चिनीमातीची भांडी - क्रॉकरी

Submitted by ऋतुराज. on 10 January, 2025 - 10:57

आपल्याकडे चहाचे कप, बश्या, प्लेट, वाडगे, चटण्या-लोणच्याच्या बरण्या अशी मोजकी चिनीमातीची भांडी असतातच. पण त्यात खूप वैविध्य असते. काही जणांकडे तर खूप सुंदर कलेक्शन असते.
तर चिनीमातीची भांडी - क्रॉकरी या विषयावर चर्चा करण्यासाठी हा धागा. शीर्षक चिनीमातीची भांडी असे असले तरी इथे तुम्ही माती, चिनीमाती, सिरॅमिक, काच, बोनचायना, क्रिस्टल, रंगीत क्रिस्टल अश्या क्रॉकरीची चर्चा करू शकता आणि तुमच्याकडे असणाऱ्या क्रॉकरीचे फोटो टाकू शकता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते मिनी शूज कसले क्युट आहेत ते बघून सिंड्रेला पिक्चर मधल्या काचेच्या बुटांची आठवण झाली तशी बुटाची सेंट ची काचेची बॉटल ही दुकाना मध्ये पाहिली होती पण फार महाग होती म्हणून घेतली नव्हती वासही एव्हडा चांगला नव्हता.

अनिंद्य तुमची छोटुशी तेलाची बुधली खूपच छान आहे, ते पिंटुकले बूट आणि गोव्याचा कपपण आवडला!

हा माझ्या हापिसमधला मग, मैत्रिणीने भेट दिलाय, आणि सोबत repurposed रीड डिफ्युजरचा पॉट Happy

IMG_0632.jpeg

You can stay immature indefinitely 😁

Very inspirational ❗

सिमरन
तुमची लोणच्याची बरणी मस्त आहे.
लहानपणी ज्याच्याकडे अशी काचेची सेंटची बाटली ती मला भारी वाटायची एकदम. एकूणच सेंट परफ्यूमच्या बाटल्यांत फार विविधता आहे.
अनिंद्य
तुमचा अंगठ्याएवढा बेबी केटल भारी आहे.
मामी,
तुमच्याकडचे पांढरे पक्षी आणि बेबी बूट एकदम क्यूट आहेत.
पुन्हा तुमच्या घरी धाड मारावी असे विचार येत आहेत.
मेघना,
मग आणि repurposed रीड डिफ्युजरचा पॉट एकदम क्लासच!

Rmd Lol

परफ्यूम सुगंध चा धागा हवाच
अनिंद्य खरच तुम्हीच काढा धागा काढण्यासाठी तुमच्यशिवाय योग्य व्यक्ती नाही.

ऋ ने वाचायचा आत धागा येऊ द्यात >> ऋ1 लिहायला पाहिजे. हा धागा ऋ2 चा आहे Wink

सगळ्यांचे फोटो मस्त. मी बऱ्याच दिवसांनी आलो इथे. मागची २-३ पाने म्हणजे भारीच आहेत.

एका सुगंधी धाग्याचा विषय दडलाय इथे मिलॉर्ड.
अनिंद्य, काढा की धागा मग. तसाही तुमचा एक सुगंधी धागा आहेच
अनिंद्य खरच तुम्हीच काढा धागा काढण्यासाठी तुमच्यशिवाय योग्य व्यक्ती नाही.
>>>>>>>>>
अनिंद्य,
शुभस्य शीघ्रम.
घ्या हे शुभकार्य हाती.
Happy

ऋ1 लिहायला पाहिजे. हा धागा ऋ2 चा आहे>>>> हरपा Lol

किल्ली , कप एकदम "सिंदूर खेला"मधून आलाय.

ऋ1 लिहायला पाहिजे. हा धागा ऋ2 चा आहे >>> तसेही ते ऋ2 आहेतच . :). म्हणून ऋ ला ऋ

ते पक्षी बघून आठवले , माझ्याकडे ही आहेत. टाकते नंतर फोटो.

ते सगळे ठीक, पण धागाकर्ते स्वत: फार contribute करत नाहीत इथे अशी आमची तक्रार आहे Happy>>>>>> नोंद घेतली आहे _/\_
20250219_192910.jpg

ह्या सुवर्णपत्ररेखिता
वय वर्षे सात.
Kisses not counted Lol

हुक्म की तामील होगी !!

फक्त दणदणीत फोटो-प्रतिसादांची हमी द्या >>>>> हुकूम मेरे आका...

Pages