्हतं. म्हणजे त्या व्हिलनला त्यातून साधायचं काय होतं हे नीट न दाखवल्यामुळे त्या ऑर्डीलला काही अर्थ उरला नाही.

हो, हो तोच दिसतोय. आपण यांच्या बघणेबलांनाही मान द्यावा आणि यांनी आपल्या रेकोंना इग्नोरास्त्र मारावेत. यामुळे मी नादाला लागले नव्हते याच्या. 'बघणेबल' हा शब्द मुख्य प्रवाहात आला या सिनेमामुळे. Happy

हो हो तोच तो. फा चे पॅकेज कळाले त्या सिनेमामूळे तोच तो Wink

म्हणजे त्या व्हिलनला त्यातून साधायचं काय होतं हे नीट न दाखवल्यामुळे त्या ऑर्डीलला काही अर्थ उरला नाही. >> डायरेक्टरला सब्जाने भरलेले ओरेगॉन दाखवायचे होते - बाकी काही नाही Wink

आपण यांच्या बघणेबलांनाही मान द्यावा आणि यांनी आपल्या रेकोंना इग्नोरास्त्र मारावेत >>> Lol ओये, आता बरेच पाहिलेत! आणि अर्धे का होईना आवडलेतही (म्हणजे हिंदी मिडीयम व दावत-ए-इश्क हे अर्धे अर्धे आवडले होते अशा अर्थाने. ४ रेको पैकी २ आवडले असे नाही Happy ) . पीएस तर मी दोनदा प्रयत्न केला पाहण्याचा.

म्हणजे त्या व्हिलनला त्यातून साधायचं काय होतं हे नीट न दाखवल्यामुळे त्या ऑर्डीलला काही अर्थ उरला नाही. >>> मलाही तसेच वाटले होते. आणि जर निव्वळ थ्रिलर करायचा असेल तर जितका थरार हवा तितका नव्हता.

डोंट मूव्ह: केली अ‍ॅस्टिल्बे साठी बघितला होता >>> मलाही ती "यलोस्टोन" मधे आवडल्याने कुतूहल होते.

बॅक टू छावा चर्चा

आपल्याकडे सिनेमात दाखवतात तोच खरं इतिहास मानण्याची प्रथा पाडली आहे >>> मलाही तसेच वाटले. मी नंतर कित्येक यूट्यूब क्लिप्स पाहिल्या पिक्चर पाहिलेल्या लोकांच्या. "आता खरा इतिहास आम्हाला कळाला" वगैरे चालले आहे. या विषयावरच्या सिरीजवर काही लोकांनी राजकीय पोळ्या भाजून घेतल्या होत्या, आता इतर काही लोक पिक्चरवर घेत आहेत.

आजकाल खरा इतिहासची व्याख्या आपला जो समज आहे त्याला पुष्टी देणारे वर्णन अशी झाली आहे.

>>> सब्जाने भरलेले ओरेगॉन
Lol
मी चुकून ओरेगनो वाचलं!

>>> आजकाल खरा इतिहासची व्याख्या आपला जो समज आहे त्याला पुष्टी देणारे वर्णन अशी झाली आहे
अगदी!

मात्र एकच आहे. I will give them that if that's true. महाराष्ट्रात औरंगजेबाची प्रतिमा स्वराज्याचा व शिवाजी/संभाजी महाराजांचा शत्रू अशी आहे (ती बरोबरच आहे). उत्त्तरेत सर्वसाधारण जनमानसांत कशी आहे कल्पना नाही. इतकी वर्षे राज्य करणारे लोक उत्तम प्रशासक वगैरे असतातच. असावेच लागतात. त्यात आपल्याकडे सुरूवातीला मुघलांचे अन्याय टोन डाउन करण्याकडे कल होता. त्यामुळे जर उत्तरेत ही बाजू माहीतच नसेल, आणि या पिक्चरमुळे ती पब्लिकला जर माहीत झाली तर चांगले आहे. हे प्रत्यक्षात किती खरे आहे मला काहीही माहीत नाही. केवळ हा एक विचार आला तो मांडतोय. महाराष्ट्राला तो प्रशासक म्हणून माहीत नाही व उत्तरेला तो अन्यायकारक म्हणून माहीत नाही - असेही असू शकेल.

फा, ही वरची पोस्ट रिअलिस्टीक आणि रिफ्रेशिंग पर्स्पेक्टिव्ह देणारी वाटली.

आजकाल खरा इतिहासची व्याख्या आपला जो समज आहे त्याला पुष्टी देणारे वर्णन अशी झाली आहे
अगदी! +1

सगळीकडून मारा होत असतो शिवाय, फेसबुक, व्हाटसॲप, ट्विटर. ज्याला जे सिद्ध करायचे आहे किंवा जशा खपल्या काढून हव्या आहेत तसा तसा कस्टमाईझ द्वेष वा कस्टमाईझ अहंकार उपलब्ध असतो, त्याने शिसारी येते. तसे तसे खोटे पुरावेही 'उभे' करता येतात. ऐतिहासिक चित्रपट आल्यावर तर सुनामी येतो या प्रकाराचा आणि हल्ली वरचेवर येत आहेत. ध्रुवीकरण+ सोशल मीडिया+ ऐतिहासिक चित्रपट + barely there सहिष्णुता किंवा टॉलरन्स = कलुषित समूहमन. चित्रपट एक कलाकृती म्हणून चांगला असला तरी हे 'बॅगेज' नको आहे. शिवाय इतिहासातील काही लोक एखाद्या अत्तराच्या कुपीसारखी हृदयाच्या इतकी जवळची किंवा 'सेक्रेड' होऊन बसलेली असतात की त्यांच्यावरील चित्रपट 'चालवून' घेता येत नाहीत. त्यामुळे पाहताच येत नाहीये. बाजीराव मस्तानी, वीर सावरकर, पानिपत आणि छावा मला पाहताच आलेले नाहीत.

अरे ते दोन दोन धागे आहेत छावाचे तिकडे लिहा. दोन काय चार भाग काढा. जगाला इतिहास सांगत फिरा. अट एकच चिकवाचे झाड सोडा. Lol Light 1

काईट रनर -
छान लिहिले आहे माधव, शेवटी डिप्रेसिंग नाही हे लिहिलेत ते बरं केलंत. नोंदवून ठेवला आहे. सबटायटल्ससहित बघेन. Happy

माधवचे काइट रनरबद्दलचे लिहीलेले छान आहे हे सांगायचे राहिले.

अस्मिता - थँक्स.

फेसबुक, व्हाटसॲप, ट्विटर. ज्याला जे सिद्ध करायचे आहे किंवा जशा खपल्या काढून हव्या आहेत तसा तसा कस्टमाईझ द्वेष वा कस्टमाईझ अहंकार उपलब्ध असतो >> हो. आणि तेच तेच आळवणारे व्हिडीओ आपल्यासमोर आपोआप येतात व द्वेष आणखी वाढवतात.

अमित Lol ओके ओके पुढ्चे वर्णन तिकडे.
(आता यावर अमित मनात म्हणेल "म्हणजे आहेच का अजून" Wink )

महाराष्ट्राला तो प्रशासक म्हणून माहीत नाही व उत्तरेला तो अन्यायकारक म्हणून माहीत नाही - असेही असू शकेल. >>> हे पटलं. चांगली पोस्ट, फा.

कस्टमाईझ द्वेष वा कस्टमाईझ अहंकार >>> परफेक्ट! अस्मिता, पूर्ण पोस्ट छान आहे. बाजीराव मस्तानी मी पाहिला. पण बाकीचे पाहिले नाहीत कारण नको वाटलं. त्या नको वाटण्याचं कारण अगदी अचूक शब्दांत मांडलं आहेस.

नाही रे. इथेच लिही. किती नाही म्हटलं तरी मला वाचायची आवड (खुमखुमी) आहेच. Happy छावा फोमो चुकवला तरी छावा चर्चेचा फोमो कसा चुकेल!

Pages