Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
और रंग = औरंग
और रंग = औरंग
‘टोप्यांतून दिसणारा औरंग - मुगल साम्राज्याचा एक तौलनिक अभ्यास’ अशी पीएचडी करण्याची किंवा ‘झेब ते औरंग - क्रौर्याचा प्रवास’ अशी ऐतिहासिक कादंबरी लिहण्याची सोय झालेली आहे हे होतकरूंनी लक्षात घ्यावे.
प्रविणपा
प्रविणपा
रंगावरून असलेलं गाणं फिट्ट बसतंय का या सिच्युएशनला?
रेहमानचा अनुल्लेख करायचा
रेहमानचा अनुल्लेख करायचा राहिलाच >>>
और, रंग, जेब - हे पण भारी आहे
छावा विषय आता बदला, ब्वा
हे एकच शेवटीच
हे एकच शेवटीच
कुणीतरी मला सांगितले की औरंगजेब मधेच म्हणतो की
"आय अॅम जितु फ्रॉम विडिओकॉन"
रेहमानचा अनुल्लेख, और रंग >>
रेहमानचा अनुल्लेख, और रंग >>

रेहमानचा अनुल्लेख, और रंग
रेहमानचा अनुल्लेख, और रंग=औरंग >>
रेहमानचा अनुल्लेख, और रंग आणि
रेहमानचा अनुल्लेख, और रंग आणि जेब = औरंगजेब
>>> ‘झेब ते औरंग - क्रौर्याचा
>>> ‘झेब ते औरंग - क्रौर्याचा प्रवास’ अशी ऐतिहासिक कादंबरी
हो, किंवा ‘और रंग मेरी जे़ब में’ नावाचा चरित्रपट.
‘और रंग मेरी जे़ब में’ नावाचा
‘और रंग मेरी जे़ब में’ नावाचा चरित्रपट
>>
'मैं रंग टोपियों का...' वगैरे गाणं टाकता येईल...
(No subject)
'मैं रंग टोपियों का...' वगैरे
'मैं रंग टोपियों का...' वगैरे गाणं टाकता येईल... >>>
(No subject)
और रंग मेरी जे़ब में.…
और रंग मेरी जे़ब में.…
आता इतके विषयांतर झालंच आहे
आता इतके विषयांतर झालंच आहे तर -

आमच्याकडे एक वेगळी व्युत्पत्ती आहे - "ऑरेन्ज" बादशहा >> ऑरेन्ग >> औरंग. आमचा औरंग बादशहा टोप्या विणताना :
(रिक्षाबद्दल क्षमस्व!!)
मग "ऑरेंज इज न्यू ब्लॅक"
मग "ऑरेंज इज न्यू ब्लॅक" म्हणावे की नाही?
अमोल पालेकरांचा "पहेली" कुणी
अमोल पालेकरांचा "पहेली" कुणी पाहिलाय का ? मायबोलीवर रिव्ह्यू/ रेको दिलेला आहे का ?
लीना पांढेरे यांचा मणि कौल दिग्दर्शित दुविधा (१९७३) या पिक्चरबद्दलचा लेख आवडला. यावरूनच पहेलीचा रिमेक केल्याचे त्यात म्हटलंय. समांतर सिनेमा आहे हे सांगितल्याने हे साहस करण्याआधी. आधी पहेली पहावा आणि आवडला तर मग दुविधा असा विचार आहे.
मी पाहिला आहे राभु, मला आवडला
मी 'पहेली' पाहिला आहे राभु, मला आवडला होता.
तुझा रेको म्हटल्यावर प्रश्नच
तुझा रेको म्हटल्यावर प्रश्नच नाही
लीना पांढरे यांचा लेख पण सुंदर आहे
https://www.facebook.com/leena.pandhare.50/posts/pfbid0xYtZoK4J1GiQyJyVT...
नक्की वाचेन, थॅंक्यू.
नक्की वाचेन, थॅंक्यू.
पहेली मी या महिन्याभरात
पहेली मी या महिन्याभरात पाहिला. जेव्हा आला तेव्हा पाहिलेला. तेव्हा नेहमीचा शाहरूखपट न वाटल्याने तितका आवडला नव्हता आणि पुन्हा कधी बघितला नव्हता.
पण आता मुलगी शाहरुख खानचे जे दिसेल ते बघत सुटते त्यामुळे तिच्यासोबत बघावा लागला. आणि चक्क आवडला. तिलाही आवडला.
कदाचित मी तेव्हा खूप लहान असल्याने मला रुचला नसावा. पण छान आहे.
त्याचा शेवट कोणाला वेगळा हवा असेल आणि हिरोईन या नाही तर त्या शाहरुखला मिळायला हवी होती असे कोणाचे मत असेल तर मी चिशेकवा धाग्यावर त्यांची वाट बघतोय.
और रंग औरंग कमाल आहात माबोकर
और रंग औरंग कमाल आहात माबोकर
स्वाती आंबोळे नी रिव्ह्यु लिहिलाय तितका टाकाऊ नसावा असं मला चित्रपट न बघता ही राहून राहून वाटतय. काहितरी तर कौतुक करण्या सारखे असेल ना? उगाच का इतके लोक चित्रपट डोक्यावर घेऊन नाचत आहेत..?
गाणी खास नाही वाटली हे मात्र खरं..
पहेली मी पाहिलाय खूप आधी. राणी खूप आवडली मला ह्यात. तिचे डोळे, कपडे अहाहा. तसा अ तर्क्य पिक्चर आहे हा. भुतापासून बाळ राहणं म्हणजे कायच्या काय
पहेली खुप सुंदर आहे, मला
पहेली खुप सुंदर आहे, मला आवडलेला. शेवट आवडला नाही. आता निटसा आठवत नाही पण ते आशिक भुत अरसिक नवर्याच्या अंगात जाते असे काहीसे आहे.
सोनु निगम्चे धीरे जलना धीरे जलना गाणे मास्टरपिस आहे एकदम.
दुविधा चा ट्रेलर पाहिला.
दुविधा चा ट्रेलर पाहिला. हिरॉईन खरंच सुंदर आहे.
त्यात जे राजस्थानी ड्रेसेस आहेत ना, तसे रंग आणि त्याच्या जवळपास जाणारे पण राजस्थानी वाटणारे डिझाईन असलेले ड्रेसेस मला जोधपूरच्या फ्ली मार्केट मधे मिळाले होते. त्यातला एक हाफ स्कर्ट +. टॉप + हलकीशी एम्ब्रॉयडरी असलेलं जॅकेट असा ड्रेस स्वस्तात घेतला होता २०१४ साली. फक्त ४०० रूपयात.
तसा ड्रेस पूर्ण पुणे - मुंबई पालथे घातले तरी मिळाला नाही.
वाकड मधे एक राजस्थानी दुकानदार आहे त्याने सांगितले कि हे असे ड्रेसेस स्थानिक कारागीर परदेशी पर्यटकांसाठी बनवतात. आम्ही कारखान्यातून माल आणतो. जेसलमेर आणि जोधपूर मधे मिळतात असे ड्रेस.
https://youtu.be/s78M3AFG-E0
https://youtu.be/s78M3AFG-E0?si=FvocC5EkdSBPQbPe
द स्टोरीटेलर साठी हॉटस्टारचं
द स्टोरीटेलर साठी हॉटस्टारचं सबस्क्रीप्शन घेतलं. पाऊण तासाचा पिक्चर एका बैठकीत पाहिला. अगदीच नाईलाजाने बंद करावा लागला.
असाच शेवटपर्यंत असेल तर इथे थोडक्यात रिव्ह्यू शक्य होणार नाही. आतापर्यंतचा सिनेमा काहीच्या काही सुंदर आहे.
सत्यजित रे यांची कथा, त्यांच्या मुलाची निर्मिती. परेश रावलचा अभिनय, (सर्वांचाच अभिनय)
खूप खूप सुंदर सिनेमा आहे.
स्टोरीटेलर
स्टोरीटेलर
मला आवडला खूप.
थोडा संथ पण त्या कथेमध्ये आपण गुंतून जातो.
सहसा हिंदी कलाकार बंगाली भूमिका लाऊड करतात पण
परेश रावल ने अगदी साधी आणि नैसर्गिक वाटेल अशी साकारली आहे.
शेवट नक्की आवडेल असा आहे.
संपला पाहून एकदाचा.
संपला पाहून एकदाचा.
सावली एकदम परफेक्ट लिहीले आहे.
असे संथ लयीत उलगडणारे कथानक (जर जमलेले असेल तर) ज्यांना आवडते त्यांनी आवर्जून पहावा. संथ म्हण जे अगदी खंडहर किंवा तत्सम त्रयस्थ कॅमेरा असलेल्या सिनेमांसारखा नाही. हा आपल्याला कहाणीत घेऊन जातो. ही कहाणी तर एका कथाकाराची आहे असा कथाकार जो स्वतःची कथा लिहायला घाबरतो. त्याच्या कथा सांगण्याच्या अवती भवती एक कथा जी त्याची स्वतःची असते ती विणली जात असते. पण ती त्याची एकट्याची असते का ? त्या कथेचे अनेक भागीदार असू शकतात. पण यातला कुणी तरी एखादाच कथाकार बनू शकतो.
आपण ज्याला रूढ अर्थाने लेखक म्हणतो, तो कथाकार कोण असतो ?
ज्याला आपली कथा ऐकली / वाचली जाते असा विश्वास आलेला असतो तो. ज्याला तो विश्वास नाही तो कथाकार बनू शकत नाही.
ही थीम मांडताना त्यात किती कंगोरे आलेत. जीवनविषयक मार्क्सचं तत्वज्ञान विरूद्ध भांडवलशाही उद्योजक, गुजराती आणि बंगाली संस्कृतीतला विरोधाभास. सरस्वती आणि लक्ष्मी यांच्यातले द्वंद्व...
दोन लोकांचा दृष्टीकोण किती भिन्न असतो, असू शकतो हे सिनेमा अर्धा होईपर्यंत छान मांडतो. आपल्या इथे सिनेमा एखाद्याला आवडतो, एखाद्याला नाही आवडत यावरून रणकंदन माजतं.
जास्त लिहू नये नाहीतर नंतर पाहणार्याची मजा निघून जाईल. अशा कथानकाचा जीवच कितीसा ..
परेश रावल गुजराती असून त्याला बंगाली भूमिका दिलीय तर आदिल हुसैन बंगाली आहे त्याला गुजराती भूमिका.
परेश रावलने बंगाली माणूस उभा करण्याची कमाल पराकाष्ठा केली आहे. हा नट आपल्याला अति परिचित आहे म्हणून आपण त्याला बंगाली म्हणून स्विकारू शकत नाही का ? मला असं वाटलं कि त्याने बंगाली उच्चार जरी अगदी व्यवस्थित केले असले तरी बंगाली संवादफेक, आवाजातला तो सूक्ष्म बंगाली भाव हे कुठेतरी मिसलं गेलं आहे. त्या मानाने आदिल हुसैन गुजराती बिझनेसमन वाटतो. पण त्याचे गुजराती उच्चर कित्येकदा बंगाली पद्धतीने येतात. एके ठिकाणी तो मछलीला माछली म्हणतो. माछ हा मासळीला बंगाली शब्द आहे.
रेवती (रात वाली) खूप दिवसांनी दिसली. तिच्या बद्दल इतकेच,
सत्यजित रे यांच्यावरचा टागोरांचा प्रभाव नेहमी जाणवतो. यात टागोरांच्या जोडीला जागतिक दर्जाचे सर्वच लेखक बसले आहेत. ते विनाकारण नाहीत. शेवट थोडा फिल्मी आहे. अर्थात रे यांनी निव्वळ आर्ट फिल्म्सच नाही बनवलेल्या. ते स्वतः किती उच्च दर्जाचे कथाकार आहेत !
सिनेमाचं नाव ऐकल्यापासूनच ओढ निर्माण झाली होती, निराश केले नाही.
(या नावामुळे जी कथा मनात कल्पिली ती खूप वेगळी आहे याचं समाधान वाटलं. नाहीतर आधीच कुणीतरी त्यावर एव्हढं मोठं काम केल्याने लिहू शकत नाही हा सिनेमातला फील अनुभवावा लागला असता).
साबरमती एक्सप्रेस कि रिपोर्ट
साबरमती एक्सप्रेस कि रिपोर्ट नावाचा मूवी विक्रांत मेस्सी दिसला म्हणून काल लावला होता.
प्रपोगंडा असेना का आम्ही सिनेमा म्हणून बघू. पण तो सफाईदार व्हायला पाहीजे. पण चांगली पकड घेत असताना सरळ फिल्म्स डिवीजन कि भेंट सारखी मोदींची डॉक्युमेंटरी सुरू झाली, ते ही एकदा नाही वारंवार. बहुतेक नंतर कुणी तरी घुसवली असेल.
खूप चीडचीड झाली,म्हटलं गेला रविवार वाया. . का बनवतात असे पिक्चर्स ?
मग बंद करून स्टोरीटेलर लावला आणि मूड रिफ्रेश झाला.
पाहिला "छावा" काल. इथे
पाहिला "छावा" काल. इथे आधीच्या आठवड्यांमधे गर्दी होती पण आता इतकी नाही. त्यात हा जरा लौकरचा शो होता. त्यामुळे या शोला भारतातल्या सारखा माहौल नव्हता. माहौल असता तर कदाचित वेगळा अनुभव आला असता.
त्याशिवाय पाहताना एक दोन चांगल्या सिनेमॅटिक मूमेण्ट्स वाटल्या. राज्याभिषेकाच्या फ्रेम्स व चित्रीकरण सुंदर आहे. शिवाजी महाराजांचा जिरेटोप स्क्रीनवर दिसतो व "हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा" हे बॅकग्राउण्डला ऐकू येते तेव्हा टोटल गूजबम्प्स मूमेण्ट होती. गणोजी शिर्क्यांना जेवताना गप्प केले जाते तो सीन. पण अशा फक्त काहीच. शेवटचा छळ दाखवलाय तो पाहताना वाईट वाटते. विकी कौशलचे खूप कौतुक वाचले आणि संभाजी महाराजाची इमेज म्हणून यापुढे तो डोळ्यापुढे येईलही पण इथे त्याचा रोल बराचसा वन डायमेन्शनल आहे. बहुतांश तो एकदम आक्रमक होउन ओरडत, लढत असतो. क्वचित काही सीन्स मधे शांत आहे. एकूण त्याचा प्रेझेन्स चपखल आहे.
बराच वेळ चालणार्या ओव्हर द टॉप लढाया, पाण्यातून डॉल्फिनचा शो असल्यासारखे वर येणारे सैन्य, खालून वरच्या मजल्यावर सहज उडी मारणारे पब्लिक हे सगळे का घातले असावे याबद्दल आधीच बरीच चर्चा झाली आहे. पण ते नसते तरी हा पिक्चर इतकाच चालला असता असे मला वाटते कारण लोकांनी नितिश भारद्वाजला जसे कृष्ण म्हणून पाहिले तसे विकी कौशलला संभाजी महाराज म्हणून पाहिले आहे. तो आता लोकांच्या डोक्यात फिट्ट झाला आहे.
त्यापेक्षा ज्यांना हा इतिहास नीट माहीत नाही त्यांच्याकरता पिक्चरमधे इतर कॅरेक्टर्सची ओळख पटकथेतून होईल असे करायला हवे होते. सोयराबाई व राजाराम (त्याचे नाव "राम राजे" असे का केले आहे?) अचानक कथेत येतात. तेथे ते अनाजी वगैरे एक प्लॉट रचतात आणि तो इतका भारी असतो की दोन मिनिटांत त्याचा उलगडा होतो. पण ही बाई कोण आहे व ती का विरोधात आहे हे अमराठी लोकांना व इव्हन मराठी इतिहास न शिकलेल्या सर्वांनाच कळायला हवे. तसेच नंतर पुढे काय झाले हे अशा घटनांवर आधारित पिक्चर्स मधे नेहमी दाखवले/सांगितले जाते. इथे औरंगजेब पुन्हा दिल्लीला जाऊ शकला नाही, मुघल साम्राज्याला पुन्हा पूर्वीचे वैभव परत मिळाले नाही, त्यांनी दख्खन कधीच काबीज केली नाही, उलट मराठा साम्राज्य पुढे आणखी विस्तारले - राजाराम, ताराराणी, शाहू व पुढे पेशवे यांनी ते आणखी वाढवले - थोडक्यात इथून मुघलांचा आलेख खाली गेला व मराठ्यांचा वर वगैरे सगळे किमान पडद्यावर यायला हवे होते. म्हणजे संभाजी महाराजांचा लढा व बलिदान याकरता किती महत्त्वाचे होते हे लोकांना कळेल.
बाकी काही अचाट प्रकार आहेत. सोयराबाईच्या चितेशेजारी राजारामाच्या लग्नाचा प्रस्ताव, "तुमने शेर को कभी कुत्तोंसे भागते हुए देखा है क्या" हा दमदार संवाद पेरण्याच्या नादात हे वाक्य "गनिमी कावा" या कल्पनेच्या पूर्ण विरोधात आहे हे लक्षात न येणे, राजकीय प्रोटोकॉल न पाळता कोणीही कोणाच्याही शामियान्यात, दरबारात घुसणे वगैरे प्रकार आहेत. दारावरचे शिपाई वासुदेवाला अडवतात पण अकबरासारख्या उघडपणे मुघल राजवेषात असलेल्याला सहज आत जाउ देतात असले सीन्सही आहेत.
संगीत व पार्श्वसंगीत फारच लेटडाउन आहे. त्या ओरडणार्या बाईच्या आवाजाचा फार अतिरेक झाला आहे.
अमराठी लोकांना यामुळे आधी नसलेली माहिती होईल वगैरे वाचले होते. पण संभाजीराजांना औरंगजेबाने फार क्रूरतेने मारले व त्याआधी ते युद्धे हरले नव्हते, याव्यतिरिक्त नक्की काय माहिती या पिक्चरमधून मिळते?
Thanks a lot for Yr review.
Thanks a lot for Yr review. So, I am not the only fish out of water
Pages