तुमच्या खिडकीतून काय दिसते !

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 June, 2022 - 12:33

किल्ली यांच्या कामाचा कोपरा या धाग्यावर विषय निघाला. कामाच्या कोपर्‍याला लागूनच एखादी खिडकी असणे आणि त्यातून बाहेरचा नजारा दिसणे हे नशीब आहे. काम करता करता एक नजर खिडकीबाहेर टाकत त्या नजार्‍याचा आनंद लुटणे हे सुख आहे. मग ते काम ऑफिसचे असो वा किचनचे असो...

चहा पिता पिताही आपल्याला खिडकीत ऊभे राहून बाहेर रस्त्यावर काय चालू आहे हे बघायला आवडते. काहींना साधे ब्रश करतानाही बाल्कनीत जाऊन गाड्या बघायला आवडतात. काही लोकांची सकाळच बाल्कनीत जात आळोखे पिळोखे देण्यापासून सुरू होते. आपल्याला तसे करताना जग बघतेय याची आपल्याला पर्वा नसते, तर आपल्याला तिथून जे जग दिसतेय ते आपल्यासाठी महत्वाचे असते.

जगात काय चालू आहे हे आपल्याला रोज सकाळी वृत्तपत्रे सांगतात. पण आपल्या आसपास सारे काही सुरळीत चालू आहे हे आपल्याला खिडकीबाहेर डोकावल्यावरच समजते. कारण खिडकी केवळ ऊन वारा पाऊसच नाही तर घराच्या चार भिंतीबाहेरील वार्ता देखील घेऊन येते.

टीव्हीवर रोज रोज एकच मालिका दाखवली तर आपण कंटाळून जाऊ. रिमोट हातात ऊचलून लगेच चॅनेल चेंज करू. पण खिडकीबाहेरील रोज रोज एकच दिसणारे दृश्य आपल्याला कधी कंटाळवाणे वाटत नाही. कारण ते जिवंत असते. आपण त्याच्याशी जोडले गेलो असतो. खिडकीतून दिसणारा रस्ता, त्यावर धावणार्‍या गाड्या, रस्त्याकडेला नेहमीच पार्क होणारी गाडी, आजूबाजूच्या ईमारती, त्यातील घरे, आपले नकळत त्यात डोकावणे, तेव्हा दिसणारी आणि दिसताच हसणारी, तो किंवा ती, पलीकडची दुकाने, त्यातल्या दुकानादाराचा चेहरा, येणारे ग्राहक, एखादे झाड, झाडावरचे पक्षी, फळ फुल, आकाशातले ढग, ढगातून जाणारे विमान, खाली धरती, अंबर वरती आणि बरेच काही....

नवीन घर घेतानाही आपण खिडकीतून काय दिसते हे आवर्जून बघतो. तर कधी नाईलाजाने जे दिसतेय ते गोड मानून घ्यावे लागते. पण ते जे काही असते ते आपल्याला आवडतेच. त्यात काही बदल झाल्यास आपल्याला चुकचुकतेच. तर तसे चुकचुकण्याआधी त्याचा छानसा फोटो काढा आणि ती आठवण ईथे साठवून ठेवा. आणि आम्हालाही सांगा,
तुमच्या खिडकीतून काय दिसते !

हा माझा बोहनीचा फोटो
खिडकी तीच, पण चॅनेल बदलायचे काम ऋतुमानानुसार निसर्ग करतो Happy
येऊ द्या.....

IMG_20220628_214559.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमचे घर एवढेही मोठे नाही की त्याची एक खिडकी कोपरखैरणेला आणि एक वाशीला असेल Happy >>> हा विनय आहे ना सर तुमचा ? असे व्यक्तीमत्व पाहण्यात नाही. कसे सांगावे कि एव्हढे मोठे घर आहे असे वाटत असेल. हा गुण सर्वांनी शिकण्यासारखा आहे.

Bangalore_Mysore_Maharaja_Palace.jpg

माझे नाही. इथे रखवालदार म्हणून कामाला असताना केबीनमधून घेतलेला फोटो. चार वर्षे नोकरी केल्यावर पुण्यात येऊन वडापावचा धंदा केला. सध्या सायकल पंक्चर आणि स्टोव्ह रिपेअरचे दुकान आहे. मागच्या बाजूलाच आम्ही राहतो. तिथे खिडकी नाही.

आमचे घर एवढेही मोठे नाही की त्याची एक खिडकी कोपरखैरणेला आणि एक वाशीला असेल >> LOL

धागा उघडतानाचे फोटो आजिबात ओळखू नाही आले ! इतकं छान शाळेचे ग्राउड दिसलेच नाही कधी Lol

शांप्रा : किती सुरेख फोटो आहे

ते गावाकडचं घर मला दिलं तर माझ्या पाळीव प्राण्यांची सोय होईल.
Submitted by शांत प्राणी on 28 June, 2022 - 21:48>>>
गावच्या घराजवळ बरेच बिबटे आहेत.. त्यामुळे घर तुम्हाला दिलं तर त्या बिबट्यांचीच सोय होईल. रात्रीचे खिडकीतून बाहेर डोकावलं तर हमखास एक तरी दिसतोच
3F688429-DCF2-4EFA-942A-950B9599062B.jpeg

पशुपत हा तुमच्या घराच्या/ऑफिसच्या खिडकीतून दिसणारा व्यू आहे का हा?
नसला तरी कुठचे लोकेशन आहे हे?

@ निलाक्षी
इतकं छान शाळेचे ग्राउड दिसलेच नाही कधी Lol >>> धन्यवाद, याला फोटोग्राफरचे कौतुक समजतो Proud

खिडकीतून बिबट्या दिसतो Uhoh
खिडकीतून काय दिसते हि जर स्पर्धा असती तर तुला एखादे प्राईज देऊन टाकले असते..

रहातात कसे इथे लोक ?>> गेल्या काही वर्षात सवय झाली लोकांना
म्हाळसा तुमचा घर जुन्नर तालुक्यात आहे का>> हो, गावाचं नाव राजूरी

गावच्या घराजवळ बरेच बिबटे आहेत. >> बापरे!
उन्हाळा चालू आहे म्हणून खिडकीतून हरण, ससे, Groundhog, blue jay(निळा पक्षी), cardinal(लाल पक्षी) दिसतात. गेले २ आठवडे (कुठूनतरी आलेली) टर्की सुद्धा दिसते आहे.

एवढे प्राणी पक्षी खिडकीतून.. अभयारण्यातच राहता जणू Happy

आमच्याईथे पक्षी दिसतात संध्याकाळचे. थव्याने उडत मिनीसीशोअरच्या वा खाडीच्या दिशेने येतात आणि बिल्डींगवरून जातात.. कामातून ब्रेक घेत मी नेहमी संध्याकाळी बाल्कनीच्या कट्ट्यावर बसून बघतो त्यांना..
तसेच दर दुसऋया मिनिटाला विमान दिसते. दहा मिनिटे बसले की पाच मोजून होतात...

IMG_20220629_232518.JPG
आमच्या खिडकीतून नारळाची झाडं आणि समोरची घरं दिसतात.. त्या नारळाच्या झाडांवर कधीकधी मधमाशाचं पोळं, खार,पोपट,घुबड,साळुंखी, कोकीळ दिसतं.
IMG_20220629_232536.JPG

झोपायला जाता जाता...एक ताजा ताजा.
हे मुंबईच्या एका घरातून..
हा फोटो शेजारच्या मित्राकडून मागवलाय खास या धाग्यावर टाकायला. त्याने त्याच्या खिडकीतून काढला.

18701699231f4d26beb93167f09d8de7.jpg

उर्मिला एस
>>>
ओके मागच्या पानावर.. त्यामुळे कन्फ्यूज झालो. माई मिस्टेक Happy शुभरात्री

म्हाळसा
मला ते घर लपाछपी सिनेमातलं वाटलं. असंच ऊसाचं वावर होतं त्यात.
बिबट्या पाळायचाच होता. आमच्या चेतकचा गोष्टीवेल्हाळ स्वभाव बघता त्याची आणि बिबट्याची दोस्ती होईल. चेतक म्हणजे आमचा पाणघोडा.ध्रुवबाळाची गोष्ट सांगताना बिबट्याच्या डोळ्यातून पाणी येईल.

शिवाय माझ्या हाताने त्याला भाकर तुकडा भरवीन. छ्टाकभर रॉयल स्टॅग सुद्धा देईन. मग किती का बिबटे येईनात. रॉयल स्टॅग प्रत्येकाला मिळेल. सगळे बिबटे एकदम झिंगाट.
लोक म्हणतील जुन्नरचे बिबटे एकदम झिंग झिंग झिंगाट..

अरे बापरे, लपाछपीतल्या घरासारखं डेंजर नाहीए..ऊसाचीच वावरं आहेत आणि त्यामुळेच बिबटेही आहेत..सातच्या आत घरात यावं लागतं म्हणून लोकांची सकाळही लवकरच उजाडते.. सकाळी उठून टेरेसवर गेलं की असा छान व्ह्यू मिळतो
496083E2-0CA6-41A2-882C-042013807816.jpegE934DD5F-4B81-40B2-9A72-20BFE3440A21.jpeg7AF4B5A1-3A56-49E6-9314-2DEF84597AE6.jpeg

पहिला फोटो छान आहे टेरेस व्यू सुर्योदयाचा. बिबट्या टेरेसवर चढू शकतो का? नाहीतर रात्री तिथेच झोपून पहाटे हा व्यू बघतच उठता येईल..

उर्मिला कोण? मातोंडकर? >>> Lol मला सगळे असेच म्हणायचे.

>>>>>>>>>
उर्मिला सुंदर आहे तुमचा व्ह्यु. हिरवगार असेल पावसाळ्यात. >>> हो समो, फार सुंदर दिसत. बोरांची झाडं आहेत मधे, तिथे खूप पोपट येतात.

अवांतर:
तुमचा हेअर ड्रायरवाला धागा सापडत नाहीये मला.

Pages