चिनीमातीची भांडी - क्रॉकरी

Submitted by ऋतुराज. on 10 January, 2025 - 10:57

आपल्याकडे चहाचे कप, बश्या, प्लेट, वाडगे, चटण्या-लोणच्याच्या बरण्या अशी मोजकी चिनीमातीची भांडी असतातच. पण त्यात खूप वैविध्य असते. काही जणांकडे तर खूप सुंदर कलेक्शन असते.
तर चिनीमातीची भांडी - क्रॉकरी या विषयावर चर्चा करण्यासाठी हा धागा. शीर्षक चिनीमातीची भांडी असे असले तरी इथे तुम्ही माती, चिनीमाती, सिरॅमिक, काच, बोनचायना, क्रिस्टल, रंगीत क्रिस्टल अश्या क्रॉकरीची चर्चा करू शकता आणि तुमच्याकडे असणाऱ्या क्रॉकरीचे फोटो टाकू शकता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उम्मीद पे दुनिया कायम है!Screenshot_20250212_131254_Photos.jpg
Secret सांता मध्ये gift मिळालेला हा कप मला.
पण गळतो
त्यात पेना ठेवल्यात

पण गळतो …

Spreading Hope ऐवजी leaking Hope Everywhere होत असेल मग Lol

Spreading Hope ऐवजी leaking Hope Everywhere होत असेल मग Lol>>> Lol
मला तर किल्लीने लिहिलेली छोटीशी कथाच वाटली( खरंतर माझीच )एका मुलीला होप ची गरज आहे आहे आणि सांता तिला होप नावाचा कप देतोही पण तोही गळतोय तिच्या आयुष्यासारखा त्यातूनही तिची होप जिवंत आहे म्हणून पॉझिटीव्ह attitude ने त्यात पेनं ठेवून त्याचा वापर करतेय.

मॅगी मला मुलांच्या प्लेटमधूनच खायला आवडते.....

>>>> मॅगी मला पण खायला आवडते पण हे स्वर्गीय सुख कधीच आजमावले नाही.
आता ठरलं !!

इथून पुढे मी पण मॅगी मुलांच्याच प्लेट मधून खाणार.
अर्थात माझी स्वतःची वेगळी प्लेट विकत आणणार आहे,
उगाच (छोट्या आणि मोठ्या) मुलांच्यात भांडणे नकोत !
Lol Lol Lol

.

leaking Hope Everywhere >>> Lol

सिमरनने थेट एखादं फॉर्वर्ड लिहायला घेतले की काय? Happy

गोवा वाला कप युनिक आहे अगदी Happy

फॉरवर्ड >>> Lol एवढं कुठे लिहिता येतय फक्त शेवट येतो. आयुष्याचही असच असतं.फुटके गळके कप नशिबात असतात आयुष्यासारखे एकूणच आयुष्य कपात असतं. Lol

गोवा प्लान फेल मग ने अगदी दुखती रग पे हात रखा है... आमचा गोवा प्लान किमान ३-४ वेळा तरी फेल झालाय. Lol मग आवडला.
IMG-20250214-WA0008.jpg
हे आमचे सूप मग.. ६-७ वर्षांपूर्वी कधीतरी खुर्जमधून तीन सूप मग घेतले होते. डावीकडचा आहे तसे दोन आम्हा दोघांचे आणि रंगीबेरंगी लेकाचा. हिवाळ्याचे चार महिने किमान आठवड्यातून ४-५ दिवस तरी हे मग वापरात आहेत.

सगळ्यांची क्रोकरी, मग्ज मस्त . मला पण फोटो टाकायचा मोह होतोय आता . पण इसिली टाकता येत नाहीत. (मिम्स च्या धाग्यावर काय माहिती पटापट जमत होते Wink )

BTW, वास फुलांचाही येतो पण तो असे पुष्पगुच्छ त्यात ठेवले की येतो. (सॉरी, ही फालतू कोटी करण्याचा मोह झालाच 😁 )

186e9643-a58f-46e7-b7b6-64eda7c42fcf.jpeg

जय हो !

आणा की इथे. तुमचे कलेक्शन खास असणारच कारण तुम्ही स्वत: कलाकार आहात.

मोअर द मेरीयर 👍

आणा झब्बू मग.

एक सेम डिझाइनचा पिटुकला वास आहे, फक्त १-२ फुले मावतील इतका. तोही येईलच.

सर्व नवीन फोटो छान, मस्तच.
अनिंद्य,
“take me home please” म्हणणाऱ्या सुंदऱ्या मोहात पाडायला बघतात>>>>>>> हे वाचून हे आठवलं.
https://youtu.be/jKDnkBsIxiU?si=au0wn3kOouAB3oUv
37.58 पासून पुढे..
कुकातकुका Lol

दोन लोकांची आवड असलेलं चित्र सेम असणं योगायोग असू शकतो उगाच दोघांची चॉईस ....जाऊद्या Lol पण वास सुंदर आहे हिरव्या डिझाइनचा. पिक्चर पीळ आहे अनेकदा पाहिलाय पण त्यातलं गाणं अतिशय आवडतं अशोक सराफने गायलेलं .आणि ती पोरगी पण जाम क्यूट आहे.

हा माझा गावचा चहा कॉफी मग याला कानाला भोकं आहेत चमचा अडकवायला चमचाही सिरॅमिक चा होता कुठे तरी हरवला .

IMG_20250218_075337_0.jpg

आणि ही क्यूटशी लोणच्याची छोटी बरणी पण ती खराब होऊ नये म्हणून त्यात बडीशेप खडीसाखर ठेवतो.

IMG_20250218_075407.jpg

हिला पण 25 वर्षांपेक्षा जास्त वर्ष झालेत.

मामी,
“ब” wordplay Lol

बूट आर क्यूट

चमचा बाजूला ठेऊन फोटो काढण्याची युक्ती बेस्ट आहे. साइज चा अंदाज येतो लगेच.

Pages