Submitted by उपाशी बोका on 28 June, 2024 - 09:42
२०२४ च्या निवडणुकीसाठी धागा काढत आहे.
कालची चर्चा (debate) बघितली का? डेमोक्रॅटिक पक्षाचे खंदे समर्थक पण हादरलेले दिसत आहेत.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
On Tuesday, a jury determined
On Tuesday, a jury determined that Carroll did not prove her allegation of rape but agreed Trump is liable for sexual abuse and defamation. They awarded her $5 million in damages.
>>>> हो, त्यानंतर पुढचे सुद्धा सांगा ना. रेप हया कायदेशीर व्याख्येत ती क्रिया येत नाही. पण सेक्श्युअल अब्युस तर सिद्ध झाला. पुढे ट्रम्प ने त्या बाईंवर डिफेमेशन सुट टाकला त्यात निर्णय आला की जनरल भाषेत ट्रम्पने जे केले त्याला रेपच म्हणतात.
बाकी सगळे निरर्थक आहे. ओबामा साठी काम करत असेल म्हणजे आरोप बाय डिफौल्ट खोटे होतं नाहीत. वेळ साधली असणे शक्य आहे. तरीही ज्यूरी समोर केस मांडली गेली आणि गुन्हा सिद्ध झाला.
आणि ज्यूरी सिस्टीम मधल्या त्रुटी काय फक्त ट्रम्पला लागु आहेत का? मग ट्रम्प साठीच ज्यूरी सिस्टीमच्या त्रुटी आणण्याचा काय संबंध????
'ट्रंप काहीही चूक करू शकत
'ट्रंप काहीही चूक करू शकत नाही' असे मानणरे ट्रंप कल्ट सदस्य आणी इतके सव्यापसव्य करून का होईना, ट्रंप ला adjudicated rapist, convicted felon वगैरे विषेषणे लावायची संधी मिळाली म्हणून आनंदीत होणारे ट्रम्प विरोधक यांच्यात फरक नाही असे खेदाने नमूद करावेसे वाटते.
पण या सर्व खटल्यांतून जाणारा संदेश लोकशाहीला मारक आहे. तुम्ही रिपब्लिकन राजकारण कराल तर तुम्ही दहा वर्षापूर्वी घेतलेल्या व फेडलेल्या कर्जाची फाईल पुन्हा उघडण्यात येइल व तुम्हाला जबर दंड करण्यात येइल, मग ज्या बँकेने हे कर्ज दिले होते तिने आमचे काहीच नुकसान झाले नाहे असे कोर्टात सांगितले तरीही. शिवाय एखादी महिला 'याने मला ३५ वर्षापूर्वी सेक्सुअली अबुयूज केले होते ' असा टाहो फोडेल व आम्ही लगबगीने तुम्हाला रेपिस्ट घोषीत करू.
>> संदेश लोकशाहीला मारक आहे.
>> संदेश लोकशाहीला मारक आहे. >> पीसफुल पॉवर ऑफ ट्रान्सफर होवू नये यास्तव ६ जानेवारीचा तमाशा, मिशीगन मधले आणि इतर ठिकाणचे खोटे इलेक्टर्स वगैरे बद्दल काय मत आहे?
बँकेने नुकसान झाले नाही म्हणणे आणि खोटी कागदपत्रे करुन व्यवसायाला, स्वतःला लाभ होईल असा गैरफायदा घेणे या दोन वेगळ्या गोष्टी. खटला बँकेच्या नुकसानीचा नव्हताच. तो वाईट बिझनेस प्रॅक्टिसचा होता.
सेक्शुअल अॅब्यूझ, हॅरॅसमेंट आणि रेप या वेगळ्या गोष्टी. कुणीही रेपिस्ट म्हणून घोषीत केले नाहीये, बाकी अमुक इतक्या वर्षांनी का असा प्रश्न असेल तर बिल कॉझ्बी पासून अॅथलेटिक कोच, कॅथलिक प्रिस्ट पर्यंत अनेक लोकांवर अनेक वर्षांनी आरोप आणि चौकश्या, खटले वगैरे झाले आहे.
सेक्श्युअल अब्युजर असे घोषित
सेक्श्युअल अब्युजर असे घोषित कोर्टाने केले आहे. कोर्टाबाहेर कोर्टाचे निर्णय लिटिगेट करायचे असतील आणि ह्यासाठी फक्त प्रो ट्रम्प प्रोपोगंडा आणि मेगन केलीचे व्हिडीओ पुरेसे वाटत असतील तर बोलणे खुंटले.
"बँकेला नुकसान झाले नाही"
"बँकेला नुकसान झाले नाही"
"अजून तरी हाऊसिंग बॉण्डच्या किमती चांगल्या वर आहेत. जर बॉण्ड खरेदी करणाऱ्यांना नुकसान झालेच नाही तर मग उगाच रेटिंग एजन्सीला दंड कशाला?"
मनासारखा निकाल लागला नाही की
मनासारखा निकाल लागला नाही की इलेक्शन प्रोसेसवर शंका उपस्थित करायची, अडचणीत आणणारा खटला दाखल झाला की न्यायव्यवस्थेवर अविश्वास दाखवायचा, व्हिक्टिम ब्लेमिंग करायचं, आता म्हणे प्रेसिडेन्ट झाला तर कॅबिनेट मेम्बर्सचे बॅकग्राउंड चेक्स एफबीआयला गुंडाळून प्रायव्हेट कंपन्यांकडून करून घेणार, कारण एफबीआयदेखील विश्वासपात्र नाही.
हा किती डेन्जरसली रिस्की खेळ आहे हे एका मूर्खाला कळत नसेल, पण त्याच्या गोतावळ्यातल्या कोणालाच कळत नाही का?
स्वाती, त्याचा जवळपास सगळा
स्वाती, त्याचा जवळपास सगळा गोतावळा रिप्लेस झालेला आहे. जे किमान बुद्धी असलेले होते ते सगळे जाहीर विरोध करतात त्याचा. आता उरले फक्त सिकोफंट्स.
जेव्हा एखादा राजकीय पदावर
जेव्हा एखादा राजकीय पदावर निवडून येताना नेता असे आश्वासन देतो की मी अमुक एका व्यक्तीला "आत घालणार" आणि त्यानुसार काम करत जातो तेव्हा गुन्हेगार आधीच ठरवला आहे आणि आता फक्त ओढून ताणून गुन्हा शोधून काढणे एवढेच उरले आहेत. त्याकरता संबंधित व्यक्तीचा तिरस्कार करणारा न्यायाधीश निवडणे. असे कोर्ट निवडणे जिथे ज्यूरर पक्षपाती असतील.
अमेरिकेची न्यायव्यवस्था खूप चोख, नि:पक्ष व्यक्तीनिरपेक्ष आणि न्यायी आहे असा संशय येऊ लागला की ओ जे सिम्पसन हे नाव आठवा!
तसे तर डेरेक शॉविन (महात्मा जॉर्ज फ्लॉईडची हत्या करणारा) त्याचेही प्रकरण पक्षपाती पद्धतीनेच हाताळले गेले.
डेमोक्रॅटिक पक्षाने न्यायव्यवस्था आपली बटिक असल्यासारखे तिला आपल्या विरोधकांना अडकवण्यासाठी वापरले गेले आहे. रीड हॉफमन सारख्या अब्जाधीशाने संबंधित फिर्यादी वगैरे मंडळींना भरपूर पैसा पुरवून हवा तो निर्णय मिळवायला मदतच केली आहे.
कधीतरी त्याना ह्या दुष्कृत्याची शिक्षा मिळेल अशी आशा.
कोलोरॅडो च्या सरकारने आणि
कोलोरॅडो च्या सरकारने आणि कोर्टाने ट्रंपचे नाव अध्यक्षीय उमेदवार म्हणून घालताच येणार नाही असली भयंकर चाल खेळली होती. किती रडीचा डाव खेळला जाऊ शकतो ह्याचे हे उत्तम उदाहरण. वरच्या कोर्टात हा निर्णय रद्द केला गेला.
सध्या जिथे जिथे ट्रंप दोषी ठरला आहे त्या सगळ्या प्रकरणात वरच्या कोर्टात दाद मागायचा पर्याय बाकी आहे. आणि आमच्या सारखे समर्थक त्या वरच्या कोर्टात तो निर्दोष ठरेल अशी अपेक्षा बाळगून आहेत.
ट्रम्प विरुद्ध न्यू यॉर्क
ट्रम्प विरुद्ध न्यू यॉर्क स्टेट मध्ये घातलेले खटले चुकीचे आहेत असे मी म्हणतो याचा अर्थ ट्रम्प ला मते द्या असे आवाहन करतो असा का लावला जात आहे ? त्याचे उरलेले ९७ दुर्गुण खरेच आहेत.
जेव्हा एखादा राजकीय पदावर
जेव्हा एखादा राजकीय पदावर निवडून येताना नेता असे आश्वासन देतो की मी अमुक एका व्यक्तीला "आत घालणार" आणि त्यानुसार काम करत जातो तेव्हा गुन्हेगार आधीच ठरवला आहे आणि आता फक्त ओढून ताणून गुन्हा शोधून काढणे एवढेच उरले आहेत. >>>
आधी मला वाटले की ट्रम्प बद्दलच बोलताय आणि ८ वर्षांनंतर का होईना पण त्यावर टीका करताय. लॉक हर अप वगैरे .
अमेरिकेची न्यायव्यवस्था खूप
अमेरिकेची न्यायव्यवस्था खूप चोख, नि:पक्ष व्यक्तीनिरपेक्ष आणि न्यायी आहे असा संशय येऊ लागला की ओ जे सिम्पसन हे नाव आठवा!
>>>
हे एक नंबर काम. जेव्हा कंव्हीनियंट तेव्हा गप बसायचे, निर्णय आवडला नाही की जोरात ओरडायचे ओजे!
पण ओजेच्या केसचा पूर्ण चुथडा पाडला आहे वेगवेगळ्या डॉक्युमेण्ट्रिज, पुस्तकांमधून. कोर्टातली एकन एक लाईन, प्रत्येक पुरावे तपासले गेले आहेत. हे काहीही न करता फ्लिप्पन्टली ट्रम्पला गोवले गेले आहे असे म्हणणार असाल तर अवघड आहे.
दॅट सेड, ट्रंपच्या अ
दॅट सेड, ट्रंपच्या अॅडल्टरीचं समर्थन नाहि, बट अॅज अमेरिकन्स डिड इन द पास्ट, यु नीड टु लर्न टु इग्नोर इट फॉर द ग्रेटर गुड... >> पहिले वाक्य लिहिल्यानंतर पुढचे वाक्य लिहिण्याचे धारिष्ट कुठून येते माणसांमधे !
पीसफुल पॉवर ऑफ ट्रान्सफर होवू नये यास्तव ६ जानेवारीचा तमाशा, मिशीगन मधले आणि इतर ठिकाणचे खोटे इलेक्टर्स वगैरे बद्दल काय मत आहे? >> लर्न टु इग्नोर इट फॉर द ग्रेटर गुड. वगैरे वगैरे वगैरे !
आधी मला वाटले की ट्रम्प बद्दलच बोलताय आणि ८ वर्षांनंतर का होईना पण त्यावर टीका करताय. लॉक हर अप वगैरे . >> विकु काय म्हणतात ह्याच्यावर हे वाचायला आवडेल
कॉमी, खरं आहे.
कॉमी, खरं आहे.
फा, मलाही तसंच वाटलं आधी!
हे खालचे टीएलडीआर असेल तर
हे खालचे टीएलडीआर असेल तर इतकेच - हैतीचे स्प्रिंगफील्डमधले लोक इल्लिगल्स नाहीत. इतरांना बाजूला सारून कमलाने किंवा बायडेनने त्यांना ग्रीन कार्ड्स दिलेली नाहीत.
--------
ह्याविषयी व्हान्स अजून काही बोलू इच्छित होता पण डेमोक्रॅटिक बाजूची तळी उचलणार्या डिबेट संचालकांनी त्याचा माईकच बंद करून टाकला. किती लोकशाही प्रेम! किती अभिव्यक्ती स्वातंत्र्य!
https://www.youtube.com/watch?v=jEphfGpJjc8
२७:५० मिनिटापासून पहा.
>>. हे टोटल बकवास आहे. मी तो भाग लाइव्हसुद्धा पाहिला होता. व्हान्सला दिलेल्या वेळेत त्याचे बोलून झाले होते. नंतर वॉल्झची कॉमेण्ट झाली. त्यानंतर डिबेट चालवणार्यांचा खुलासा झाला. त्यावरही व्हान्स व वॉल्झ दोघे कॉमेण्ट करू लागले तेव्हा दोघांचाही माइक बंद झाला. इतके सगळे सविस्तर लिहा की. व्हान्सचे ऑलरेडी बोलून झाले होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे मी एकटाच बोलेन असे नसते. आणि हे "त्या चॅनेल्सचा लायसन्स काढून घेतला पाहिजे" म्हणणार्याच्या फॅन्सनी लिहावे हे आणखी भारी.
अर्थात मुळात व्हान्स जे बोलला ते इररिलेव्हंट होते हे वेगळे सांगायला नकोच. हैतीचे लोक कसे व का आले आहेत ते मागच्या पानावर ऑलरेडी लिहीले आहे. व्हान्स जे बोलत होता ते "सीबीपी-१" अॅप बद्दल. त्याचा हैतीच्या इमिग्रंट लोकांशी काहीही संबंध नाही. ते अॅप लोक बॉर्डरवर न येता त्यांनी असायलम क्लेम्स हे ते अॅप वापरून करावे याकरता ते होते. त्याचा उद्देश बॉर्डरवरचा ताण कमी करणे हाच होता. उलट त्यावर दुसर्या बाजूने जास्त टीका झाली होती - अशिक्षित इमिग्रंट्सना ते अॅप वापरता येत नाही ई.
हैतीचे लोक तेथे येण्यात कमलाचा काहीही संबंध नाही. तरीही व्हान्स तेच रेटून बोलत होता. टेम्पररी प्रोटेक्शन हे मोठया ग्रूपला एकत्रित मिळते. प्रत्येकाला स्वतंत्र असायलम सारखे दिले जात नाही. हे नियम वर्षानुवर्षे आहेत.
आणि हो. ती ग्रीनकार्डची ही बकवास आहे. टोटल लाय. असले काहीही झालेले नाही. आता भारतीय लोकांना ताटकळत ठेवून इतर लायक लोकांना का आधी देतात म्हणत असाल, तर ते कोटा, प्रायोरिटी प्रकार कमलाने केलेले नाही. बायडेननेही नाही.
आता हे यावरून आणखी काहीतरी फेकतील. त्यांना फेकायला पुरावा लागत नाही. आणि ते फुसके निघाले की तिसरेच काही फेकायला सुरूवात करतात. जरा इमिग्रेशनवाल्या साइट्स बघा. तेथे कोणता कायदा कधी लागू झाला ते बघा. त्यावेळेस कोण अध्यक्ष होता हे आठवा. नुसते फॉक्स, व्हान्स व न्यूजमॅक्स वर जाऊ नका. व्हान्स प्रचंड इंटेलिजंट आहे. त्याला हे सत्य नक्की माहीत असणार. पण तो असे आर्ग्युमेण्टस वापरून आभास निर्माण करण्याइतका चतुरही आहे.
तुम्हाला कमलवर बिल फाडायचे तर बॉर्डरवर जे चालले होते त्याबद्दल फाडा. आम्हीही फाडतोय. पण हैतीचे लोक पाळीव प्राणी खात आहेत हे एकदा बोलून बसले. मग एकदा बोललेले कधीही मागे घ्यायचे नाही या प्लेबुक प्रमाणे डबल डाउन करत राहिले. अजूनही काही सापडलेले नाही. त्यामुळे गोल पोस्ट फिरवत बसलेत.
सापडले की!
सापडले की!
कुठल्यातरी साउथ अमेरिकन देशांत प्राणी खाण्यावर बंदी घालायचा कायदा केला. हा धडधडीत पुरावा म्हणून दिलेला की त्यांनी.
माझ्या मते हे डेमोक्रॅट्स
माझ्या मते हे डेमोक्रॅट्स गलथान आहेत.
२०२० मधे म्हणते होते, की त्रम्प्याची प्रेसिडेन्सी संपली की दुसर्या दिवशी त्याला तुरुंगात टाकू. मग का नाही तशी तयारी केली? आणि भरला तर कॅरॉल बाईचा खटला. त्यात काही दम नव्हता. त्याने तो तुरुंगात जाणार नाही. इतर अनेक गुन्हे शोधून काढता आले असते, नि नक्की तुरुंगात पाठवू शकले असते, पण नाही.
आता माझ्या मते त्रंप्याच निवडून येईल आणि ती डेमोक्रॅट्सचीच चूक असेल.
कसा बसा एक काळा प्रेसिडेंट केला - तो निदान खूप हुषार तरी होता. ही आहे बाई, त्यातून गोरी नाही. कठिण आहे तिचे.
अमेरिकन लोक किती हुषार आहेत, ते कसे पॉलिसी बघून मत देतात, असे तुम्हाला अजूनहि वाटते? गेल्या आठ वर्षात काहीच कळले नाही?
> आणि भरला तर कॅरॉल बाईचा
> आणि भरला तर कॅरॉल बाईचा खटला. त्यात काही दम नव्हता. त्याने तो तुरुंगात जाणार नाही
म्हणजे केरोल बाईंचा खटला डेमोक्रेट्स नी भरला आहे तर !
एखाद्या हलकट माणसाचा due process च हक्क मान्य करणे आणी त्याने केलेल्या गुन्ह्यांचे समर्थन करणे यात गल्लत का करताय ?
> तो वाईट बिझनेस प्रॅक्टिसचा होता.
तो सध्या अपील मध्ये आहे आणी अपील च्या जजेस नी उपस्थित केलेले प्रश्न इंटरेस्टिंग आहेत. दोन सोफिस्टिकिटेड पार्टीज मध्ये झालेला प्रायव्हेट करार ई ई.
विकू,
विकू,
ज्याने आपले सगळे साम्राज्यच श्रीमंती बढाचढाके दाखवून उभे केले त्याबद्दल काय बोलावे? दोन प्रायवेट पार्टीज मधील करार म्हटले तरी त्यावेळी दाखल केलेले पेपर खोटी माहिती देणारे आहेत हे तर मान्य आहे ना? त्या खोट्या माहितीच्या जोरावर तर फायदेशीर अशा टर्म्स मिळाल्या. एवढे सोफिस्टिकेटेड आहात तर द्यायची होती ना खरी माहिती की माझी पत इतकीच आहे म्हणून, नसलेली पत फुगवून कशाला सांगायची?
<<म्हणजे केरोल बाईंचा खटला
<<म्हणजे केरोल बाईंचा खटला डेमोक्रेट्स नी भरला आहे तर !>>
असे माझे रिपब्लिकन मित्र म्हणतात. ते रिपब्लिकन असले तरी विकु किंवा शेंडेनक्षत्र यांच्याइतके त्रंपिस्ट नाहीत. नुख्य म्हणजे अनेक वर्षे न्यू यॉर्क मधे राहिल्यामुळे ते त्रंप्याला गेली अनेक वर्षे ओळखतात. त्रंप्या जेलमधे जायच्याच लायकीचा आहे असे ते म्हणतात.
पण दक्षिणेकडील राज्यातील व मधल्या राज्यांतील अनेक गोरे त्रंप्याचे सगळे खरे मानतात. म्हणून शेंडेनक्षत्र नि विकु सारखे लोकहि.
मला अजून कुणि सांगत नाहीत की श्रीमंतांचा टॅक्स कमी करून किंवा टॅरिफ लावून काय होणार? नि बेकायदेशीर घुसखोरांना कसे पकडणार? नि त्यांना नोकर्या देणार्यांना जबरदस्त शिक्षा कशी देणार? का आधी लॅटिनो, नंतर मुस्लिम, नंतर हिंदू या सर्वांना हाकलणार?
पण डेमोक्रॅट्स हरले तर मला आश्चर्य वाटणार नाही.
विकु ते वरच्या "लॉक हर अप
विकु ते वरच्या "लॉक हर अप वगैरे" पोस्ट बद्दल बोलता का ?
स्वातीजी,
स्वातीजी,
मी नुकतीच माझी जुनी कोरोला कार ३००० डॉ ला एका परिचिताला विकली. आम्ही दोघानीही आपापला रिसर्च करून किंमत ठरवली, थोडीशी घासाघीस करून फायनल केली. दहा वर्षांनी जर सरकार ने ठरवले की माझ्या कार ची योग्य किंमत फक्त २५०० डॉ. होती व मी त्याला फसवले, तर ? त्यातून त्या मित्राने जर सांगितले की माझी फसवणूक झालेली नाही, तरीही माझ्यावर खटला केला तर ? ही सिव्हिल केस इतकी हास्यास्पद व गंभीर आहे की अपील जज ने विचारले की न्यू यॉर्क ने अशा प्रकारची केस या आधी आणली होती का? गव्हर्नर नी ही इतर व्यवसायिकांना आम्ही असली केस आणणार नाही असे आश्वासन दिले.
'लॉक हर अप' वगैरे इथे गैरलागू आहे. मी इन जनरल ट्रम्प चे समर्थन करत नाहिये त्यामुळे 'ट्रम्प ने असे केले, त्याचे काय ?' वगैरे प्रश्न कशाला?
I am just calling ball and strike.
I am just calling ball and
I am just calling ball and strike. >> हाच मुद्दा तुमच्या आर्गुमेंट्ला लागू होतो विकु
विकु, स्वातीजी वगैरे नको.
विकु, स्वातीजी वगैरे नको.
तुम्ही आणि समोरच्या पार्टीने ३००० किंमत ठरवून कॅम्री विकली ठीक, ५०० डॉलर इकडे तिकडे पण हे तसे नाहीये हे तुम्हालाही माहित आहे. https://www.pbs.org/newshour/politics/judge-imposes-364-million-penalty-...
मी एक खेड्यात रहाणारी साधी गृहिणी आहे, सोफिस्टिकेटेड वगैरे नाही. ही ठरवून केलेली बनवाबनवी नाही असे म्हणायचे का?
मीही म्युनिसिपालटी मधला साधा
मीही म्युनिसिपालटी मधला साधा प्लंबरच आहे.
ट्रंप एक लबाड, खोटारडा, व्हल्गर, grotesque माणूस आहे, प्रेसिडेंट पदाच्या लायकीचा नाही हे १००% मान्य आहे.
त्याची एक यशस्वी बिझिनेस्मॅन ही प्रतिमाही खोटीच आहे, रियॅलिटी शो मुळे झालेली. त्याच्या यशात बालपणीच मिळालेल्या फायनान्शियल व सोशल कॅपिटल चा मोठा भाग आहे. हे सर्व मान्य.
पण ट्रंप ला अडकवण्याचा नादात घातक कायदेशीर पायंडे पडू नयेत हेही वाटते. Two wrongs do not make it right.
एखादा व्यवसायीक जेव्हा बॅकेकडून कर्ज घेतो तेव्हा आपली मालमत्त थोडीशी वाढवूनच सांगतो, खातरजमा करून घेणे बँकेचे काम असते. इथे तर बँकेनेही आपले नुकसान झालेले नाही असे सांगितले आहे.
एखादा व्यवसायीक जेव्हा
एखादा व्यवसायीक जेव्हा बॅकेकडून कर्ज घेतो तेव्हा आपली मालमत्त थोडीशी वाढवूनच सांगतो >> काय सांगता विकु ? मॉर्ट्गेज साठी अप्लाय करताना पगार वाढवून सांगतो का आपण ?
व्यवसायिक
व्यवसायिक !
भारतात असताना अनेक लहान व्यवसायिकांना कर्जासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट लिहायला मदत केली होती. आपल्या नव्या व्यवसायासाठी कर्ज मागताना रेव्हेन्यू अंदाज थोडेसे ऑप्टिमिस्टिक दाखवणे, खर्च थोडे कमी करून सांगणे हे होतेच. बँक ही लगेच कर्ज मंजूर करत नाही. त्यांचीही प्रोसेस असतेच.
मुद्दा हा अहे की एखाद्याने कर्ज मागितले, बँकेने ते दिले, मग त्याने कर्जाची परतफेड केली, आणी त्यानंतर काही वर्षांनी सरकार ने ती फाईल उघडली व बँकेची तक्रार नसतानाही फ्रॉड केस दाखल केली हे योग्य आहे का ? सुदैवाने अपील कोर्टातले न्यायाधीश तारतम्य असणारे आहेत व ट्रंप द्वेषाने आंधळे झालेले नाहीत. खालील व्हिडिओत त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न पहा.
https://x.com/thesnawn/status/1848604294561611998
आपला निर्णय अपील कोर्टात टिकणार नाही हे लेटिशिय जेम्स व एन्गॉरॉन यांना माहित आहेच, त्यामुळेच त्यांनी दंडाची लवकरात लवकर वसूली करायचा प्रयत्न केला.
मुद्दा हा अहे की एखाद्याने
मुद्दा हा अहे की एखाद्याने कर्ज मागितले, बँकेने ते दिले, मग त्याने कर्जाची परतफेड केली, आणी त्यानंतर काही वर्षांनी सरकार ने ती फाईल उघडली व बँकेची तक्रार नसतानाही फ्रॉड केस दाखल केली हे योग्य आहे का ? >> एक मिनिट असे करणे का योग्य नाही नक्की ? तुम्ही स्वतः तात्याने खोटे आकडे दिले हे मान्य करत आहात नि मग त्याचे समर्थन करत आहात ? समजा बँक अशा प्रकाराने दिवाळ्यात गेली असती तर त्याचा भुर्दंड सरकारवर पडला असता ना ? मर्डॉफ नंतर अशा किती बँकांना तारणहार बनावे लागले आहे ? बरः हा " अंदाज थोडेसे ऑप्टिमिस्टिक" असा प्रकार नव्हता माझ्या आठवणीप्रमाणॅ - मूळ जागा तीन चार पट अधिक स्केवर फूटेजची आहे असे नमूद केले होते. कुठली तरी प्रॉपर्टी रेसीडेंशियल युज साठी असताना कमर्शियल आहे (किंवा उलट) असे दाखवून त्याची किम्मत फुगवली होती. बँकेची प्रोसेस असो नसो, हा शुद्ध फ्रॉड आहे.
विकुनचे आर्ग्युमेंट 'मस्क कसा
विकुनचे आर्ग्युमेंट 'मस्क कसा लीगल आहे ' हे पटवायची रंगीत तालीम दिसते आहे.
किंवा त्यांच्याच भाषेत अनालॉजी द्यायची म्हणजे नथुराम ने गांधीना गोळी मारली, त्यात गांधी वाचले. मग गांधी म्हणाले मला त्याच्यावर केस करायची नाही. म्हणून त्याला मोकळा सोडून दिला.
( काही दिवसांनी त्याने परत गोळीबार केला त्यात गोळी गांधीना लागली.. हे वेसांनल)
काहीही पोस्ट आहे ती. अंधभक्तीत विकु इतके रंगतील कल्पना न्हवती.
फ्रॉड मध्ये कुणालातरी नुकसान
फ्रॉड मध्ये कुणालातरी नुकसान व्हावे लागत नाही. पब्लिक ट्रस्ट साठी फ्रॉड शिक्षापात्र असावेच लागते. (अशी माझी तरी समजूत आहे.)
Pages