२०२४ अमेरिकेतील निवडणूक

Submitted by उपाशी बोका on 28 June, 2024 - 09:42

२०२४ च्या निवडणुकीसाठी धागा काढत आहे.

कालची चर्चा (debate) बघितली का? डेमोक्रॅटिक पक्षाचे खंदे समर्थक पण हादरलेले दिसत आहेत.

IMG_3696.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

तात्या नि वान्स ला अभिप्रेत नसलेले अर्थ काढून दाखवतात >>> त्यांनाच काय, लिबर्टीच्या पुतळ्यावर १००+ वर्षांपूर्वी सुद्धा जे लिहीले आहे ते कसे चुकीचे आहे ते सुपर कॉन्फिडंटली सांगतात.

दुसर्‍याला शिव्या घालताना आधी मुद्दा समजावून घ्या. >> हे किती निर्विकारपणे लिहिले आहे हे पाहिले आहे का ? बहुधा हाच तो विनोद इत्यादि असावा >>> Happy हो सेल्फ डेप्रकेटिंग आहे. अनइंटेन्शनली Wink

"आँ?! मग हा धागा आहे तरी कशासाठी म्हणते मी?" - Lol सॉरी शक्तीमान!

" बहुधा हाच तो विनोद इत्यादि असावा " - Lol

चालायचच रे फा. तात्याने वीकेंड्ला फॉक्स वर मुलाखत दिली त्यात त्याला कुत्रा-मांजरांबद्दल परत विचारले तेंव्हाही त्याने ठासून तेच सांगितले. हॉवर्ड ने तुला ह्यातून काही सुचवायचे होते असा फुल्टॉस दिला पण तात्याने पॅडमधे घालून "कोणीतरी म्हणाले ते मी म्हणालो" असे परत परत सांगीतले. इमिग्रेशन नाही नि काहीही नाही . हा एकतर विनोद असावा किंवा ह्यातून वेदांचे सार सांगितले असावे (परत शेंडे ला विचारावे लागेल) असा पुसटसा विचार मनाला चाटून गेला.

या बाबतीत तात्या म्हनजे फेबू अंकल आहे. व्हॅअ‍ॅ वर आलेला कचरा पुढे पाठवायची जाम घाई ! बरं नंतर तरी खुलासा करेल ? 'forwarded as received'

<<कमलाबाईने एक लोणकढी थाप मारली की मी लहानपणी मॅकमधे नोकरी केली आहे >>
हे शेंडे म्हणजे एक कवि आहेत, जे न देखे रवि ते देखे कवि.
इथल्या कुणालाहि १०० टक्के माहित नसेल की कमलाने खरेच ंMcdonald मधे नोकरी केली होती की नव्हती.पण शेंडेनक्षत्र खात्रीपूर्वक लिहितात की कमलाबाईने एक लोणकढी थाप मारली.
शेंडे इथे नेहेमी लिहीत जा. विनोदी असतात तुमचे लेख. तुम्ही लिहीले की आम्हाला फॉक्स बघायला नको.
इतरांना शिव्या देणे यालाच विनोद म्हणायचे असेल तर त्रंप्या नि शेंडेनक्षत्र फारच विनोदी!
पूर्वी एक डॉन रिकल्स होता, त्याची कॉमेडी म्हणजे सगळ्यांचा अपमान करायचा. त्रंप्या त्याच्यासारखा आहे. फरक एव्हढाच की त्रंप्या मूर्खासारखा बरळतो नि शेंडेनक्षत्र सारखे लोक सांगतात की तो विनोद होता.

<<<काल परवा एका न्हाव्याच्या सलूनमधे जाऊन तिथल्या गिर्‍हाईकांशी, मालकाशी गप्पा मारल्या. >>>
नशीब नुसत्या गप्पाच मारल्या, केस कापतो म्हणाला असता तर???

खरे तर त्रंप्याने असलीच कामे करावीत, कुठे उगीच प्रेसिडेंट वगैरे होतो.

<<ट्रंप हा लोकांत रमणारा माणूस आहे. >>
अर्थातच तिथे आलेली गिर्हाइके त्रंप्याला मत देणारीच होती. ते योग्यच आहे. त्रंप्यावर एकदा गोळी मारली नि एकदा बंडूक घेऊन त्याच्या घराजवळ एक जण लपून बसला होता. उगाच वाट्टेल ते लोक आणले नि त्यांच्यापैकी कुणि पुनः आपला सेकंड अमेंडमेंटचा हक्क बजावला तर?

तो लोकात इतका रमला की त्याने तिथे काम करणार्‍यांची विचारपूस, त्यांना पगार पुरेसा मिळतो का? किती तास काम करावे लागते वगैरे जाणून घेतल्याचे प्रसिद्ध झाले नाही. बाकी त्याला वाटले असेल मॅकडोनाल्ड मधे काम म्हणजे दोन तास फ्राइज करायचे नि मग उरलेला दिवस गोल्फ खेळायचे. म्हणूनच तो म्हणाला मला आवडला हा जॉब!!

<<ट्रंप हा लोकांत रमणारा माणूस आहे. >>
अर्थातच तिथे आलेली गिर्हाइके त्रंप्याला मत देणारीच होती. ते योग्यच आहे. त्रंप्यावर एकदा गोळी मारली नि एकदा बंडूक घेऊन त्याच्या घराजवळ एक जण लपून बसला होता. उगाच वाट्टेल ते लोक आणले नि त्यांच्यापैकी कुणि पुनः आपला सेकंड अमेंडमेंटचा हक्क बजावला तर?

तो लोकात इतका रमला की त्याने तिथे काम करणार्‍यांची विचारपूस, त्यांना पगार पुरेसा मिळतो का? किती तास काम करावे लागते वगैरे जाणून घेतल्याचे प्रसिद्ध झाले नाही. बाकी त्याला वाटले असेल मॅकडोनाल्ड मधे काम म्हणजे दोन तास फ्राइज करायचे नि मग उरलेला दिवस गोल्फ खेळायचे. म्हणूनच तो म्हणाला मला आवडला हा जॉब!!

<< आर्थिक, सामाजिक, तंत्रज्ञान ह्याची परिस्थिती पाहून आपले इमिग्रेशन नियंत्रणात ठेवायचे की निव्वळ त्या निर्जीव पुतळ्यावरील वाक्ये जणू कुठल्या प्रेषिताने सांगितली आहेत असे डोळे मिटून मानून बेकायदा घुसखोरांचे आणि कायदेशीर घुसखोरांचे लोंढे चालू ठेवायचे? >>

----- या लाखो गरजू लोकांच्या लोंढ्यातूच उद्याचे भावी शेंडे नक्षत्र तयार होतील या होणार्‍या फायद्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. Happy investment आहे आणि अमेरिकेला याचा नक्की फायदा होणार आहे.

<< वेगवेगळ्या आकाराचे कमर्शियल ट्रक्स स्वयंचलित होण्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर आणि रेग्युलेटरी स्ट्रक्चर संपूर्ण देशात तयार होणं, ती टेक्नॉलॉजी संपूर्ण डेव्हलप होणं ह्या ‘काही’ वर्षात होणार्या गोष्टी नाहीत इतकच. >>

------ सहमत.

कुठलेही काम , मग ते ट्रक चालविणे असेल किंवा व्हाईट हाऊस चालविणे, कमी महत्वाचे आहे असे मी मानत नाही. प्रत्येक जॉबसाठी लागणारी कौशल्ये वेगवेगळी आहेत. नवे तंत्रज्ञान आल्याने आधीच्या तंत्रज्ञानाशी संबंधीत लोकांचे जॉब जातील. पण नवे काही निर्माण होतीलच. नव्या तंत्रज्ञानाने निर्माण होणारे जॉब कोण करेल ? जगभरांतला जन्मदर घटत आहे तसाच तो अमेरिकेतही झपाट्याने घटत आहे. बातमी FBI ची नाही आहे. Happy म्हणून अमेरिकेला बाहेरुन लोक आयात करावीच लागतील, immigration ला पर्याय नाही.

त्रंप्याचे विनोद एकट्या शें डेनक्षत्रालाच नाही तर कमलाबाईला पण कळतात. म्हणूनच त्रंप्या बोलतो नि कमला हसते!

बाकी जसे कमलावाले लोक त्रंप्या बद्दल लिहितात तसेच शेंडेनक्षत्र त्रंप्याच्या बाजूने लिहितात.
नाहीतर इथे कुणाला काय देणे घेणे आहे नि काय फरक पडतो.
पण शेंडेनक्षत्र इथे लिहितात म्हणून जरा तरी समतोलपणा आला आहे. नुसतीच एकतर्फी बाजू बघून मत ठरवणे योग्य नाही. निवडणूक ही कमी वाईट माण्साची किंवा बाईची करायची असते. दोन्ही राजकीय पक्ष सारखेच बदमाश.
एक महाराष्ट्रीय गृहस्थ एका पक्षाकडून उभे राहून एका गावाचे मेयर म्हणून निवडून आले होते. त्यांनी तसे सांगितले म्हणून मी म्हणतो.
नाहीतर मला त्याबद्दल काय माहित?

>>आणि अमेरिकेला याचा नक्की फायदा होणार आहे.<<
इल्लीगल इमिग्रंट्स पासुन अमेरिकेला फायदा होइस्तोवर अमेरिका ग्रीस, वेन्झुएलाच्या वाटेवर गेलेली असेल. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात लिहिलेली एक कविक्ल्पना फेसवॅल्युवर घेतलेली बघुन हसावं कि रडावं या विचारात आहे. या न्यायाने भारतात "जहां डाल डाल पर सोने कि चिडिया.." चिवचिवत असेल.. हो ना... Lol

मी कोठे म्हणतोय इल्लिग्लसही घ्या म्हणून. मी फक्त त्रास देऊ नका म्हणतोय तर हे कोठल्या कोठे पोहोचून स्वतः स्ट्रॉमॅन उभा करत सुटले Happy

नुकताच CNN वर एक लेख बघितला. बेकायदेशीररित्या प्रवेश करणार्‍यांच्या संख्येत मेक्सिको, व्हेनेझुएला, एल साल्वाडोर सोबत भारत पण आघाडीवर आहे. CNN च्या बातमीत तिसरा क्रमांक म्हटला आहे. घुसखोरांच्या सांख्येत ८,००० ( २०१८-१९) वरुन ९६,००० ( २०२२ -२३) अशी लक्षणीय वाढ झालेली आहे. $ ५०,००० असा दर मोजतात. सर्वांनाच यश मिळते असे नाही.

https://www.cnn.com/2024/10/22/india/young-indians-chase-american-dream-...

<< मी कोठे म्हणतोय इल्लिग्लसही घ्या म्हणून. >>
----- फारएण्ड - ते माझ्यासाठी असावे Happy

येणारा प्रत्येक स्थलांतरित हा गंभिर गुन्हेगार ( खुन, बलात्कार) नसतो. बहुतेकांचे गुन्हे बेकायदेशीर सिमा प्रवेश, ड्रंक ड्रायव्हिंग (driving under influence) अशा सौम्य प्रकारांतले आहेत. काही बलात्कार/ खुन करणारे गुन्हेगार पण आहेत पण ते एकंदर येणार्‍या संख्येच्या नगण्य ( < १ % ) असतील यापेक्षा जास्त गुन्हेगारांची टक्केवारी अमेरिकेत आज आहे.
https://www.cbp.gov/newsroom/stats/cbp-enforcement-statistics/criminal-n...

जन्मदर घटण्याने निर्माण होणारी लोकसंख्येतली पोकळी कशी भरायची हा पुढच्या काही दशकातला सर्वच देशांसमोरचा यक्ष प्रश्न आहे. आज दारे घट्ट बंद करत आहात. पण उद्या हेच लोक अमेरिकेच्या भविष्याचा आशेचा किरण आहेत. Happy कुशल, अकुशल असे सर्वच काम करणारे हात हवे आहेत.

यावेळी तात्याच जिंकेल असे मला वाटते. इकॉनॉमी आणी मायग्रंट्स ही दोन कारणे.

मायग्रंट चा विषय बायडेन हॅरिस यांनी अगदी सिनिकली हाताळला.
बायडेन ने पहिल्याच दिवशी तात्याचे executive orders rescind करून बॉर्डर सताड उघडी केली.
मग आलेल्या मायग्रंट्स ना न्यूयॉर्क /शिकागो सारख्या शहरात अगदी महाग हॉटेल्स मध्ये मोफत राहू दिले.
हा भार इतका वाढला की न्यूयॉर्क चे मेयर एरिक अ‍ॅडॅम्स ( कृष्णवर्णीय व डेमोक्रॅट) यांनीही तक्रारीचा सूर लावला व न्यूयॉर्क च्या नागरी सुविधा कमी करण्याचे सूतोवाच केले. त्याचा बदला म्हणून मग एफ बी आय ने त्यांना अगदीच किरकोळ कारणाने अडकवले ( विमान तिकिट अपग्रेड म्हणे) मिडटाऊन न्यू यॉर्क मध्येही भुरट्या चोर्‍या होऊ लागल्या. शिकागो सारख्या शहरात कृष्णवर्णीयांसाठी असलेली कम्यूनिटी सेंटर्स मायग्रंट्स ना देण्यात आली. परिणामी कृष्णवर्णीय मोठ्या संख्येने ट्रंप कडे वळाले.

एकदरीतच मायग्रेशन हा अनेक देशात कळीचा मुद्दा बनला आहे. तिकडे केनडा मध्ये ट्रूडो वि. पोलिव्हिये , इंग्लंड मध्ये स्टार्मर वि. फाराज.

सगळे ट्रक हे अवाढव्य १८ चाकी धूडे नसतात. आजूबाजूला पहा. कितीतरी लहानमोठ्या आकाराचे ट्रक रस्त्यावर असतात. सर्व आकाराच्या ट्रकसाठी खास लायसेन्स, परीक्षा लागत नाहीत. असे अनेक ट्रक बेकायदा घुसखोर चालवतात. अनेक राज्ये बेकायदा घुसखोरांना लायसन देण्यात पुढाकार घेतात. अनेक वेळा बेकायदा घुसखोर नियम धुडकावून ट्रक चालवतात. ही बातमी पहा
https://www.newsweek.com/widow-hits-out-over-rogue-truckers-after-illega...

अशा प्रकारे बेकायदा घुसखोरांचे कोडकौतुक करण्याचे थेर इतके वाढले तर स्थानिक नागरिकांच्या पोटावर पाय येणारच आहे.

मोठ्या आकाराचे ट्रक, टँकर वगैरे चालवायला नक्कीच कौशल्य लागते. काटेकोर परीक्षा द्याव्या लागतात. तरी ते काम मशीन लर्निंग, डेटा सायन्टिस्ट, न्यूरो सर्जन, नॅनो टेक्नोलोजिस्ट आणि अन्य कामांसारखे समजले जात नाहीत. त्याकरता कॉलेज मधे जावे लागत नाही. ब्लू कॉलर गटात हे मोडते.
अनेक कंपन्या ट्रक स्वयंचलित करण्याच्या कामात आहेत. हे ही सत्य आहे.
ट्रक ड्रायवर ह्याविषयावर मी यापुढे काही बोलू इच्छित नाही. तो चर्चेचा मुख्य मुद्दा नाही.

कमलाबाई ने काही वर्षापूर्वी ट्रंपच्या सीमेवर भिंत बांधण्याच्या योजनेची प्रचंड हेटाळणी केली होती. एक मध्ययुगीन विचारांचा कार्यक्रम, ट्रंपच्या आत्मकेंद्रित विचारातून निघालेला कार्यक्रम, कोत्या मनाचा कार्यक्रम वगैरे वगैरे.
पण दोन चार दिवसांपूर्वी तिने अचानक कोलांटी उडी मारून ट्रंपने पुरेशी मोठी भिंत बांधलीच नाही म्हणून आगपाखड केली. म्हणजे हा मध्ययुगीन, स्वार्थी विचारांचा, कोत्या मनाचा कार्यक्रम पुरेशा प्रमाणात राबवला नाही म्हणून टीका.
ह्यातली खरी कमलाबाई कुठली? भिंतीचा तिरस्कार करणारी की भिंत पुरेशी मोठी नाही म्हणून आक्रंदन करणारी?
सत्तेवर आल्यावर ह्यातली कुठली कमलाबाई दिसेल?

>>
जन्मदर घटण्याने निर्माण होणारी लोकसंख्येतली पोकळी कशी भरायची हा पुढच्या काही दशकातला सर्वच देशांसमोरचा यक्ष प्रश्न आहे. आज दारे घट्ट बंद करत आहात. पण उद्या हेच लोक अमेरिकेच्या भविष्याचा आशेचा किरण आहेत. Happy कुशल, अकुशल असे सर्वच काम करणारे हात हवे आहेत.
<<
ह्याला वारेमाप, बेफाट परदेशी जनता आयात करणे हाच उपाय आहे का? देशात असलेल्या लोकांसाठी जास्त अपत्ये जन्माला घालावीत म्हणून काही आमिषे दाखवली तर? मोठ्या प्रमाणात कर सवलत दिली तर? परके, उपरे लोक आशेचा किरण तर मग स्थानिक नागरिक काय फक्त निराशेचा अंधःकार आहेत का?
स्थानिक बेकार, व्यसनी लोकांच्या पुनर्वसनाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवून नोकरीच्या जागा भरल्या जाऊ शकत नाहीत का?
स्थानिक गुन्हेगार भरपूर आहेत म्हणून आणखी परके गुन्हेगार आले तरी काही हरकत नाही हा एक विकृत विचार आहे.
अनेक राज्यात असा नियम आहे की पोलिस गुन्हेगाराला त्याच्या इमिग्रेशनविषयी काहीही विचारू शकत नाहीत. त्यामुळे बेकायदा घुसखोरांच्या गुन्हेगारीची आकडेवारी आजिबात भरवशाची नाही.
ज्या व्यक्तीने देशात घुसताना एक महत्त्वाचा कायदा मोडला आहे तो गुन्हेगार आहेच. आणखी पुढचे गुन्हे केले तरच त्याला गंभीरपणे घ्या हा उथळपणा आहे.
जर डेमोक्रॅट आणि त्याच्या समर्थकांना खात्री आहे की जगभरातील अब्जावधी बेकायदा घुसखोर अमेरिकेत येण्याने अमेरिकेत समृद्धीचा, सोन्याचा धूर निघणार आहे तर ते सरळ इमिग्रेशन कायदे रद्द का करत नाहीत? नुसते सीमेवरच नाही तर विमानतळ आणि अन्य प्रवेशद्वारांवर तरी इमिग्रेशन अधिकारी, त्यांचे काउंटर ह्याचा तरी खर्च वाचवा ना. उगीच कायदे अस्तित्त्वात असल्याचे नाटक करायचे आणि ते पाळायचे नाहीत ह्या दुटप्पीपणाला काय अर्थ आहे?

इथले बहुतेक अमेरिकास्थित सदस्य एच १बी, ग्रीनकार्ड, नागरिकत्व वगैरे चक्रातून गेले असतील ह्याची खात्री आहे.
जर उच्चशिक्षित लोक व्हिसा मिळवून, पैसे भरून अमेरिकेत येतात. पुढील इमिग्रेशन सोपस्कार करायला स्वतःचे किंवा कंपनीचे पैसे खर्च करतात. सहनशक्तीचा अंत होईल इतक्या हळूहळू विविध टप्पे ओलांडत असतात. लेबर, आय-१४०, व्हिसा संपला की स्टॅम्प मारायला एकदा देश सोडून पुन्हा सोपस्कार करणे वगैरे तर अर्धशिक्षित लोक कुठल्याशा सीमास्थित माफियाला पैसे देऊन अमेरिकेत घुसतात, आश्रय मागत असल्याचा दावा करतात आणि करदात्यांच्या पैशाने आलिशान पाहुणचार उपभोगतात हे कसे काय तर्कसंगत आहे?
सध्या ग्रीनकार्ड प्रक्रियेला एकाहून जास्त दशके लागू शकतात असे ऐकले आहे. पण आगंतुक घुसखोरांना मात्र तातडीने सामावून नागरिकत्व द्यावे असा धोशा लावला जातो. असे का? उच्चशिक्षित लोकांपेक्षा अशिक्षित आणि अर्धशिक्षित घुसखोर अमेरिकेकरता जास्त फायदेशीर आहेत का?

यावेळी तात्याच जिंकेल असे मला वाटते. इकॉनॉमी आणी मायग्रंट्स ही दोन कारणे. >>> जिंकेल का ते माहीत नाही. सध्या तरी स्विंग राज्यांत पुढे आहे पोल्स मधे. हे दोन्ही विषय डेम्स करता वीक आहेत. त्यांची धोरणेही बर्‍यापैकी भोंगळ आहेत - किमान इमिग्रेशनच्या बाबतीत. इव्हन इकॉनॉमीच्या बाबतीत ते बोलतात ते एकदम इन्फ्लेशन इन्डेक्स, ट्रेजरी नोट चा दहा वर्षांचा यील्ड वगैरे भाषेत. याउलट रिपब्लिकन्स बोलतात ते ग्रोसरी, गॅस च्या किमतींबद्दल. गरीब लोक हा प्रायमरी बेस असलेल्या डेम्सना त्यांची भाषा बोलता येत नाही. पण अ‍ॅबॉर्शन, प्रोजेक्ट २०२५ हे डेम्सकडे हुकमी एक्के आहेत. रिपब्लिकन्स कडे त्यावर लोकांचा विश्वास बसेल असे उत्तर नाही.

इमिग्रेशनच्या बाबतीत डेम्स भोंगळ आहेत म्हणजे रिपब्लिकन्स बरोब्बर आहेत असे नाही. यांना सगळे एकजात गरीब बिच्चारे वाटतात, तर त्यांना सगळे गुन्हेगार. वरकरणी कितीही म्हणत असले, तरी रिपब्लिकन्स हे लीगल व इल्लिगल मधे तितका फरक करत नाहीत. त्यांना न आवडणारे सगळेच अनवेलकम. पण प्रॅक्टिकली बघितले तर अमिरिकेची सिस्टीम आहे लोकांना कायदेशीर मार्गाने येउ देण्याची. ती तोडून सरळ घुसणार्‍यांना पाहिजे तसे येऊ देणे अमेरिकेला परवडणारे नाही. त्यात असंख्य लोक प्रचंड हाल सोसत बॉर्डरपर्यंत पोहोचलेले असतात. लहान मुले असतात. त्यांना तेथून परत पाठवणे हे इनह्यूमन वाटते हे खरे. पण हा बोजा अमर्याद असेल आणि अमेरिकाच काय कोणताही देश तो एका लिमिटपुढे घेऊ शकणार नाही. ज्या देशांतून हे लोक येतात त्यांच्यावरही ती जबाबदारी टाकायलाच पाहिजे.

ट्रम्पच्या काळात या लोकांना त्यांच्या असायलम अ‍ॅप्लिकेशनवर निर्णय होईपर्यंत मेक्सिकोमधेच राहायला भाग पाडण्याचा एक बदल ट्रम्पने केला होता. पुढे बायडेनने तो आधी काढला व नंतर कोर्टाने तो पुन्हा लागू केला. त्यातही बरेच प्रॉब्लेम्स होते पण अमेरिकेच्या दृष्टीने एक फायदा हा होता की जोपर्यत अमिरिकन कायद्याप्रमाणे ज्यांना असायलम मिळत नाही तोपर्यंत ते बॉर्डरच्या आत येऊ शकत नव्हते. नाहीतर अमेरिकेचा एरव्ही कायदा असा आहे की बॉर्डरवर कोणी असायलम ला अ‍ॅप्लाय केले की त्यावर निर्णय होईपर्यंत अमेरिकन सरकार त्यांची जबाबदारी घेते. पण त्यामुळे येणार्‍यांचे प्रमाणही वाढते. प्रत्यक्षात असायलम फार कमी लोकांना मिळते. पण तोपर्यंत बॉर्डरवरच्या राज्यांवर बोजा वाढतो, त्यातून निसटून अमेरिकेत शिरणारे लोकही वाढतात.

अमेरिकेला उद्या मनुष्यबळाची गरज पडली तर येणार्‍यांची कमी नाही. कायदे बदलून आणखी बरेच लोक येउ शकतील.

स्प्रिंगफील्ड मधल्या हैतीच्या लोकांची केस वेगळी आहे. ते सगळे कायदेशीर प्रोसेस मधून आले आहेत (असे किमान वाचले आहे). ते पाळीव प्राणी खाणे वगैरे सोडा. पण एकाच गावात इतक्या मोठ्या संख्येने इमिग्रंट्स आले तर तेथील व्यवस्थेवर बोजा येणार, येणार्‍या लोकांचे कल्चर वेगळे असले तर तेथील लोकांमधे त्याबद्दल संशय/नाराजी ई असणारच. सोशल नेटवर्क्सवर त्याबद्दल virtue signalling करणे किंवा अशा लोकांना रेसिस्ट ई म्हणणे फार सोपे आहे. पण अगदी पुण्यात सुद्धा मराठीबहुल सोसायट्यांमधे उद्या जर अचानक बरेच अमराठी लोक आले तर बहुतांश लोकांची प्रतिक्रिया अशीच असते. हे अमेरिकेत भारतीय इमिग्रंट्सबद्दलही तितकेच लागू आहे. म्हणून कोणी एखाद्याला धमक्या, हल्ले वगैरे केल्याचे समर्थन नाही, पण स्थानिकांना न आवडणे, हे लोक आमचे कल्चर बिघडवत आहेत वगैरे लोकंनी म्हणणे हे स्वाभाविक आहे. मुंबईत काय वेगळे केले होते तमिळ, उत्तर प्रदेशी वगैरेंच्या बाबतीत.

“सध्या ग्रीनकार्ड प्रक्रियेला एकाहून जास्त दशके लागू शकतात असे ऐकले आहे. पण आगंतुक घुसखोरांना मात्र तातडीने सामावून नागरिकत्व द्यावे असा धोशा लावला जातो. असे का?” - ह्या मुद्द्याशी टोटली सहमत आहे. इल्लिगल इमिग्रेशनचं (ह्यात अगदी जीवावर बेतलं म्हणून शेजारच्या देशात पळून गेले ही कॅटेगरी सोडली तर) समर्थन मी तरी नाही करू शकत. भरघोस पैसे मोजून, बेकायदेशीर घुसघोरी करणार्यांविषयी सहानुभूती नाही.

फारेंड पोस्ट आवडली.
मला खरे तर डाका प्रकारही अजिबात आवडला नव्हता. त्यानंतर एकटी मुलं पाठवणे वाढले. h-4 वर लिगली असलेल्या शिकल्या सवरलेल्या मुलांना वय वर्षे २१ नंतर देश सोडा/ f1/h1 करा असे भिकार पर्याय आणि या लोकांना मात्र आश्रय हे कायच्या कैच!
भिंत बांधणे, त्याचे पैसे मेक्सिको दीएल वगैरे इलेक्शनच्या बाता. अशी भिंत बांधणे प्रॅक्टीकल नाही, आर्थिक दृष्ट्या आणि भौगोलिक दृष्ट्याही. गावागावातून असलेले कायदे पाळायला लावले, इल्लिगल वर्क फोर्ससाठी दणकट फाईन लावले तर नक्कीच फरक पडतो. काम करता येते, पैसे मिळतात म्हणून लोकं रिस्क घेवून येतात. अमेरीकेला कामासाठी माणसे हवीत तर वेगवेगळ्या देशाशी करार करुन तिथून ट्रेनिंग देवून, बाकी सर्व चेक करुन आणता येतीलच. तसे का करत नाहीत?
बॉर्डरवरच्या स्टेट मधून लोकं सो कॉल्ड सॅंकचुरी भागात बस केली ते एका अर्थी बरेच झाले. बॉर्डरवरच्या गावांवर किती बर्डन येते त्याची झलक या लोकांना मिळाली.
माझे असे झाले आही की मला दोन्ही बाजूच्या बर्‍याच पॉलिसी न पटणार्‍या , एका बाजूचा उमेदवार व्यक्ती म्हणून न पटणारा. एक बरे आहे, माझ्या मताला किंमत शून्य. तेव्हा लोकल गवरमेंटपुरता विचार करावा आणि गप बसावे झाले.

>>तरी रिपब्लिकन्स हे लीगल व इल्लिगल मधे तितका फरक करत नाहीत. त्यांना न आवडणारे सगळेच अनवेलकम.<<
हॅवंट सीन सच ए लोडेड स्टेटमेंट इन ए व्हाइल.. जरा विस्कटुन सांगा...

आतापर्यंत मागा रिपब्लिकन जॉर्ज सोरोस बद्दल कुजबुज करायचे. की बघा, अमुक डेमोक्रॅट सोरोसच्या पैश्यावर आहे वैगेरे.

आता इलॉन मस्क ओपनली ट्रम्प साठी मिलीयन आणि मिलीयन डॉलर देत आहे. ट्रम्प त्याला ब्युरोक्रसी मध्ये खुडबुड करण्यासाठी एक नवे खाते आणि त्या खात्याचा कारभार देण्याचे वचन देत आहे. उघड पणे डोनेशन साठी जगातल्या सर्वात श्रीमंत माणसाला सरकारी कामकाजात थेट निमंत्रण. वा.
https://edition.cnn.com/2024/09/05/politics/trump-economic-plans-musk-go.....

इलॉन मस्कने ट्विटर घेण्याआधी बराच दंगा केला होता. आता ट्विटरवर स्वतः रोज ट्रम्पचा प्रचार करत असतो.

आणखी एका बाईंनी ट्रम्प वर सेक्श्युअल असोल्टचा आरोप केला आहे. पण आता पब्लिकला सवय झाली आहे. जीन कॅरोल बाबतीत तर कोर्टात पण ट्रम्पविरुद्ध आरोप सिद्ध होऊनही समर्थक अजून समर्थन करतायत. मग नवीन आरोपाला कोण हिंग लावून विचारतंय?

>>आतापर्यंत मागा रिपब्लिकन जॉर्ज सोरोस बद्दल कुजबुज करायचे. की बघा, अमुक डेमोक्रॅट सोरोसच्या पैश्यावर आहे वैगेरे.
१. सोरोस कशासाठी पैसे देत होता? तर गुन्हेगारांना शिक्षा न करणारे वकील, नेते निवडून यावेत आणि अमेरिकेत सर्वत्र अराजक माजावे ह्या उद्देशाने तो योग्य उमेदवारांना पैसे पुरवत होता आणि आहे. त्याची फळे विविध शहरात दिसत आहेत! सॅन फ्रॅन्सिस्क्तो, लॉस अ‍ॅन्जेलिस, शिकागो, पोर्टलँड इथे गुन्हेगारीचा उच्छाद इतका वाढला आहे की कित्येक गुन्हे नोंदवूनही घेतले जात नाहीत. रस्त्यावर पार्क केलेल्या कारवर "ह्या कारमधे मूल्यवान काहीही नाही. कृपया काच फोडू नका!" असे सांगणारे कागद चिकटवलेले दिसतील! अनेक दुकानात गुंड लोक घुसून हव्या त्या गोष्टी घेऊन सरळ बाहेर चालू लागतात. ९५० डॉलर पेक्षा कमी किंमतीच्या वस्तू चोरल्या तर कुणी गुन्हाही समजत नाही! किती किती छान आहे. अशामुळे अनेक अनेक दुकाने सॅन फ्रॅन्सिस्कोतून गाशा गुंडाळत आहेत. अनेक कंपन्या आपली शेकडो दुकाने बंद करत आहेत. किती किती छान!

२. सोरोस आम्हाला पैसे देतो हे उघड कुणी मान्य करत नाही कारण अशा जनहितविरोधी गोष्टींकरता तो पैसे पुरवतो.

३. निव्वळ सोरोस नाही तर स्टीव्ह जॉबची पत्नी, बिल गेट्स, लिंक्डइनचा संस्थापक रीड हॉफमन हेही उद्योजक डेमोक्रॅटनी जिंकावे आणि ट्रंप हरावा म्हणून कोट्यावधी डॉलर वेगवेगळ्या गोष्टींसाठी पुरवले आहेत. शिवाय अनेक नट नट्या तर डेमोक्रॅट धार्जिण्या आहेतच.

४. इतक्या प्रचंड संख्येने डेमोक्रॅट पक्षाला मदत करणारे अती धनाढ्य लोक असताना एका इलॉन मस्कने ट्रंपला मदत केली की लोकांच्या डोळ्यात सलते हे खूप गमतीचे आहे.

५. इलॉन मस्कचे एक कारण खूप वैयक्तिक आहे. त्याच्या एका कन्येने ट्रान्स जेंडर कल्ट स्वीकारला आहे. ती आता मुलगा बनली आहे. आणि ती मस्कचा तिरस्कार करते. ह्या मुलीचे डोके फिरण्याचे कारण हे कॅलिफोर्नियातील वोकिज्म कल्ट आहे असे मस्क् मानतो. अल्पवयीन मुलांचे त्यांच्या पालकांच्या नकळत लिंग बदल करण्याची शाळेच्या प्रशासनाला, सरकारला मुभा असावी असे कॅलिफोर्नियाचे सरकार मानते. अशा अल्पवयीन मुलींचे स्तन शस्त्रक्रिया करून कापले जातात. शरीराच्या अन्य अवयवांची कापाकापी करून खोटी जननेंद्रिये लावली जातात. त्याकरता लाखो डॉलर खर्च केले जातात. विविध हार्मोनचा मारा करून त्या मुलीच्या शरीराची जैव रासायनिक प्रयोगशाळा केली जाते. मुलगा असेल तर त्याच्या उलट . त्याचे जननेंद्रिय शस्त्रक्रियेने कापून तिथे आणखी नवी कापाकापी करून स्त्रीच्या जननेंद्रियाशी मिळते जुळते काहीतर बनवले जाते. शरीराची जैव रासायनिक प्रयोगशाळा केली जाते. आणि हे सगळे पालकांची अनुमती नसली तरी. किती किती छान आणि दयाळू लोक आहेत हे!
अशा बहुतेक मंडळींचे आयुष्य उध्वस्त होते. ह्यातले अनेक बदल असे असतात की त्याची चक्रे पुन्हा उलटी फिरवता येत नाहीत. त्या व्यक्तीला आपण आपले लिंग कृत्रिमरित्या बदलल्याचा पश्चाताप होऊन काहीही उपयोग होत नाही.
लहान मुले लहरी असतात. लहान मुले प्रगल्भ नसतात. त्यांना आपण जी कृती करत आहोत तिचा दीर्घकालीन परिणाम काय होणार आहे हे जाणायची कुवत अनेकदा नसते. कायद्याने लहान मुलांना स्वतःच्या मर्जीने अनेक गोष्टी करायला बंदी आहे. मात्र लिंगबदल करताना ह्यातले काहीही विचारात घेतले जात नाही. ह्या उपक्रमामागेही सोरोसच आहे.
तर ह्या वैयक्तिक कारणामुळे मस्क हा कट्टार वोक विरोधी बनला आहे.

६. मस्कने आपण ट्रंपला समर्थन करतो हे आणि ट्रंपने मला मस्क समर्थन देतो आहे हे कधीही लपवलेले नाही. मस्क जाहीरपणे प्रचारात दिसतो. सोरोस किंवा त्याची पिलावळ असे करेल काय? वाटत नाही.

Pages