तुमच्या खिडकीतून काय दिसते !

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 June, 2022 - 12:33

किल्ली यांच्या कामाचा कोपरा या धाग्यावर विषय निघाला. कामाच्या कोपर्‍याला लागूनच एखादी खिडकी असणे आणि त्यातून बाहेरचा नजारा दिसणे हे नशीब आहे. काम करता करता एक नजर खिडकीबाहेर टाकत त्या नजार्‍याचा आनंद लुटणे हे सुख आहे. मग ते काम ऑफिसचे असो वा किचनचे असो...

चहा पिता पिताही आपल्याला खिडकीत ऊभे राहून बाहेर रस्त्यावर काय चालू आहे हे बघायला आवडते. काहींना साधे ब्रश करतानाही बाल्कनीत जाऊन गाड्या बघायला आवडतात. काही लोकांची सकाळच बाल्कनीत जात आळोखे पिळोखे देण्यापासून सुरू होते. आपल्याला तसे करताना जग बघतेय याची आपल्याला पर्वा नसते, तर आपल्याला तिथून जे जग दिसतेय ते आपल्यासाठी महत्वाचे असते.

जगात काय चालू आहे हे आपल्याला रोज सकाळी वृत्तपत्रे सांगतात. पण आपल्या आसपास सारे काही सुरळीत चालू आहे हे आपल्याला खिडकीबाहेर डोकावल्यावरच समजते. कारण खिडकी केवळ ऊन वारा पाऊसच नाही तर घराच्या चार भिंतीबाहेरील वार्ता देखील घेऊन येते.

टीव्हीवर रोज रोज एकच मालिका दाखवली तर आपण कंटाळून जाऊ. रिमोट हातात ऊचलून लगेच चॅनेल चेंज करू. पण खिडकीबाहेरील रोज रोज एकच दिसणारे दृश्य आपल्याला कधी कंटाळवाणे वाटत नाही. कारण ते जिवंत असते. आपण त्याच्याशी जोडले गेलो असतो. खिडकीतून दिसणारा रस्ता, त्यावर धावणार्‍या गाड्या, रस्त्याकडेला नेहमीच पार्क होणारी गाडी, आजूबाजूच्या ईमारती, त्यातील घरे, आपले नकळत त्यात डोकावणे, तेव्हा दिसणारी आणि दिसताच हसणारी, तो किंवा ती, पलीकडची दुकाने, त्यातल्या दुकानादाराचा चेहरा, येणारे ग्राहक, एखादे झाड, झाडावरचे पक्षी, फळ फुल, आकाशातले ढग, ढगातून जाणारे विमान, खाली धरती, अंबर वरती आणि बरेच काही....

नवीन घर घेतानाही आपण खिडकीतून काय दिसते हे आवर्जून बघतो. तर कधी नाईलाजाने जे दिसतेय ते गोड मानून घ्यावे लागते. पण ते जे काही असते ते आपल्याला आवडतेच. त्यात काही बदल झाल्यास आपल्याला चुकचुकतेच. तर तसे चुकचुकण्याआधी त्याचा छानसा फोटो काढा आणि ती आठवण ईथे साठवून ठेवा. आणि आम्हालाही सांगा,
तुमच्या खिडकीतून काय दिसते !

हा माझा बोहनीचा फोटो
खिडकी तीच, पण चॅनेल बदलायचे काम ऋतुमानानुसार निसर्ग करतो Happy
येऊ द्या.....

IMG_20220628_214559.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विषय काय
आपण बोलतोय काय
हे घ्या एक पावसाळा स्पेशल दृश्य. पलीकडच्या खिडकीतून...

Screenshot_2024-07-11-14-18-36-79_99c04817c0de5652397fc8b56c3b3817.jpg

काय विषय?
ज्याचं त्याला लागेल. मी टाकलेल्या फोटोवर फेक आयडीने वैयक्तिक माहितीची चौकशी करणे गंभीर आहे. हा आयडी तुमचा नसेल तर लोड घेऊ नये.
इथे फोटो टाकलेत हे आवडले नसेल तर तुम्हाला कमेंट्स उडवणे अवघड नाही.
या धाग्यावर ही शेवटची पोस्ट.
माफ करा विसर पडला होता..

ह्म_म्हण _ह्म , मी जेनुइन्ली विचारला होता प्रश्न . विपु केल्याने गैरसमज झालेला दिस्तोय. sorry.
सध्या माझा विचार चालला आहे जरा लाम्ब जागा घेउन घर बान्धण्यचा. मातीच्या घरात interest वाटला म्हणुन विचारले होते कि पुण्यात कुणी बान्धणारे.

माझगाव, दक्षिण मुंबई
खिडकी बाहेरचे दृश्य झपाट्याने बदलत चालले आहे.
माझ्या माहितीप्रमाणे फार उंच इमारतींची परवानगी नव्हती आधी आमच्या इथे..
IMG-20241215-WA0003.jpg
.
IMG-20241215-WA0002.jpg

IMG-20241215-WA0001.jpg
.
IMG-20241215-WA0006.jpg

वाह ... मस्त फोटो..
रात्रीची चमचमती मुंबई मला आवडते..

ऋन्मेष तुमचं माझगावातलं घर खूपच महागडं असेल असा अंदाज.
अंबानीला कर्ज द्यायचा व्यवसाय आहे का ? कि एस आर के कडून निधी मिळालाय ?

रात्रीची चमचमती मुंबई मला आवडते..
>>>
आणि मला खरे तर ती तितकीशी आवडत नाही Happy
आमच्या माझगाव डोंगरावरची सकाळ आवडते.
मरीन ड्राईव्हचा समुद्र किनारा आणि तिथली संध्याकाळ आवडते.
मध्यरात्री बारा नंतर शहराचा वेग जरा कमी झाल्यावर, गल्ल्या थोड्या अंधाऱ्या झाल्यावर फिरायला आवडते.
एकटे किंवा अगदी क्लोज सर्कल सोबत.. जसे की सध्या दोन्ही मुले.

ऋन्मेष तुमचं माझगावातलं घर खूपच महागडं असेल असा अंदाज.
>>>>
हो, खूपच. कारण जुन्या जागीच बांधले गेले असल्याने बालपणीच्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत त्या सोबत. एक भावनिक नाते आहे. त्यामुळे व्हॅल्यू पैशात नाही मोजू शकत Happy

बहुतेक इथे ९९% मायबोलीकर खूपच श्रीमंत आणि महागड्या घरात राहणारे आहेत. इतक्या बड्या लोकांच्यात आपण वावरतो याचा न्यूनगंड येतो बुवा. कुणाला घरी बोलवावं तर चंद्रमौळी झोपडी, कधी पाणी गळेल, कधी काय सांगता येत नाही. म्हणून फोटो टाकायला पण खूपच कसंसं होतं.
गरीबीमुळे कधी कधी कारमधेच झोपावं लागतं. कारच्या खिडकीतून फोटो काढावा तर गाडी स्थिर नसते...

बस करा मित्रांनो, माझ्या गरीबीबद्दल आता काय सांगू..
मला तर स्वत:लाच गरीबांचा शाहरूख खान म्हणतात Sad

चला, बॅक टू नवी मुंबई..
फोटोत जाणवत असेल नसेल. पण सूर्य पार थंड पडला आहे.
गेले दोन चार दिवस फार मस्त क्लायमेट आहे इथे.

IMG-20241222-WA0003.jpg
.
IMG-20241222-WA0004.jpg

मस्त!
या धाग्यापेक्षा जुनी आहे कविता Happy

साजिरा Rofl

IMG_20241225_144127_0.jpg

*ताडा माडाची झाडे बघितली की. वाशीचे घर आठवते*-
माडाशी निगडित कोकणातल्या माझ्या असंख्य गोड आठवणी आहेत. सध्या मी राहतोय त्या माझ्या मुलीच्या खिडकीतून दिसणारा हा माड आहे. त्याच्या सोबतीला मोठ्ठं आंब्याचं झाड पण आहे, मला आणखीनच सुखावणारं !!!

हो भाऊ, कदाचित कोकण कनेक्शनमुळे असेल त्यामुळेच मला खिडकीतून दिसणारे माडाचे झाड सुखावायचे.
इतरही भले मोठे डेरेदार वृक्ष होते तिथे. दादरच्या हिंदू कॉलनीची आठवण व्हायची. नवीन घर तिथेच घ्यायचे अशी माझी इच्छा होती पण तिथली घरे छान असली तरी जुनी होती आणि घरच्या इतरांना नवीन बांधकामातील सुखसोयी उर्फ एमिनिटीज हव्या होत्या.

*कदाचित कोकण कनेक्शनमुळे असेल* - माझं बालपण मुंबईतल्या ज्या चाळीत गेलं, तिथे 100% कोकणी रहात होते व त्यांना सुखवायला तीन माड होते !! Wink

Pages