क्रिकेट - ८

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

तिथे अ‍ॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाहिले हायलाइट्स कालचे. खतरनाक बॅटिंग.

रोहितच्या पहिल्या दोन सिक्सेस म्हणजे एकदम Statement of intent होते. पंत टिकायला हवा होता. क्रीजवरचे सगळे अँटिक्स बघायला मिळाले असते Happy डीप फाइन लेगला सिक्स आणि इकडे हा क्रीजवर आडवा वगैरे.

कपिल शर्मा शो मध्ये आज रोहीत सूर्या अर्श अक्षर आणि दुबे आले होते.. धमाल..
रोहितने ऋषभ पंत चा सांगितलेला किस्सा आणि त्यानंतर पुढे जे म्हणाला.. वायरल मटेरियल आहे

IND-Ban 20-20
इंडिया ७.१ ओवर १०२-१
आज वर्ल्ड रेकॉर्ड मारायचे ठरवून आलेत असे खेळत आहेत. शेवटपर्यंत राहणार हा रनरेट जर विकेट नाही पडल्या.
बांगलादेशला पूर्ण निर्वस्त्र करून पाठवणार यंदा.

२०२२ वर्ल्डकप नंतर इंडियाने जाणीवपूर्वक अंगिकारलेला हा टी २० क्रिकेटचा ब्रँड आहे. सुपर-अ‍ॅग्रेसिव्ह बॅटिंग, त्यांचा दिवस असेल तर बॅटिंग/बॉलिंग वर एकहाती मॅच जिंकू शकतील असे ७-८ ऑलराऊंडर्स, आणि बेदरकार विजयी मनोवृत्ती. कॅप्टन-कोच, टीम कुणीही असले तरी टेंप्लेट हीच आहे. हे बीसीसीआय आणि टीम इंडियाचं कौतुक आहे.

दादाच्या काळात आपण कितीही फॅब फोर म्हणून मिरवत असलो तरी म्हणावे तितके यश नव्हते. कारण परदेशात हे फलंदाजी करायचे पण गोलंदाजी तोकडीच पडायची. तिथेही हरभजन कुंबळे हेच आपले प्रमुख गोलंदाज ठरत असतील तर सातत्याने जिंकणे अवघड होते.

वेगवान गोलंदाजांची फळी तयार झाली आणि चित्र बदलू लागले. ज्याने किंवा ज्या ज्या कोणी यात योगदान दिले त्यांनी भारतीय क्रिकेटचा चेहरा मोहरा बदलण्यास सुरुवात केली.

पण त्याचवेळी या वेगवान फळीला तितकेच आक्रमक नेतृत्वाची गरज होती. जे कोहलीच्या स्वरूपात लाभले.

तिन्ही फॉरमॅट एकच कप्तान या प्रकाराने आपले नुकसान केले. अन्यथा धोनीची निवृत्ती आधीच कोहली कसोटी कप्तान व्हायला हवा होता. पण त्याचवेळी लिमिटेड मध्ये मात्र धोनीपश्चात कोहली ऐवजी शर्मा कप्तान व्हायला हवा होता.

देर आये दुरुस्त आये म्हणत तो झाला. आणि आल्याआल्याच त्याने ॲप्रोच बदलायची घोषणा केली. त्यानुसार आपण सुरुवातही केली, पण 2022 ला काय माहीत ते दिसलेच नाही. कदाचित कप्तान बदल झाल्यावर जे काही थोडे बहुत अंतर्गत राजकारण होते त्याचा फटका बसला असावा किंवा आणखी काही.

पण त्यांनतर मात्र रोहीत सरळ सरळ आपल्या खेळातून स्टेटमेंट देऊ लागला की आता शतके आणि एवरेज नाही तर स्ट्राईक रेट आणि इम्पॅक्ट मॅटर करणार. 2023 वर्ल्ड कप आधीच हे सेट झाले होते.

त्यामुळे 2023 वनडे वर्ल्ड कप याच ॲप्रोचने आपण गाजवला. अगदी फायनलला रोहीत बाद होईपर्यंत आपण आपल्या बदललेल्या ॲप्रोचसह हिट होतो. पण अंतिम निकाल दुर्दैवाने मनासारखा लागला नाही.

2024 वर्ल्डकपला मात्र त्याची कसर भरून काढली. ऑस्ट्रेलियाविरुद्धची रोहितची खेळी त्याचे एक खणखणीत स्टेटमेंट होते. ज्याला आकड्यानपलीकडचे क्रिकेट समजते त्याला ती कायम लक्षात राहणार.

या काळात Hash tag Selfless Captain Rohit Sharma हे जे काही ट्रेंडिंग झाले आहे ते नुसते रोहितचे कौतुक नाही तर भारतीय टीम सध्या ज्या ब्रँडचे क्रिकेट खेळत आहे ते दर्शवत आहे. अश्या खेळाचे कौतुक होऊ लागल्याने नवीन खेळाडूंना सुद्धा आता असेच खेळण्याची प्रेरणा मिळू लागली आहे.

ट्वेंटी-ट्वेंटीसाठी कर्णधार म्हणून सूर्या अगदी योग्य निवड आहे. त्याचा स्वतःचा खेळ कमालीचा आक्रमक आहे, आणि रोहितची कप्तानी त्याने जवळून पाहिली आहे. नुसते डावपेच नाही तर टीमबिल्डिंग आणि सहकाऱ्यांशी संबंध कसे असावेत याबाबत सुद्धा तो बरेच काही शिकला असेल. तयार झाला असेल. त्यामुळे आता हिच लीगसी तो पुढे नेणार हे नक्की.

कसोटीत भारताने दोन दिवसात जिंकायचा प्रयत्न करताना घेतलेला ॲप्रोच आणि आज फलंदाजीला उतरल्यावरच आज कुच तुफानी करते है म्हणून सुरू केलेला खेळ हे दोन्ही बोलके आहेत. म्हणूनच आज सुरुवातीलाच मला समजले होते की आज आपण विक्रम घडवणार आहोत Happy

मला वाटले वर्ल्ड रेकॉर्ड झाले पण ते नेपाळने करून ठेवले आहे Happy

आज आपली बॅटिंग पूर्णच बघायला हवी. हायलाइट्स मधे काही सिक्सेस आणि काही फोर्स बघण्यापेक्षा.

“ मला वाटले वर्ल्ड रेकॉर्ड झाले पण ते नेपाळने करून ठेवले आहे” - टेस्ट प्लेयिंग टीम्स मधे आजचा स्कोअर हा सर्वाधिक आहे (नेपाळ, आणि मंगोलिया टेस्ट प्लेयिंग टीम्स नाहीत).

“आज आपली बॅटिंग पूर्णच बघायला हवी.” - १००% सत्य. टस्किन च्या पहिल्याच ओव्हरमधे संजूने लेग स्टंपच्या बाहेर जात त्याला एक्स्ट्रॉ कव्हरमधून दोन बाऊंड्रीज मारल्या. पुढचे दोन बॉल तो जागेवर उभं राहिला. दोन्ही बॉल्स पॅड्सवर अँगल्ड-इन होते (पहिल्या दोन बाऊंड्रीज चा परिणाम), जे संजूने मिड्विकेट आणि फाईन लेगला सीमापार केले. हे लाईव्ह बघताना त्या सेट-अपला नकळत दाद निघून गेली. अश्या अनेक मोमेंट्स होत्या.

हैदराबादमध्ये आयपीएलला सुद्धा 277 झाले होते यंदा.
ते चेस करताना मुंबईने सुद्धा 246 मारले होते.
आज संजूने वेगवान गोलंदाजाला एक बॅक फूट पंच मारला तो सिक्स गेला.
असे शॉट आम्ही गल्लीत अंडर आर्म खेळताना मारायचो ते आठवले.
यंदा आयपीएल मध्ये चार की पाच 250+ स्कोअर झालेले जे आजवर आयपीएल इतिहासात कधी एकदाही झाले नव्हते.
इतके फलंदाजधार्जिणे क्रिकेट बघण्यात देखील मजा नाही असे वाटते.
जिथे गोलंदाजासाठी देखील काहीतरी आहे तिथली फलंदाजी बघायला जास्त मजा येते.

लाईव्ह बघताना त्या सेट-अपला नकळत दाद निघून गेली. अश्या अनेक मोमेंट्स होत्या. >.. टोटली! फार सुरेख शॉट्स होते त्याचे. खूप क्लासी वाटले त्यातले अनेक.

पंड्या आजकाल जास्तच "इष्टाइल" मारतो की बराच काळ असाच आहे? परवा त्याने डोक्यावरून एक शॉट मारला तर बॉल कोठे जातोय ते न बघता ते माहीत असल्यासारखा उभा राहिला. साउथचे हीरो फायटिंग करतात तसा. आजही काही शॉट्सना तसा वाटला. showing total disdain

संजू आज एकदम संजू सारखा खेळला. नसता खेळला त्याचे कठीण होते त्याचे. "अश्या अनेक मोमेंट्स होत्या." हे एकदम बरोबर. त्यासाठीच त्याला एक परमनंट स्लॉट मिळायला हवा.

आजही काही शॉट्सना तसा वाटला. showing total disdain >> आधी ही मारत असे. बसला कि स्वॅग वाटतो.

“ पंड्या आजकाल जास्तच "इष्टाइल" मारतो” - चालतं रे. मोक्याच्या वेळी खेळतो हे महत्वाचं. वर्ल्डकप जिंकल्यानंतरचे त्याचे अश्रू त्याची दुसरी बाजू पण दाखवून गेले.

“ त्यासाठीच त्याला एक परमनंट स्लॉट मिळायला हवा.” - कदाचित टी२० मधे जैस्वालबरोबर ओपनिंग हाच त्याचा स्लॉट असेल (कोहली, शर्माच्या रिटायरमेंट नंतर कदाचित वनडे मधे पण त्याला जागा मिळू शकेल). रोहित सारखा लेट बूमर असू शकेल.

*आज आपली बॅटिंग पूर्णच बघायला हवी.” -* - बरेच दिवस क्रिकेट पाहिलं नव्हतं आणि काल योगायोगाने नेमकी आपली पूर्ण बॅटिंग पाहिली ( मुख्यत:, आवडता सॅमसन खेळत होता म्हणून ! ). खरं सांगू, प्रथम खूप बरं वाटलं पण नंतर मात्र इतकं एकतर्फी क्रिकेट पहायचा कंटाळा आला. निर्जीव गोलंदाजी नुसती निर्दयपणे सतत झोडली गेलेली
फार वेळ नाही पहावत !

बॉक्सिंगसारखी ' नॉक आउट ' ची तरतूद क्रिकेटच्याही नियमांत असती, तर खेळ आता बंद करता आला असता !!!20181215_133742_7.jpg

भाउ, चित्र छान., फरक एव्हढाच की, क्रिकेटमधे केंव्हा काय होईल सांगता येत नाही, दहाव्या विकेटसाठी ३०० धावांची भागिदारी! अशी हेडलाइनहि बघायला मिळेल.

भारत ऑस्ट्रेलिया बायकांचा सामना चालू आहे.
शारजाला मॅच आहे.

आज आपण जिंकलो आणि न्यूझीलंड हरली तरी प्रश्न मिटला. किंवा न्यूझीलंड जिंकली तरी त्यांचा रन रेट आपल्या वर जाता कामा नये.

सध्या आपला रन रेट न्यूझीलंड पेक्षा थोडा जास्त आहे.
त्यामुळे आपण हरलो आणि न्यूझीलंड सुद्धा साधारण तेवढ्याच फरकाने हरली तर आपण पुढे जाऊ.

आता प्रॉब्लेम असा आहे की आपला सामना बलाढ्य ऑस्ट्रेलिया सोबत आहे. आणि न्यूझीलंडचा पाकिस्तान सोबत.

आपला रन रेट न्युझीलँड वर राहायला १३९ मारावे लागतील.
मग न्युझीलँड एक रन ने हरली तरी चालेल. आपले त्यापेक्षा कमी झाले तर न्युझीलँड तितक्या फरकाने हरावी लागेल.

बाई दवे, त्यात संजय मांजरेकर कॉमेन्ट्री करत आहे. तो आता म्हणाला. पीच मे जरा भी पेस नही है. स्पंजी बाऊन्स है. मागची एक चर्चा आठवली.

इंडिया-ऑस्ट्रेलिया - मस्ट विन गेम - सतत डेझर्ट स्टॉर्मच आठवतं. Happy

तीन चांगल्या बॅटर्स आऊट झाले आहेत इंडियाचे. हरमन-दीप्ती ला मोठी पार्टनरशिप करावी लागेल. निदान जिंकून ६ पॉइंट्स झाले तरी पुढचं पुढे पहाता येईल.

हो, शारजाहला इंडिया ऑस्ट्रेलिया आणि क्वालिफिकेशन सिनारिओ त्यामुळे सर्वाँनाच सचिनचा डेझर्ट स्टॉर्म आठवत आहे.

बॅड लक, वेल प्लेड ! महिलांचा संघ छानच खेळला, विशेषतः फलंदाजी व यष्टीरक्षण अप्रतिम ! क्षेत्ररक्षण, मुख्यतः झेल पकडणं, यावर त्यांनीं अधिक मेहनत घ्यायला हवी असं वाटलं. नशिबाने साथ दिली तर अजूनही बाद फेरीत येवू शकतात. शुभेच्छा.

बॅड लक, वेल प्लेड ! >> बॅड लक कसं काय म्हणू शकता भाऊ तुम्ही ? तो कोलॅप्स Sad

कदाचित टी२० मधे जैस्वालबरोबर ओपनिंग हाच त्याचा स्लॉट असेल >> जैस्वाल पेक्षाही अभिशेक बरोबर असावा असे वाटतबॉलिजय्स्वाल ला वन डे नि टेस्ट साठी ठेवावे. मोठ्या प्रयासाने असा जबरदस्त ओपनर मिळाला आहे Happy

“ बॅड लक कसं काय म्हणू शकता ” - आत्ताची भारताची मुलींची टीम, ९० च्या दशकातल्या पुरुषांच्या टीमसारखी आहे. इंडिव्हिज्युअल ब्रिलियन्सवर काही मॅचेस जिंकतीलही (सचिनचा मोठेपणा जास्त जाणवतो अश्या वेळी. कित्येक मॅचेस अक्षरशः एकहाती जिंकून दिल्या आहेत त्याने त्या काळात). पण अजून एक टीम म्हणून अभेद्य नाही. कदाचित बीसीसीआय त्यांना तितकं इन्फ्रास्ट्रक्चर पुरवू शकेल आणि ती टीमही अजिंक्य होईल पुढच्या काही वर्षात.

इन्फ्रास्ट्रक्चर नि मेंटाल कोचिंगची गरज आहे. भयंकर टॅलेंटेड आहेत पण पारच कोलमडतात प्रेशर आले कि . एकदम ९० ची टीम म्हणालास तसे वाटते.

*बॅड लक कसं काय म्हणू शकता भाऊ तुम्ही ? * - प्रथम पासून योजनापूर्वक 7+ ची सरासरी ठेवून छान फलंदाजी करत होत्या त्या मुली ! नंतर कांहीं चूका झाल्या, तरीही 152 चं लक्ष्य ऑसीजच्या नेटक्या क्षेत्ररक्षणाविरुद्ध इतक्या छोट्या मर्जिंनने हुकलं म्हणून ' बॅड लक ', इतकंच.

बाबर आझमला आज पाकिस्तानने बसवला.
गेल्या १८ इनिंग मध्ये एकही अर्धशतक नाही.
आणि त्याला काढून ज्या कामरान गुलामला घेतले त्याने पदार्पणात अर्धशतक मारले Happy

नंतर कांहीं चूका झाल्या, >> आलं लक्षात. मला शेवटच्या ओव्हर मधले डावपेच काही समजले नाहित. हरमनप्रीत ने दोनदा सिंगल घेऊन नव्या फलंदाजाला खेळायला लावले.

या वर्ल्डकपला शारजाला दहा ते अकरा सामने झाले.
त्यात हा १५१ सर्वाधिक होता.
त्या खालोखाल १४८ ऑस्ट्रेलियाचाच होता.
त्या खालोखाल १४२, जे आपण मारले.
त्या खालोखाल १२५..
त्या खालोखाल सगळे १००-११० घरात आहेत.
तरी आपण या स्लो पीचवर ऑस्ट्रेलियासमोर टारगेटच्या इतक्या जवळ पोहोचू असे मला वाटले नव्हते.

आपल्याला खरा फटका न्यूझीलंड सामन्यात बसला. तेव्हाच मला पुढे जाऊन असे होणार वाटलेले. कारण ऑस्ट्रेलिया पुढे जाणारच होती आणि त्या नंतर न्यूझीलंडशीच स्पर्धा होती आपली. आणि त्यांच्याशीच हरलो.

“ हरमनप्रीत ने दोनदा सिंगल घेऊन नव्या फलंदाजाला खेळायला लावले.” - तिने गिव्ह-अप केलं असं वाटलं. अगदी काही नाही तर शेवटच्या ३ बॉल्स मधे १३ रन्स हवे असताना तरी तिने स्ट्राईक ठेवायला हवा होता. असो.

आजपासून इंडिया-न्यूझिलंड टेस्ट (वेदर परमिटिंग)!!

आजपासून इंडिया-न्यूझिलंड टेस्ट (वेदर परमिटिंग)!!
>>
सोमवारी रात्रिपासून ऑलामोस्ट सतत पाऊस आहे. काल रात्री थोडी विश्रांती घेतली इतकंच.
रस्त्यात नद्या वाहतायत
आज खेळ होणं खूप अवघड आहे...

आजचा पूर्ण दिवस वाया.
पुढचे दिवस सुद्धा पाऊस आहे म्हणतात.
हा सामना अवघड आहे निकाल लागणे.
उतरणार आपले पॉइंट. नाहक फटका.
तरी बरे बांगलादेशला खोलला दोन दिवसात. तिथे पॉइंट नाही गेले.

तिने गिव्ह-अप केलं असं वाटलं >> तेच तर झेपले नाही. डू ऑर डाय मॅच होती आपल्यासाठी खरं तर. पाकिस्तान किवीज ना हरवेल वगैरे वर भरवसा ठेवण्यात काय हशिल होता कोण जाणे. परफेक्टच ९० टीम वाटते ह्याबाबत. Happy हरमन्प्रीत टोकापर्यंत घेऊन येत असते नेहमी पण तिच्याने शेवटचा गोल पोस्ट ट्च करताना नेहमीच गडबड होत असते. Sad

Pages