Submitted by उपाशी बोका on 28 June, 2024 - 09:42
२०२४ च्या निवडणुकीसाठी धागा काढत आहे.
कालची चर्चा (debate) बघितली का? डेमोक्रॅटिक पक्षाचे खंदे समर्थक पण हादरलेले दिसत आहेत.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मूळ मुद्दा सोडून तिसरेच
मूळ मुद्दा सोडून तिसरेच चऱ्हाट. डोनेशन बदल्यात थेट सरकार मध्ये पोझीशन देणे हे जर जॉर्ज सोरोस ने केले असते तर?
>>आणखी एका बाईंनी ट्रम्प वर
>>आणखी एका बाईंनी ट्रम्प वर सेक्श्युअल असोल्टचा आरोप केला आहे. पण आता पब्लिकला सवय झाली आहे.
सदर बाईने असा दावा केला आहे की १९९३ साली हा प्रकार झाला. म्हणजे ३० वर्षापूर्वी!
ह्या आरोपाचे टायमिंग बघता हा खरोखर, गंभीरपणे केलेला आरोप असणार ह्यात शंकाच नाही. बाई ३० वर्षे रोज कष्ट करत करत पुरावे गोळा करत होत्या आणि नेमके निवडणुकीच्या काही दिवस आधी पुरेसे पुरावे जमले आणि म्हणून असा जाहीर आरोप केला आहे ह्यात शंकाच नको! निव्वळ योगायोग!
>>
>>
मूळ मुद्दा सोडून तिसरेच चऱ्हाट. डोनेशन बदल्यात थेट सरकार मध्ये पोझीशन देणे हे जर जॉर्ज सोरोस ने केले असते तर?
<<
बिनतोड उत्तर मिळाले की चर्हाट वगैरे नावे ठेवणे सुचते का?
सोरोसची प्यादी सरकारमधे आहेतच. स्वतः सरकारमधे सामील होण्याइतका सोरोसच्या **मधे दम नाही. तो एक कणाहीन, नीच मनुष्य आहे.
मस्कने आपण ट्रंपला समर्थन
मस्कने आपण ट्रंपला समर्थन करतो हे आणि ट्रंपने मला मस्क समर्थन देतो आहे हे कधीही लपवलेले नाही. मस्क जाहीरपणे प्रचारात दिसतो. सोरोस किंवा त्याची पिलावळ असे करेल काय? वाटत नाही.
>>>
मस्क दिवसभर रिकामटेकड्यासारखा ट्विटरवर पोस्ट करत असतो. बाकीचे असे कोणी करत नाही, म्हणजे काय सगळे गुप्त, पडद्याआड असते असे नाही. सोरोस डेमो्क्रॅटिक पक्षाचा समर्थक आहे हे पब्लिक आहे. त्याने कोणाकोणाला पैसे दिले ह्यावर बोलता येते कारण ते सुद्धा पब्लिक आहे.
मस्क सारखे नाही. सरकारी अनुदानावर कंपण्या चालवून अनुदान आणि सरकारचा खर्च कसा वाईट ह्यावर बोंबा मारायच्या. उगाच लांब्याचोड्या बाता मारून चांगले पब्लिक प्रोजेक्ट बंद पाडायचे. हायपरलूपची गाजरं दाखवून हाय स्पीड रेलची व्हायेबल कामं थंडावली त्यानं.
आणि उगाच त्याला सरकारी कामकाजाचे ऑडिट द्यायला त्याचे काय क्वालिफिकेशन आहे? अर्थात तो पण तात्यांची आरती करतोय मग भक्तगण डोळे उघडणार नाहीत. असो.
सदर बाईने असा दावा केला आहे
सदर बाईने असा दावा केला आहे की १९९३ साली हा प्रकार झाला. म्हणजे ३० वर्षापूर्वी!
ह्या आरोपाचे टायमिंग बघता हा खरोखर, गंभीरपणे केलेला आरोप असणार ह्यात शंकाच नाही. बाई ३० वर्षे रोज कष्ट करत करत पुरावे गोळा करत होत्या आणि नेमके निवडणुकीच्या काही दिवस आधी पुरेसे पुरावे जमले आणि म्हणून असा जाहीर आरोप केला आहे ह्यात शंकाच नको! निव्वळ योगायोग!
>>>
तसाही तुम्हाला कुठे फरक पडतोय होय की नाही? जो आरोप कोर्टात सिद्ध झालाय त्याने तुमचे मत बदलले काय? छे. तुम्ही म्हणणार ती बाईच दुष्ट की आमच्या तात्यावर बोट उचलते.
त्यामुळे लगेच इतक्या वर्षांनी कसे काय सांगितले वैगेरे चालू.
वाईन्स्टीन, एपस्टीन जरा लौकर पकडले गेले. आणखी थोडी वर्षे थांबले असते तर लाल टोपी घालून सेफ झाला असते . म्हणायचं की माझ्या राजकीय मतांमुळे हि वोक लोकं माझ्या मागे लागली आहेत.
शेंडेनक्षत्र त्या ब्लॅक जजचे
शेंडेनक्षत्र त्या ब्लॅक जजचे काय क्वालिफिकेशन विचारत होते. पण "गव्हर्मेंट इफिशिंयन्सी" ऑडिट करण्यासाठी मस्कचे काय क्वालिफिकेशन हा प्रश्न पडत नाही???
शेंडेनक्षत्र केतांजी ब्राऊन
शेंडेनक्षत्र केतांजी ब्राऊन बाईंचे क्वालिफिकेशन काय आहे विचारत होते. त्या बाईंनी आयुष्यभर कोर्टात जज म्हणून काम केलेले. अनेक प्रकारच्या भूमिका बजावल्या होत्या.
पण आता पैसे देऊन "गव्हर्नमेंट इफिशियन्सी ऑडिट" हया त्याच्यासाठी नवीन बनवलेल्ल्या पदासाठी मस्कचे काय क्वालिफिकेशन हे मात्र कधीही विचारणार नाहीत. आणि उद्या वेळ आल्यावर लॉबीईंग बद्दल भाषणे पण देतील.
सोरोस जे काही करतो आहे त्याची
सोरोस जे काही करतो आहे त्याची फळे आम्ही कॅलिफोर्नियावासी आणि अनेक राज्यातले रोज भोगत आहोत. अनेक लोकांच्या घरी चोर्या होत आहेत. माळीकाम करणारे, सफाई करणारे, पाण्याचे, एअर कंडिशन आणि हीटिंग करणारे असे अनेक सामान्य लोक आपल्या ट्रकमधून आपली हत्यारे चोरीला गेल्याचे सांगतात. अनेकांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होईल इतकी बजबजपुरी निर्माण करण्यात सोरोस पुरस्कृत वकील आणि नेते यशस्वी झालेले आहेत. सामान्य निरपराध नागरिकांपेक्षा गुन्हे करणारे लोक जास्त जपले पाहिजेत असा विकृत उदारमतवादी संदेश देण्यात हे लोक आघाडीवर आहेत. आणि लोकांनी कटकट केली की मी त्यातला/ली नाहीच असा आव आणणारे हे ढोंगी लोक आहेत.
मस्कने काय केले आहे ? कुठले समाजविघातक कृत्य केले आहे?
जर ट्रंप सरकारमधील बजबजपुरीविरुद्ध आणि भ्रष्टाचाराविरुद्ध आणि खाबूगिरीविरुद्ध काहीतरी नवे करण्यासाठी काही नवे पद निर्माण करत असेल तर काहीही चूक नाही. पिडलेले सामान्य नागरिक त्याला समर्थनच देतील. अर्थात तो निवडून आला तरच.
>>
>>
शेंडेनक्षत्र केतांजी ब्राऊन बाईंचे क्वालिफिकेशन काय आहे विचारत होते. त्या बाईंनी आयुष्यभर कोर्टात जज म्हणून काम केलेले. अनेक प्रकारच्या भूमिका बजावल्या होत्या.
<<
ज्या बाईला ती डॉक्टर नसल्यामुळे स्त्री कोण ह्याची व्याख्या सांगता येत नाही ती बाई न्यायाधीश बनायला नालायक आहे. ती वोकनेसच्या आहारी गेलेली आहे. केवळ काळी आणि बाई आहे म्हणून तिला निवडली आहे. तिच्या गुणवत्तेचे अनेक पुरुष असतील, अनेक श्वेतवर्णीय स्त्रिया असतील. पण त्याना डावलून केवळ ह्या बाईचे लिंग आणि त्वचेचा रंग बघून निवडली आहे. तिला बाई म्हणून निवडलेली असताना तिला स्वतःला बाई कोण हा प्रश्न अनाकलनीय वाटतो हे आणखी गंमतशीर.
त्याचा आणि मस्क प्रकरणाचा बादरायण संबंध जोडू नये.
>>
>>
तसाही तुम्हाला कुठे फरक पडतोय होय की नाही? जो आरोप कोर्टात सिद्ध झालाय त्याने तुमचे मत बदलले काय? छे. तुम्ही म्हणणार ती बाईच दुष्ट की आमच्या तात्यावर बोट उचलते.
<<
नुसता आरोप काय कुणीही सोम्यागोम्या करेल. सोरोसने खिशात पैसे चारले की कुणीही उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असा पराक्रम करेल. पुढचे सोपस्कार झाले तर विचार करु.
सध्या ट्रंप हा हिटलर,
सध्या ट्रंप हा हिटलर, मुसोलिनी आणि स्टालिन ह्यांचा अर्क आहे असे शोध लावले जात आहेत. इतका खलप्रवृत्तीचा गृहस्थ आपल्या चार वर्षाच्या सत्ताकाळात ह्यांच्या सारखे कुठलेही "महान" खलनायकी कृत्य का नाही करू धजला? की दुसर्या टर्ममधेच कॉन्सन्ट्रेशन कॅंप वगैरे विधायक कार्यक्रम राबवणार आहे?
कदाचित निवडणुकीच्या आधी डेमोक्रॅट समर्थक ट्रंप हत्येचा एक निकराचा प्रयत्न करणार की काय अशी संशयाची पाल चुकचुकत आहे. कारण कुणीतरी व्यक्ती हिटलर आहे असे अभद्र पसरवले तर त्या व्यक्तीला ठार मारणे हे मोठे पुण्याचे काम आहे आणि ते करून आपल्याला फाशी झाली तरी आपण देशाचा उद्धारच करत आहोत असे डोकेफिरू लोक सहज निर्माण होऊ शकतात. आणि हेच डेमोक्रॅटिक नेत्यांना हवे आहे.
झालेत की एका केस मध्ये पुढचे
झालेत की एका केस मध्ये पुढचे सोपस्कार. जीन कॅरोल केस मध्ये निर्णय दिला आहे.
ट्रम्पला सेक्श्युअल अब्युस आणि डिफेमेशन दोन्हीसाठी दोषी धरलं.
पुढे ट्रम्पने जिन कॅरोल वर डिफेमेशन केस केली त्या निर्णयात स्पष्ट म्हणले की कायदेशीर व्याख्यानुसार बलात्कार नव्हता, सेक्श्युअल अब्युज होता. पण सर्वासामान्य बोलीभाषेत बलात्कारच, असे म्हणून ट्रम्पची केस कचऱ्याच्या टोपलीत टाकली.
ई जीन कॅरोल केस ही Trump
ई जीन कॅरोल केस ही Trump Derangement Syndrome चे उदाहरण आहे.
ट्रंप वर टीका करण्यासारखे अनेक मुद्दे आहेत ( इन्कम टॅक्स काढून टेरिफ लावणे! त्याने राजधानी वॉशिंग्टन वरून मेंफिस ला नेली तरीही आश्चर्य वाटणार नाही)
पण ई जीन कॅरोल ची केस ( किंवा न्यूयॉर्क च्या अन्य दोन केसेस) कोट करणे अज्ञानाचे किंवा आंधळ्या ट्रम्प विरोधाचे लक्षण आहे.
ती केस आणण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाने इतक्या कायदेशीर कोलांट उड्या घेतल्या की ई जीन कॅरोल ने अक्षरशः कुणावरही केस केली असती तरीही ती जिंकली असती. ( ट्रम्प डी एन ए द्यायलाही तयार होता , जज ने नाकारले)
रोजच्या वापरातील अन्नधान्य,
रोजच्या वापरातील अन्नधान्य, मांस, दुग्धजन्य वगैरे पदार्थाच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. विद्वान कमलाने असा शोध लावला आहे की कुठलेसे खलनायकी ग्रोसरीची दुकाने चालवणारे संगनमताने किमती वाढवत आहेत आणि ती अध्यक्ष बनल्यावर सगळ्या खलवृत्तीच्या कंपन्यांच्या नाकात वेसण घालणार आहे. आता हे खलपुरुष अचानक गेल्या चार वर्षातच का उन्मत्त झाले आणि लोकांना छळू लागले? आणि त्यांना आत्ता सत्तेत असताना वेसण, लगाम, चाबूक वगैरे का लावले जात नाहीत? त्याकरता पुढच्या निवडणुकीची वाट का बघावी लागत आहे?
वस्तुस्थिती अशी आहे की थेरड्याने कोविडच्या काळात वेड लागल्यासारखे पैसे वाटले आणि शटडाउन करुन उत्पादन अगदी कमी केले. विविध क्षेत्रात सप्लाय चेन वगैरे विस्कळित होऊ दिली. कुठल्याही अर्थशास्त्राच्या बिगारीच्या पुस्तकातही चलनफुगवट्यामागे वारेमाप पैसे छापणे हे कारण ठळकपणे लिहिलेले असते. पण जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ मंत्रीमंडळात असून थेरड्याने ते केले आणि नियमानुसार त्यातून महागाई, चलनफुगवटा ही भुते निघाली. आता वड्याचे तेल वांग्यावर काढण्याचा प्रयोग चालू आहे. काही आधार नसताना सेफवे, व्हॉन्स, अल्बर्टसन, क्रोगर, अमेझॉन हेच दूष्ट दूष्ट लोक भाव वाढवत आहेत असले बिनडोक दावे केले जात आहेत.
ही बाई सत्तेत आली आणि सरकार जर अन्नधान्याचे भाव कृत्रीमरित्या निर्धारित करू लागली तर आणखी वाट लागून टंचाई, महागाईचा भडका उडेल ह्यात शंका नाही.
कमलाबाईचा (अजून एक) बिनडोकपणा
कमलाबाईचा (अजून एक) बिनडोकपणा सी एन एन च्या टाऊन हॉलमधे दिसला.
"अशी कुठली तरी गोष्ट सांगा जिथे तुम्ही स्वतःला दुबळी समजता आणि त्यात काय सुधारणा कराल?" (अर्थात तुमचा वीकनेस काय आहे?) साधारण नोकरीच्या इंटरव्ह्यू मधे असले प्रश्न विचारतात. ह्याला प्रामाणिक उत्तर न देता असे काहीतरी उत्तर द्यायचे असते की जे वरवर पहाता दुबळी बाजू वाटेल पण आणखी विचार केला तर कंपनीला हा गुण जास्त आवडेल. उदाहरणार्थ, "जेव्हा मी एखादे काम हातात घेतो तेव्हा तहान भूक हरपून ते काम करतो. कित्येकदा माझी झोप, व्यायाम, खाणेपिणे विसरून मी कामात गर्क होतो" (I work too hard!). हे एक टिपिकल उत्तर आहे. असो.
तर ह्या बयेला त्याचे उत्तर नीट देता आले नाही.
"एखादा प्रश्न उभा राहिला की मी त्याविषयात जाणकार असणार्या काही मंडळींना निवडून त्यांच्या मदतीने मी त्या प्रश्नाबद्दल आणि त्याच्या उत्तरांबद्दल त्या तज्ञांची मते ऐकते. विविध दृष्टीकोनांच्या लोकांचे विचार ऐकणे ही एक चांगली गोष्ट आहे असे मी समजते".
आता ह्याला वीकनेस कसे काय म्हणायचे? ही तर एक मोठी जमेची बाजू आहे!
ह्या बाईला टाऊन हॉल होण्याआधी सगळे प्रश्न मिळतात तरी असली दयनीय उत्तरे दिली गेली.
ह्या प्रश्नाचे उत्तर काय द्यावे ह्याकरता आपला हाच "दुबळेपणा" वापरुन जाणकार मंडळींचा संघ बनवून त्यांच्याशी विचारविनिमय करून चांगले उत्तर देता आले असते की!
<<<देशात असलेल्या लोकांसाठी
<<<देशात असलेल्या लोकांसाठी जास्त अपत्ये जन्माला घालावीत म्हणून काही आमिषे दाखवली तर? मोठ्या प्रमाणात कर सवलत दिली तर?>>>
असे प्रयत्न अर्वाचीन इतिहासात बरेच वेळा झाले आहेत पण आजतागायत एकही यशस्वी झाला नाही. विरळ लोकसंख्या असल्याने पुर्वी (यु एस एस आर असताना) रशियन सरकार अशा सवलती देत असे. सध्याच्या काळात चीन मध्ये तरुण आणि म्हातारे यांचं गुणोत्तर बदलल्याने चीन सरकार ह्या प्रयत्नात आहे. दोन्ही ठिकाणी त्यातुन काही निष्पन्न झाले नाही. विकसित देशांत आर्थिक स्तर उंचावण्यासाठी जी जीवनशैली स्वीकारावी लागते त्यात मुले सांभाळणे अवघड होत जाते. त्यामुळे अशी अमिषे काम करत नाहीत. आपल्या जीवाची आणि आर्थिक स्तर उंचावण्याची काही शाश्वती नाही, कुटुंबात काम करणारे जास्तीचे हात असतील तर किमान ही अन्न, वस्त्र, निवारा मिळवण्याची शाश्वती असेल असे जेव्हा लोकांना वाटते तेव्हाच जन्मदर वाढतो.
जे रशिया आणि चीन सारख्या हुकुमशाही राजवटीत शक्य झाले नाही ते लोकशाहीत कसे घडवुन आणणार. त्यातुन "तरुण महिला मुलांना जन्म देण्यासाठी आणि प्रौढ महिला त्यांना सांभाळण्यासाठीच फक्त उपयुक्त असतात" असे दिव्य विचार सातत्याने मांडणार्या संभाव्य राज्यकर्त्यांनी सांगितले म्हणून महिलांनी हे करावे म्हणता?
ट्रंपवर झालेले सेक्शुअल अ
ट्रंपवर झालेले सेक्शुअल अॅब्युज, एक्स्प्लॉयटेशनचे कॅपिटलायज केलेले आरोप आर नॉट वर्थ अड्रेसिंग, एस्पेशियली एफओबीज कडुन झालेले. कारण एफओबीज वरचं प्रभु रामचंद्रांचं (एकपत्नीव्रत) भूत अजुन उतरलेलं नसतं. कदाचित, अमेरिकेन प्रेसिडेंट्सच्या सेक्स स्टोरीज अजुन त्यांच्या गुगल सर्च मधे आलेल्या नसतील, आल्यातर तोंडाला फेस येइल..
दॅट सेड, ट्रंपच्या अॅडल्टरीचं समर्थन नाहि, बट अॅज अमेरिकन्स डिड इन द पास्ट, यु नीड टु लर्न टु इग्नोर इट फॉर द ग्रेटर गुड...
<<<<मस्क दिवसभर
<<<<मस्क दिवसभर रिकामटेकड्यासारखा ट्विटरवर पोस्ट करत असतो. बाकीचे असे कोणी करत नाही, म्हणजे काय सगळे गुप्त, पडद्याआड असते असे नाही.>>>>
+१
मस्क ची ही वैयक्तिक पार्श्वभूमी माहिती नव्हती. पण वाचुन काही बेसिक प्रश्नं पडले. एवढा प्रचंड पैसा आणि दिवसभर सोशल मिडियावर पडिक असण्यासाठी भरपुर रिकामा वेळ असताना मस्क ने स्वतःच्या मुलीच्या बाबतीत जे काही (त्याच्या मते) चुकीचे होत होते ते वेळीच थांबायला काहीच का नाही केले? मुळात वोक गॅंग च्या संपर्कात येण्यासाठी ती मुलगी पब्लिक स्कूल मध्ये शिकत होती का? शिकत असल्यास तिला तिथुन काढुन स्वतः च्या तत्वांशी मिळत्या जुळत्या एखाद्या महागड्या प्रायव्हेट शाळेत तिला घालते मस्क सारख्या श्रीमंत व्यक्तीला अवघड होते का? नक्की काय झाले आहे? तेव्हा मुलीकडे अजीबात लक्ष नव्हते की हे सगळे प्रयत्न करुन झाले आहेत आणि त्यांना यश न आल्याने (कारण मुलीचे ओरिएंटेशन नैसर्गिक आहे, ते बदलणे शक्य नाही) आता स्वतः च्या संतापाचे खापर आता असे फोडणे चाललेय? किंवा स्वतःचे पुर्वग्रह जस्टिफाय करण्यासाठी ही कहाणी वानगी म्हणून दिली जातेय?
विकु केसेस बघायला कोर्ट असते.
विकु केसेस बघायला कोर्ट असते. कोर्टाबाहेर निर्णय लिटिगेट करून कोर्टाचा निर्णय चुकीचा कशावरून म्हणताय? तुम्ही संबंध कोर्ट केस अभ्यासली आहे का? सगळे पुरावे, आरग्युमेंट तपासले आहेत का?
Trump's attorneys repeatedly
Trump's attorneys repeatedly rejected the requests, arguing in court filings that Carroll had "not demonstrated a reasonable basis for such an intrusive request."
"Further, the request is highly prejudicial given chain of custody concerns and violates defendant’s privacy rights, which are especially sensitive given that he is a former president," Trump lawyer Alina Habba contended last year.
Trump's new attorney, Joe Tacopina, revived the issue in a letter to Kaplan last week, offering to turn over a sample of Trump's DNA to Carroll's lawyers if they first turned over more information from a report on the DNA that was found on the dress.
Kaplan rejected that proposal in his ruling Wednesday, noting that it came well after both sides had submitted all their evidence in the case, which is scheduled to go to trial in April.
जेव्हा पुरावे मागितले जातं होते तेव्हा ट्रम्प नको म्हणणार. वेळ संपली की आता देतो म्हणून दंगा करणार. आणि विकु म्हणतात की हया केसचा निकाल सांगणे म्हणजे ट्रम्प डिरेंजमेंट. उलट निकाल लागलेल्ल्या केसमध्ये ट्रम्पचा बचाव करणे हे डिरेंजड आहे.
ट्रंपवर झालेले सेक्शुअल अ
ट्रंपवर झालेले सेक्शुअल अॅब्युज, एक्स्प्लॉयटेशनचे कॅपिटलायज केलेले आरोप आर नॉट वर्थ अड्रेसिंग, एस्पेशियली एफओबीज कडुन झालेले.
>>> कोर्टात गुन्हा सिद्ध झाला आहे. नॉट मेरली आरोप.
एखादा निर्णय कोर्टाने दिला
एखादा निर्णय कोर्टाने दिला म्हणजे ते ब्रह्मवाक्य आणी त्यावर टीका होऊच नये हा दुराग्रह चुकिचा आहे.
अगदी भारतीय सुप्रीम कोर्टाने दिलेले काही हेबिअस कॉर्पस सारखे निर्णय चुकिचे होते यावर आज बव्हंशी एकमत आहे.
( इतरहे एकदोन चुकीचे होते असे माझे परसनल मत आहे)
इथे तर न्यू यॉर्क स्टेट मधले लुटूपुटीचे ज्यूरी कोर्ट !
ई जीन कॅरोल ची केस आणी राहूल गांधींविरुद्ध गुजरात मध्ये अणलेली केस यात साम्य आहे.
त्या ई जीन कॅरोल केस मध्ये इतके रेड फ्लॅग्स असतानाही तेच झाड का पकडून बसताय ?
(या केसबद्दल माबोसारख्या कुटुंबवत्सल साईट वर फार लिहावेसे वाटत नाही)
यालाच Trump Derangement Syndrome म्हणतात. 'ट्रंप मला आवडत नाही, मग काय वाटेल ते बेकायदेशीर मार्ग वापरून त्याला अडकवा' !
२०२० निवडणूकीनंतर ट्रंप ची अवस्था दयनीय झाली होती (आठवा ती फोर सीझन्स पत्रकार परिषद) त्यानंतर चार वर्षे ट्रंप ला अडकवायला जितकी मेहनत घेतली तितकी कारभार करण्यात घेतली असती तर ?
मेगिन केली चा एक व्हिडिओ
https://x.com/Shaughn_A2/status/1848434959968805038
सिव्हिल फ्रॉड केस मध्ये ट्रंप ला तब्बल ३०० मिलियन डॉलर्स चा विनाकारण दंड केला होता. अशा केसेस मध्ये अपीलात असताना बाँड देण्याची तरतूद आहे. तीही नाकारायचा प्रयत्न झाला. ट्रम्प च्या इमारती जबरदस्तीने विकायचा प्रयत्न् झाला. रियल इस्टेट मध्ये एखादी इमारत तातडीने विकली तर लोक किंमत पाडून मागतात. नंतर अपीलात केस त्रंप ने जिंकली ( आणी तशीच चिन्हे आहेत) तरी नुकसान व्हायचे ते होतेच.
बेकायदेशीर काय मार्ग?
बेकायदेशीर काय मार्ग?
फक्त टाइम विंडो वाढवली. ह्याचा अर्थ असा होतं नाही की ट्रम्प सेक्श्युअल अब्युसर नाहीये. ट्रम्प ने काय केले हे मायबोली वर लिहिता येणार नाही, बाकी लाजण्यासारखे काय आहे? ट्रम्प जयूरी समोर सेक्श्युअल अब्युसर म्हणून लायेबल ठरला. हे म्हणण्यात कसलीही डिरेंजमेंट नाही. ट्रम्प हया बाबत धुतल्या तांदळाचा आहे असे समजणे डिरेंजड आहे.
हो, सेक्श्युअल अब्युजर कधीही पकडला जावा. ह्यात काही चुकीचे वाटत नाही मला.
ओके,
ओके,
ती विन्डो फक्त ट्रंप साठी वाढवली गेली होती.
ई जीन कॅरोल ला रीड हॉफमन ने केस साठी पैसा पुरवला होता.
आपण त्यावेळी जो ड्रेस घातला होता असा तिच दावा होता तो त्यावर्षी बाजारात आलेलाच नव्हता.
एक इंटरव्ह्यू मध्ये रेप ही आपली फँटसी आहे असे तिने सांगितले होते, तो ज्यूरी ला दाखवला गेला नाही.
इतरही अनेक पुरुषांवर तिने असेच आरोप केले आहेत.
Is this the hill you want to die on ?
१. चूक, in जनरल ती विंडो
१. चूक, in जनरल ती विंडो वाढवली होती, जीन कॅरोल सोडून इतर तक्रारी सुद्धा आलेल्या.
२. मग? ट्रम्प निरागस कसा?
३.सोर्स?
४. अच्छा, म्हणजे जर कोणी म्हणले की रेप ही आपली फँटसी आहे (आणि हे नक्की कोणत्या context मध्ये आहे हे पाहायला हवे. सोर्स?) मग रेप करणारा निरागस का?
५.इतर पुरुषांवर आरोप केले म्हणजे बाय डिफौल्ट खोटारडी???
मूळ मुद्दा हा की कोर्टाबाहेर कोर्टातला निर्णय लिटिगेट करणे हे काही निवडक एक दोन फॅक्टस कडे बघून करण्यासारळे नसते. कोर्टात दाखवले गेलेले सगळे पुरावे बघितल्याशिवाय असे करणे बेजबाबदार आणि निरर्थक आहे. सिलेक्टिवली ट्रम्प समर्थकांचे नारेटिव्ह ऐकून निर्णय चुकीचा होता म्हणणे म्हणजे खरी डिरेंजमेंट आहे.
कोर्ट ही धुतल्या तांदळासारखी
कोर्ट ही धुतल्या तांदळासारखी न्यायनिष्ठूर वगैरे काही नसतात. भक्कम पैशाचे पाठबळ असेल तर दोषीचा निर्दोषी होतो हे ओ जे सिम्प्सन च्या खटल्यातून स्वच्छ दिसले. जाणून बुजून अशा कोर्टात तो खटला नेला गेला जिथे काळ्या लोकांची संख्या जास्त असेल आणि जे ओजे साठी जास्त सहानुभूती बाळगतील. अशा अनेक कायदेशीर पण अनैतिक शक्कली लढवून ह्या प्राण्याला निर्दोष ठरवले गेले.
ट्रंपबाबतही हाच प्रकार झाला आहे. अब्जाधीश रीड हॉफमन (ज्याला ट्रंप खरोखर हुतात्मा का नाही झाला ह्याची प्रचंड खंत आहे) त्याने ह्या खटल्याकरता पाण्यासारखा पैसा खर्च केला.
कधीतरी हे प्रकरण वरच्या कोर्टात जाईल आणि तिथे ट्रंप निर्दोष सुटेल ह्यात शंकाच नाही.
>>इतर पुरुषांवर आरोप केले म्हणजे बाय डिफौल्ट खोटारडी???
घटना घडल्यानंतर तीस चाळीस वर्षांनी जाग येऊन बरोब्बर अटीतटीची निवडणूक अगदी काही दिवसावर आलेली असताना हे प्रकरण चव्हाट्यावर मांडणे हे नक्कीच संशयास्पद आहे.
On Tuesday, a jury determined
On Tuesday, a jury determined that Carroll did not prove her allegation of rape but agreed Trump is liable for sexual abuse and defamation. They awarded her $5 million in damages.
सुदैवाने आपल्या देशात नानावटी केस नंतर ज्यूरी ट्रायल्स बंद झाल्या.
ट्रम्प वर आरोप करणार्या लेटेस्ट महिलेची बातमी अमेरिकेतील एकाही पेपर ने स्वीकारली नाही.
प्रेसिडेंट होण्याही आधी कित्येक वर्षे ट्रंप पब्लिक लाईफ मध्ये आहे. त्रंप तिसरी निवडणूक लढवत असताना, मतदानाच्या जेमतेम दोन आठवडे आधी, ट्रम्प पोलिंग मध्ये पुढे असताना, एका ओबामा साठी काम केलेल्या महिलेला अचानक आठवते की आपल्याला १९९३ मध्ये ट्रम्प ने अब्यूज केले होते ?
ट्रंप अतिशय क्रास, क्रूड, आहे वी कॅन ग्रॅब देम बाय सारखी वाक्ये त्यानेच बोललेली आहेत, त्याच्यावर यासाठी जरून टीका करूयात पण lawfare चे समर्थन नको.
हॅवंट सीन सच ए लोडेड
हॅवंट सीन सच ए लोडेड स्टेटमेंट इन ए व्हाइल.. जरा विस्कटुन सांगा... >>> माझ्या पोस्टचा मुख्य मुद्दा तो नाही पण जे डी व्हान्सची स्प्रिंगफील्ड बद्दलची वक्तव्ये हे एक उदाहरण आहे. तो सातत्याने तेथील हैतीच्या इमिग्रंट लोकांचा "इल्लिगल" असा उल्लेख करतो. हैतीचे किंवा अमेरिकन कल्चरच्या बाहेरचे इतके लोक एकाच गावात आल्याने लोकांचा रोष होणे साहजिक आहे, ते सगळीकडे होते वगैरे मी ऑलरेडी लिहीले आहे. पण ते इल्लिगल नाहीत. हैतीच्या लोकांना टेम्पररी प्रोटेक्शन गेली अनेक वर्षे आहे, ट्रम्पच्या काळातही होते, आणि कोर्टाने अनेकदा वाढवलेले आहे. हे काही कमलाने परस्पर काही करून त्यांना तेथे आणलेले नाही. पण व्हान्सचे ऐकतात त्यांना वाटेल की जणू कमला/बायडेनने काहीतरी निर्णय घेउन अमेरिकेत इतके लोक आणलेत. ते इल्लिगल का, तर म्हणे कमलाच्या इल्लिगल पॉलिसीज मुळे ते आले म्हणून. कमलाची कसली इल्लिगल पॉलिसी वगैरे प्रश्न त्याच्या वोटर्सना पडत नाहीत. प्रत्यक्षात यात इल्लिगल काही नाही. पण ते तेथे अनवेलकम आहेत व त्याकरता एक कारण फुसके निघाले तर इतर काहीतरी काढले जाते. या अर्थाने ते वाक्य आहे.
अशा वेळेस अचानक मोठ्या संख्येने दिसू लागलेल्या "वेगळ्या" लोकांबद्द्ल असणारी नाराजी स्वाभाविक असते. त्याला मी रेसिस्ट समजत नाही. वोक स्नोफ्लेक्स ज्याला रेसिस्ट म्हणतात ते अनेकदा आपल्या कल्चरपेक्षा वेगळी दुनिया न पाहिलेल्यांचे स्वाभाविक वागणे असते. काही क्रेझी लोक सोडले तर तर बहुतांश लोक हळुहळू हे बदल स्वीकारतात. रिपब्लिकन्सच सोडा, इव्हन मागा पब्लिक सगळे रेसिस्ट नाहीत. पण ट्रम्प आणि व्हान्स त्यांच्या रोषाला खतपाणी घालून त्यांना रेसिस्ट बनवत आहेत.
जर व्हान्स आणि टँपोन वॉल्जची
जर व्हान्स आणि टँपोन वॉल्जची डिबेट ऐकलीत तर एक मुद्दा कळेल. एखादा मांत्रिक जादूचे पाणी टाकून एखाद्या माणसाचा बेडूक करतो किंवा बेडकाचा माणूस करतो तसे काहीतरी जादूटोणा सदृश विधी करून स्प्रिंगफील्डमधील बेकायदेशीर आगंतुकांना कायदेशीर स्टेटस देण्यात आले होते. कुठलेसे अॅप घुसखोराला सरकारी खर्चाने दिलेल्या फोनवर स्थापित करायचे आणि ते वापरुन आपले स्टेटस कायदेशीर करून घ्यायचे असा सोपा राजमार्ग ह्या घुसखोरांना दिला गेला.
ह्याविषयी व्हान्स अजून काही बोलू इच्छित होता पण डेमोक्रॅटिक बाजूची तळी उचलणार्या डिबेट संचालकांनी त्याचा माईकच बंद करून टाकला. किती लोकशाही प्रेम! किती अभिव्यक्ती स्वातंत्र्य!
https://www.youtube.com/watch?v=jEphfGpJjc8
२७:५० मिनिटापासून पहा.
सगळे सोपस्कार करून आलेल्या
सगळे सोपस्कार करून आलेल्या लोकांना ग्रीन कार्डसाठी अनेक दशके ताटकळावे लागते. पण ह्या श्वान्मार्जारभक्षक हेतीवासीयांना काही मिनिटात ते उपलब्ध! किती न्यायी आणि दयाळू सरकार आहे बायडन हॅरिसचे!
Pages