२०२४ अमेरिकेतील निवडणूक

Submitted by उपाशी बोका on 28 June, 2024 - 09:42

२०२४ च्या निवडणुकीसाठी धागा काढत आहे.

कालची चर्चा (debate) बघितली का? डेमोक्रॅटिक पक्षाचे खंदे समर्थक पण हादरलेले दिसत आहेत.

IMG_3696.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

इल्लीगल पॉलिसी हा शब्द मी आजच ऐकला. एखादि पॉलिसी डॅमेजिंग असु शकते, पण इल्लीगल सुद्धा असु शकते ते आज कळलं. असो... >>>

Lol माझ्याकडूनही एक "असो". कारण हा शब्द माझा नाही. व्हान्सचा आहे. आधी हैतीच्या लोकांना इल्लिगल म्हणून बसला. मग ते लीगल आहे हे कळाल्यावर ही शोधाशोध.

माझे सोर्स मागच्या पानावर दिलेले आहेत. सगळी पक्षविरहित माहिती आहे.

हेतीचे लोक त्यांच्या देशात कुत्री मांजरे खातात हा मुद्दा आहे. बाकी कुठल्या देशात हे प्राणी खाल्ले जात नाहीत. अशियातील काही देशात कुत्रे खातात. (अनंतकोटी ब्रह्मांड नायक ओबामाजींनी कुत्र्याचे मांस खाल्ले आहे असे त्यांनी लिहिले आहे असो).
मुद्दा हा की हेतीचे लोक आणि कुत्रे मांजरे खाणे ह्या दोन गोष्टी पूर्ण असंबद्ध नाहीत. कुणी हेतीचे लोक कुत्री मांजरे खात आहेत असा दावा करत असल्यास तो विचारातही घेण्याच्या लायकीचा नाही. हेतीच्या लोकांना हे खाणे पूर्ण अपरिचित आहे असा विचार बिंबवू पहात आहेत. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आहे.

>>
आणि अँटी वॅक्सर केनेडी आरोग्यखाते बघणार.
<<
लशीच्या विक्रीवर भक्कम रॉयल्टी कमावणारा आणि त्याची आकडेवारी लपवुन ठेवणारा दैत्य आरोग्यखाते बघत होता ते चालत होते का?

कुठलाही वैज्ञानिक पुरावा, डेटा नसताना अकारण ६ फूट अंतर ठेवण्याचा फतवा काढून अनेक उद्योग धंद्यांचे अब्जावधी डॉलरचे नुकसान करणारा दानव आरोग्य खाते चालवत होता.
लहान मुलांना कोविडचा धोका नगण्य असूनही त्यांच्या शाळा बंद करणे, त्यांना अनेक तास मुखवटे बांधायला भाग पाडून त्यांच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ करणारा नराधम फौची आरोग्य खाते चालवत होता. त्यासंबंधी कुठलाही अभ्यास, डेटा देण्यात ते असमर्थ ठरले पण तरी त्यांनी हा वरवंटा फिरवून एका पिढीच्या शिक्षणाचे वाटोळे केले.
त्यापेक्षा आर एफ के कितीतरी बरा!

लशीच्या विक्रीवर भक्कम रॉयल्टी कमावणारा आणि त्याची आकडेवारी लपवुन ठेवणारा दैत्य आरोग्यखाते बघत होता ते चालत होते का? >> काय ते लॉजिक ! जबरदस्त ! समजा दैत्य वगैरे मूर्खपणा एक वेळ मान्य केला तर त्याचा पर्याय म्हणून अँटी वॅक्सर आरोग्यखात्यावर आणायचा नि त्याची भलावण करायची ?

ज्या कंपन्यांसाठी हे हेतीचे लोकं काम करत आहेत तिथल्या कुणालाच त्यांच्याबद्दल प्रॉब्लेम नाहीये. जागा भरल्या जात नव्हत्या तेव्हा स्थानिक वर्करना बर्न आउट व्हायची वेळ आली होती आणि ऑर्डर्स आहेत पण काम करायला कामगार नाही म्हणून वाढीव बिझनेस घेता येत नाही हे देखील होते. लोकल इकॉनॉमीसाठी वर्क होत आहे म्हणून हेतीचे लोकं कामाला ठेवलेत. स्थानिक पातळीवर रिपब्लिकन मेयर देखील अफगाण रिफुजी चालतील का, म्यानमारचे चालतील का वगैरे कंपन्यांना विचारतात, जेणे करुन कंपनीचा एक्सपानशनचा प्लॅन कामगारां अभावी दुसर्‍या भागात जाऊ नये.

IMG_20241101_222818.jpg

ट्रम्प फॅन्स प्लिज तुमचे उत्तर सांगा.

हेतीचे लोक त्यांच्या देशात कुत्री मांजरे खातात हा मुद्दा आहे >>>

मराठी लोक महाराष्ट्रात अळूचं फदफदं खातात. यावरून हे सिद्ध होते की अमेरिकेत आलेले मराठी लोक ज्या गावात राहतात तेथील लोकांच्या बॅकयार्ड मधले अळू चोरून नेऊन खातात.

<कुठलाही वैज्ञानिक पुरावा, डेटा नसताना अकारण ६ फूट अंतर ठेवण्याचा फतवा काढून अनेक उद्योग धंद्यांचे अब्जावधी डॉलरचे नुकसान करणारा दानव आरोग्य खाते चालवत होता.
लहान मुलांना कोविडचा धोका नगण्य असूनही त्यांच्या शाळा बंद करणे, त्यांना अनेक तास मुखवटे बांधायला भाग पाडून त्यांच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ करणारा नराधम फौची आरोग्य खाते चालवत होता. त्यासंबंधी कुठलाही अभ्यास, डेटा देण्यात ते असमर्थ ठरले पण तरी त्यांनी हा वरवंटा फिरवून एका पिढीच्या शिक्षणाचे वाटोळे केले.> हे सगळं भारतातही झालं. त्यासाठी कोणता नराधम जबाबदार?

कमला हॅरीस - सेल्झर पोल- आयोवा मध्ये ३ पॉईंटने पुढे!
हया पोलचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे. शुभचिन्ह दिसते आहे.

कमलाकडे रुरल आयोवा मध्ये तीन टक्क्याची लीड असणे हे एकूण देशाचा कल कुठे आहे दाखवते. गेल्या निवडणुकीच्या हया पोल मध्ये ट्रम्प बायडन आणि हिलरी वर आयोवात सात पॉईंटने लीडवर होता. आयोवात हारूनही बायडेन निवडणूक जिंकला. आतातर आयोवा मध्ये ट्रम्प मागे आहे.

आयोवा कदाचित कमला घेईल किंवा ट्रम्प कडेही जाईल, शक्य आहे. पण हे नक्की की कोणीही आयोवा घेतलं तरी अगदी स्लिम मार्जिनने घेणार आहे. आणि जिथे ट्रम्पची डोंगराएवढी लीड हवी तिथे तो सध्या मागे आहे.

इंटरेस्टिंग.

सध्याच्या गणतीप्रमाणे नेहमी ब्लू (डेमोक्रॅट) असणारी व नेहमी रेड (रिपब्लिकन) असणारी राज्ये तशीच राहतील असे धरून बेसलाइन स्कोअर कमलाचा २२६ व ट्रम्पचा २१९ आहे. म्हणजे वरच्या आयोवा पोल सारखे काही बदल झाले नाहीत तर इतक्या जागा दोघांच्या नक्की आहेत. त्यापुढे नेवाडा (६), अ‍ॅरिझोना (११), जॉर्जिया (१६), नॉर्थ कॅरोलीना (१६), पेनसिल्वेनिया (१९), मिशिगन (१५) आणि विस्कॉन्सिन (१०) - ही राज्ये यात धरलेली नाहीत. त्या राज्यांमधून मिळणार्‍या जागांची संख्या कंसात आहे. यातली कोणतीही राज्ये कोणालाही मिळू शकतील असे अजूनतरी चित्र आहे. गेल्या काही दिवसांत हे कधी थोडे इकडे तर कधी तिकडे जाते. निकाल ही सात राज्ये ठरवतील. दोन्ही कॅम्पेन्स गेले अनेक दिवस याच राज्यांत फिरत आहेत.

(नेब्रास्का व मेन या राज्यांचा अपवाद वगळता बाकी सर्व राज्यांत जो उमेदवार जास्त मते जिंकतो त्याला त्या राज्यांतील सर्व जागा मिळतात. म्हणजे एका राज्यांत १० जागा असतील ("इलेक्टोरल वोट्स") व एका उमेदवाराला ५१% मते मिळाली, तर दहाच्या दहा जागा त्याला/तिला मिळतात. यावरून एखादे राज्य रेड आहे की ब्लू असे सहसा म्हणतात. फक्त या वरच्या दोन राज्यांत मताच्या टक्केवारी प्रमाणे जागा विभागल्या जातात).

इथे हे मॅप व सिनॅरिओज आहेत.
https://www.270towin.com/

आताच ट्विटरवर The Apprentice या चित्रपटाबद्दल वाचलं. निवडणुकीच्या तोंडावर आलेला हा चित्रपट प्रचारकी propoanda movie आहे का?

टकर कार्ल्सनवर राक्षसाने हल्ला केला म्हणे.
(राक्षस म्हणजे लिटरली राक्षस (demon). रुपकात्मक राक्षस किंवा राक्षसी प्रवृतीचा माणूस नव्हे तर खराखुरा पंजेवाला बायबल मधला राक्षस.)

पाहिला आहे तो पोल मी. आयोवा कमला +३ हे फारच म्हणजे फारच आश्चर्यकारक आहे, गांधीनगर मधून शहा पडतील या भाकितापेक्षाही. गेल्या दोनही वेळा ट्रम्प जवळजवळ +१० होता तिथे. आणी जर हे खरे झाले तर कमला हॅरिस यांना ४०० वगैरे इलेक्टोरल वोट्स मिळतील. आयोवाचा काल आलेला दुसरा पोल ट्रंप +१० आहे.

> आताच ट्विटरवर The Apprentice या चित्रपटाबद्दल वाचलं. निवडणुकीच्या तोंडावर आलेला हा चित्रपट प्रचारकी propoanda movie आहे का?
हो, पण ट्रम्प चे अफाट कौतुक करणाराही एक सिनेमा येऊन गेला. तो बहुदा २००० म्यूल्स वाल्या दिनेश डिसोझाने काढला होता. दोन्हीही सिनेमा फारसे चर्चेत आले नाहीत.

Personal preference aside, ट्रंप येइल हाच आजही माझा अंदाज आहे. RFK ने पाण्यातले फ्लोरईड काढून टाकायच सूतोवाह्च केले आहे. तिकडे कमला जिंकल्या आणी लिझ चेनींना बक्षीस म्हणून कॅबिनेट मंत्री केले तर त्या ज आणखी दोन युद्ध सुरू करून हजारो अमेरिकन सैनिक, लाखो नागरीक यांचा बळी घेऊओन हॅलिबर्टन चे ( पर्यायाने स्वतःचे) उखळ पांढरे करतील ही भिती !

आयोवाचा काल आलेला दुसरा पोल ट्रंप +१० आहे.
>>>
इमर्सनचा ट्रॅक रेकॉर्ड खराब आहे. मागच्या इलेक्शन बघा.
सेलझर अमेरिकेतली गोल्ड स्टॅण्डर्ड पोलस्टर समजली जाते. असो, काहीही होऊ शकते हे खरेच.

लोकांना कसला राग/भीती जास्त आहे यावर निकाल टिकेल असे वाटते. इमिग्रेशन्/महागाई चा राग जास्त असेल तर ट्रम्प येईल. अ‍ॅबॉर्शन लॉज राज्याराज्यांत लागू होतील याची भीती असेल तर कमला.

ठिकठिकाणी प्रचंड प्रमाणात "अर्ली वोटिंग" झाले आहे. आमच्या येथे सुद्धा प्रचंड गर्दी होती सतत. इतकी लाइन कधीही पाहिली नाही इथे. काल जवळजवळ २-२.५ तास लागले शेवटच्या दिवशी. रांगेतल्यांना तेथील स्थानिक उमेदवारांचे स्टॉल्स्/बूथ वाले पाणी, पिझा, चीटोज ई आणून देत होते. आमच्या भागात गेल्या ७-८ वर्षांत भारतीयांची संख्या खूप वाढली आहे, ते ही रांगेत जाणवत होते. ३ वाजता मतदानाची वेळ बंद झाली तेव्हा रांगेत अजून २०० तरी लोक शिल्लक होते. त्यांना सर्वांना मतदान करू दिले.

अमेरिका इज अ‍ॅट द क्रॉसरोड्स..

अ‍ॅबॉर्शन, वेल्फेर अशा दुय्यम इशुजचं भांडवल करुन देशाला दारिद्र्यात लोटणारं नेत्रुत्व हवं कि कठोर पॉलिसीज राबवुन देशाला गर्तेतुन बाहेर काढणारं?

होप अमेरिका विल वोट हु इज बेस्ट फॉर द कंट्रि...

सिरियसली! २०२२४ मध्ये अमेरिकेत 'अ‍ॅबॉर्शन आणि गन आणि युनिवर्सल हेल्थ केअर' अशा काही दशके जुन्या आणि जगाने कधीच मागे टाकलेल्या इश्यूज वर बोललं जातं हे पथेटिक आहे.
हे चोराच्या उलट्या बोंबा आहे. पण चालायचंच.

आमचे एक मित्र, जे स्वतःला intellectuals समजतात, ते त्रंप्याला मत देतात. student loans माफ करणे हे त्यांना एकदम अमान्य आहे, म्हणून.

How Trump’s concern for Bangladeshi Hindus shows Hindu community gaining a political voice -
https://www.firstpost.com/opinion/how-trumps-concern-for-bangladeshi-hin...

‘Kamala Harris, Joe Biden ignored Hindus’: Donald Trump condemns violence against minorities

https://www.hindustantimes.com/world-news/us-news/kamala-joe-ignored-hin...

तरी आपण डेमोक्रॅटसनाच मते देणार. Happy करेक्ट?

काहीही. एक तर ट्रंप ला कसलीच काही इन्टेग्रिटी नावाची चीज आहे यावर माझा विश्वास नाही. दुसरे म्हणाजे बांगला देशी किंवा इतर कुणा हिंदूंचा ( केवळ ते हिंदू आहेत म्हणून) कैवार घ्यायला मला वेळ आणि माझा प्रेफरन्स नाही , मी जिथे रहातेय तिथे एक माणूस लोकशाही धाब्यावर बसवण्याची उघड भाषा करत असेल तर त्याला सत्तेपासून दूर ठेवण्याला माझे मत!!

इग्नोर केले म्हणजे काय? ट्रम्पने काय वेगळे केले असते?

ट्रम्प फॉरेन पॉलिसी बाबत ठोस फार क्वचित बोलतो. इजराईल बाबत उघडपणे तो म्हणतो की बीबीला पूर्ण खुली छुट देईन काहीही करायला, पण इतर बाबत नुसतंच "मी असतो तर हा प्रॉब्लेमच आला नसता" असं मोघम मोघम म्हणतो.

एक तर ट्रंप ला कसलीच काही इन्टेग्रिटी नावाची चीज आहे यावर माझा विश्वास नाही.
अगदी ! मिशिगन सारख्या स्विंग स्टेट मध्ये पाकिस्तानी अमेरिकन्स जास्त झाले तर रातोरात बदलेल तो.

तरी आपण डेमोक्रॅटसनाच मते देणार. Happy करेक्ट? >> सामो तुला त्याने फ्लिप फ्लॉप केल्याची किती उदाहरणे दिली म्हणजे तुला "हा मनुष्य त्याला त्या क्षणी जे सुचेल ते बरळतो " (ह्या पेक्षा योग्य शब्द नाही) त्यामागे कसलीही ठाम वैचारिक भूमिका नसते हे पटू शकेल असे वाटते ?

त्याचे चाहते अ‍ॅबॉर्शन ला दुय्यम ईश्यू मानतात. एक स्त्री म्हणून तुला ह्या ह्या विचारसरणीबद्दल काय वाटते ?

Pages