चित्रपट कसा वाटला - ११

Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53

नवीन चिकवा.

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोघा लीडचे संवाद डब केलेत अशी मला खात्री आहे.

> जिमी शेरगील नाही सिनेमात, विकुंनी रॉन्ग नंबर दिला जुगल हंसराज आहे.
हे म्हणजे अमूक गाणे शब्बीर कुमार ने नव्हे तर मो. अझीझ ने गायले आहे असे म्हणण्यासारखे झाले.

शाळेच्या कँपसमध्ये दोघांना एकटंच बागडता येईल अशा असंख्य जागा आहेत. शाळेत क्लासरूम्स नाहीत. पण स्विमिंग पूल आहे. सगळी मुलं बघावं तेव्हा बागेत बसलेली असतात. >>> Happy Happy

शाळेसंबंधी पिक्चर असून तीन तासात एकदाही एकही वर्ग दाखवलेला नसण्याचे रेकॉर्ड मोहब्बतें ने सेट केले आहे. हा पिक्चर तेच करतोय असे दिसते.

हे म्हणजे अमूक गाणे शब्बीर कुमार ने नव्हे तर मो. अझीझ ने गायले आहे असे म्हणण्यासारखे झाले. >>> Lol

Lol विकु

भरत, म्हणूनच हेलिकॉप्टर बाबा. पुढे सिनेमात आले आहे की हा घोडा जन्माला आला तेव्हा बाबा डॉक्टर असल्याने दुसरी सर्जरी आल्याने नेमके नव्हते. त्यामुळे त्यांनी ठरवले की हा मोठा क्षण मिस झाल्याने आता मुलाच्या आयुष्यात जन्मभर पचपच करायचे. आई शिक्षिका व बाबा डॉक्टर असल्याने हा गरीब आहे खुशीपेक्षा. नंतरच्या शॉटमधे व्हर्साची का तत्सम ड्रेस घालून 'बाबा, तुम्हाला हॉट चॉकलेट आणते हं'. असे म्हणून नंतर सरकारने कोरोना व्हॅक्सिनबाबत काय धोरण ठेवायला हवे हे सांगू लागली तेव्हा टडोपाच आले. Happy

इब्राहिम आणि खुशीच्या डोळ्यांत चमकच नाही. वयाने लहान असूनही उत्साह व जिवंतपणा नाही. त्यामुळे ते स्क्रीनवर सुंदर भासले तरी निर्जीव वाटत राहतात. तेच शाहरुख नवीन आला होता तेव्हा कसा उत्साह व एनर्जीने सळसळता दिसायचा. रूढार्थाने देखणा नसूनही त्याच्याकडेच लक्ष जायचं. त्यालाही काही तरी करून दाखवायची जिद्द होती, तीही दिसते कामात. ह्यांना महत्त्वाकांक्षा नाही, सर्वाहव्हलची भीती नाही. ते सगळं वावरात दिसतं. सगळा एनर्जीचा खेळ असतो, काही जणांची एनर्जीच अशी असते की ते लक्ष वेधून घेतातच, स्क्रीन व्यापतातच.

कजो चा आहे का नादानियां ?
बहुतेक माबोचा वाचक असेल. आपल्या पिक्चरचं बरेच दिवसात रोस्ट झालेलं नाही म्हणून बनवला असेल त्याने.

नादानियां पूर्ण बघितला. हो, बंडलच आहे पण खात्री झाली > >> आख्ख्या पोस्टला Rofl तुफान आवडली.

ते ">>>" देऊन लोल करायचे तर सगळीच वाक्ये द्यावी लागतील. धागाच काढ. अक्षरं फोडून वाचणे, सिक्स पॅक दाखवून डीबेट जिंकणे, अनन्या पांडे मेरिल स्ट्रीप आणि बरेच काही Happy

सुनील शेट्टीची ९०ज ची "सपूत", "रक्षक" इमेज डोक्यात असल्याने तो डॉक्टर म्हणून डोक्यात येतच नाही. फ्रेण्ड्समधला जोई एका शो मधे न्यूरोसर्जन दाखवतात तसे.

मी सिनेमा बघायची शक्यता शून्य आहे, पण अनन्या पांडे is not that bad - 'खो गये हम कहाँ' आणि 'CTRL' हे दोन सिनेमे पाहिलेत मी तिचे. मला फार अपेक्षा नव्हत्या, पण she was a happy surprise.

धन्यवाद फा, जुगल हंसराज डॉक्टर आहे. सुशे जयसिंग आडनावाचा कोट्याधीश आहे.

Lol जोई सारखाच आहे की जुगल वजा धमाल करा म्हणजे काय उरते ते मोजा. ते मेरिल -अनन्या मीम आलं होतं मला. अजूनही नावं ठेवली होती पण ते मी नीट वाचलं नव्हतं.

स्वाती, मी तो 'खोगये' पाहिला आहे पण मला खुशीला नावं ठेवताना अनन्या योग्य वाटली. Proud

राभु, शोधून आले. हो, कजोचाच आहे.

सुहाना व खुशी एकमेकींना खूप वर्षांनी भेटून अत्यानंदाने किंचळतात असा सीन होता तर ती किंकाळी चक्क हॉरर सिनेमाची होती
>>
त्यांना त्यांचा आई बापाचं आर्मी मधलं ' मैं तो हूं पागल मुंडा तू है मेरी सोणी कुडी ' गाणं दाखवलं असेल...

नादानियां Uhoh
धनिला नादानियां बघून बघू असं वाटत असल्याने कदाचित बघूच आम्ही Proud ( मला खरंतर यापेक्षा जानी दुश्मन चांगला असेल असंच वाटतंय Wink ) मग आपण दोघी मिळून पुन्हा नावं ठेवू, अस्मिता Happy

३ इडियट्स मध्ये अमीरला पडलेला प्रश्न खरा होता असे त्या हिरो-हिरवणीला बघून समजले - नाक मध्ये येणारच
>>
त्याच्या आधी हाच प्रश्न लॉर्ड बॉबी अन् प्रीती झिंटा ला सोल्जर मधे पडला होता

थोडं खाल्ल्यासारखं करून डायरेक्ट 'कामाला' लागतात. असं पानात टाकून देऊ नये, पोटभर जेवून मग काय करायचे ते करावे
>>>
कणेकर आठवले

"वाळ्यांव..."

ॲन्की , सगळ्या पोस्ट वाचून 'किती हा व्यासंग' म्हणतेय. Happy Happy

मला खरंतर यापेक्षा जानी दुश्मन चांगला असेल असंच वाटतंय
>>> हो, आहेच. मी दोन्ही पाहिलेत. Lol

त्यामुळे ते स्क्रीनवर सुंदर भासले >>> का ही ही हं अस्मिता (जान्हवी टोनमध्ये). अशाने तुमची आणि पर्यायाने तुमच्या रेकोची विश्वासार्हता कमी होइल हो Happy

जिमी शेरगिलची तुलना शब्बीर कुमारबरोबर केल्याबद्दल मी या ठिकाणी विकुंचा तीव्र णिषेद करते अध्यक्षमहोदय!!!

पिसं काढण्यासाठी परत बघावा का नादानियां?

जिमी शेरगिलची तुलना शब्बीर कुमारबरोबर केल्याबद्दल मी या ठिकाणी विकुंचा तीव्र णिषेद करते अध्यक्षमहोदय >> I second it !!!

णिषेद णिषेद णिषेद

माधव- नाही, नाही. Happy 'भासले' म्हटलेय 'दिसले' नाही. "जरी का शृंगारिले मढे" या अर्थाने घ्या. तुम्ही माझ्या रेको-दुकानाचे "गोल्डफिश मेम्बर" आहात. जाऊ देणार नाही असंच. Happy

माझेमन, एकदाही बघू नये असा सिनेमा तुला परत का बघायचा आहे. Happy

राभु, शोधून आले. हो, कजोचाच आहे. >> ते वरती कॉलेजचं वर्णन वाचलं आणि कजोचा असावा ही शंका आली.
समजा चोप्रांचा असता तरी फारसा फरक पडला नसता. दगडापेक्षा वीट मऊ ! (पुलं ची वीट वरची कोटी द्यायचा मोह आवरला )

( मला खरंतर यापेक्षा जानी दुश्मन चांगला असेल असंच वाटतंय Wink>>> आहेच, मी फार पुर्वी बघितलाय त्यामुळे पिसे काढणेबल आहे हे आठवतय...निदान पिस तरी अस्सल निघतिल..

काल इथल्या रेकोपैकी काही सिनेमे शोधायचा प्रयत्न केला. पण डोंगरांमुळे रेंजच मिळत नाही. खाली सावंतवाडीला गेल्यावर कदाचित बघता येईल.
एकाने पेन ड्राईव्हमधे विधू विनोद चोप्राचा खामोश मला दिला. डालो केलाय. थोडा पळवत पाहिला.
बघणेबल आहे. ८० च्या दशकात असा मूव्ही बनवलाय हे डोक्यात ठेवून बघायचाय. कारण त्या वेळी खून करायचा म्हणजे खूनी गमबूट, ओव्हरकोट, मोठी हॅट असा जामानिमा घेऊन वावरायचा. पावसात खून केला कि बहुतेक पोलिसांना सापडत नसेल. तसंच ज्याचा खून करायचा आहे (बहुतेक वेळा स्त्री पात्रं) ते ज्या घरात आहे ते घर दिसू लागलं कि हातात खूनाचे हत्यार (चाकू, पिस्तुल, कुर्‍हाड ) घेऊन तो हात थोडा लांब धरायचा. म्हणजे ऐन वेळी विसरायला नको.
बॉलीवूड ची खूनी रेसिपी पाहून जर कुणी पावसात खून केला तर त्याच्या गमबुटाचे ठसे उमटतील आणि पाणी गेल्यावर ते कडकडीत होऊन बसतील. हत्यार घेतलेला हात लांब धरल्याने रस्त्याने जाणार्‍यालाही खूनी इसमाचं स्केच करता येईल.
तर मुद्दा असा कि अशा वातावरणात असा सिनेमा बनवताना प्रेक्षकांना एकदम कल्चरल शॉक नको म्हणून थोडीफार तडजोड केलेली असेल तर इग्नोर करणार आहे.
( खामोश पाहिला नाहीस अजून ? या प्रश्नावर मान खाली घालून बसायची वेळ इथून पुढे येऊ देणार नाही. त्यामुळे सध्या रेकोज बाजूला ठेवतेय)

नादानियाँ बघायला सुरुवात केली आहे. खुशी जान्हवी पेक्षा बरीच बरी वाटली. सैफ किड पण नॉट बॅड. त्याचा पहिलाच पिक्चर आहे हे लक्षात घेता ओके वाटला. त्याचा बाबा सुरुवातीच्या पिक्चर्स मधे याहून जास्त पपलू वाटला होता. पण नाकाचं काहीतरी करायला हवंय त्याने. चेहऱ्याकडे पहिलं की डोळ्यांत खुपतं.
बाकी पिक्चर एक तासभर पाहिला. नुसताच फालतू टाईमपास आहे. एंगेजिंग टाईमपास पण नाही. पण आता सुरू केलाच आहे तर पूर्ण करेन पिक्चर. निदान सुनील शेट्टी तरी बरा दिसलाय Proud

अस्मिता, शाहरुखशी या दोघांची तुलना नकोच करूया. ते वेगळं रसायन आहे टोटली. Happy

सताच फालतू टाईमपास आहे. एंगेजिंग टाईमपास पण नाही. पण आता सुरू केलाच आहे तर पूर्ण करेन पिक्चर. >>> मी पण. सैपुत्र बरा वाटला. अजून acting बघावी तिथपर्यंत पोहोचले नाहीये. School भारी आहे बाबा यांचं.

तेच शाहरुख नवीन आला होता तेव्हा कसा उत्साह व एनर्जीने सळसळता दिसायचा. रूढार्थाने देखणा नसूनही त्याच्याकडेच लक्ष जायचं. त्यालाही काही तरी करून दाखवायची जिद्द होती. >> अस्मिता, अनुपमा चोप्राचे किंग ऑफ बॉलिवूड नक्की वाच. खूपच सुंदर गोष्ट सांगितली आहे तिने शाहरूखच्या सुरुवातीच्या दिवसांची. त्याचे दिल्लीतले नाटकं करण्याचे दिवस, मग मुंबईत मालिकांचे दिवस, आणि मग सिनेमातले दिवस. मस्त लिहिले आहे पुस्तक. त्याच्या एनर्जीचे गमक त्यात आलेले आहे.

अस्मिता,
इब्राहिम आणि खुशीच्या डोळ्यांत चमकच नाही. वयाने लहान असूनही उत्साह व जिवंतपणा नाही....... तेच शाहरुख नवीन आला होता तेव्हा कसा उत्साह व एनर्जीने सळसळता दिसायचा. ...... त्यालाही काही तरी करून दाखवायची जिद्द होती, तीही दिसते कामात. ह्यांना महत्त्वाकांक्षा नाही, सर्वाहव्हलची भीती नाही. ते सगळं वावरात दिसतं. .....

>>> हा पॅरा आवडलाय!

निदान सुनील शेट्टी तरी बरा दिसलाय
>>>> Lol अरे देवा! तुझ्याच लेखातला दृष्ट लागू नये म्हणून तीट लावलेला सुशे आठवला. अंधश्रद्धा निर्मूलन झाले त्या दिवशी. Proud
ते वेगळं रसायन आहे टोटली. >>> +१ अगदी.

धनि, फारच थॅंक्यू. Happy पोस्ट आवडली. एनर्जीचे गमक वाचायला आवडेलच. विकी पेज बघून आले. King of Bollywood and the seductive world of Indian cinema - इंटरेस्टींग वाटतेय.

ललिता प्रीती, थॅंक्यू. Happy

चिकवाने 'नादानियांचे' झाड धरले आहे. Happy येऊ द्या.

नादानिया इतका फालतु आहे आणि ती २ पोरं तर फारच टाकाऊ .. इब्राहिमचं कॉन्स्टिपेटेड अ‍ॅक्टिंग (!) बघून आता मला अर्जुन कपुर, अनन्या पांडे इ. नेपोकिड्स बद्दल आदर वाटु लागलाय Proud

हुलू वर "किल" हा हिंदी पिक्चर पाहिला. तुफान व्हायोलन्स व बहुतांश पिक्चर मारामार्‍यांचे सीन्स आहेत. पण वेगवान आहे आणि कलाकारांची कामे चांगली आहेत. सतत हाय अ‍ॅड्रीनेलिन अ‍ॅक्शन आहे. असे पिक्चर आवडत असतील तर बघा. लीड हीरो पेक्षा लीड व्हिलनचे काम मस्त आहे. राघव जुयाल हे त्याचे नाव आहे. त्याला कोठेतरी पाहिल्यासारखे वाटते. मात्र विकीवर चेक केल्यावरही नक्की कोठे ते आठवले नाही. तो बर्‍याच शोज मधे असतो असे दिसते पण ते पाहिलेले नाहीत. त्यामानाने हीरो (जरी दिसायला चांगला असला तरी) ८०% पिक्चर व्हिलन्स कडे संतापाने बघत दिसेल त्याची धुलाई, व उरलेला पिक्चर हिरॉइनकडे प्रेमाने बघायचे इतक्याच डायमेन्शनमधे त्याचा रोल आहे.

Pages