Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53
चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...
चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आजचा Netflix कपिल शर्मा शो
आजचा Netflix कपिल शर्मा शो चांगला होता.
मूर्ती पती पत्नी आणि Zomato फॅमिली आली होती..
बरेचदा मी सुरू करतो आणि बोर झाले की चॅनेल बदलातो. पण यात सुरुवातीपासूनच चांगले vibes येत होते.
मियाळगाSS >> तमिळ भाषेत
मियाळगाSS >> तमिळ भाषेत अकारांत पुं शब्दाला मूळ रूप उच्चारताना आ लावतात. प्रथमा एकवचनी उल्लेख करताना अन् लावतात. तो आदरार्थी उल्लेख असेल तर अर लावतात. त्यामुळे वंद्य-तेवन, करिगालन, अरुलमोळी-वर्मन किंवा वर्मर, रामन, पळूवेट्टरियर, मुरलीदरन... अशी रूपं होतात.
मोरोबा
मोरोबा
मिय्यळ्ळ्गान
मिय्यळ्ळ्गान
मी मागच्या रांगेत असतो तर
मी मागच्या रांगेत असतो तर तिथूनच गिफ्ट न देता कलटी मारून, भरपूर जेवून सटकलो असतो>>>>
भरपुर जेऊन हे एकदम परफेक्ट..
संपुर्ण चित्रपट तसा प्रेक्षणिय आहे पण ती जेवणाची फ्रेम मात्र डोळ्यांसमोरुन आजही हलत नाहीय्
बकिंगहॅम मर्डर्स पहिला. वन
बकिंगहॅम मर्डर्स पहिला. वन टाईम वॉच. करीना कपूर आणि रणवीर ब्रार हे ओळखीचे चेहरे. ब्रारने चांगली केलीय ॲक्टिंग. करीनासाठी फार वेगळा रोल नाहीये. खुनी सापडतो सापडतो म्हणता म्हणता काही तरी वेगळा clue मिळत जातो आणि सुई दुसरीकडे वळते. पेस चांगला आहे पण मधे slow होतो. मर्डर मिस्ट्रीस आवडतात त्यामुळे मला आवडला.
बकिंगहॅम मर्डर्स>>ठीक आहे.
बकिंगहॅम मर्डर्स>>ठीक आहे. But not as expected हंसल मेहताने पाट्या टाकल्या आहेत. Not expected from him.
Time cut इंग्रजी नेटफ्लिक्सवर
Time cut इंग्रजी नेटफ्लिक्सवर.
१८एप्रिल २०१४ मधून एक मुलगी अपघाताने १८ एप्रिल २००३ मधे पोहोचतो.. जस्ट तीच्या मोठ्या बहिणीचा मर्डर व्हायच्या दोन दिवस आधी..
क्राईम, सस्पेन्स, टाईम ट्रैवल..चांगला आहे.
Dont move इंग्रजी नेटफ्लिक्सवर
एक किलर एका स्त्रीच्या शरीरात हळूहळू पैरालाईज्ड होणारे औषध इनजेक्ट करतो.. पूर्ण शरीर पैरालाईज्ड व्हायच्या आधी तीला कुणाची तरी मदत घ्यावी लागणार..चांगला आहे थ्रिलर सिनेमा...
The platform 2 इंग्रजी नेटफ्लिक्सवर
सिनेमा समजला नाही.
आस्वा काही समजलं नाही. परत
आस्वा काही समजलं नाही. परत सिनेमा पाहिला शेवट नामावली पर्यंत . भूवनाचा सीन पॅाज करून पाहिला. वाटल कोणत कॅरेक्टर हे जे चूकून सुटल नजरेतून. शेवटी चीकवाची मागची पान पहात गेले आणि आस्वा सापडल.
काल उल्लेख केलेला "My Old A**
काल उल्लेख केलेला "My Old A**" पाहिला. तो प्राइम वर आहे. मी चुकून नेफि लिहीले होते. मस्त पिक्चर आहे. शेवटही चांगला आहे. फक्त एक त्यात उल्लेख केला आहे तो मला समजला नाही/आवडला नाही. पण स्पॉईलर होईल म्हणून बहुतेकांचा बघून झाल्यावर बोलू. पिक्चर मस्त आहे.
Dont move इंग्रजी नेटफ्लिक्सवर >> पहिली १०-१५ मिनिटे अंगावर येतात. पण नंतर सर्वाव्हल थ्रिलर सारखा आहे. एंगेजिंग आहे. यलोस्टोन सिरीज मधे "मोनिका" चे जिने काम केले आहे ती लीड रोल मधे आहे. दुसरा मेल लीड आहे तो ओळखला नाही.
Mikey And Nicky (1976)https:/
Mikey And Nicky (1976)
https://www.youtube.com/watch?v=ztGLuzbCGzA
मित्र, मैत्री आणि विश्वासघात ह्यांची जबरदस्त कहाणी.
Neo-Noir
“A powerful dark tale that is emotional and profound in its unsentimental characterization of lowly underworld figures.”
त्या दशकातल्या १० अर्वोत्कृष्ट सिनेमातील एक.
संपवला एकदाचा मियाळगा.
संपवला एकदाचा मियाळगा.
पहिल्या भेटीत नाव बिचारले असते तरी चालले असते>>> +१
मेलोड्रामाटिक ओव्हर द टॉप ॲक्टिंगवाले सीन पाहून डोळे पुसायला ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी ठीक पिक्चर आहे. इतरांनी पाहिला/नाही पाहिला तरी चालेल.
त्यातल्या त्यात अरविंद स्वामी बरा ॲक्टलाय.
सिनेमॅटोग्राफी चांगली आहे. ग्रामीण पार्श्वभूमीचे सीन डोळ्यांना बरे वाटतात पण आजच्या अल्ट्रा एचडी जमान्यात त्यात काही विशेष राहिलं नाही.
कोणी नेफ्ली वर लिव्हिंग विथ लेपर्ड्स नावाची डॉक्युमेंटरी पाहिली आहे का? व्हिज्युअल्स अप्रतिम आहेत!
Prime वर zwigato पाहिला.
Prime वर zwigato पाहिला. कपिल शर्मा ने सुंदर काम केले आहे. या सिनेमाबद्दल आधी लिहिले असल्यास माहीत नाही. मी आज पाहिला मला आवडला. दोन्ही लीड ने कपिल आणि शहाना गोस्वामी यांनी छान काम केले आहे.
विजय 69 - नेटफ्लिक्स - न्यू
विजय 69 - नेटफ्लिक्स - न्यू रिलीज - अनुपम खेर
आधी नावावरून ॲडल्ट कॉमेडी वाटला. पण ट्रेलर पाहिले तर वेगळाच निघाला.
69 वर्षांच्या अनुपम खेरच्या डोक्यात ट्रायथलॉन पूर्ण करायचे खूळ संचारते. हा प्रकार हर्पेनमुळे माहीत असल्याने चटकन रीलेट झाला.
पिक्चर टाईमपास, इमोशनल, इंस्पीरेशनल वगैरे सर्व आहे. शेवट फिल्मी आहे. पण तोपर्यंत आपण पिक्चरसोबत इमोशनली कनेक्ट झालो असतो. मी तरी झालेलो. त्यामुळे मला आवडला. जे होऊ शकतात त्या सर्वाँना आवडेल.
कोणाला शेवटचं नाही तर पूर्ण चित्रपट देखील फिल्मी वाटू शकतो. स्पोर्ट्स चित्रपट आहे तर ट्रायथलॉनचे नियम अमुक तमुक असतात, ते यात चुकलेत वगैरे माझे लाड नसतात त्यामुळे मला तसे वाटले नाही.
अनुपम खेर साठी मात्र एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अवॉर्ड विनिंग परफॉर्मन्स!
अरे हो, ते अनन्या पांडेचे बाबा आय ॲम जस्ट जोकिंग चांकी पांडे सुद्धा आहे यात. तो सुद्धा हल्ली छान ॲक्टिंग करतो.
सान्वी, अनुमोदन. मी दोन तीन
सान्वी, अनुमोदन. मी दोन तीन पानामागे त्यावर लिहीले आहे.

भक्ती, उत्सुकता होती. धन्यवाद.
------------
नंतर बैलावर एक निबंध आहे व सायकलवर एक आख्यान आहे. जगावेगळा असा काही चित्रपट वाटला नाही. भावनांचेही खूप लेयर्स वगैरे जाणवले नाहीत. उलट एकाच प्रतलातला आवेग आहे. तो त्याच्या एका कझिनचे नाव विसरून गेलेला असतो आणि कझिन मात्र 'भैय्या भैय्या' करत मांडीवरच येऊन बसलेला असतो. हा चांगला मोठा असताना त्यांना सुट्टीत सिनेमा, खेळ, गप्पा व चक्क मांडीवर झोपवलेले असताना त्याचे नाव तर काय त्यालाच विसरून जातो हे थोडे झेपले नाही. आणि बहिणीचे लग्न असते व 'हम एकसाथ बडे हुए है' म्हणतो तर बहिण पंचवीस वर्षांची आणि हा पंचावन्न वर्षांचा दिसत होते. 'एकसाथ बडे' कसे झाले, टाईम ट्रॅव्हल करून का ?
दोघे मिळून अंगणात मडक्यात ताडी पित असताना गाणी गातात, ती एवढी भयंकररित्या अनुवादित केली आहेत. त्याच अंगणात बाजूला आडही असते. त्यामुळे 'इकडे आड तिकडे विहीर' प्रसंग उद्भवला म्हणता येईल प्रेक्षकांना.
मैयाळागन एकदाचा संपवला. तीन वेळा बेसूर का भेसूर गाणं आलं की बंद केला होता. एकदा ती परीक्षा पास झालो की पुढे सहनशक्ती वाढते.
कार्तीचा अभिनय आणि वावर खूप सहज आहे. अरविंदनचाही चांगलाच आहे पण त्याला जरा लो एनर्जी आणि ऑकवर्ड वावर दाखवायचा होता. शेवटी भेटायला जाताना तो सहज , शर्ट ईन केलेला, कॉन्फिडन्ट वाटला. कार्तीचे मोठे मन बघून त्यालाही त्या इस्टेट लुबाडलेल्या केळीच्या पानावर भरपेट जेवणाऱ्या चार नगांना माफ करता आले. तगमगीचे क्लोजर मिळवता आले व नंतर नवीन घर घेता आले. स्वतःच्या मुळांशी कुठेतरी स्वतःला पुन्हा जोडता आले. त्यामुळे बैल, सायकल, मडक्यातली बिअर, देवाचे न घेतलेले दर्शन ही सगळी अरविंदनची थेरपी झाली. पूर्ण वेळ कार्ती 'राम-भरत भेट' (चपलांसकट) मोड मधे होता आणि अरविंदन 'मैं कहां हुं' मोड मधे होता. शेवटची पंचेचाळीस मिनिटे आवडला, सुरवातीचे छत्तीस तास सहन केला.
नेफिवर "माय ओल्ड अॅ* "
विजय 69 - नेटफ्लिक्स - न्यू रिलीज - अनुपम खेर>>>
ऋ, हे वाचून ट्रेलर बघितले त्याचे. रेकोसाठी धन्यवाद.
राम-भरत भेट' (चपलांसकट >>
राम-भरत भेट' (चपलांसकट >> सहीच!!
इकडे आड तिकडे विहीर पण आवडलं
कोणाला पिक्चर पाहिला का हे
कोणाला पिक्चर पाहिला का हे विचारायची पण चोरी.
"Have you seen 'my old ass'?"
"??!...Its right behind you"
मैयाळगन हिंदीत बघूनही ज्यांना
मैयाळगन हिंदीत बघूनही ज्यांना आवडला त्यांनी हात वर करा.
मैयाळगन तमिळमधे बघूनही ज्यांना आवडला नाही त्यांनी हात वर करा
बहुतेक कमी लोक असतील असे.
असो.
कार्तीसाठी ती ९४ सालची उन्हाळ्याची सुट्टी संस्मरणीय असते. तो पहिल्यांदाच आपल्या गावातून बाहेर कुठेतरी रहायला जातो. तिथे इतर मुलांबरोबर भरपूर मज्जा करतो. तिथे एक दादा असतो, जो सगळ्या मुलांशी छान, प्रेमाने वागत असतो. कार्तीचं कुटुंब गरीब असल्याने इतर नातेवाईक त्यांच्याशी तुच्छतेने/फटकून वागत असतात. अशा परिस्थितीत अरविंदस्वामी आणि त्याच्या कुटुंबाने दिलेली चांगली वागणूक त्याच्यासाठी मोलाची असते. नंतर तर त्याची सायकलही त्याला मिळते, जिच्यामुळे घरात बरकत येते. (एरवीही एखादी वस्तू किंवा वास्तू, गाय-मांजर-कुत्रा यांचा पायगुण चांगला अशी समजूत सहज निर्माण होते, इथे तर ती सायकल खरोखरच त्यांच्या उत्कर्षाला कारणीभूत होते). अरविंदस्वामीचे कुटुंबीय प्रॉपर्टीच्या वादात हरल्यावर ग्रेसफुली तंजावर सोडून जातात. त्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांना सहानुभूती आणि त्यांच्या एकूण स्वभावामुळे आदर असतो. या सगळ्या परिस्थितीमुळे कार्तीसाठी अरविंदस्वामी आणि कुटुंब अतिशय ओळखीचे, आदरणीय वगैरे वगैरे असतात.
याउलट अरविंदस्वामीसाठी ९४ च्या सुट्टीत आलेल्या अनेक मुलांपैकी तो एक असतो. कदाचित दरवर्षीच त्यांच्याकडे नातेवाईक मुलं येत असतील. कार्ती काही सख्ख्या कझिन्सपैकी नसतो. नंतर दोन वर्षांनी गाव सोडून गेल्यावर त्यांनी मागची कवाडं बंद करून टाकलेली असतात. भुवना अगदीच लाडकी बहीण असल्यामुळे तिच्याशी आणि इतर काही जवळच्या लोकांशी संपर्क राहतो.
भुवना बहुतेक यांच्याकडे तंजावरलाच रहात असणार कारण ते तंजावर सोडून जाणार म्हटल्यावर तिचे वडील तिला गावाला घेऊन जातात असा उल्लेख आहे. त्यामुळे अरविंदस्वामी आणि भुवना खूप क्लोज असणं, विशेषतः त्याचा चांगला स्वभाव बघता, अगदी स्वाभाविक आहे. वरती माधवनी म्हटल्याप्रमाणे लहानपणच्या जवळिकीच्या आठवणी ज्यांच्याबरोबरच्या असतात, त्यांच्याशी नंतर सहवास आला-न आला तरी सहसा प्रेम टिकून राहतं. अपवाद- प्रॉपर्टी किंवा तत्सम कारणांमुळे झालेल्या भांडणाचा. तिथे मात्र संबंध कितीही बिघडू शकतात. त्यामुळे 'त्या चौघांना' बघितल्यावर अरविंदस्वामीची जेवणावरची वासनाच उडून जाते हे अगदी शक्य आहे. इस्टेटीच्या वादात जे हावरटपणा करतात, त्यांची
शिसारी येऊ शकते हे बघितलेलं आहे.
पहिल्या भेटीत त्याला नाव-गाव-नातं जरी विचारलं असतं, तरी कदाचित अरविंदस्वामीने त्याला 'ओळखलं' नसतं असं मला वाटतं! चित्रपटभर डेव्हलप झालेलं कार्तीचं व्यक्तिमत्त्व, ९४ च्या सुट्टीतले संदर्भ, भाज्यांची नावं, या सगळ्यासकट त्याची खरी ओळख आहे.
मी मधला मार्ग स्विकारला आहे
मी मधला मार्ग स्विकारला आहे वावे. तुझे जसे झिम्माच्या वेळेस झाले होते तसे यावेळी माझे झाले आहे. अगदीच नावडला नाही, उत्तम वगैरेही वाटला नाही.
त्यामुळे शोलेतल्या असराणी सारखे 'आधे उधर आधे इधर बाकी मेरे पिछे' म्हणतेय आणि बसतेय.
मधला मार्ग निवडणाऱ्यांनी हात वर करा आणि टाळी द्या.
जोपर्यंत मिय्यळगान (मिञंळगां
जोपर्यंत मिय्यळगान (मिञंळगां ) असा उच्चार करत नाहीत तोपर्यंत हा चित्रपट पाहणार नाही.
ही घ्या टाळी.
ही घ्या टाळी.
मी पिक्चर बघितलेला नाही पण तुमच्या प्रतीसादांसाठी टाळ्या!
थॅंक्यू थॅंक्यू.
ञ चा उच्चार शिकवा.
ञ चा उच्चार शिकवा.
इस्टेटीच्या वादात जे हावरटपणा
इस्टेटीच्या वादात जे हावरटपणा करतात, त्यांची शिसारी येऊ शकते हे बघितलेलं आहे.
>>>>
अगदीच. एका छताखाली एक क्षण थांबावेसे वाटत नाही. त्यात काही जण असेही असतात ज्यांनी तितका हावरटपणा दाखवला नसतो पण धृतराष्ट्रपणा केला असतो. ते समोर येतात आणि आपण त्यांच्याशी बोलावे अशी अपेक्षा करतात तेव्हा सुद्धा फार ऑकवर्ड होते. अशी लग्ने अटेंड करणे म्हणजे खरेच एक दिव्य असते. आपल्या वडिलांनी ती टाळली असतात कारण त्या लोकांची तोंडे बघायची नसतात. पण कॉमन नातेवाइकांची असल्याने अटेंड तर करावी लागतात. अश्यावेळी जबाबदारी मुलगा म्हणून आपल्यावरच येते. या चित्रपटातील जवळपास सात-आठशे गोष्टी मला रीलेट झाल्यात.
वर एका प्रतिसादात कोणीतरी शंका उपस्थित केली होती की बहिणीचे प्रेम इतक्या दुराव्या नंतर राहील का?
त्याचेही उत्तर होय असेच मिळते. अर्थात ती मुलगी फार लहान दाखवली होती. पण किमान इतक्या वयाची असेल की तिला आपले बालपण आठवावे तर हे असेच होते. आपली एकेकाळची लाडकी चुलत बहीण कित्येक वर्षानी नातेवाइकांच्या लग्नात अचानक भेटल्यावर आपल्या गळ्यात पडून रडणे अगदी असाच सीन माझ्याशी सुद्धा घडलं आहे. आणि सुरुवातीला आपल्याला त्यात प्रचंड ऑकवर्ड वाटते हे अनुभवलेले आहे. कारण आपले इमोशन त्या लेव्हलला नसतात त्यावेळी. पण मग हळूहळू आपला ऑकवर्डनेस जातो...
योगायोग म्हणजे हे सारे घडले ते हॉल मधील पहिल्या रांगेत जो व्हीआयपी सोफा असतो त्यावर मी बसलेले असताना. त्यामुळे इथेही आहेर द्यायला लागलेली रांग हा सारा सीन बघत होती
पुढेही बरेच घडले. आणि ते कमालीचे इंटरेस्टिंग आहे. पण राहू द्या. इथे फार मोठी पोस्ट होईल. वेगळे लिहायला हवे यावर...
आता ज्या लग्नात मी अवघडलेल्या स्थितीत वावरत होतो तिथे मी पहिल्या रांगेतील सोफ्यावर जाऊन का बसलो.. तर ज्या बहिणीचे लग्न होते तिच्या वडिलांनी मुद्दाम हाताला धरून मला तिथे नेऊन बसवले. कारण अश्यावेळी जे ईतर कॉमन नातेवाईक असतात त्यांना सुद्धा बराच मानापमान सांभाळावा लागतो.
९४ च्या सुट्टीतले संदर्भ,
९४ च्या सुट्टीतले संदर्भ, भाज्यांची नावं, या सगळ्यासकट त्याची खरी ओळख आहे>>>
हा सिन मलाही खुप आवडला… एक कंफ्युजन आहे, परत बघायला हवा.. अरुलला कोबीचे नाव आठवते, तेव्हा कार्ती बोलतो तुला कोबी आठवला तर त्याचा धाकटा भाऊ का आ ठवत नाही… इथे धाकटा की मोठा ते मला आठवत नाही. कार्तेचा उल्लेख त्याचा बाबा थोरला म्हणुन करायला लागतो असा मागे उल्लेख येतो. तोही सिन सुंदर आहे. मुलगा जाणता होतोय याची जाणिव व त्याबद्दलचा योग्य तो मान बाबा ठेवतो.
चित्रपट तुकड्यात खरेच चांगला आहे पण नाव विसरण्याचा मुद्दा इतका मोठा नको होता. तेच दाखवायचे तर त्यांचे बालपणात गुळपिठ तरी दाखवायला हवे होते… वावेने वर लिहिलेय तसे इतक्या पोरांतला तो एक, लक्षात राहिलही किंवा राहणार नाहीही.
कदाचित असा एखादा प्रसण्ग असावाही जो एडिटिण्ग मधे कटला..
ञ चा उच्चार शिकवा >> चिकवा
ञ चा उच्चार शिकवा >> चिकवा धाग्यावर शिकवा??
त्र (आता सर्वमान्य)
वावे >>> तू लिहिलेला कार्तीचा
वावे >>> तू लिहिलेला कार्तीचा नी अस्वाचा आलेख आवडला.
मला हिंदीमध्ये बघून आवडला. तमिळ समजत असती तर कदाचित जास्त आवडला असता. कारण हिंदी संवाद अजून चांगले करता आले असते.
अस्वा जात्याच सेन्सिटिव्ह आहे. त्यामुळे सुट्टीत आलेल्या लांबच्या भावालाही प्रेमाने वागवतो. आणि गरीबीमुळे दबलेल्या कार्तीसाठी ते माणूस म्हणून वागवणे व सायकल कॅटलिस्ट ठरते. त्याचा बहिर्मुख व पॉझिटिव्ह स्वभाव अस्वाच्या कोमेजलेल्या, जगाकडे पाठ फिरवलेल्या, भूतकाळात जगणाऱ्या व्यक्तिमत्वाची गाठ सोडवत जातं, त्यालाही वर्तमानात जगायला लावतं.
अस्वाच्या मुलीच्या छोट्याश्या रोलमध्ये आजच्या व येणाऱ्या पिढीचा प्रॅक्टीकल स्वभाव जाणवतो. बापाची कुचंबणा समजल्यावर जान्हवी त्याला समजवत बसत नाही, सरळ समस्येला भिडायला लावते.
असे खूपसे प्रयत्न कम उपद्व्याप केलेत त्यामुळे तिचा अप्रोच पटला.
इकडे आड तिकडे विहीर, (चपलांसकट) राम भरत भेट

>>>>>>
बेसुर गाण्यांबद्दल इथे आधीच वाचल्यामुळे एक्सपेक्टेशन्स लो सेट झाली.
नाही साधना, तो मोठा भाऊच
@साधना, नाही तो मोठा भाऊच म्हणतो. मी हिंदीमध्ये पाहिला आणि त्यात "बडा भाई" अस ऐकलं.
विजय 69 बाबत सरांना अनुमोदन
विजय 69 बाबत सरांना अनुमोदन
चांगला विषय पण सपशेल माती खाल्ल्याने निराशा
अतिशय सुंदर सिनेमा बनू शकला असता, त्यातल्या लाईट कॉमेडी सह
पण त्याला फार्सीकल बनवून टाकलयाने सगळी मजाच जाते
बॉलिवूड वाल्याना हिरे जरी मिळाले तरी ते शेणातच सावरणार आणि वर पुन्हा असलंच लोकांना आवडतं म्हणून मखलाशी करणार
बरं इतके कष्ट घेऊन सिनेमा बनवलाय तर थोडे अधिक घेऊन रेफरन्स तरी बरोबर घ्यावेत पण नाहीच, आम्हाला चार आण्याची कोंबडी घेऊन 12 आणे मसालाच टाकायचा हा हट्ट
अक्षरशः काय वाट्टेल ते दाखवलंय
Pages