Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
मलापण आवडला धुमधाम. अस्मिता
मलापण आवडला धुमधाम. अस्मिता छान पोस्ट .
मोनोलॉग आवडला तो अजूनही कित्येक जणींना रिलेट होतो यापेक्षा दुर्दैव नाही. परिस्तिथी वरवर बदलली आहे बंधन तीच आहेत यातही एवढ्या शिकलेल्या ( मुलगा प्राण्यांचा डॉक्टर आहे)हिरोला एकटीला भेटायला तिला लग्नाआधी चांसच भेटत नाही सगळा परिवार प्रत्येक भेटीत आहेच ,मग बोलणार तरी कधी आणि यात मुलांचही काही चालत नाही . ज्या महत्वाच्या आणि नंतर कळलेल्या प्रतीक आणि यामी दोघांच्याही गोष्टी जर का ते त्या प्रसंगात पडले नसते तर स्पष्टपणे बोलले असते का!
तरी याचा शेवट सुखांत आहे दोघे आहे तसे समजून घेतात नाहीतर चुकीच्या माणसाशी लग्न झालं की सान्या च्या Mrs सारखी गत होते.
शिवरायांची गारद नको तिथे
शिवरायांची गारद नको तिथे अस्थानी आणि अकाली म्हणणारे लोक फारच डोक्यात जातात. कोण तरी जरा चांगले पाठांतर असलेला एखांदा शाना बेंबीच्या देठापासून ओरडतो मग बाकीचे लै कौतुकाने हात जोडून वगैरे उभे राहतात. काय क्रिन्ज वाटते, येस येस वि गेट इट. तिकडे फ्रांस बीन्स मध्ये नेपोलियन वगैरे लोकांच्या गारदी म्हणणारे असले एन्थु लोकं असतील काय अचानक कुठेपण?
सगळा परिवार प्रत्येक भेटीत
सगळा परिवार प्रत्येक भेटीत आहेच >>> तो सीनही मस्त आहे. आधी तिला एकटीला खिडकीतून पाहून दोन कॉफी किंवा काहीतरी ऑर्डर देतो. मग एकेक करत इतर लोक उतरून तेथे "हम साथ साथ है" सुरू होते
धूम धाम मी पण पाहिला. चांगला
धूम धाम मी पण पाहिला. चांगला टिपी आहे. ज्या क्षणाला चार्ली कोण/ काय आहे हे ऐकले त्या सेकंदाला मला समजले तो कुठे असणार आहे त्यामुळे जरा प्रेडिक्टेबल झाले.
पण तरी सिनेमा एकदा बघण्याचा लायकीचा नक्कीच आहे. मला तो यामीचा मोनोलॉग मात्र बोअर झाला. कॉमेडि सिनेमात इतका लांब सिरियस मोनोलॉग कशाला असे वाटले.
यामीच्या मोनोलॉग मधला मुद्दा
यामीच्या मोनोलॉग मधला मुद्दा बरोबर आहे पण त्या चित्रपटात तो उगाचच एक सामाजिक मुद्दा आणायचा म्हणून आणलाय असं वाटलं मला.
बाकी चित्रपट मस्त.
मला सामाजिक मुद्दा न वाटता
मला सामाजिक मुद्दा न वाटता त्या क्षणी तिला जे तीव्रतेने वाटले ते ती बोलून गेली असं वाटलं. कारण त्याला हा खोटेपणा वाटत असतो. फेमिनिझम असून/नसून तिच्या कॅरेक्टरचे वाक्ताडण किंवा निर्भीडपणे समजावून सांगणे. तिचं कॅरेक्टर असंही विचारपूर्वक-ठरवून बोलणाऱ्यांपैकी नव्हतंच. सगळंच impulsive करतेय ती, त्यात हेही. बोलणं असो वा मारामारी, थोबाड-फोड एनर्जी आहे तिची.
थॅंक्यू सिमरन.
3000 Years of Longing / Prime
3000 Years of Longing / Prime Video (India)
दिव्यातल्या जिन्हंची गोष्ट पण एकदम वेगळ्या संदर्भात. तिच्या घरातल्या एका वस्तूमधून जिन्न बाहेर पडतो आणि तीन इच्छा मागायला सांगतो.
ती त्या तीन इच्छा मागते का ? कि वेगळंच काही घडतं ? जिन्न किती वर्षांपासून अशी गुलामी करत असेल ? आधीच्या त्याच्या मालकांनी काय इच्छा मागितल्या होत्या ? असे प्रश्न जर कधी तरी पडले असतील तरच बघा. नाहीतर बोअर होईल
एस्केप फ्रॉम मोगादिशु (प्राईम व्हिडीओ इन)
सोमालियाच्या कॅपिटल सिटीमधे एक कोरीयन टीम येते. सोमालिया सोडून जायच्या क्षणाला दंगे सुरू होतात. तिथल्या भारतियांवर हल्ले सुरू होतात. हे कोरीयन पण अडकतात. भयाण वातावरण निर्मिती, ड्रामा, उत्कंठा आहे. अशा प्रकारचा चित्रपट कधीच पाहिला नव्हता. खूपच वेगळा वाटला.
The covenant ( Prime Video) - Guy Ritichie
अफगाणिस्तानवर या आधी चार पाच सिनेमे पाहिले होते. त्यातला एक हिंदीत होता. या सिनेमाबद्दल इथे जास्त लिहू शकत नाही.
वॉर मूवी पण नाही म्हणता येत. अफगाणिस्तान मधे अमेरिकनांच्या एका टीमवर हल्ला होतो. बाकीचे सगळे मरतात पण एक जण वाचतो. तो जखमी असतो. त्याचा जीव तिथला एक स्थानिक वाचवू पाहतो. अमेरिकनाचा जीव वाचवण्यामुळे तिथले सगळे त्याच्या विरोधात जातात आणि त्याला मारण्यासाठी शोधत असतात. अशा वातावरणात कुणी काय केलं असतं ? गाय रिची फॅन्स साठी खास आहे.
मला सामाजिक मुद्दा न वाटता
मला सामाजिक मुद्दा न वाटता त्या क्षणी तिला जे तीव्रतेने वाटले ते ती बोलून गेली असं वाटलं. >> +! परत त्याला हे सगळे त्यालाच उद्देशून नव्हते हेही सांगते
त्या वेळी तो एक ईज ही बॉदरिंग्स यू म्हणाणारा रोमियो येतो ते क्लासच अहे.
काय म्हटलं आहे यापेक्षा कुणी
काय म्हटलं आहे यापेक्षा कुणी म्हटलं आहे याला जास्त महत्त्व असतं (असं पुलंनी म्हटलं आहे
) हे परत एकदा पटलं
शिवाजी महाराजांची गारद हा शब्दप्रयोग मीही यापूर्वी ऐकलेला होता. आत्ता गूगल केल्यानंतर 'आस्ते कदम' पासून ती सुरू होते असं दिसतंय. मला 'प्रौढप्रतापपुरंदर'पासून पुढची माहिती होती फक्त. असो!
कालच छावा बघितला. अतिशय
कालच छावा बघितला. अतिशय चांगला चित्रपट आहे. सर्वांनी चांगली काम केलीत. स्मृती मंधना सोडून. मी गेलो त्या थिएटरला कोणी घोषणा दिल्या नाहीत, कोण नऊवारी नेसून नव्हते की कोणी गारद ऐकवली नाही.
वावे हो, आस्ते कदम पासून
वावे हो, आस्ते कदम पासून सुरुवात सर्वांना माहीत नव्हती, किंवा माहीत असून सर्व तिथून नाही बोलायचे. आता सारखा गूगल जमाना नव्हता. हे ज्ञान एका पिढीतून दुसऱ्या पिढीत ती आवड जोपासल्याने जायचे.
अरे हो, आणि आम्ही आईकडून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे वंशज आहोत. हे माझ्या आईने माझ्या मुलीला पण सांगितले आहे. पण ते एक असो. इतकी चर्चा झाली म्हणून सांगितले. उगाच त्याला फाटे नको.
स्मृती मंधना सोडून >>> याचा
स्मृती मंधना सोडून >>>
याचा इम्पॅक्ट इतका आहे की मला रश्मिका आठवायला पाच मिनिटे लागली 
आम्ही आईकडून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे वंशज आहोत >>> रिस्पेक्ट! याला कोण कशाला फाटे फोडेल? तुझ्या इथल्या "मतां"वर भरपूर फाटे फोडू. पण हे पर्सनल आहे.
शिवाजी महाराजांची गारद हा शब्दप्रयोग मीही यापूर्वी ऐकलेला होता. आत्ता गूगल केल्यानंतर 'आस्ते कदम' पासून ती सुरू होते असं दिसतंय. मला 'प्रौढप्रतापपुरंदर'पासून पुढची माहिती होती फक्त. असो! >>> हे काहीच माहीत नाही.
राभू - द कॉव्हेनंट मलाही आवड्ला होता. नक्कीच रेको आहे.
रिस्पेक्ट! >>> +१
रिस्पेक्ट! >>> +१
स्मृती मंधना सोडून >>> Lol
स्मृती मंधना सोडून >>> Lol याचा इम्पॅक्ट इतका आहे की मला रश्मिका आठवायला पाच मिनिटे लागली
फारएण्ड, माझे पण असेच झाले. तुमची प्रतिक्रिया वाचल्यावर कळले की ती रश्मिका आहे चित्रपटात. योगायोगाने टाटा आयपील मधली बंगलोर महिला टिमच्या मॅचचे हायलाईट्स पहात होतो तरी वरच्या प्रतिक्रियेत रश्मिकाऐवजी स्मृती लिहीले आहे हे लक्षात आले नाही.
बिचारी स्मृती, चांगले क्रिकेट खेळून सुद्धा रश्मिकाच्या छावामधल्या रोलने बदनाम होणार...!!
तिचा मोनोलॉगही आवडला
तिचा मोनोलॉगही आवडला
>>> मी पिक्चर नाही पाहिला. पण तो मोनोलॉग पाहिला कुठेतरी. अगदी अगदी वाटलं.
स्मृती? रश्मिकाला संवाद नाहीयेत तेव्हा ती बरी ऍक्टींग करते. मुकपटांत चांगलं करीअर झालं असतं तिचं.
@ऋन्मेष विपू पहा.
Thanks Farend.
Thanks Farend.
If possible, please watch "3000 years...". It's an intelligent movie.
Extremely Sorry for not writing in Devnagari. I need to install keyboard for Android once again.
»»» @ऋन्मेष विपू पहा.
>अवांतर<
»»» @ऋन्मेष विपू पहा. Submitted by माझेमन on 21 February, 2025 - 08:47
हेच आठवलं एकदम
बहुतेक ऋन्मेष सोडून सगळ्यांनी
बहुतेक ऋन्मेष सोडून सगळ्यांनी बघितली वाटतं
फा आणि रमड, धन्यवाद
फा आणि रमड, धन्यवाद
माझेमन बघितले मी विपु
इतर धाग्यांवरचे प्रतिसाद सुद्धा वाचले. मनात रिप्लाय तयार झाले. पण आता टाईप करायला वेळ नाही. फक्त तुम्हालाच उत्तर दिले. बाकी ऑफिस संपल्यावर बघू...
गारद - हा अर्थ मलाही माहिती
गारद - हा अर्थ मलाही माहिती नव्हता.
धूमधाम - विशलिस्टीत टाकलाय.
गारद - हा अर्थ मलाही माहिती
गारद - हा अर्थ मलाही माहिती नव्हता. >> +१. गार्ड या अर्थाने पोर्तुगीज भाषेतूनच आला असणार. भालदार चोपदार म्हणजे गार्ड किंवा गारदी असावेत. त्यांची ललकारी ती गारद.
मोनालिसा स्माईल इथले वाचुन
मोनालिसा स्माईल इथले वाचुन पाहिला. खुप सुंदर आहे. ज्यानी इथे लिहिले होते त्यांचे आभार.
मोनालिसा स्माईल इथले वाचुन
मोनालिसा स्माईल इथले वाचुन पाहिला >> कुठे आहे ?
मोनालिसा स्माईल >> ज्यूलिया
मोनालिसा स्माईल >> ज्यूलिया रॉबर्ट्सचा ना?
ईज ही बॉदरिंग्स यू म्हणाणारा
ईज ही बॉदरिंग्स यू म्हणाणारा रोमियो येतो ते क्लासच अहे >>>
त्यालाही फटकारते ती
पण बॉदरिंग्स वरून "हॅलो, हॅलो, तू फ्लोअर्स पे जब है आयी..." गाणे आठवले (दिल धडकने दो). या सुरूवातीच्या ओळींमधून मस्त रंगत जाते ते गाणे
रानभूली - धन्यवाद रेको बद्दल. प्राइम व्हिडीओ वरचे सगळे पिक्चर सर्व एरियात उपलब्ध असतीलच असे नाही. पण चेक करतो.
मोनालिसा स्माइल गेल्या ३-४ दिवसांत कोठेतरी ब्राउज करताना दिसत होता. लक्षात नाही. एकेकाळी चर्चेत होता. पाहिलेला नाही. ज्युलिया रॉबर्ट्स अॅक्ट्रेस म्हणून आवडते - एरिन ब्रोकोविच ई. पण तिच्या सौंदर्याची राजकुमारच्या पिक्चर मधले सपोर्टिंग कॅरेक्टर्स त्याची इण्ट्रो करताना तारीफ करतात तशी जी तारीफ चालते तितकी काही ती भारी बिरी वाटत नाही.
मो स्मा नेफ्लि का प्राईमवर
मो स्मा नेफ्लि का प्राईमवर आहे, नक्की कुठे ते आठवत नाही. तेव्हा विशीत असलेल्या गोड मुली आहेत. व्हाय विमेन किल् मधली बेथ अॅन अगदी गोड व लहान दिसते.
ब्युटीफुल गेम - नेटफ्लिक्स वर
ब्युटीफुल गेम - नेटफ्लिक्स वर
छान सिनेमा, होमलेस लोकांना एकत्र करून त्यांचा फुटबॉल वर्ल्ड कप घेतला जातो आणि त्या साठी कशी टीम गोळा करतात त्यांचे प्रॉब्लेम आणि मग स्पर्धा
स्टोरी बऱ्यापैकी क्लिशे आहे कारण असे असंख्य सिनेमे आलेत पण ट्रीटमेंट छान घेतली आहे
साऊथ आफ्रिका आणि जपान ची कोच फारच धमाल आणतात
नंतर मग चेक केलं तर खरोखरच दर वर्षी ही स्पर्धा होते वेगवेगळ्या देशात
अत्यंत गरीबी, बेघर लोकांना एक उमेद द्यायचं काम करते ही स्पर्धा
मस्त वाटलं, एकदा नक्कीच बघण्यासारखा
फॅमिली मुव्ही अगदीच
बेघर लोकांच्या फुटबॉलचा
बेघर लोकांच्या फुटबॉलचा पिक्चर मी सुद्धा पाहिला होता. हाच असावा. छान होता. त्यांना दोन बाहेरचे चांगले प्लेअर मिळतात आणि त्यांच्या जीवावर जिंकतात तोच का..
बॉलीवूड जॉन अब्राहम आणि अर्शद वारसी यांचा गोल चित्रपट सुद्धा छान होता. स्पेशली क्लायमॅक्स. जेव्हा त्याला आपल्या बापाबद्दल समजते आणि तो नवीन क्लब सोडून आपल्या जुन्या क्लब मध्ये जातो..
द पॅसेज हा जुना सिनेमा पाहिला
द पॅसेज हा जुना सिनेमा पाहिला. ( डिव्हीडी -लीगल कॉपी वर पाहिला असल्याने ओटीटी वर कुठे आहे का हे माहिती नाही).
अँथनी क्वीन यात वयस्कर वाटतो म्हणजे हा याच्या आधीच्या वॉर मूव्हीज पेक्षा बर्याच काळाने आलेला दिसतो. सिनेमॅटोग्राफी, रंग अशा टेक्निकल गोष्टीत मॉडर्न असल्याचे जाणवते. वॉर मूवी रादर स्पाय मूवी च्याच धाटणीने जातो. अँथनी क्वीन सारखा रांगडा हिरो सुद्धा आहे. थरार आहे, काही वेळा चक्क भयपट पण वाटतो.
पण.... (इंग्रजी सिनेमाला नावं ठेवताना काळीजच लागतं)
याच्या जुन्या पिढीतल्या फ्रेंडसपेक्षा हा कमी पडला आहे असे वाटते. काही तरी मिसिंग आहे. भट्टी जमून आलेली नाही. श्वास रोखून धरायला लावणारा प्रसंग आहे का ? तर हो आहे. पण मग नंतर तो ताण जाणवतो का ? तर नाही. विस्कळीत विस्कळीत सरकत राहतो, अचानक काही तरी घटना घडत जातात.
वॉर मूव्हीज मधे गन्स ऑफ नेव्हरॉन सर्वात आवडला. त्या खालोखाल व्हेअर इगल्स डेअर आवडला. डंकर्क राहिला आहे लिस्टमधला.
मला तरी हा फसलेला वॉर मूव्ही वाटतो. ( युद्ध पटांच्या चाहत्यांची क्षमा मागून)
आज थिएटर मधे बघून आले छावा.
आज थिएटर मधे बघून आले छावा.

ओके - ट्रेलर वरून वाटला होता तितका वाईट नाही. देअर आर सम गुड मोमेन्ट्स.
पण तरी एका पाठोपाठ एक लढाया, गिमिक्स जास्त आणि कथानक , कॅरेक्टर बिल्डिंग कमी असे वाटले.
शेवटची संगमेश्वर ची ड्रॅमॅटिक लढाई छान घेतली आहे, तो बहुधा हाय पॉइन्ट म्हणेन मी. मग तो बहुचर्चित टॉर्चर सिक्वेन्स. अगदी हौसे हौसेने २५ मिनिटे टॉर्चर दाखवून संभाजीने तो सहन करणे हे डिट्टेल मधे दाखवले त्यापेक्षा अजून वेळ इतिहास, कॅरेक्टर बिल्डिंग मधे वापरला असता तर चांगले झाले असते.
आता म्हणजे नॉन मराठी लोकांना संभाजी नामक एक शूर योद्धा होता हे कदाचित नावापुरते कळेल पण बाकी त्यांचं व्यक्तिमत्व , जडण घडण, स्वराज्य म्हणजे काय ? शिवाजी राजांची महानता, त्यांचे आणि संभाजी राजांचे नाते, हे काही कळेल का? मराठ्यांची फितुरी भरपूरच हायलाइट झाली पण स्वराज्या साठी जीव देणारे, राजांच्या इशार्यावर मरायला तयार होणारे साथीदार का कसे निर्माण झाले ? ते कोण कसे होते हे बॅकग्राउंडलाच राहिले. ते कुणाला समजतील का?
रहमानची गाणि थॅन्कफुली फार वेळ नाही येत. त्याचा बॅकग्राउंड स्कोअर अॅक्चुअली चांगला आहे, विशेषतः लढायांच्या वेळी वगैरे नाशिक ढोल किंवा तत्सम पर्कश्शन इस्ट्रुमेन्ट्स अतिशय परिणामकारक वापरली आहेत... पण ती अप्रिशिएट करावी तेवढ्यात कोणी ह्यूमन त्यात तोंड घालतो - एक अभद्र किंचाळणारी बाई, किंवा "आयोवा यो वा" अशा अनाकलनीय आरोळ्या किंवा रहमान चे स्वत:चे "ए! नरसिंघे !! " ( यापुढचा डायलॉग - " क्यू बे, दिखता नही क्या, अंधा है क्या" असा कहीतरी असेल असे वाटावे) तेव्हा चुकीच्या कारणासाठी मुठी आवळल्या जातात!!
अजून काही न झेपलेल्या गोष्टी-
-लढाया -सुरुवातीला एन्गेजिंग वाटतात पण नंतर तेच ते वाटते. खर तर बुर्हाणपूर आणि संगमेश्वर या महत्त्वाच्या लढाया ठेवून बाकी वर फोकस कमी ठेवला तरी चालले असते- त्यात ही उगीच एकदा त्रिशूल, मग काय गदा, मग भगवे कपडे- धनुष्य बाण वगैरे गिमिक्स नाही झेपले!
दांडपट्टा हे मराठ्यांचे आवडते आणि वैशिश्ट्यपूर्ण शस्त्र होते ते शेवटच्या लढाईत येते पण एक नाही ३-४ वेळा संभाजी ते उलट बाजूने - पाते हातात पकडून मुठीने शत्रूला चोपताना दाखवलाय!
-दिव्या दत्ताचे सोयराबाई कॅरेक्टर साफ इनअप्रोप्रिएट वाटले. नुकते नवर्याचे निधन झाले असताना भरजरी शालू विधवा सोयराबाई का वापरतील, उठवळासारख्या विडे तोंडात कोंबत पाय पसरून का बसतील . सगळेच भयाण!
-राज्याभिषे़काला एक इन्ग्रज पाहुणा आलेला दिसतो त्याला संभाजी राजांच्या तोंडि"आय होप रायगड इज ट्रीटिंग यू वेल ?" असा डायलॉग आहे. त्यांना इतकी सफाईदार इन्ग्रजी येत होती ?
- औरंगजेबाचा ग्रँड दरबार वगैरे दिसत नाही. लहानश्या व्हरांड्यात तो बसलाय , समोर मोजून ७-८ लोक उभे. ते जरा ऑड वाटते. त्याच्या मुलीचा रोल अनावश्यक आहे.
विकी कौशल, अक्शय खन्ना, आशुतोष राणा वगैरे सर्व अॅक्टर्स चे काम उत्तम आहे. मला रश्मिका पण फारशी खटकली नाही. सुंदर दिसलीय.
मराठी कलाकार जे घेतलेत त्यांना हार्डली १-२ वाक्ये आहेत तीही न लक्षात येण्यासारखी. सर्वांचा कपडेपट आणि सिनेमॅटोग्राफी ही फार सुरेख आहे. अगदी पुस्तकात वगैरे आपण पाहिलेले असतात तसा वाटतो सर्वांचा कपडेपट आणि काही फ्रेम्स अणि दृष्येही फार सुरेख आहेत.
Pages