Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
जिगरा पंधरा मिनिटे पाहिला.
जिगरा पंधरा मिनिटे पाहिला. नेहमीचं वातावरण नसल्याने आणि आलियाचा वावर खूप सफाईदार असल्याने पुढे पाहू शकेन.
इथे कुणी पाहिलाय का ? धर्मा प्रॉडक्शन असल्याने सावधानता बाळगलेली बरी.
कजो बहुतेक फक्त निर्माता असावा कारण मुलं मोठी झाली, बिझनेस ट्रीप वर चालली हे आई ज्या घरात म्हणते, ते घर दिल्ली, मुंबईतल्या नॉर्मल श्रीमंत कुटुंबाचे असावे तसे आहे. भला मोठा राजवाडा नाही, कारंजी नाहीत.
टुमदार बंगला, आत पोर्च, कार आत येण्या जाण्याइतपतच अंगण. धर्मा प्रॉडक्शन म्हटल्यावर नोकरी करणार्या माणसाचं कुटुंब सिनेमात असूच शकत नाही म्हणून त्या तयारीने पुढचा सिनेमा पाहीन.
नादानियांमध्ये त्यांनी सुनील
नादानियांमध्ये त्यांनी सुनील शेट्टीचे नाव देव रंजन चोप्रा आणि महिमाचे नाव शीतल ठेवायला हवे होते. किमान चालून चालून कमावलेल्या पाचशे कोटींचा आफ्टरमॅथ म्हणून मार्केट करता आला असता >>>
पुढे १५-२० मिनिटे पाहिला. एका वेळेस त्यापेक्षा जास्त पेशन्स शक्यच नाही. काही दखल घेण्याजोगे नाही दिसले. कॉलेजमधल्या एका मुलीचा मिस्टरी बॉयफ्रेण्ड कोण आहे याबद्दल याबद्दल एका "इलाइट" कॉलेजमधल्या इतर इलाइटांना फारच अवास्तव कुतूहल दिसले. आणि जर इतके कुतूहल असेल तर यातले कोणीही तिचा पाठलाग करून त्या इतक्या फोटोशूटस च्या वेळेस त्यांना पाहात नाही.
पब्लिक असे भर पार्टीमधे केवळ लोकांच्या पार्श्वभूमीबद्दल थेट अपमान करतात का? आपण वेगळ्या स्टेटस मधले आहोत हा अहंकार किंवा गर्व असेल पण तो असा प्रत्येक नॉन-इलाइट समोर मिरवत नाहीत जाहीरपणे. या पिक्चरमधे लोकांचा नेहमीच्या संभाषणात ते सतत दिसते.
तुम्हारा नाम राहूल शर्मा हैं
तुम्हारा नाम राहूल शर्मा हैं क्या ?
नहीं राहूल मेहता.
फिर इतना शर्मा क्यों रहें हो ?
हा 'करमरकर म्हणजे डू डाय डू' च्या पातळी वरचा देहांत प्रायश्चिताच्या लायकीचा संवाद आहे, पहिल्याच १५ मिनिटात !
मस्त आहे जिगरा. उत्कंठावर्धक.
मस्त आहे जिगरा. एंगेजिंग.
फॅमिली ड्रामा असेल असं वाटलं, पण वेगवान निघाला. शेवट थोडा अ आणि अ आहे पण इमोशनली बांधून ठेवलं त्यामुळं इट्स ओके.
मनोज पाहवा खूप दिवसांनी दिसले. बाकि फक्त आणि फक्त आलिया.
धन्यवाद फारेण्ड
(खालच्या कमेण्टसाठी)
राभू - धन्यवाद. रेको आहे
राभू - धन्यवाद. रेको आहे तुमचा असे दिसते. पाहिला नाही अजून. मनोज पाहवाला सत्या मधे पाहिला आहे पण तो मला दिल धडकने दो पासून जास्त आवडू लागला आहे. "हॅलो, हॅलो, तू फ्लोअर्स पे जब है आयी..."
फिर इतना शर्मा क्यों रहें हो ? >>> आठवला तो विनोद
त्यावेळचे सबटायटल्स अजून अचाट होते. Rahul McShy का असले काहीतरी.
जिगरा आवडला नव्हता. अजिबात
जिगरा आवडला नव्हता. अजिबात सुसंगता वाटली नाही. आलिया आणि गोंबार (जेलर) हे फक्त सेव्हिंग ग्रेस आहे त्यात. तिला खरं म्हणजे जास्ती रोल द्यायला हवा होता. स्टोरी चांगली आहे पण फार पाणी घालून सपक केली आहे. फोकस्ड राहत नाही. एक वेळ बघायला ठीक आहे. पण हीच स्टोरी पहायची असेल तर मी आलियाच्या वडिलांचा गुमराह बघेन. श्रीदेवीने जबर काम केलेले. राहुल रॉय व्हिलन आहे त्यात.
अमेजॉन प्राइम वर स्वप्नील
अमेजॉन प्राइम वर स्वप्नील जोशी चा जिलेबी बघितला. का बघितला असं वाटावं असा चित्रपट .वाळवी इतक्या चांगल्या पिच्चर नंतर स्वप्नील शिवानी सुर्वे ला अश्या चित्रपटात बघायचं म्हणजे...एकतर प्रसाद ओक चा डबल रोल, त्यात पोलीस स्वप्नील आणि खुनी कोण ते कोणीही सांगेल, ज्याच्या वर अजिबात शक नसतो तोच खुनी हा कोळून प्यायलेला फॉर्म्युला .मी मधेच कधीतरी झोपले .उठले तेव्हा सगळे जण एकेक करत मेले होते(हे इतर जे घरचे बघत होते त्यांनी सांगितलं) पर्ण पेठे ऍक्टटिंग करण्याचा प्रयन्त करत होती .शेवट बघितला आणि थेटर मध्ये असला पकाऊ पिच्चर वर पैसे वाया नाही घालवले याबद्दल स्वतःचेच आभार मानले.आणि पुष्पां 2 लावला.
देहांत प्रायश्चिताच्या
देहांत प्रायश्चिताच्या लायकीचा संवाद >>>
नादनियां पाहाताना रडतखडत त्याच्या व्हिजन बोर्डच्या सीन पर्यंत पोहोचलो काल. प्रचंड निर्जीव सीन. आता पुढे पिक्चर पहायची इच्छा राहिली नाहीये खरंतर पण 'एक बार कमिटमेंट..' वगैरेच्या स्पिरीटने लढत राहू कदाचित शेवटपर्यंत
प्रायश्चिताच्या लायकीचा संवाद
तुम्हारा नाम राहूल शर्मा हैं क्या ?
तो विनोद (?) पुढे तुम्ही बुद्धाच्या निर्विकार भावाने उरलेला सिनेमा बघावा म्हणून बधीर करण्यासाठी सुरवातीच्या पंधरा मिनिटांत मुद्दामच योजला असावा .
नहीं राहूल मेहता.
फिर इतना शर्मा क्यों रहें हो ?
प्रायश्चिताच्या लायकीचा संवाद आहे, पहिल्याच १५ मिनिटात !
>>>>
Rahul McShy का असले काहीतरी. >>>
राहुल नाही अर्जुन मेहता आहे. जाऊ द्या पण, काही फरक थोडीच पडला असता.
नादानियांमध्ये त्यांनी सुनील शेट्टीचे नाव देव रंजन चोप्रा आणि महिमाचे नाव शीतल ठेवायला हवे होते. किमान चालून चालून कमावलेल्या पाचशे कोटींचा आफ्टरमॅथ म्हणून मार्केट करता आला असता >>
आपण वेगळ्या स्टेटस मधले आहोत हा अहंकार किंवा गर्व असेल पण तो असा प्रत्येक नॉन-इलाइट समोर मिरवत नाहीत जाहीरपणे.
प्रेक्षकांना कसं कळणार पण? ते एकमेकांसाठी नाही तर आपल्यासाठी 'तेच- तेच' बोलतात. 
>>>>>
प्रचंड निर्जीव सीन. >>>> 'मुडदानियां' नाव जास्त चपखल झालं असतं.
मुडदानियां >>> जियो! अगदी
मुडदानियां >>>
जियो! अगदी परफेक्ट!!
फारेण्ड, हा रेको नव्हता.
फारेण्ड, हा रेको नव्हता. इथे लिहायच्या आधी सर्च दिला तर बर्याच जणांना आवडलेला दिसत नाही.
हा मूव्ही करन जोहरच्या टिपीकल शैलीची अपेक्षा धरून सुरू केला होता. सुरूवातीची दहा मिनिटे कोण कुणाचे कोण हेच कळत नाही. हाताळणी तर कजो सारखी अजिबात नाही असे वाटले तर पुढे चक्क अॅक्शन मूवी झाला. एखाद्या मांसाहारी माणसाला महिनाभर साबुदाण्याची खिचडी खायला घातल्यावर अचानक चिकन वाढावे तशी अवस्था झाली. एका काल्पनिक देशात आलियाचा निरपराध भाऊ ड्रग्जच्या आरोपाखाली अडकतो. तिथे कायदे कडक असतात. त्याला सोडवण्यासाठी ती काय काय करते हे एंगेजिंग आहे.
गुमराह मधे सुद्धा शेवटचा प्लान अ आणि अ च आहे. पण तोपर्यंत आपल्याला इमोशनली त्यात बांधून ठेवतो तो पिक्चर पण.
हाताळणी तर कजो सारखी अजिबात
हाताळणी तर कजो सारखी अजिबात नाही असे वाटले तर पुढे चक्क अॅक्शन मूवी झाला. >>कजो डायरेक्टर नाहिये...कुणीतरी वासन बाला आहे..कजो फक्त प्रोड्युसर आहे त्याला कुठुन अॅक्शन वैगरे जमणार आहे.
त्या इलाइटस्मध्ये Orry पण
त्या इलाइटस्मध्ये Orry पण दिसला.
कजो फक्त प्रोड्युसर आहे
कजो फक्त प्रोड्युसर आहे त्याला कुठुन अॅक्शन वैगरे जमणार आहे. >>>
टिव्हीत एकता कपूर आणि मोठ्या स्क्रीनवर कजो हे भारतीय चिसृ च्या राशीतले राहू केतू आहेत.
आपण इथे रसभंग नको म्हणून
आपण इथे रसभंग नको म्हणून इमानदारीत स्पॉयलर अॅलर्टचा इशारा ठ्ळकपणे देतो.
पण सोशल मीडीयात सस्पेन्स मूव्हीच्या क्लिप्स फिरत असतात. त्या पाहिल्यावर तो पिक्चर बघण्यातली मजाच संपते.
मला खामोशची क्लिप इतक्यात आली, पण नुकताच संपूर्ण पिक्चर बघितल्याने नुकसान टळलं.
आपण कितीही प्रयत्न केला तरी त्या वेळी ती क्लिप बघितली जातेच.
जुन्या पिक्चरमधले हम, तिरंगा, क्रांतिवीर, घातक इ. इ. पिक्चर्स क्लिप्स बघून आता बघायची गरज उरलेली नाही. साऊथच्या पण बर्याच क्लिप्स फिरत असतात.
युट्यूब जर गाण्यांना कॉपीराईट लावतं तर अशा क्लिप्सना का नाही लावत ? एकूणच, कॉपीराईटचा जे खूप समजून उमजून विचार करतात ते मूर्ख असा जमाना आहे.
( अवांतराबद्दल सॉरी पण खूप दिवसाचं हे साठलेलं व्यक्त करायचं होतं. )
परवाच्या निर्जीव सीन नंतर
परवाच्या निर्जीव सीन नंतर नादानियाँ पहायचं धाडस झालं नाही . सुनील शेट्टी पाहता यावा म्हणून गोपीकिशन पहायला घेतला आहे. जास्त मजा येतेय
सुनील शेट्टी पाहता यावा
सुनील शेट्टी पाहता यावा म्हणून गोपीकिशन
>>
गोपी च्या पोराचा आयकॉनिक डायलॉग
" दो दो बाप ... "
संगीत अचारी बा(लीश) - बस नाम
संगीत अचारी बा(लीश) - बस नाम ही काफी है.
मुडदानीयातले मुडदे बरे की बाचे लोणचे असा एक धागा काढायला वाव आहे.
अनुराग कश्यपचा "गुलाल" काल
अनुराग कश्यपचा "गुलाल" काल थोडा पाहिला (यूट्यूबने सुचवला). काही वर्षांपूर्वी पाहिला होता व आवड्ला होता. आता पाह्तानाही चांगला वाटला. अभिमन्यू सिंगचे यातले काम आवडले होते व त्याला बरीच संधी मिळेल असे तेव्हा वाटले होते. पण नंतर फारसा दिसला नाही (काही वर्षांनी रामलीला मधे दिसला होता). त्याचा "राजपूत ताठा" अगदी अस्सल वाटतो. मरायची वेळ आलेली असताना सुद्धा "विथड्रॉ" वरचे प्रत्युत्तर वगैरे.
पीयूष मिश्राचे संवाद व गाणी (सरफरोशी की तमन्ना चे त्याचे व्हर्जन, आरंभ है प्रचंड हे गाणे) अफाट मस्त आहेत. "पानी अच्छा है क्या - तेरे लिए बिसलेरी का कुआँ खुदवाये है", "ब्रेन वॉश" चा कन्स्पेट वगैरे धमाल आहे - पिक्चर विनोदी नसला तरी.
सत्या मधला खांडेलकर आहेच पण इव्हन त्यातली परेश रावलची बायकोही यात आहे. अनुराग कनेक्शन असावे. दीपक डोब्रियाल वगैरे नंतर लोकप्रिय झालेले बरेच कलाकार आहेत.
गुलाल नोटेड.
गुलाल नोटेड.
आझाद जेमतेम दहा मिनिट पाहिला. बंद केला.
कसलं कृत्रिम सगळंच.
नादानियांमधे जिमी शेरगिल होता
नादानियांमधे जिमी शेरगिल होता हे वाचून धक्का बसला. म्हटलं काय हे! आपण आख्खा पिच्चर तो सुनिल शेट्टी आहे असं समजून पाहिला.
>> गुलाल नोटेड
>> गुलाल नोटेड
गुलाल तसा थोडासा कल्ट सिनेमा आहे. सर्वांना आवडेलच असा नाहीय पण पियुष मिश्रा ची गाणी मात्र अफाट आहेत. इतक्या वर्षन्नी देखील माझ्या प्ले लिस्ट मध्ये आहेत.
मामी
मामी
संतोष जुवेकर च्या अबोल्यावर
संतोष जुवेकर च्या अबोल्यावर अक्षय खन्ना ची प्रतिक्रिया
https://youtu.be/arQwcbBEINw?si=v4tJv4ZV_r1iJttT
नादानियाँ संपवला एकदाचा.
नादानियाँ संपवला एकदाचा. याहून काही वाईट असूच शकत नाही, असं वाटत होतं. पण आताच फेसबुकवर ही क्लिप दिसली.
हा चित्रपटही शाळेशी संबंधित आहे.
>>> अक्षय खन्ना ची
>>> अक्षय खन्ना ची प्रतिक्रिया

नादानियाँ १५ मिनिटाच्या वर
नादानियाँ १५ मिनिटाच्या वर बघणे अवघड आहे. मी तसा धीराचा माणूस आहे, ' मुंबई कॅन डान्स साला', 'सनम रे', पाहिलेत पण मीही सहन करू शकलो नाही. अगदी पिसे काढण्यासाठीही !
अक्षय खन्ना ची प्रतिक्रिया
अक्षय खन्ना ची प्रतिक्रिया
शूटिंग सोडून मी 'संत्या, संत्या' करत मागे पळालो, पर संत्या गायब...
>>>
तुकड्यातुकड्यात बघा विकु, धीर धरा. सहनशक्ती वाढायला हवी, तुमीच असं म्हणू लागला तर आमी कुणाच्या तोंडाकडं बघावं
अक्षय खन्नावाला व्हिडिओ
अक्षय खन्नावाला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मला २-३ ग्रुप्स मधे फॉरवर्ड आला.
अक्षय खन्ना
अक्षय खन्ना
Pages