किल्ली यांच्या कामाचा कोपरा या धाग्यावर विषय निघाला. कामाच्या कोपर्याला लागूनच एखादी खिडकी असणे आणि त्यातून बाहेरचा नजारा दिसणे हे नशीब आहे. काम करता करता एक नजर खिडकीबाहेर टाकत त्या नजार्याचा आनंद लुटणे हे सुख आहे. मग ते काम ऑफिसचे असो वा किचनचे असो...
चहा पिता पिताही आपल्याला खिडकीत ऊभे राहून बाहेर रस्त्यावर काय चालू आहे हे बघायला आवडते. काहींना साधे ब्रश करतानाही बाल्कनीत जाऊन गाड्या बघायला आवडतात. काही लोकांची सकाळच बाल्कनीत जात आळोखे पिळोखे देण्यापासून सुरू होते. आपल्याला तसे करताना जग बघतेय याची आपल्याला पर्वा नसते, तर आपल्याला तिथून जे जग दिसतेय ते आपल्यासाठी महत्वाचे असते.
जगात काय चालू आहे हे आपल्याला रोज सकाळी वृत्तपत्रे सांगतात. पण आपल्या आसपास सारे काही सुरळीत चालू आहे हे आपल्याला खिडकीबाहेर डोकावल्यावरच समजते. कारण खिडकी केवळ ऊन वारा पाऊसच नाही तर घराच्या चार भिंतीबाहेरील वार्ता देखील घेऊन येते.
टीव्हीवर रोज रोज एकच मालिका दाखवली तर आपण कंटाळून जाऊ. रिमोट हातात ऊचलून लगेच चॅनेल चेंज करू. पण खिडकीबाहेरील रोज रोज एकच दिसणारे दृश्य आपल्याला कधी कंटाळवाणे वाटत नाही. कारण ते जिवंत असते. आपण त्याच्याशी जोडले गेलो असतो. खिडकीतून दिसणारा रस्ता, त्यावर धावणार्या गाड्या, रस्त्याकडेला नेहमीच पार्क होणारी गाडी, आजूबाजूच्या ईमारती, त्यातील घरे, आपले नकळत त्यात डोकावणे, तेव्हा दिसणारी आणि दिसताच हसणारी, तो किंवा ती, पलीकडची दुकाने, त्यातल्या दुकानादाराचा चेहरा, येणारे ग्राहक, एखादे झाड, झाडावरचे पक्षी, फळ फुल, आकाशातले ढग, ढगातून जाणारे विमान, खाली धरती, अंबर वरती आणि बरेच काही....
नवीन घर घेतानाही आपण खिडकीतून काय दिसते हे आवर्जून बघतो. तर कधी नाईलाजाने जे दिसतेय ते गोड मानून घ्यावे लागते. पण ते जे काही असते ते आपल्याला आवडतेच. त्यात काही बदल झाल्यास आपल्याला चुकचुकतेच. तर तसे चुकचुकण्याआधी त्याचा छानसा फोटो काढा आणि ती आठवण ईथे साठवून ठेवा. आणि आम्हालाही सांगा,
तुमच्या खिडकीतून काय दिसते !
हा माझा बोहनीचा फोटो
खिडकी तीच, पण चॅनेल बदलायचे काम ऋतुमानानुसार निसर्ग करतो 
येऊ द्या.....

मुंबईच्या खिडकीतून....
मुंबईच्या खिडकीतून....
प्रसन्न सकाळ
रोमॅंटीक संध्याकाळ
आणि झगमगती रात्र
आणि
झगमगती रात्र
सर, आपण तुमच्या बद्दल,
सर, आपण तुमच्या बद्दल, तुमच्या घराबद्दल, तुमच्या सगळ्या बद्दल ३६५ दिवस २४ * ७ बोलतोच कि. पण खूप दिवसांनी काही जुन्या मायबोलीकरांचे धागे आले आहेत. पब्लिक पण खूपच खूष आहे. तर त्यांचं गिर्हाईक कशाला तोडायचं? थो sssss डी कळ सोसता आली तर बघा.
सक्ती नाही. तुमचं कौतुक आत्ताच करायचं असेल तर आक्षेप नाही हो.
फोटो कौतुकास्पद आहेत या
फोटो कौतुकास्पद आहेत या कॉम्प्लिमेंटरी प्रतिसादाबद्दल थॅम्क्स ब्रो
अरे वा छान आहे
अरे वा छान आहे
मुंबई मध्ये कुठला भाग आहे हा?
आणि फोटो बऱ्याच उंची वरून काढलेला वाटत आहे
धन्यवाद निलेश,
धन्यवाद निलेश,
फोटो माझगावमधून काढला आहे. समोर भायखळा आहे. त्या पलीकडे ताडदेव आहे. तिथले फेमस ट्विन टॉवर आधी स्पष्ट दिसायचे. आता मध्येही ईमारती उभ्या राहिल्याने ठराविक ॲंगलने दिसतात.
फोटो ईतक्याही ऊंचीवरून नाही. तरी दहाव्या माळ्यावरून आहे. पण ओवरऑल माझगावच जरा ऊंचावर आहे.
फोटोत उजवीकडे दिसणारी शेजारची बिल्डींग ३६ माळ्याची आहे. आमच्याच बिल्डरची आहे. तिथून बघायला आणखी छान वाटत असेल.
ऋजींना घालून पाडून का बोलत
ऋजींना घालून पाडून का बोलत आहात ? त्यांचं मायबोलीवर खूप प्रेम आहे.
( लगेच पुरावे मागू नका. सरांनी स्वतः खूपदा सांगितले आहे. ते शोधून घ्या).
सुंदर.
सुंदर.
काल एकाच वेळी उन्हं पाऊस
काल एकाच वेळी उन्हं पाऊस क्षितिजावर दाटलेले काळे ढग असे मस्त वातावरण होते. इंद्रधनुष्य असते तर अजून मजा आली असती.
संध्याकाळी इथेच समोर
संध्याकाळी इंद्रधनुष्य दिसले.
पण दुर्दैवाने मी घरी नव्हतो फोटो टिपायला..
वाह!!!
वाह!!!
खुपच सुंदर क्लिक आहे
खुपच सुंदर क्लिक आहे
धन्यवाद सामो आणि अज्ञानी
धन्यवाद सामो आणि अज्ञानी
पावसाळ्यात बाल्कनीत बसायला मस्तच वाटते. हे दृश्य घरातील तीन बाल्कनी आणि किचनची खिडकी अश्या चार ठिकाणहून दिसते. किचनमध्ये उभे राहून काम करताना मी खिडकीबाहेरच बघत असतो. खालील दुसऱ्या फोटोतील फुटबॉल खेळणारी मुले मी तासनतास बघू शकतो. जेव्हा पावसाळा नसतो तेव्हा क्रिकेटचा खेळ चालू असतो. तो तर दिवसभर बघू शकतो.
.
.

आणि हे १५ ऑगस्टचे फोटो.
आणि हे १५ ऑगस्टचे फोटो.
मी आमच्या खिडकीतून फोटो काढतो आणि सोसायटी ग्रूपवर टाकतो ते सारे जण मग आपल्या स्टेटसवर लावतात.
कारण आमचा अँगल परफेक्ट आहे या फोटोला..
.
१५ ऑगस्टचे फोटोही मस्त आलेत.
१५ ऑगस्टचे फोटोही मस्त आलेत.
धन्यवाद सामो
धन्यवाद सामो !
सर्वच फोटो एकसे बढकर एक आहेत.
सर्वच फोटो एकसे बढकर एक आहेत.
(No subject)
अरे वाह किल्ली.. खूप लाँग
अरे वाह किल्ली.. खूप लाँग व्यू आहे
बरे झाले हा धागा वर आला.. खिडकीतले दृश्य आवडीचा विषय आहे.
वाह किल्ली काय बर्ड व्यु आहे
वाह किल्ली काय बर्ड व्यु आहे गं.
खिडकीतून दिसणारी रंगपंचमी
खिडकीतून दिसणारी रंगपंचमी
यावेळी बाल्कनीत बसूनच बघावी लागली.
पण पोरांना मजा करताना बघणे सुद्धा आनंददायी असते..
मस्त..चौथा photo best
धन्यवाद ऋ आणि सामो.
.
मस्त..चौथा photo best
ॠन्मेष फार मस्त
ॠन्मेष फार मस्त
किल्ली, सामो धन्यवाद!
किल्ली, सामो धन्यवाद!
चौथा photo best >> त्यात उजवीकडे आमचीच कार्टी आहे म्हणून फोटो काढला. तिचे आणि चिखल मातीचे अगदी लहानपणापासूनचे नाते आहे
,
,
टिंब देऊन धागा वर आला आहे तर
टिंब देऊन धागा वर आला आहे तर चंद्र टाकतो
ऋन्मेष, हा धागा जेव्हा जेव्हा
ऋन्मेष, हा धागा जेव्हा जेव्हा वर येतो तेव्हा तेव्हा तुला हा विषय सुचला- याचं कौतुक वाटतं. (तुझ्या घरातून दिसणारे व्ह्यू दाखवण्यासाठीही काढला असशील, पण तुझ्याबद्दलचं त्यात नवीन काय आहे, नाही का
)
जगातल्या सगळ्या थोर कलाकारांना खिडकी, आणि ती दाखवते त्या गोष्टी- यांचं अप्रूप होतं. माधव आचवलांनी यावर फार भारी लिहिलं आहे.
व्हिंसेंट वॅन गॉग नावाचा महान कलाकार होता. चित्रांव्यतिरिक्त त्याचा आणखी एक हळवा कोपरा होता- त्याचा भाऊ थिओ. आयुष्यात लिहिलेली जवळजवळ सर्व पत्रं त्याने थिओला लिहिली आहेत, आणि ती प्रसिद्धही आहेत.
थिओच्या पॅरिसमधल्या घराच्या खिडकीतून दिसणारं दृष्य व्हॅन गॉगने काढून ठेवलं आहे.

*View from Theo*s Home* (1887)
व्हॅनगॉग वेडा होऊन रुग्णालयात दाखल झाला. त्या खोलीच्या खिडकीत बसून त्याने अजरामर चित्रं काढली. सगळ्यात प्रसिद्ध आणि श्रीमंत चित्र होतं, अर्थातच- स्टारी नाईट. पण हे चित्र कुठच्याही खिडकीतून दिसत नव्हतं. त्याच्या अख्ख्या विश्वातल्या आतल्या खिडक्यांतून दिसेल तसं त्यानं ते काढलं.
पिकासोनंही अशी अनेक चित्रं काढली. त्यातली-


*Still life in front of a window at Saint-Raphael* (1919)
*The Pigeons, Cannes* (1957)
हे दुसरं 'कान्स'मधलं चित्र पिकासोने त्याचा मित्र मतीझच्या स्मरणार्थ केलं, ज्याला खिडक्या, बाल्कन्या, टेरेसेस आणि तिथून दिसनारी दृष्यं- याचं ऑब्सेशन होतं.
अनेक आठवत आहेत, पण साल्वादोर दालीचं हे फेमस पेंटिंग इथं टाकलंच पाहिजे-

Young Woman at a Window by Salvador dali (1970)
साजिरा सुंदर पोस्ट!
साजिरा सुंदर पोस्ट!
चंद्र ही छान!
साजिरा मस्त पोस्ट.. अशी पोस्ट
साजिरा मस्त पोस्ट.. अशी पोस्ट या धाग्यावर येणे हे धाग्याचे नशीब..
Young Woman at a Window... याचे young and beautiful करावे असे वाटते. चेहरा न दिसताही किती आकर्षक दिसत आहे ती.. तिथे तिच्या शेजारी उभे राहावेसे वाटले.. तिच्यासोबत बाहेरचे ते दृश्य बघत गप्पा मारणे एक रोमांटिक डेट होईल.
बाई दवे, दुसऱ्या ओळीतील कंस
.. जो खरा असला तरी नवीन घर विकत घेताना माझे जे क्रायटेरियाज होते त्यात खिडकीतून दिसणारे दृश्य हे फार वर होते. मी घर शोधताना घराच्या खिडक्यातून डोकावूं लागलो की माझी बायको नेहमी म्हणायची. झाले याचे सुरू...
Pages