Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
"The Secrets of Shiledars"
"The Secrets of Shiledars" >>> २ भाग पाहिले. कादंबरीचे प्रेरणास्थान दा विंची कोड असावे हे लगेच लक्षात येते. " प्रेरणा" म्हणणे अंडरस्टेटेमेन्ट होईल , नक्कल म्हणणे जास्त योग्य वाटते, इतके सेम टु सेम प्रसंग सुरुवातीपासून दिसतात. दा विंची कोड मधे जी कथा आहे त्याची स्टोरी लाइन जीझन ख्राइस्ट आणि त्याचे अनुयायी यांपर्यन्त जाते, इतिहास, पुरातन कलाकृती, त्या साकारणारे दिग्गज कलाकार, इ चे सत्य आणि दंतकथा यांची गुंफण करून गूढ रहस्य निर्माण केले आहे, ते इतके बेमालूम, तरी लॉजिकल आहे की वाचता वाचता आपल्याला बर्याच गोष्टी खर्याच वाटू लागतात.
पण ती वातावरण निर्मिती इथे होत नाही कारण कदाचित शिवाजीमहाराजांचा इतिहास खूप अलिकडचा आहे, जो व्यवस्थित डॉक्युमेन्टेड आहे आणि काय काय कसे झाले हे माहित आहे, त्यांचे वारसही जिवंत आहेत. त्यामुळे ती गूढतेची किनार येत नाही आणि असे खरेच असेल?! असा थरार निर्माण होत नाही.
मला तरी फार मजा आली नाही. पुढे बघेन असे वाटत नाही.
प्रतिपश्चंद्र व शोध दोन्ही
प्रतिपश्चंद्र व शोध दोन्ही वाचली आहेत. शोध मला जास्त थरारक वाटली होती. प्रतिपश्चंद्रचा शेवट काहीसा विरस करणारा वाटला होता. पण बघेन ही सिरीज, निदान सुरूवातीचे काही भाग तरी. ब्लॅकलिस्टच संपेना नी जेम्स स्पेडर सोडवेना असं झालंय. नंतर द डे ऑफ द जॅकल, पाताळलोक लाईन्ड अप आहेत.
the capture – नेटफ्लिक्सवरील
the capture – नेटफ्लिक्सवरील एक ब्रिटीश वेब सिरीज. खूपच वेगळी भन्नाट आणि भारी. सुरुवातीची काही भाग मेंदू हलवून टाकतात, आणि शेवटी तुम्हाला विचार करायला लावतात – हे योग्य आहे का?
जर अस खरच झाल तर काय होइल? innocent until prove guilty हे खरच योग्य आही की नाही.
शिलेदार पाहिली, पटली नाही फार
शिलेदार पाहिली, पटली नाही फार.. रायगडाच्या पोटात हलणाऱ्या भिंतींचे दालन वगैरे जरा जास्तच झालं
डॉक्युमेंटरी वर वेगळा धागा
डॉक्युमेंटरी वर वेगळा धागा आहे का?
नेटफ्लीक्सवर ब्रायन जॉन्सनवरची 'डोन्ट डाय' ही डॉक्यु आज पाहिली. आयुष्य वाढवण्यासाठी (की अमर होण्यासाठी?) ब्रायनने केलेले प्रयत्न (किंवा उपद्व्याप) पाहून 'काय ही श्रीमंतांची थेरं' पासून कौतुक वाटण्यापर्यंत संमिश्र भावना झाल्या. पण बघण्यासारखी आहे.
नेटफ्लिक्सवर ब्लॅक वॉरंट
नेटफ्लिक्सवर ब्लॅक वॉरंट बघितली. सुनिल गुप्तांच्या मुलाखती पाहिल्या असल्याने उत्सुकता होती, पण मला सिरिज त्रोटक वाटली.
तसं पाहिलं तर वेगळा विषय आणि चार्ल्स शोभराज ते अजमल कसाब एवढा मोठा स्पॅन , एवढ्या जमेच्या बाजू असूनही बघताना कुठेतरी काहीतरी मिसींग वाटत राहिलं.
पात्रनिवडीबद्दल बोलायचं तर सुनिल गुप्ता साठीची नटाची निवडच कुठेतरी गंडल्यासारखी वाटली. साधेपणा आणि बावळटपणा ह्यातील सीमारेषा बऱ्याच ठिकाणी ओलांडली गेल्या सारखी वाटली. काही काही वेळा मला तर गुप्ताजींच्या चेहऱ्यावरचे भाव चार्ली चॅप्लिन च्या चेहऱ्यावर असायचे तसेच वाटले.
दुसरी खटकणारी व्यक्तिरेखा म्हणजे चार्ल्स शोभराज. त्याच्या पहिल्याच सीन मध्ये मला पटकन मि. योगी मधला मोहन गोखलेच आठवला. नंतर त्याचं इंग्लिश, ते अचानक प्रकट झाल्यासारखं समोर येणं खटकत गेलं. बऱ्याचदा मनातील द्वंद्व दाखवायला त्याच व्यक्तीची दुसरी बाजू त्याला काहीतरी सांगतेय असं दाखवतात, तसा तो चार्ल्स शोभराज प्रकट होताना दाखवला आहे. शेवटी शेवटी विनाकारण तो डोक्यात गेला.
एकंदरीत मला वेब सिरिज पेक्षा सुनिल गुप्तांच्या मुलाखती जास्त आवडल्या.
ब्लॅक वॉरंट्चा नायक शशीकपूरचा
ब्लॅक वॉरंट्चा नायक शशीकपूरचा नातू आहे. त्याच्या बाबाचा विजेता भारी होता. याचाही अभिनय चांगला वाटला पण ते पात्रच नीट लिहिलं गेलं नाहीये. त्यामुळे मालिका पकड नाही घेऊ शकत.
ती पाचव्या वेदाची सिरीयल कुणी
ती पाचव्या वेदाची सिरीयल कुणी बघतंय का?
स्पॉईलर अलर्ट
स्पॉईलर अलर्ट
प्रतिपश्चंद्र कादंबरी म्हणून चांगली असेल पण त्याचा सिक्रेट्स ऑफ शिलेदार नाही आवडला. इंडियाना जोन्स धाटणीचा. एवढ्या पटापट क्लू ओळखणे म्हणजे जरा अतीच आणि शेवट तर अगदीच आवडला नाही. इतक्या वर्षात ती सगळी कडी कुलप व्यवस्थित. खजिना उघडला की आत लख्ख प्रकाश. काही शे वर्षे बंद राहून आत अंधार नाही, धूळ नाही कोळीष्टके नाहीत.
मुरलीधर खैरणारांच्या शोध वर एखादी सीरिज, चित्रपट यावा अस वाटत होत. पण आता हे पाहून असच झाला तर?
विथ ड्यु रिस्पेक्ट, शोध
विथ ड्यु रिस्पेक्ट, शोध कादंबरीची शैली आणि घाट डॅन ब्राऊनच्या शैलीशी आणि स्टोरी टेलिंगच्या घाटाशी खूप मिळती जुळती आहे.
Blacklist (परत) बघायला
Blacklist (परत) बघायला सुरुवात केली. फार अगोदर जेमतेम S1 बघून सोडून दिली होती . आता S3 पर्यंत पोहोचलेय. मध्ये मध्ये interesting होते.
Tom Keen हा एक motivating factor आहे बघण्यासाठी. त्याच Tom ते Christoff ते Jacob ते Matt transformation interesting आहे.
युट्युबवरची लीना भागवत ची तू
युट्युबवरची लीना भागवत ची तू अभितक है हसी एपिसोड्स बघत आहे. हटकून आई बाबांची आठवण येते. गोड आहे.
Tom Keen चं पात्र भारी घेतलंय
Tom Keen चं पात्र भारी घेतलंय. तो एकाच सीरियलमध्ये चॉकोलेट बॉय आणि डेडली किलर वाटू शकतो आणि त्यासाठी त्याला फारसे व्हिजिबल ट्रान्सफॉर्मेशन करावे लागले नाही हे आश्चर्य. आपल्या इकडे असता तर मी या भूमिकेसाठी शरीरावर कशी मेहनत घेतली यावर मुलाखती वगैरे दिल्या असत्या.
एलिझाबेथ मात्र गंडलेली आहे. ती टफ एफ बी आय एजंट वगैरे वाटत नाही.
मला तो मथायस पण आवडला. त्याचे डोळे कसले शार्प आहेत.
तो एकाच सीरियलमध्ये चॉकोलेट
तो एकाच सीरियलमध्ये चॉकोलेट बॉय आणि डेडली किलर वाटू शकतो आणि त्यासाठी त्याला फारसे व्हिजिबल ट्रान्सफॉर्मेशन करावे लागले नाही हे आश्चर्य. >>>> हो ना
.
टॉम ते ख्रितॉफ तो फक्त केस कापतो आणि त्याची बॉडी लॅन्गवेज बदलते .
जेकब ते मॅट पण तो हेअर स्टाईल बदलतो आणि जरा बरे कपडे घालतो . मॅटसाठी तयारी करताना त्याची अखंड बड्बड एक्दम क्युट सीन आहे
एलिझाबेथ पहिल्या एपिसोड पासूनच आवडत नाही . तिला नक्की काय हवय तेच कळत नाही . तिच्यापेक्षा मस्त नवाबी आहे.
>> युट्युबवरची लीना भागवत ची
>> युट्युबवरची लीना भागवत ची तू अभितक है हसी>> एकदोन बघितले आणि मग बोअर झाली.
"The Greatest Rivalry: India
"The Greatest Rivalry: India versus Pakistan" - नेटफ्लिक्स
प्रचंड उत्सुकतेने ही सिरीज पाहिली. सध्या तीनच भाग आलेत. अजून येणार आहेत का माहीत नाही. पण "good in parts" म्हणावे अशी वाटली. शोएब अख्तर व वीरेन्द्र सेहवाग यांची नॅरेशन्स हा मुख्य भाग, व १९९९ सालची भारतातली आणि २००४ ची पाकमधली सिरीज हे केंद्रस्थानी ठेवून त्याभोवती भारत-पाक मधले राजकीय वैर, जनतेमधले कधी प्रचंड वैर तर कधी प्रेम, खेळाडूंवरचे प्रेशर - या सगळ्याचे वर्णन व काही उदाहरणे आहेत. २००४ पासून वाढीस लागलेले राजकीय संबंध, जनरल गुडविल व क्रिकेटही २००८ च्या हल्ल्यानंतर पूर्ण बंद पडणे याबद्दलही थोडे आहे. गावसकर, श्रीकांत, गांगुली, इंझमाम, रमीज राजा, जावेद मियाँदाद वगैरेंच्या नजरेतून काही मॅचेस्/सिरीजचे संदर्भ, निरीक्षणे आहेत.
हे तीनच भाग असतील तर खूपच त्रोटक आहे. शोएब व सेहवाग यांच्या कारकीर्दीतील जितका भाग दाखवला आहे तो व त्याचे वर्णन त्यांच्याच तोंडून ऐकणे हा सगळा भाग मस्त आहे.
कोहलीचा उल्लेखही नाही. सचिनचाही त्रोटक आहे. पुढे अजून भाग असतील तर माहीत नाही.
क्रिकेट आवडणारे सगळे बघतीलच. आणि बघाच. पण इतरांनी किंवान शोएब व सेहवाग नॅरेट करतात तो भाग बघा. मस्त आहे.
पुर्वि रिटायर्ड क्रिकेटर्स
पुर्वि रिटायर्ड क्रिकेटर्स करता बेनिफिट मॅचेस व्हायच्या, आता होतात कि नाहि याची कल्पना नाहि कारण हल्ली बक्कळ पैसा मिळतो. तर हि सिरिज शोएबची इमेज सुधारण्याकरता अथवा त्याची बाजु मांडण्याकरता बनवली आहे असं वाटतं...
फा, योगायोगाने आत्ताच अजून
फा, योगायोगाने आत्ताच अजून एक क्रिकेट वरच्या सीरीज चा रेको मिळाला - Mid Wicket Tales With Naseeruddin Shah - अॅमेझॉन प्राइम वर आहे.
https://youtu.be/ZiwguP9nsSs?si=Yo0pcMPbaiDBZHoG
इन्टरेस्टीम्ग वाटत आहे.
ओह थँक्स. कधीतरी ब्राउज
ओह थँक्स. कधीतरी ब्राउज करताना दिसली होती बहुतेक.
(No subject)
Persuader Jack Reacher #7 वर
Persuader Jack Reacher #7 वर आधारित.
उद्या पाहीन.
सध्या कॅनेडियन सीरिज corner
सध्या कॅनेडियन सीरिज corner gas ला वाहून घेतले आहे.
एकदम फ्रेश, साधी सोपी, व्हल्गर नसलेली, खूप बॅगेज नसलेली मस्त फील गुड कॉम्फी हिवाळी पावसाळी बोअरिंग दिवसावर उत्तम उतारा दिलखुष अशी सीरिज आहे. मस्त वाटतं एकदम
डब्बा काटेल - नेटफ्लिक्स
डब्बा काटेल - नेटफ्लिक्स
अंमली पदार्थांच्या गुन्ह्यावरची मालिका आहे. दोन गुन्ह्याचे ट्रॅक्स आहेत दोन्ही ट्रॅक्समधली माणसे एकमेकांच्यात अगदी जवळची आहेत.
पहिले दोन भाग जरा स्लो वाटले पण तिसर्या भागापासून मालिका पकड घेते. काही लूपहोल्स आहेत पण मालिकेचा वेग, त्यातले कलाकार ती लूपहोल्स बर्यापैकी झाकून टाकतात.
बरेच नवे आणि जुने कलाकार आहेत. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री बघायला मजा येते. शेवट अगदीच अनपेक्षीत नसला तरीही त्यातला एक झटका मात्र जबरदस्त आहे. दुसर्या सिझनकरता स्कोप ठेऊन मालिका संपवली आहे पण तो नाही आला / उशीरा आला तरी जीव टांगणीला लागणार नाही असा लॉजीकल शेवट केला आहे.
अर्रे! मीही त्याबद्दलच
अर्रे! मीही त्याबद्दलच लिहायला आले!
हो, मजा आली हा सीझन बघताना.
'ब्रेकिंग बॅड'ची आठवण येणं अपरिहार्य होतं. सगळेच कलाकार त्या-त्या रोलमध्ये मस्त वाटले - एक चाकोच मला तेवढा आवडला नाही, जरा टिनपाट वाटला.
ती माला ओळखीची वाटली म्हणून शोधलं तर ती म्हणजे ग्रेट इंडियन किचनमधली सून! मस्त काम करते ती. आणि शबानाची सून दाखवली आहे ती त्या 'महाराज'मधली मुलगी.
इखलाक म्हणजे कोण असेल याचं कुतुहल वाटतंय मला. कधी येणार दुसरा सीझन?
एक चाकोच मला तेवढा आवडला नाही
एक चाकोच मला तेवढा आवडला नाही, जरा टिनपाट वाटला. >>> जरा नाही जास्तच टिनपाट वाटला.
ती झोपाळलेल्या डोळ्यांची वरुणा पण नाही आवडली. त्या कॅरेक्टरला अनेक कंगोरे आहेत त्याकरता चांगली अॅक्ट्रेस असायला हवी होती.
माला 'पोचर'ची नायिका म्हणून चांगलीच लक्षात होती. पण त्या शाहिदाला (अंजली आनंद) कुठे पाहिलय ते आठवत नाहीये मला.
रिअल्टर ना? ती रॉकी और
रिअल्टर ना? ती रॉकी और रानीमधली गोलू/गायत्री.
वरुणाचं काम केलेली ती ज्योतिका. साऊथमंदी फ्येमस आहे.
मालाच्या रोलमध्ये रिंकू राजगुरूही चालली असती कदाचित.
ती झोपाळलेल्या डोळ्यांची
ती झोपाळलेल्या डोळ्यांची वरुणा पण नाही आवडली >>> ती ज्योतिका सदाना ना? ९०ज मधे हिंदीत होती एक दोन पिक्चर्स मधे. साउथ मधे बरीच होती बहुतेक.
मलाही सिरीज आवडली. आता फक्त शेवटचा एपिसोड बघायचा राहिला आहे.
फा, संदेश कुलकर्णी म्हणजे
फा, संदेश कुलकर्णी म्हणजे गरीबांचा टूको सालामान्का वाटला की नाही?
ज्योतिका ही अक्षय खन्ना सोबत
ज्योतिका ही अक्षय खन्ना सोबत “डोली सजा के रखना “ पिकचरमध्ये होती . त्यातल किस्सा हम लिखेंगे हे गाणे प्रसिद्ध झाले होते.
रिसेंटली अजय देवगण आणि माधवन सोबत शैतान मध्ये दिसलेली
ती रॉकी और रानीमधली गोलू
ती रॉकी और रानीमधली गोलू/गायत्री. >>> येस्स्स! आता आठवली.
Pages