तुमच्या खिडकीतून काय दिसते !

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 June, 2022 - 12:33

किल्ली यांच्या कामाचा कोपरा या धाग्यावर विषय निघाला. कामाच्या कोपर्‍याला लागूनच एखादी खिडकी असणे आणि त्यातून बाहेरचा नजारा दिसणे हे नशीब आहे. काम करता करता एक नजर खिडकीबाहेर टाकत त्या नजार्‍याचा आनंद लुटणे हे सुख आहे. मग ते काम ऑफिसचे असो वा किचनचे असो...

चहा पिता पिताही आपल्याला खिडकीत ऊभे राहून बाहेर रस्त्यावर काय चालू आहे हे बघायला आवडते. काहींना साधे ब्रश करतानाही बाल्कनीत जाऊन गाड्या बघायला आवडतात. काही लोकांची सकाळच बाल्कनीत जात आळोखे पिळोखे देण्यापासून सुरू होते. आपल्याला तसे करताना जग बघतेय याची आपल्याला पर्वा नसते, तर आपल्याला तिथून जे जग दिसतेय ते आपल्यासाठी महत्वाचे असते.

जगात काय चालू आहे हे आपल्याला रोज सकाळी वृत्तपत्रे सांगतात. पण आपल्या आसपास सारे काही सुरळीत चालू आहे हे आपल्याला खिडकीबाहेर डोकावल्यावरच समजते. कारण खिडकी केवळ ऊन वारा पाऊसच नाही तर घराच्या चार भिंतीबाहेरील वार्ता देखील घेऊन येते.

टीव्हीवर रोज रोज एकच मालिका दाखवली तर आपण कंटाळून जाऊ. रिमोट हातात ऊचलून लगेच चॅनेल चेंज करू. पण खिडकीबाहेरील रोज रोज एकच दिसणारे दृश्य आपल्याला कधी कंटाळवाणे वाटत नाही. कारण ते जिवंत असते. आपण त्याच्याशी जोडले गेलो असतो. खिडकीतून दिसणारा रस्ता, त्यावर धावणार्‍या गाड्या, रस्त्याकडेला नेहमीच पार्क होणारी गाडी, आजूबाजूच्या ईमारती, त्यातील घरे, आपले नकळत त्यात डोकावणे, तेव्हा दिसणारी आणि दिसताच हसणारी, तो किंवा ती, पलीकडची दुकाने, त्यातल्या दुकानादाराचा चेहरा, येणारे ग्राहक, एखादे झाड, झाडावरचे पक्षी, फळ फुल, आकाशातले ढग, ढगातून जाणारे विमान, खाली धरती, अंबर वरती आणि बरेच काही....

नवीन घर घेतानाही आपण खिडकीतून काय दिसते हे आवर्जून बघतो. तर कधी नाईलाजाने जे दिसतेय ते गोड मानून घ्यावे लागते. पण ते जे काही असते ते आपल्याला आवडतेच. त्यात काही बदल झाल्यास आपल्याला चुकचुकतेच. तर तसे चुकचुकण्याआधी त्याचा छानसा फोटो काढा आणि ती आठवण ईथे साठवून ठेवा. आणि आम्हालाही सांगा,
तुमच्या खिडकीतून काय दिसते !

हा माझा बोहनीचा फोटो
खिडकी तीच, पण चॅनेल बदलायचे काम ऋतुमानानुसार निसर्ग करतो Happy
येऊ द्या.....

IMG_20220628_214559.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खिडकीतून टेरेस वरून पडणाऱ्या पाण्यात अंघोळ करणारा बुलबुल दिसतो.
Screenshot_20220709-094638_Video Player.jpg
सतत चिर्र आवाज करत खोपा दुरुस्त करणारा सुगरण पक्षी दिसतो .
त्याने तो मधुमालती वेलाला बांधलेला आहे .
चार पाच वर्षापूर्वी एकाच सीजन ला अकरा खोपी होती .

Screenshot_20220709-095555_Video Player.jpg
आणि पाणी प्यायला आलेले सात भाई दिसतात ..
Screenshot_20220709-170408_Gallery.jpg

माझ घर उंचावर नाहीये...आकाश पण नाही दिसत खीडकीतून....

पण सुख एवढच आहे ...पहाटे खीडकी ऊघडली की असा प्राजक्ताचा सडा मात्र दिसतो
https://drive.google.com/file/d/1e5pEYmM5CfiWEoEg24DZ17uAItXV1hp6/view?u...

माझ घर उंचावर नाहीये...आकाश पण नाही दिसत खीडकीतून....

पण सुख एवढच आहे ...पहाटे खीडकी ऊघडली की असा प्राजक्ताचा सडा मात्र दिसतो

alt="IMG_20220709_083702.jpg" />

पण सुख एवढच आहे ...पहाटे खीडकी ऊघडली की असा प्राजक्ताचा सडा मात्र दिसतो
>>>>>>>
हे खरेच सुख असते. काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या. अगदी खिडकीला लागूनच हा सडा पडायचा..

म्हाळसा >>> तुमच्या खिडकीतून कितीतरी दिवसांनी सूर्यप्रकाश दिसला, गेल्या १५ ते २० दिवसांपासून मुंबईतील पावसाच्या थैमानामुळे सूर्यप्रकाश दुर्लभ झाला आहे.

राहुल +७८६ >> आज तर सुर्य सोडा समोरची ईमारत दिसायचे वांधे आहेत. पाऊस दिसायला जसा छान वाटतो. तसा फोटो काढायला गेले तर त्यात तो येत नाही. पांढरे धुरकट चित्र दिसते. तरी एक ट्राय मारतो नंतर..

अर्रर ... Sad
समजू शकतो यातले दु:ख

>>>>>>कालच्या वादळी पावसात माझा प्राजक्त ....
एक मोठी फांदी तुटुन गेली....आता छोटासाच बाकी राहिला आहे
पुन्हा येइल Sad जोमाने बहरेल.

अरे वाह मस्त आहे
ते गाणेही अगदी.. गारवाचे आहे ना ते.. ऐकावे लागणार आज.. तिथे क्लिक केले आणि ईथे पावसाला सुरुवात झाली.. योगायोग Happy

... पाऊस.. पाऊस... पाऊस .. पाऊस...
......... पाऊस.. पाऊस .. पाऊस
...............पाऊस.. पाऊस
..................... पाऊस

IMG_20220716_223506.jpg

Pages