२०२४ अमेरिकेतील निवडणूक

Submitted by उपाशी बोका on 28 June, 2024 - 09:42

२०२४ च्या निवडणुकीसाठी धागा काढत आहे.

कालची चर्चा (debate) बघितली का? डेमोक्रॅटिक पक्षाचे खंदे समर्थक पण हादरलेले दिसत आहेत.

IMG_3696.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सगळीकडे क्लोज फाइट आहे असे पोल्स आहेत आणि २/३ मतदारांनी अजून मत द्यायचे बाकी आहे! Happy

२०१६ मधे तात्याला तमाम पोल्सनी अंडरएस्टिमेट केले होते. त्या लॉजिकने क्लोज पोल्स म्हणजे तात्याला जास्त मते पडतील. त्याचबरोबर हे ही खरे की २०१६ मधे लोक तात्याला मत देणार हे सांगायला लाजत पण त्यांनी प्रत्यक्षात त्याला मते दिली. यावेळेस तसे नाही. त्यामुळे हे बर्‍यापैकी करेक्ट असेल. पण एकूणच मागा लोकांचा मीडियाबद्दल अविश्वास पाहता ते लोक पोल्सना उत्तरे कमी देतात असाही एक मतप्रवाह आहे.

दुसर्‍या बाजूने आयोवा मधले पोल हा एखादा छुपा अंडरकरंट दर्शवतही असेल. एका स्त्रीला मत द्यायचे नाही म्हणून (यात फक्त व्हाइट मेल्स आहेत असे अजिबात नाही), किंवा इमिग्रेशनबद्दलचा राग म्हणून किंवा रोजच्या महागाईमुळे लोक ट्रम्पला आणू शकतात. पण अ‍ॅबॉर्शन हा एकच मुद्दा सुद्धा कमलाला आणू शकतो.

शेवटी सगळे पेनसिव्लेनियावर आले, तर तेथील पोर्टो रिकन्स किती प्रभावी ठरतात ते ही कळेल.

डेम्सनी आपला बेस उत्साहाने बाहेर काढला नाही तर रिपब्लिकन उमेदवार निवडून येतो असे मी पाहिलेल्या काळातील चित्र आहे. ओबामाने बेस ला दोन्ही वेळेस मतदानाला बरोबर बाहेर काढले होते. कमलाकरता किती येतात पाहू.

>>>>>>>>>>.त्याचे चाहते अ‍ॅबॉर्शन ला दुय्यम ईश्यू मानतात. एक स्त्री म्हणून तुला ह्या ह्या विचारसरणीबद्दल काय वाटते ?
रिपब्लिकन लोकांचा स्टँड अगदी चूक चा आहे पण जर रिपब्लिकन्स आले तर स्त्रिया उद्या रस्त्यावरती उतरुन लढू शकतील. कॅनेडिअन शीख आपल्याला मारायला आले, किंवा अमेरीकेतील घ्या ना तर कमला व बायडेन दुर्लक्ष करतील. ट्रंप निदान काहीतरी अ‍ॅक्शन घेइल असा विश्वास वाटतो.

पण जर रिपब्लिकन्स आले तर स्त्रिया उद्या रस्त्यावरती उतरुन लढू शकतील. >> कमाल आहे सामो. इथे प्रोबेबल सीनारियोला स्त्रियांनी रस्त्यावर उतरून लिहायची तयारी दाखवायची नि "शीख आपल्याला मारायला आले" वगैरे सीनारियोला सरकारकडे बघायचे ? I have to say 'm amazed to say the least.

> शेवटी सगळे पेनसिव्लेनियावर आले,
हेच सर्वात महत्वाचे राज्य आहे आणी तिथले अर्ली व्होटिंग चे आकडे डेम्स ना डोकेदुखी देणारे आहेत. गेल्यावेळी डेम्स कडे १.२ मिलियन बफर होते ते यावेळी जेमेतेम ४०० K वर आले आहे.

कॅनेडिअन शीख आपल्याला मारायला आले, किंवा अमेरीकेतील घ्या ना तर कमला व बायडेन दुर्लक्ष करतील. ट्रंप निदान काहीतरी अ‍ॅक्शन घेइल असा विश्वास वाटतो. >>> Happy आता मला खरंच कुतुहल वाटते आहे! " अमेरिकेत हिंदू कम्युनिटीला टार्गेट करून हल्ले झाले(च) तर बायडेन -कमला दुर्लक्ष करतील ? " असे कशावरून वाटते? आणि ट्रम्प अ‍ॅक्शन घेईल(च) हेही कशामुळे वाटते?

कनेडिअन शिखांना मारायला इकडे हिंदू कमी आहेत का? Lol की बॉर्डर क्रॉस करुन, चला... अमेरिकन स्त्रियांना मारू आज... करुन बाहेर पडतील. ऑ!!! ते पण हेशियन सारखेच आहेत. सगळी कुत्री सोडून फक्त स्प्रिंगफिल्डची कुत्री खातात तसे इकडचे हिंदू मारतील की!
बाकी कनेडिअन शीख असे काही एक गठ्ठा चक्रम लोक नाहीत. आणि असं एक गठ्ठा टार्गेट करणं अत्यंत बेजबाबदार आहे. पण ते एक असो. आणि यावरुन ट्रंपला मत दिलं असं लिहिण्यापेक्षा ट्रंपला दिलं मत इतकं पुरेसं आहे की. गेल्यावेळी ही तुम्ही ट्रंपला देऊन असंच बादरायण कारण दिलं होतं. ट्रंप सपोर्टर आहात तर आहात. ते रॅशनलाईज कशाला करताय?
बाकी अमेरिकन स्त्रियांना मारायला लोकल गन लॉ, आणि अ‍ॅबॉर्शन लॉ पुरेसे आहेत की! बॉर्डरवरुन लोक कशाला हवेत!

बाकी अमेरिकन स्त्रियांना मारायला लोकल गन लॉ, आणि अ‍ॅबॉर्शन लॉ पुरेसे आहेत की! बॉर्डरवरुन लोक कशाला हवेत! >> +१

>>>>>>>>स्त्रियांनी रस्त्यावर उतरून लिहायची तयारी दाखवायची नि "शीख आपल्याला मारायला आले" वगैरे सीनारियोला सरकारकडे बघायचे ?
स्त्रिया ५०% आहेत आपण फार कमी आहोत असामी.

स्त्रिया ५०% आहेत आपण फार कमी आहोत असामी. >> असे बघ, ५०% पॉप्युलेशनला फाट्यावर मारायला नि निघालेल्यांची भलावण करतेस मग ? माझा अमेरिकन लॉ ऑर्डरवर विश्वास आहे कि कॅनेडियन शिख अमेरिकन भारतीयांना मारायला आले तर इंटरफीयर केले जाईल ह्याबद्दल. (मूळात ते असे मारायला का येतील हे मात्र मला अजून कळलेले नाही. कॅनडामधे अंतर्गत इतिहास आहे खलिस्तानपासूनचा म्हणून तिथे का झाले हे समजू शकतो. अमेरिकेने खलिस्तानवाल्यांना नव्वदीमधे देशाबाहेर हाकलले नि ते कॅनडामधे गेले असे मी वाचलेले. )

असामी आर्ग्युमेन्ट आवडले.
>>>>अमेरिकेने खलिस्तानवाल्यांना नव्वीदीमधे देशाबाहेर हाकलले नि ते कॅनडामधे गेले असे मी वाचलेले. )
बाप रे!
अर्गुमेन्टसबद्दल, धन्यवाद.

टॅरॉटला विचारले -
ट्रंप करता सेल्फ सफिशिअन्सी, लोकांकडे दुर्लक्ष करावे असे कार्ड आले.
कमलाकरता - पेरणी झालेली आहे आता सुगीची - कापणीची वाट पहात आहे असे कार्ड आले.

Happy

नाही सांगता येत डायरेक्टली. बरेचदा खूप इन्टरप्रिट करावे लागते. अराऊंड म्हणजे आजूबाजूचे व मूडच कॅच होतो. क्लॅरिटी मिळते. भविष्य नाही. आणि अगदी १००% मिळतेच.

आणि ट्रंप सारखा तोंडाळ आणि या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणारा माणूस काही ही म्हटला तरी बोलला ते करेल याची ही काहीही गॅरेन्टी नाही. त्याला सोयीचा असेल तो स्टँड तो घेणार. असल्या माणसावर विश्वास ठेवणे हेच नाइव्हपणाचे नाही का?
मुळात अमेरिकेत हिंदू खतरे मे वगैरे अशी परिस्थितीच नाहिये, आणि कमला बोलत नसेल बांगलादेशी हिंदूंबद्दल याचा अर्थ असा नाही ना की ती अमेरिकेत हिंदूंवर हल्ले झाले तर इग्नोरच करेल. इतर मुद्दे सोडून " बांगला देश त्यांच्या रडार वर नाही" - या मुद्द्यावर आपण आपले मत ठरवणार आहोत का आपण?

>>>>मी लॉग आउट करणार होतो तो थांबलो आहे.
Happy
मै शक्य आहे मी चूक असेन पण मी चीनविरुद्ध ट्रंप बोलतो या मुद्द्यावर (ट्रंपवर नाही) फिदा होउन दर वेळेस मत देते. त्या ड्रॅगनला रोखा रे कोणीतरी.

https://en.m.wikipedia.org/wiki/The_Keys_to_the_White_House
हा माणूस पोल बिल करत नाही. ह्याचे वेगळेच मॉडेल आहे. १३ किजचे.
स्ट्राईक रेट जवळपास०१००% आहे.
ह्यावेळी कमला जिंकणार म्हणतोय.

विधान सभा च्या निवडनुकीच्या धाग्यावर कोणी लिहिले आहे कि "रासमुसिन" च्या पोलवरून ट्रम्प प्रचंड बहुमताने जिंकणार आहे.

रासमुसेन हा कंसर्व्हेटिव्ह पोल आहे. पोलिंग एव्हरेज मध्ये कमला किंचित पुढे आहे.>>> पोलिंगमधे कितीही पुढे असू दे. इलेक्ट्रोल व्होटसचं काय करायचं म्हणता?

>>>>>>>टॅरॉ काही बोलायला तयार नाही.

सॉरी लास्ट टॅरोट बुलशिट (सम पीपल माईट कॉल इट)
माझा विश्वास आहे. पण आता थांबते.

Happy परत काढलं तर ट्रंप जिंकणार का ला किंग ऑफ पेन्टॅकल्स आला - अ ग्राउंडेड लीडरशला, पेन्टॅ कल्स म्हणजे पैसे, कॉइन्स, मनी-मनी-मनी

कमला करता किंग ऑफ वाँडस आला. सर्वांना घेउन चालणारी लीडरशिप. ऑल इन्क्लुझिव्ह. वाँड म्हणजे उर्जा, एनर्जी, उत्साह, ताकद. -

बट माईंड यु बोथ आर किंगस सो अजुन तरी माहीत नाही कोण येइल ते. टसल आहे. बोथ किंगस!!

> पोलिंग एव्हरेज मध्ये कमला किंचित पुढे आहे
याचा अर्थ ट्रम्प प्रेसिडेंट होणार ! जिंकण्यासाठी कमलाला किंचित नव्हे तर बरेच पुढे असावे लागेल.
rcp average मध्ये कमला +०.१ आहे, तुलनेसाठी आजच्या दिवस बायडेन +७.२ आणी हिलरी +३.२ होत्या.

पोलिंग मध्ये पोलस्टर इलेक्टरल व्होट पण बघतातच की. रासमुसेन हा काय एकटाच पोल आहे काय इलेक्टरल व्होट बघणारा.>>> Five presidents in the history of the nation won the presidency without winning the popular vote — most recently, Donald Trump in 2016. His opponent that year, Hillary Clinton, won over 2.8 million more votes than Trump nationwide, but she lost enough key states to be defeated in the Electoral College, 306 to 232.
हिलरीच्या वेळेस पोल्स्टर्स कितीने हुकले होते?
असो.

अंजलीचा इलेक्टरल व्होट्सचा मुद्दा योग्य आहे.

कमला हॅरीसने जर विस्कॉन्सिन, मिशिगन , मिनिसोटा व पेनसिल्व्हानिया असा क्लिन स्विप केला तर ती नेव्हाडा, अ‍ॅरिझोना, जॉर्जिया व नॉर्थ कॅरोलायना ही सगळी राज्ये हरुनही विजयी होउ शकते. पण पेन्सिल्व्हानियामधे मात्र ती हरली तर मात्र तिला जॉर्जिया जिंकायलाच लागेल व अ‍ॅरिझोना, नेव्हाडा व नॉर्थ कॅरोलायना या तिनपैकी एक राज्य तरी तिला जिंकायला लागेल व्हिच इज टॉल ऑर्डर!

थोडक्यात काय तर तिने रस्ट बेल्ट मधे क्लिन स्विप केला( पेनसिल्व्हॅनिया इज अ मस्ट फॉर हर!) तरच ती निवडुन येउ शकते अन्यथा तात्याची हुकुमशाही येउन अमेरिकेत लोकशाहीला तिलांजली मिळणार याची तयारी ठेवा. आणी तो रॉबर्ट केनेडीला आरोग्य खाते देणार म्हणे! म्हणजे माकडाच्या हाती कोलीत! माझी प्रॅक्टीस बंदच करावी लागेल मग तर!

राज, अ‍ॅबॉर्शन व स्त्रि आरोग्याचा मुद्दा गौण ? वॉव!

आणी आता आपण अमेरिकेची निवडणुक टरेट कार्डने ठरवणार का? मग निवडणुका रद्दच करा की! मी आत्ता मतदानालाच निघालो होतो पण टरेट कार्डच वाचुन जाउ की नको या विचारात पडलो आहे Proud

सामो, अमेरिकेत अनिर्बंधित गन कंट्रोल , अ‍ॅबॉर्शन, इल्लिगल इमिग्रेशन सारखे ज्वलंत विषय असताना तुला कॅनडातले शिख येउन तुला ठार मारुन् टाकतील याबद्दल जास्त चिंता आहे?

रॉबर्ट केनेडी म्हणजे काही महिन्यांपूर्वी ज्याने "माझ्या मेंदुत डॉक्टरांच्या गलथान पणामुळे अळी बरीच वर्षे वास्तव्य करुन होती" असे आचरट विधान करणारा ना? तोच असेल तर ट्रंप त्याला आरोग्य खाते देणार हे वाचुन आवाक् झाले आहे.

Pages