२०२४ अमेरिकेतील निवडणूक

Submitted by उपाशी बोका on 28 June, 2024 - 09:42

२०२४ च्या निवडणुकीसाठी धागा काढत आहे.

कालची चर्चा (debate) बघितली का? डेमोक्रॅटिक पक्षाचे खंदे समर्थक पण हादरलेले दिसत आहेत.

IMG_3696.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

विकु भक्त आहेत किंवा अचानक भक्त झाले आहेत असे मला अजिबात वाटत नाही Happy त्यांचा मुद्दा तात्या यात काड्या करत नाही हा नाही पण ही (आर्थिक) केस यावर्षी चालवत ठेवण्यात बॅड ऑप्टिक्स आहे - असा असावा हे माझे इंटरप्रिटेशन आहे. ते मला पटते.

६ जाने, कागदपत्रांची केस ई. केसेस मधे ट्रम्प विरूद्ध खटले उभे करणे बरोबर होते. त्याच्या आर्थिक घोटाळ्यांबद्दल जनरल ऑब्जेक्टिव्ह तज्ञांनी पूर्वीही असे सांगितले आहे ते गफले अगदी खरे असतील, तरी आजी/माजी अध्यक्षाला यावरून ताणणे हे "अनप्रेसिडेण्टेड" आहे. असे घोटाळे करणार्‍या इतर अनेकांना तुलनेने हलक्या दंडावर्/शिक्षेवर सोडले गेलेले आहे. माझा यात स्वतंत्र अभ्यास नाही. पण जितके वाचले आहे त्यावरून.

याउलट ६ जाने. सारख्या केसेस या जास्त महत्त्वाच्या आहेत. जरी या केसेस वेगवेगळ्या कोर्टांत असल्या तरी पब्लिक परसेप्शन मधे सगळ्या एकत्रच तपासल्या जातात. सरकार प्रत्यक्षात किती हस्तक्षेप करते माहीत नाही. अगदी बायडेनला बेनिफिट ऑफ डाउट दिला - त्याने हे सगळे मॅनेज केलेले नाही असे धरले, तरी ठिकठिकाणचे उत्साही ट्रम्पविरोधी लोक या आणत असतील. पण जेथे सर्वात जास्त गुन्हा आहे तेथे फोकस करून बाकी स्लो डाउन करायला हव्या होत्या.

बाकी ते कन्व्हिक्टेड फेलन वगैरे एमएसएनबीसीला अगदी घनघोर काही वाटले तरी फॉक्स वाले व मागा पब्लिक ते झुरळासारखे झटकते. एकदा सगळी दुनिया तात्याच्या मागे लागली आहे हा समज डोक्यात बसल्यावर याचा काही उपयोग होत नाही.

मात्र यातून होणार नाही इतका फरक एक पोर्टो रिको, किंवा लॅटिनोज आणि बेबीज च्या कॉमेन्टने होऊ शकतो Happy

व्हॉटेवर स्टिक्स! Lol
इतकं ऑप्टिक्स वगैरे बघुन टेलरमेड यानंतर ते करणे कोणाला शक्य होईल वाटत नाही. इतके जास्त मुव्हिंग पार्ट्स आहेत की व्हॉटेव्हर स्टिक्स इतकंच फक्त शक्य असावं.

असे लहानमोठे फ्रॉड्स वारंवार 'चलता है' सदरात गेले की माणसाला 'मी फिफ्थ अ‍ॅव्हेन्यूवर दिवसाढवळ्या खून पाडेन आणि माझं कोणी काही वाकडं करू शकणार नाही' असा कॉन्फिडन्स येतो.

पण जेथे सर्वात जास्त गुन्हा आहे तेथे फोकस करून बाकी स्लो डाउन करायला हव्या होत्या. >> म्हणजे एखाद्या माणसाने १००० वेळा शिवीगाळ केली, १०० वेळा पकिटे मारली , १० वेळा मारहाण केली नि एकदा खून केला तर फक्त खूनावर फोकस ठेवायचा कारण ऑप्टिक्स फा ? "अनप्रेसिडेण्टेड" आहे म्हणून नको हे आर्ग्युमेंट कसे होऊ शकते ? ह्या केसेस होउ नये म्हणून(च) तात्या उभा राहिलाय असा विचार असेल तर ? फ्लोरिडामधल्या केसचे काय झाले ते बघितले ना ? विकु काय म्हणणार त्यावर ?

अरेरे ! क्रिमिनल व सिव्हिल केस मध्ये गल्लत का करताय ?

आज न्यू यॉर्क मध्ये डेमोक्रॅट्स वरचढ आहेत व ते ट्रम्प ला अडकवत आहेत म्हणून गुदगुल्या होत आहेत, ठीक आहे, उद्या रिपब्लिकन्स होतील, मग तेही डेमोक्रॅट्स वर अशाच केसेस घालतील, हे पटेल का ?
अपीलाची सुनावणी बव्हंशी पूर्ण झाली आहे आणी निकाल (निवडणूकीनंतर) ट्रंप च्याच बाजूने येइल अशी मला ९०% खात्री आहे, मग तसे झाले तर अपील जजेस वरही मस्क भक्त असण्याचा आरोप कराल ?

To be clear, ट्रंप ने केलेल्या फ्रॉड्स ची यादी मोठी आहे, त्याने ज्या ज्या व्हेंडर्स चे पैसे बुडवले त्याची दुपटीने वसूली करा, कामगारांचे पगार बुडवले असतील तर तेही वसूल करा. फक्त न्यूयॉर्क मधल्या सर्व बिझिनेस्मॅन लोकांना कायम टेन्शन मध्ये ठेवणारे पायंडे पाडू नका, इतकेच.

क्रिमिनल व सिव्हिल केस मध्ये गल्लत का करताय ? >> दोन्ही गुन्हेच आहेत ना ? "To be clear, ट्रंप ने केलेल्या फ्रॉड्स ची यादी मोठी आहे, त्याने ज्या ज्या व्हेंडर्स चे पैसे बुडवले त्याची दुपटीने वसूली करा, कामगारांचे पगार बुडवले असतील तर तेही वसूल करा. " हे म्हटल्यावर कोणी कुठे केस केली हे बघून ठरवायचे का ? फॉर सेक ऑफ आर्ग्युमेंट न्यू यॉर्क वाली केस टेक्सास मधे केली गेली असती तर तुम्हाला मान्य असती का ? कमीत कमी फा च्या "बॅड ऑप्टिक्स " ह्या दाव्यात तथ्य तरी आहे पण तुमचे मात्र भलतेच सुरू आहे विकु.

<<>>
हे म्हणजे प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलहि निघे असे म्हणण्यासारखे आहे.
उगाचच काही काही बोलायचे.
सोपी गोष्ट आहे ती? का पूर्वी कुणि करून पाहिले नाही? शक्य नाही ते!
तर तसले काही होणार नाही.

ऑप्टिक्स बरोबरच मला फेयरनेस, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, चेक्स अँड बॅलंसेस, महत्वाचे वाटतात, बिझिनेस मन लोकांना घाबरवून राज्यातून हकलून देण्यात काय हशील ?

ओके, आपण अपील कोर्टाचा निर्णय येइपर्यंत थांबूयात. या विषयावर हेमाशेपो Happy

<<असे घोटाळे करणार्‍या इतर अनेकांना तुलनेने हलक्या दंडावर्/शिक्षेवर सोडले गेलेले आहे.>>
सहमत.
<<< पण जेथे सर्वात जास्त गुन्हा आहे तेथे फोकस करून बाकी स्लो डाउन करायला हव्या होत्या.>>>
एव्हढी अक्कल कुठे आहे?
<<< म्हणजे एखाद्या माणसाने १००० वेळा शिवीगाळ केली, १०० वेळा पकिटे मारली , १० वेळा मारहाण केली नि एकदा खून केला तर फक्त खूनावर फोकस ठेवायचा>>>
शिविगाळ, मारहाण, पाकीटमारी या गुन्ह्यात तो सापडणार नाही, खटले लांबवत ठेवणे यात तो पटाईत आहे.
त्रंप्याला तुरुंगात टाकणे एव्हढे सोपे नाही.
म्हणून खूनावर फोकस.
तरी काय उपयोग? त्रंप्याने स्वतःच सांगितले की भर टाईम्स स्॑क्वेअर मधे दिवसा ढवळ्या जरी खून केला तरी मला काही होणार नाही नि ते खरे आहे.
जनता त्रंप्यावर खूष आहे.

पुन्हा एकदा हेती आणि त्यांचे श्वान मार्जार इत्यादी प्राणीवर्गाशी असणारे संबंध.
सध्या ट्रंपने जे काही म्हटले आहे ते खोटेच हे ठरवण्यासाठी सगळ्या बातम्यांची रंगसफेदी चालू आहे. पण हे एक पोस्ट बघा तीन वर्षे जुने आहे. स्प्रिन्गफील्ड वगैरे व्हायच्या आधी.
https://www.reddit.com/r/Advice/comments/s6ginv/haitian_girl_crashing_at...

वाचायची इच्छा नसेल तर हा सारांशः
लेखक लिहितो आहे की एक हेतीची मुलगी माझ्या घरी पाहूणी म्हणून आली होती. माझ्याकडे अनेक मांजरे आहेत. ती मांजरांशी व्यवस्थित वागत होती. पण बोलता बोलता तिने सहज उल्लेख केला की आमच्या देशात मांजरे खातात. तिने मांजराचे खाद्यपदार्थ कसे बनवतात ह्याबद्दलही वर्णन करून सांगितले. हे ऐकून आम्ही दचकलोच! मी हेतीच्या चालीरितीबद्दल वाचले होते आणि मला खात्री होती की ह्या मुलीला हे कळते की अमेरिकेतील मांजरे आणि हेतीतील मांजरे ह्यांना अगदी वेगळ्या पद्धतीने पाहिले जाते. माझ्या बॉयफ्रेंडला मात्र हे फारच धक्कादायक वाटले. त्याला आता ह्या मुलीला घराबाहेर काढावे असे वाटू लागले आहे. तुम्हाला काय वाटते? तुम्ही काय सल्ला द्याल?

निदान हेतीचे लोक मांजर खातात ह्या मुद्द्यावर एकमत व्हावे. तसेही बाकी कुठल्या देशातील आगंतुकांवर असला आरोप न करता फक्त हेतीतून आलेल्या आगंतुकांवर आरोप का होतो आहे ह्याचाही विचार व्हावा हा हेती आय मीन हेतू.

गलितगात्र, पायपुसण्यासारखे वापरून आता कचर्यात फेकून दिलेल्या पण कागदोपत्री आजही राष्ट्रपती असणार्‍या थेरड्या बायडनने समस्त ट्रंप मतदार हे उकिरड्यातल्या कचर्यासारखे आहेत असे विधान केले. आता भाषा पंडित त्यात कुठलेसे नसलेले अवतरण चिन्ह असल्याचा दावा करत म्हातारड्याच्या गलिच्छ विधानावर गुलाबपाणी शिंपडून त्याची दुर्गंधी झाकण्याचा प्रयत्न करत आहेत.
हिलरीने बास्केट ओफ डिप्लोरेबल्स अर्थात हीन दर्जाच्या लोकांचे टोपले म्हणून ट्रंप समर्थकांची निर्भत्सना केली होती. आता थेरड्याने आता ही टोपली उकिरड्यावर नेऊन टाकली आहे. आणि हे सगळे म्हणत असताना आम्ही सर्वांना एकत्र आणणारा पक्ष आहोत हेही तुणतुणे वाजवायचे! किती मस्त एकत्र आणत आहेत सगळ्यांना!

शेंड्यांचा मुद्दा नक्की काय आहे? वेगवेगळ्या प्रदेशांत तिथल्या हवामान आणि उपलब्धतेनुसार वेगवेगळी खाद्यसंस्कृती असते. त्याने नक्की काय सिद्ध होतं?

काही देशांत हॉर्सफ्लेश खातात. यातले काही देश चक्क कॅनडा वगैरे मधून हॉर्सफ्लेश इंपोर्ट करतात. माझ्यासाठी हे धक्कादायक होते. या देशांतील मंडळी आमच्या राज्यांत स्थलांतरीत आहेत. मला घोडे फार आवडतात. माझ्या मैत्रीणीकडे पेट म्हणून मिजेट घोडे आहेत. मी काय करावे?
मला मांजरेही फार आवडतात. हॉर्स फ्लेश डेलिकसी म्हणून खाणार्‍या मंडळींच्या कंपनीत हेतीवरुन आलेली मंडळी कामगार असल्यास काय करावे?

सध्या जॉब नाहीत म्हणावे तर तसे नाहीये. मी तुम्हाला श्रीमंत करेन वगैरे म्हणू शकत नाही. रिकाम्या जागा भरणे कठीण अशी परीस्थिती. स्थानिकांच्या जोडीला हेतीच्या लोकांनाही नोकर्‍या आहेत. तेव्हा हे मांजराचे पिल्लू दिले सोडून.

अरे देवा, आले का परत मांजर कुत्रे !
थेरडा वगैरे शब्द वापरलेच पाहिजेत का ? रसभंग होतो.
माझ्या चुलत बहिणीच्या सख्ख्या दीराचे साडू आय टी मध्ये आहेत, ते हैती ला गेले होते, तिथे एका टपरीवर 'मांजर बिर्याणी' अशी पाटी पाहिली म्हणे त्यांनी, खरं खोटं देव जाणे.

तिथे एका टपरीवर 'मांजर बिर्याणी' अशी पाटी पाहिली म्हणे त्यांनी, खरं खोटं देव जाणे. >> ते हैतीचे आहेत का ? ओहायोमधे राहतात का ? त्यांचे लेगल स्टेटस काय आहे हे कळीचे प्रश्न आहेत. वान्स ने स्वतःचे मांजर मारून तात्याला बिर्याणी करून खायला घातले तर तो इश्यू नाहिये विकु

पुन्हा एकदा हेती आणि त्यांचे श्वान मार्जार इत्यादी प्राणीवर्गाशी असणारे संबंध. >>>

आता तर मला वाटते की तात्याने याच पोस्ट्स वाचून "लोक असे म्हणत आहेत" असे डिबेटमधे ठोकून दिले. ही "राजापेक्षा राजनिष्ठ" गिरी अफाट आहे. परवा ट्रम्प स्वतःच फॉक्सच्या मुलाखतीत म्हंटला की त्याला काही माहीत नाही खरे आहे की खोटे आहे, कोठेतरी त्याने ऐकले व दिले ठोकून. सगळे "डिबंक" झाले आहे ऐकल्यावर त्याचा प्रतिप्रश्न होता What about the geese? What happened there?

शेंड्यांचा मुद्दा नक्की काय आहे? वेगवेगळ्या प्रदेशांत तिथल्या हवामान आणि उपलब्धतेनुसार वेगवेगळी खाद्यसंस्कृती असते. त्याने नक्की काय सिद्ध होतं? >>> जी बस मुद्दे का पता चलतेही हम आपको खबर कर देंगे! तो मै आपका वोट पक्का समझू? Happy

पक्का ? भले मेरा वोट जिल स्टीन को देकर बर्बाद ही करना पडे, तेरे ट्रंप को कभी नहीं दूंगी !

भारतात उत्तर पूर्व राज्यांत ( मिहोमिझोराम, नागालँड) कुत्रे , मांजरे खाण्याचे प्रकार आढळतात. प्रत्येक भारतीय कुत्रे, मांजरे खातात असा निष्कर्ष काढायचा का?

जुलै २०२० मधे, नागालँड राज्यसरकारने कुत्र्याच्या मांसावर बंदी आणली होती. त्याआधी मिझोराम राज्यात अशाच प्रकारची बंदी आणली होती.
https://www.thehindu.com/news/national/other-states/nagaland-asked-to-ba...

जून २०२३ मधे, गुवाहटी उच्च न्यायालयाने कुत्र्याचे मांस खाणे नागांची प्राचिन प्रथा आहे असे म्हणत बंदीचा निर्णय रद्द केला.
https://www.thehindu.com/news/national/other-states/gauhati-high-court-q...

कुत्रे मांजराचे मांस खाणे हा क्लेम वेगळा आहे लोकांची पाळीव कुत्री मांजरे चोरून त्यांचे मांस खाणे हा पूर्ण वेगळा क्लेम आहे.
मोट अँड बेली प्रकार झाला. एक एक्स्ट्रीम दावा करायचा आणि समर्थनार्थ त्यापेक्षा कितीतरी साधारण गोष्टीचा पुरावा देणे.

ट्रम्पचे वचन - वॅक्सिन्स बद्दल अफ़वा आणि भयगंड पसरवणाऱ्या बॉबी केनेडी ज्युनिअरला सर्व आरोग्य विषयक एजन्सीजचा कार्यभार सोपवणार.

अरे देवा. ह्या कामासाठी ह्यापेक्षा वाईट माणूस शोधूनही सापडला नसता.
https://www.msnbc.com/mehdi-on-msnbc/watch/-kids-died-the-story-of-rfk-j...

एकूण दिव्य आहे. इलॉन मस्क, ज्याने ट्विटर विकत घेऊन कंपनीची किमत रसातळाला नेली- तो गवर्नमेंट इफिश्यन्सी बघणार, हया बाबत शून्य अनुभव असूनही.

आणि अँटी वॅक्सर केनेडी आरोग्यखाते बघणार.

> अरे देवा. ह्या कामासाठी ह्यापेक्षा वाईट माणूस शोधूनही सापडला नसता.
अक्षरशः १०० %.
उरलेली कसर ट्रम्प चीन वर २०% सरसकट टेरिफ लावून भरून काढणार !

बायडेन / कमला यांना शिक्षा करण्याचा नादात आपण अमेरिकेचेच वाटोळे करतोय हे केव्हा लक्षात येणार कल्ट च्या?

>>पण व्हान्सचे ऐकतात त्यांना वाटेल की जणू कमला/बायडेनने काहीतरी निर्णय घेउन अमेरिकेत इतके लोक आणलेत. ते इल्लिगल का, तर म्हणे कमलाच्या इल्लिगल पॉलिसीज मुळे ते आले म्हणून.<<
तुमचा सोर्स काय आहे याची क्ल्पना नाहि परंतु तो बहुतेक एकोचेंबर असावा अशी शंका आहे. बाय्डनने टिपीएसची मर्यादा वाढ्वली हे जगजाहिर आहे. इल्लीगल पॉलिसी हा शब्द मी आजच ऐकला. एखादि पॉलिसी डॅमेजिंग असु शकते, पण इल्लीगल सुद्धा असु शकते ते आज कळलं. असो...

<<इल्लीगल पॉलिसी>>

हा एक प्रकारचा समास आहे. लोकांना इल्लीगली येऊ देणे ही पॉलिसि!

वान्सची जो रोगन मुलाखत पाहिली का ? (एको चेंबर च्या बाहेर ची आहे Wink ) वान्सला टेक्सामधल्या नि त्यासारख्या कडक अबॉर्शन लॉची कल्पना नाहीये म्हणे. स्वतः रो च्या रिपील नंतर "हि सेलेबरेशन मोमेंट आहे" हे पोस्ट करणारा नग मुलाखतीमधे 'कोणी सेलेबरेशन केले असेल असे जरुरी नाही ' म्हणत इकडच्या बोटावरची थुंकी तिकडे करतो. ह्याउलट तात्या "मी बायकांना वाचवाणार" असे कोकलतो आहे. असे कोऑर्डिनेशन हवे राव. एक एको चेंबरच्या बाहेर बरळतो नि दुसरा एको सेंटर मधे कोकलतो.

Pages