तुमच्या खिडकीतून काय दिसते !

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 June, 2022 - 12:33

किल्ली यांच्या कामाचा कोपरा या धाग्यावर विषय निघाला. कामाच्या कोपर्‍याला लागूनच एखादी खिडकी असणे आणि त्यातून बाहेरचा नजारा दिसणे हे नशीब आहे. काम करता करता एक नजर खिडकीबाहेर टाकत त्या नजार्‍याचा आनंद लुटणे हे सुख आहे. मग ते काम ऑफिसचे असो वा किचनचे असो...

चहा पिता पिताही आपल्याला खिडकीत ऊभे राहून बाहेर रस्त्यावर काय चालू आहे हे बघायला आवडते. काहींना साधे ब्रश करतानाही बाल्कनीत जाऊन गाड्या बघायला आवडतात. काही लोकांची सकाळच बाल्कनीत जात आळोखे पिळोखे देण्यापासून सुरू होते. आपल्याला तसे करताना जग बघतेय याची आपल्याला पर्वा नसते, तर आपल्याला तिथून जे जग दिसतेय ते आपल्यासाठी महत्वाचे असते.

जगात काय चालू आहे हे आपल्याला रोज सकाळी वृत्तपत्रे सांगतात. पण आपल्या आसपास सारे काही सुरळीत चालू आहे हे आपल्याला खिडकीबाहेर डोकावल्यावरच समजते. कारण खिडकी केवळ ऊन वारा पाऊसच नाही तर घराच्या चार भिंतीबाहेरील वार्ता देखील घेऊन येते.

टीव्हीवर रोज रोज एकच मालिका दाखवली तर आपण कंटाळून जाऊ. रिमोट हातात ऊचलून लगेच चॅनेल चेंज करू. पण खिडकीबाहेरील रोज रोज एकच दिसणारे दृश्य आपल्याला कधी कंटाळवाणे वाटत नाही. कारण ते जिवंत असते. आपण त्याच्याशी जोडले गेलो असतो. खिडकीतून दिसणारा रस्ता, त्यावर धावणार्‍या गाड्या, रस्त्याकडेला नेहमीच पार्क होणारी गाडी, आजूबाजूच्या ईमारती, त्यातील घरे, आपले नकळत त्यात डोकावणे, तेव्हा दिसणारी आणि दिसताच हसणारी, तो किंवा ती, पलीकडची दुकाने, त्यातल्या दुकानादाराचा चेहरा, येणारे ग्राहक, एखादे झाड, झाडावरचे पक्षी, फळ फुल, आकाशातले ढग, ढगातून जाणारे विमान, खाली धरती, अंबर वरती आणि बरेच काही....

नवीन घर घेतानाही आपण खिडकीतून काय दिसते हे आवर्जून बघतो. तर कधी नाईलाजाने जे दिसतेय ते गोड मानून घ्यावे लागते. पण ते जे काही असते ते आपल्याला आवडतेच. त्यात काही बदल झाल्यास आपल्याला चुकचुकतेच. तर तसे चुकचुकण्याआधी त्याचा छानसा फोटो काढा आणि ती आठवण ईथे साठवून ठेवा. आणि आम्हालाही सांगा,
तुमच्या खिडकीतून काय दिसते !

हा माझा बोहनीचा फोटो
खिडकी तीच, पण चॅनेल बदलायचे काम ऋतुमानानुसार निसर्ग करतो Happy
येऊ द्या.....

IMG_20220628_214559.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पावसाचा खिडकीतला photo टाकण्यासाठी धागा वर काढला होता पण photo compress झाला नव्हता. आणि ब्लर आला होता.
बरं झालं पण
साजिरा ह्यांची post आली

चेहरा न दिसताही किती आकर्षक दिसत आहे ती.. तिथे तिच्या शेजारी उभे राहावेसे वाटले.
>>> आकर्षक तर आहेच. त्याशिवाय का इतकं फेमस झालं ते.

पण तिथं शेजारी जाऊ नकोस. एकतर ती दालीची गर्लफ्रेंड आहे. दुसरं म्हणजे हा दाली भिडू सर्रियलिझमचा वारकरी आहे. तू तिथं असा शेजारी जाण्याचा अवकाश, की ती गायब होईल. अशीही दालीने मुळातच तिच्या शेजारी फार जागा शिल्लक ठेवलेली नाही. तू आपला विषयाला धरून राहा, आणि फक्त खिडकीच्या बाहेरच बघ.

दालीचा आता आत्मा झाला असेल तर डुआयडी घ्यायची काय गरज? डायरेक्ट क्लेम लावू शकतो की...

माझे लग्न झाले आहे म्हणा.. पण तसेही मायबोलीवर विबासं या शब्दाला एक वेगळेच ग्लॅमर आहे.. ते बघून एखादे करायची इच्छा कित्येक दिवसांपासून मनात होतीच.

त्याची गर्लफ्रेंड 90 वर्षाची का झाली असेना.. योगायोगाने मी सुद्धा नाईंटीज किड आहे.

खिडकीत तिच्या शेजारी जागा कमी नसून माझी शरीरयष्टी पाहता नेमकी मला पुरेल इतकीच ठेवली गेली आहे..

फक्त आता एकच टेन्शन आहे..
जर ती दालीची स्वतःची गर्लफ्रेंड असेल तर तो प्रेमात आंधळा होऊन त्याला ती अतिआकर्षक दिसत असणार आणि तसेच चित्र रेखाटले गेले असणार.. प्रत्यक्षात तितकीच असेल का शंका आहे.

मस्त..

धागा वर आला की मलाही मोह होतो Happy

एव्हड्या उंच इमारती एकामेकांना चिटकून? खालच्या मजल्यावर प्रकाश येत असेल का? कि पाहताना माझी काही गल्लत होतेय? पुढे-मागे आहेत कि काय?

एका रांगेत असतील.. आणि एकच रांग असेल. म्हणजे समोरासमोर नसतील. दोन्ही बाजूने खिडक्या असतील तिथून त्या साईडच्या फ्लॅट ना प्रकाश.

खाबुतारांची खुराडी. हे पिक्चर नव्या युगाचे आयकॉनिक आहे. आता पत्ता सांगायचा झाला तर मॅट्रिक्स फॉर्माट मध्ये सांगायचा. (१८ ५ ४)
हाय राईज, लो लाईफ.

image_67212289-min.JPG

अमेरिकेत सधारण तीन प्रकारची घरे असतात, काँडो ( आपल्याकडचे फ्लॅट) , टाऊन्होम्स ( आपल्याकडची रो हौसेस, फोटोत ती आहेत, एकमेखांना खेटून असलेली घरे) व सिन्गल फॅमिली होम्स ( आपल्य भाषेत बंगले) प्रत्येक घराला कार ठेवायला एक गॅरेज आहे, शिवाय समोर एक पार्किंग स्पॉट. घरांसमोर निळ्य कचरापेट्या. आठवड्यातून दोन दिवस एक ट्रक येतो व कचरा गोळा करून जातो, नुकताच पाऊस पडला आहे. स्पीड लिमिट १५ मैल आहे. (मैल वापरणारा एकमेव देश असावा हा)

मस्त
जवळपास हाच फोटो मी कुठेतरी पाहिला होता. तेव्हा त्या रस्त्यावर मुले खेळत होती..

बाथरूमच्या खिडकीतून किंवा गार्डनमधून..
(हे फोटो गार्डनमधून काढले आहेत)

दुपार आणि संध्याकाळ

IMG_20240511_221023.jpg
.
IMG_20240511_221011.jpg

हो, तिन्ही बाजूंना तीन शाळांची मैदाने आहेत. सर्वांसाठी खुली असल्याने खेळायची सुद्धा सोय होते आणि त्या मोकळ्या जागेमुळे आमचा वारा सुद्धा अडत नाही Happy

Pages