Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
तिथे अॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
“ हरमन्प्रीत टोकापर्यंत घेऊन
“ हरमन्प्रीत टोकापर्यंत घेऊन येत असते नेहमी पण तिच्याने शेवटचा गोल पोस्ट ट्च करताना नेहमीच गडबड होत असते.” - .खरंय. म्हणूनच वर लिहिलंय “सचिनचा मोठेपणा जास्त जाणवतो अश्या वेळी. कित्येक मॅचेस अक्षरशः एकहाती जिंकून दिल्या आहेत त्याने त्या काळात.”
"टेस्ट' सुरु आहे
"टेस्ट" सुरु आहे
हीरो बनायाच्या नादात टॉप
हीरो बनायाच्या नादात टॉप ऑर्डर गडगडली...
टॉस जिंकून बॅटिंग घेतल्यावर ही १२.४ ओव्हर मधे १३/३
शर्मा -२, कोहली -०, सर्फराज -०
पाऊस आला धाऊन...
न्युझीलंड संघात तीन वेगवान,
न्युझीलंड संघात तीन वेगवान, स्विंग त्यांची स्ट्रेंथ, जी ढगाळ वातावरणात अजून वाढणार असे असताना पहिली फलंदाजी निर्णय चुकला का?
त्यात फलंदाजी क्रम सुद्धा चुकला,
शर्मा, जैस्वाल, राहुल, कोहली, पंत, सरफराज असा हवा होता..
आता जरा बरा स्कोर आहे. ३३/4
आता जरा बरा स्कोर आहे. ३३/4
ओह नो.३३/५
ओह नो.३३/५
बस झाले. दुसरी कामे आहेत कि.
बस झाले. दुसरी कामे आहेत कि.
३६, ४२, ५८, ६६ हे आपले लो
३६, ४२, ५८, ६६ हे आपले लो स्कोर. आता अश्विन काही करतो का बघायला हवे.
पहिल्या बॉल वर गेला आश्विन
पहिल्या बॉल वर गेला आश्विन
३४/७
एकटा चुम्मा खेळतोय, ते ही एक
एकटा चुम्मा खेळतोय, ते ही एक जीवदान मिळून.हे लिहिले तोवर आऊट झाला.
गेला पंत ३९/८
गेला पंत
३९/८
गेल्या ५ ओव्हर मधे ८ रन झाल्या आहेत, अन् ५ विकेट्स गेल्या
अफलातून झेल
अफलातून झेल
अश्या वेळी टॉप स्कोअरर साधारण
अश्या वेळी टॉप स्कोअरर साधारण पंतच असतो. इथेही तोच आहे यात आश्चर्य नाही. पण सगळेच रन इतके कमी आहेत की याचा काही फायदा नाही.
आता गोलंदाज आणि आपली दुसऱ्या डावातील फलंदाजी बघूया कशी होते आणि सामना कुठे जातोय
सर्व बाद ४५
सर्व बाद ४६.
ऑस्ट्रेलियात ३६ केले होते त्यापेक्षा तब्बल १० जास्त!
"अश्या वेळी टॉप स्कोअरर
"अश्या वेळी टॉप स्कोअरर साधारण पंतच असतो"
या कॉन्फिडन्ससाठी तुमची दाद द्यायला हवी.
NZ चा लोवेस्त एवर स्कोअर 29 आहे, आता कर्णधार रोहित काही करेल का आणि भारत 10 विकेट झटापट घेईल का?
न्युझिलंडने २५० ते ३००
न्युझिलंडने २५० ते ३०० केल्यास भारताचे भवितव्य कठीण आहे ह्या सामन्यात.
इथे क्रिकेट मधली तज्ज्ञ
इथे क्रिकेट मधली तज्ज्ञ मंडळी आहेत. कोणी समजाऊन सांगेल काय NZ ने काय जादू केली?
न्युझीलँड एकदा आपल्याला 80
न्युझीलँड एकदा आपल्याला 80 मध्ये ऑल आऊट केले होते.
आपण दुसऱ्या इनिंग मध्ये 500+ मारले होते.
न्युझीलँड ने कसाबसा तो सामना अनिर्णीत राखला होता.
Result
Result
India vs New Zealand, 1st Test
New Zealand tour of India
IND 83 & 505/3d
NZ 215 & 251/7
Match drawn
Click here to view more @espncricinfo : https://www.espncricinfo.com/series/new-zealand-tour-of-india-1999-00-62...
चौथ्या इनिंग मधे तीनही स्पिनर
चौथ्या इनिंग मधे तीनही स्पिनर ना फायदा मिळावा म्हणून पहिल्या डावात बॅटिंग घेतली. पिच ला अनइव्हन बाऊन्स असताना अन् सकाळी वारे वहात असताना टिकून एक दीड सेशन खेळून काढणं गरजेचं होतं. पण ते कुणालाच जमलं नाही. सगळे एक तर बाऊन्स वर गंडले किंवा हीरो बनायच्या नादात चुका करून बसले. त्यात फिल्डिंग अन् कॅचिंग कमाल होतं.
दुपारी ऊन पडलं अन् वारं पण गेलं. पिच ड्राय व्हायला लागलं अन् बॅटिंग सोपं होत गेलं. दोन च पेसर असल्याने अन् बाकी कुणीही कामचलाऊ मीडियम पेसर नसल्याने स्पिनर ना लवकर आणायला लागलं अन् त्यांना धोपटलं...
आता अवघड आहे.
ऋ नी उल्लेखलेल्या सामन्यात पिच अन् हवामानाचा इश्यू नसावा. बोलिंग युनिट मधे दादा नी उपयुक्त ६व्या बॉलर चा रोल केला आहे. कुठलाच बॉलर फार धोपटला गेला नाहीये अन् दुसऱ्या डावात सगळ्यांनी नांगर टाकून बॅटिंग केली आहे (आताच्या टीम मधे ते होण्याचा चान्स खूप कमी आहे)
दुपारी ऊन पडलं अन् वारं पण
दुपारी ऊन पडलं अन् वारं पण गेलं. पिच ड्राय व्हायला लागलं अन् बॅटिंग सोपं होत गेलं.>>> करेक्ट. आपली इनिन्ग्स साम्पायचीच वाट बघत होते.
त्यांनी चांगली गोलंदाजी केली अस नाही म्हणायचे. आपल्या फलंदाजांनी खराब फलंदाजी केली असे म्हणायचे.
त्यांनी चांगली गोलंदाजी केली
त्यांनी चांगली गोलंदाजी केली अस नाही म्हणायचे. आपल्या फलंदाजांनी खराब फलंदाजी केली असे म्हणायचे
>>
बरं बाबा
आपल्या कुठल्याही महान फलंदाजाला घराच्या कंडीशन मधे त्यांची पिच कडून मदत मिळत असतानाची चांगली गोलंदाजी खेळून काढता आली नाही...
ठीक आहे???
क्रिकेट खेळच असा आहे ज्यात
क्रिकेट खेळच असा आहे ज्यात खेळपट्टी आणि हवामान हे खेळाडूंच्या हातात नसलेले फॅक्टर खेळावर आपला प्रभाव पाडत असतात. त्यामुळे याला बेभरवशाचा खेळ म्हटले जाते. असे दिवस यात दिसणारच. आता इथून पुढे आपले प्लेअर मेंटल टफनेस किती दाखवतात हे बघूया. अर्थात खेळपट्टी अजून दोन दिवसांनी काय रंग दाखवते हे आलेच. पण तूर्तास ती अजून दोन दिवस चांगली राहील असे गृहीत धरूया.
बाई दवे, गेल्या काही वर्षात बरेच मालिकात आपण पहिला सामना हरत आलोय. हा सुद्धा एक पॅटर्न आहे म्हणू शकतो.
न्युझीलँड ने कसाबसा तो सामना
न्युझीलँड ने कसाबसा तो सामना अनिर्णीत राखला होता. >>> तीच मॅच आठवली आज! त्या काळात काहीतरी मिसिंग होते आपल्या अॅटॅक मधे. मॅच क्लोज करू शकायचो नाही आपण. कितीतरी मॅच दुसर्या संघाच्या ५+ विकेट्स जाउन अनिर्णित राहिल्या होत्या.
“ त्या काळात काहीतरी मिसिंग
“ त्या काळात काहीतरी मिसिंग होते आपल्या अॅटॅक मधे. मॅच क्लोज करू शकायचो नाही आपण” एकंदरीतच मॅच सेव्हिंग इनिंग्ज खेळायची तयारी, टेंपरामेंट जास्त होतं प्लेयर्स कडे. टेस्ट मॅच ड्रॉ होणं ही कुळाला बट्टा लागल्यासारखी घटना नव्हती. वर उल्लेख केलेल्या मॅच चं स्कोअरकार्ड बघ. कितीतरी बॅट्समेन २५-३५ च्या स्ट्राईकरेटने मोठ्या इनिंग्ज खेळले आहेत.
त्या मॅचमध्ये भारतात खेळताना
त्या मॅचमध्ये भारतात खेळताना आपण पहिल्या डावात असे ८३ ला सर्वबाद होणे हा एक धक्का बसलेला मला. पण तरीही हे पहिल्या सकाळी मदत मिळाल्यामुळे झाले आणि दुसऱ्या डावात आपण सचिन दादा द्रविड असताना भरपाई करून मोठा डोंगर रचणार याची मला पूर्ण खात्री होती असे आठवतेय. त्यामुळे मला त्या डोंगराचे कौतुक वाटले नव्हते. पण श्रीनाथने जे पीचमधून मदत मिळायचे बंद झाल्यावर देखील विकेट काढून त्यांचा पाहिला डाव लवकर संपवला होता त्याचे मला जास्त कौतुक वाटलेले.
उद्या बुमराहने देखील एखादा स्पेशल स्पेल टाकावा आणि नेहमीप्रमाणे मोक्याच्या क्षणी विकेट काढून त्यांचा डाव लवकर संपावावा.. हे फार गरजेचे आहे.
कारण खेळपट्टी चांगली असतानाच आपला डाव सुरू झाला पाहिजे.
माझी अपेक्षा आणि अंदाज - पूर्ण दिवसाचा खेळ झाल्यास,
न्युझीलंड निम्मा दिवस खेळून ३२० सर्वबाद.
भारत दिवस अखेरीस एक ते दोन विकेट गमावून १५० धावा.
शनिवारी भारत ४७५ ऑलआऊट..
रविवारी न्यूझीलंडला २०० धावांचे टार्गेट
त्यांनी थोडे जास्त मारले तर थोडे आपणही जास्त मारू.. पण टारगेट २०० चेच देऊ
चौथ्या इनिंग मधे तीनही स्पिनर
चौथ्या इनिंग मधे तीनही स्पिनर ना फायदा मिळावा म्हणून पहिल्या डावात बॅटिंग घेतली >> रोहितनेही हा निर्णय अंगाशी आला असे म्हटले आहे. अनिर्णित राखायलाही कोणालातरी काहीतरी अविस्मरणीय करावे लागणार आहे.
"अनिर्णित राखायलाही कोणालातरी
"अनिर्णित राखायलाही कोणालातरी काहीतरी अविस्मरणीय करावे लागणार आहे." - दोनपैकी एक - 'ओ पालनहारे' किंवा 'घनन घनन घन, घिर आये बदरा' - ह्या दोघांवर सगळं अवलंबून आहे.
घनन घनन घन, घिर आये बदरा
घनन घनन घन, घिर आये बदरा
>>
लख्ख ऊन आहे आज...
काल सकाळ नंतर बिलकुल पाऊस पडला नाहीये
दुसऱ्या डावात आपण सचिन दादा
दुसऱ्या डावात आपण सचिन दादा द्रविड असताना भरपाई करून मोठा डोंगर रचणार याची मला पूर्ण खात्री होती असे आठवतेय. त्यामुळे मला त्या डोंगराचे कौतुक वाटले नव्हते
>>
तुला खात्री नसताना कुणी खेळलं तरच तुला कौतुक वाटतं होय...
म्हणजे बहुदा तुला शर्मा, पंत अन् धोनी बद्दल कधीच खात्री नसावी...
Pages